एक वादळ शांत होतांना

Primary tabs

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
4 Jun 2019 - 1:17 am

जेव्हा बॉक्सिंग हा शब्द मनात येतो तेव्हा- तेव्हा तुमच्यासमोर सर्वात पहिले नाव येत ते The undisputed heavyweight champion of the world ‘महंमद अली’चं! १७ जानेवारी १९४२ ला केंटकी मधल्या लुइजविल शहरात त्याचा जन्म झाला. त्याचं आधीचं नाव 'कॅशियस क्ले'
१२ वर्षाचा असताना त्याची सायकल चोरीला गेली होती, त्याची तक्रार करण्यासाठी तो मार्टिन नावाच्या एक पोलिस ऑफिसरकडे गेला, तिथे त्याचा आवेश पाहून, मार्टिनमामांनी हि उर्जा बॉक्सिंगमध्ये खर्च करायला सांगितली आणि एक जग्गजेत्याचा प्रवास सुरु झाला.
त्याचा उर्जेवर आणि चपळतेवर प्रचंड विश्वास होता. त्याचे रिफ्लेक्सेस एवढे जबरदस्त होते की समोरच्याला त्याच्यापर्यंत पोहचताच यायचं नाही. त्यातूनच त्याची Out -Fighter ची पद्धत विकसित होत गेली आणि तो एक उत्कृष्ट बॉक्सर म्हणून नावारूपाला आला.
१९६० मध्ये त्याने रोम ऑलिम्पिक मध्ये केवळ १८ वर्षाचा असताना २०० पेक्षा जास्त फाईट खेळलेल्या पोलंडच्या अनुभवी झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्कीला. पहिल्याच प्रयत्नात त्याने सुवर्णपदक जिंकलं, आणि असं जिंकलं की सामन्याच्या शेवटी पीर्त्रझकोवस्कीची शॉर्ट रक्ताने माखलेली होती. यानंतर क्लेच्या आयुष्याचा महत्वाचा अध्याय सुरु झाला. त्याने हेविवेट बॉक्सर बनायचं ठरवल होतं. त्यासाठी त्याने आव्हान दिलं, ते तेव्हाच्या वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन सोनी लिस्टनला. क्लेचे लढत जिंकायचे चान्सेस अगदी कमी होते. पण नशिबात काही वेगळेच लिहले होते. पहिल्याच राऊंड तो लिस्टनच्या ठोशांच्या टप्प्याबाहेर होता. तेव्हा क्लेनं डाव्या-उजव्या हातांच्या जोरदार प्रहारांनी त्याला हैराण केलं, पुढे लिस्टनने ही लढतच खेळायला नकार दिला. या लढती नंतर क्लेनं इस्लाम धर्म स्वीकारला आणि कॅशियस क्लेचा 'मुहम्मद अली' झाला. या निर्णयावर लोकांनी टिका केली पण, त्याने कुणालाही भिक घातली नाही.

अलीची जगण्याची पद्धत पण बिनधास्त होती, विएतनाम युद्धात भरती होण्यास त्याने साफ नकार दिला. कारण विचारले तर तो म्हणाला, "Why should they ask me to put on a uniform and go 10,000 miles from home and drop bombs and bullets on Brown people in Vietnam while so-called Negro people in Louisville are treated like dogs and denied simple human rights? No I’m not going 10,000 miles from home to help murder and burn another poor nation simply to continue the domination of white slave masters of the darker people the world over.". यामुळे त्याच्यावर बंदी घातली गेली. तब्बल ३ वर्ष तो बॉक्सिंगपासून दूर होता.
१९७१ ला तो पुन्हा रिंगणात आला. पण फोरमन सोबत झालेल्या या लढतीत अली हरला. १९७४ मध्ये पुन्हा त्याची त्याची लढत होती जॉर्ज फोरमनशी. ही लढत बॉक्सिंगच्या इतिहासात "Rumble in the Jungle". म्हणून प्रसिद्ध आहे. फोरमन आणि अली दोघेही तुल्यबळ प्रतिस्पर्धी होते. आठव्या फेरीपर्यंत चालेली ही लढत प्रचंड ताकदीच्या दोन योध्यांची अशी होती ज्यात कोणीही हार मानत नव्हतं. या लढतीमध्ये अलीने "रोप-अ-डोप" चा आसरा घातला. शेवटी याच योजनेचा त्याला फायदा झाला. एका क्षणी अलीच्या डाव्या हाताच्या एका "हुक" नं फोरमनचं डोकं वर उचललं. दुसर्‍याच क्षणी थोडाही वेळ न गमावता एक ताकदवान उजवा "पंच" फोरमनला चेहर्‍यावर बसला आणि सगळं संपलं ....
फोरमन पाठीवर पडला. नवा जागतिक विजेता हेवीवेट मुष्टियोद्धा होता "महंमद अली"!!!

निवृत्तीनंतर तो एक सुंदर आयुष्य जगला. जगभरातल्या लोकांसाठी, जात, धर्म, पंथ यांचं बंधन ठेवता काम केलं. आपल्या भयानक पंचेस नि समोरच्याला नमोहरम करणारा हा महान खेळाडू, तेवढाच सुंदर माणूस म्हणूनही आयुष्य जगला. जगण्याच्या या लढतीत या योद्ध्याला अखेर मृत्यूने मात दिलीच, पण जगभरातल्या बॉक्सिंग प्रेमीना तो कायम आठवत राहील.
"float like a butterfly, sting like a bee" हे वाक्य सर्वार्थानी जगणारा एक उत्तुंग, विशाल आणि वादळी खेळाडू -
‘महंमद अली !’

MA

पूर्वप्रसिद्धी : www.mandarbhalerao.com

मांडणीसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कंजूस's picture

4 Jun 2019 - 6:19 am | कंजूस

अगदी झटपट अली'चं आयुष्य मांडलं आहे. आवडलं.

पैलवान's picture

4 Jun 2019 - 6:48 am | पैलवान

पण बऱ्याच शुद्धलेखन चुका भातातल्या खड्यासारख्या त्रास देत होत्या.

महासंग्राम's picture

4 Jun 2019 - 12:14 pm | महासंग्राम

पैलवान भौ आता तपासा एकदा

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2019 - 1:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्यावसायिक मुष्टियुद्धात, कॅशिअस क्ले उर्फ महंमद अली" याचे स्थान एखाद्या अढळ तार्‍यासारखे आहे. त्याचे मुष्टियुद्धातले जीवन जितके उत्तुंग होते, तितकेच ते विवादांनी भरलेलेल्ही होते. त्याची त्रोटक ओळख आवडली... जरा विस्तृत असती तर अजून मजा आली असती.

लई भारी's picture

4 Jun 2019 - 2:17 pm | लई भारी

अजून विस्ताराने चाललं असत!

समीरसूर's picture

6 Jun 2019 - 4:14 pm | समीरसूर

लेख छानच आहे. थोडा अजून मोठा चालला असता.

अवांतरः दुसरा धर्म स्वीकारणार्‍या लोकांविषयी मला खूप कुतूहल वाटतं. महम्मद अली (ख्रिश्चन > मुस्लिम), ए. आर. रहमान (हिंदू > मुस्लिम), रे. ना. वा. टिळक (हिंदू > ख्रिश्चन), वाय. एस. आर. रेड्डी (हिंदू > ख्रिश्चन)...काय कारणं असावीत?

अभ्या..'s picture

6 Jun 2019 - 7:45 pm | अभ्या..

काय नाय, पोर्टिंग चा मेसेज टाकल्यावर जुन्या कंपनीला आपण किती व्हॅल्यूएबल कस्टमर होतो ते आठवते. जुनी आणि नवीन कंपनी एकदमच ऑफरचा भडिमार करतात. एकदा पोर्ट झाले की नवीन कंपनी सेम जुन्या कंपनिगत इग्नोर करते तसेच आहे हे.

चौथा कोनाडा's picture

6 Jun 2019 - 9:05 pm | चौथा कोनाडा

हा .... हा ..... हा ..... !

जॉनविक्क's picture

6 Jun 2019 - 9:14 pm | जॉनविक्क

आपण नक्कीच मिपा समृध्दीकर आहात. काय कहर प्रतिसाद लिहलाय.
मजा आया.

भंकस बाबा's picture

6 Jun 2019 - 9:18 pm | भंकस बाबा

पोर्टिंग असले तरी जिओसारख्या ऑफर सगळ्याच कंपन्या देत नाहीत. शिवाय आमच्या माहितीतिल कंपनी अजुन कस्टमर आणन्यार्या कस्टमरला बोनस पण देते. दुनिया कर लो मुठ्ठीमें !

महासंग्राम's picture

7 Jun 2019 - 9:32 am | महासंग्राम

आगगाग्गा अभ्या शेठ काय तो अब्यास आन प्रतिसाद भारीच कि :)

टर्मीनेटर's picture

9 Jun 2019 - 12:05 pm | टर्मीनेटर

जोरदार 'पंच' मारून प्रतिस्पर्ध्याला घायाळ करणाऱ्या महंमद अलीची आटोपशीर ओळख करून देणारा हा लेख आणि शाब्दिक 'पंच' मारून वाचकांना हसवणारा अभ्या.. चा हा मिश्कील प्रतिसाद, दोन्ही आवडले.

भंकस बाबा's picture

6 Jun 2019 - 9:13 pm | भंकस बाबा

लेख आवडला. अशी माहितिपर लेख वाचायला आवडेल.
लिहित रहा. हि विनंती आहे, धमकी नाही.
हलकेच घ्या.

भंकस बाबा's picture

6 Jun 2019 - 9:13 pm | भंकस बाबा

लेख आवडला. अशी माहितिपर लेख वाचायला आवडेल.
लिहित रहा. हि विनंती आहे, धमकी नाही.
हलकेच घ्या.

महासंग्राम's picture

7 Jun 2019 - 9:34 am | महासंग्राम

समस्त वाचक मंडळींचे धन्यवाद लेख अजून मोठा करता आला असता पण लै टंकाळा आला होता.

गड्डा झब्बू's picture

7 Jun 2019 - 10:22 am | गड्डा झब्बू

चांगला लेख. मुष्टियुद्ध म्हन्टल कि मला माईक टायसन आठवायचा. महंमद अलीची चांगली ओळख करून दिली तुम्ही.

मदनबाण's picture

9 Jun 2019 - 10:09 am | मदनबाण

लेख आवडला !

P1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- वे तू लौंग, वे मैं लाची तेरे पीछे आ गवाची... :- Laung Laachi

जालिम लोशन's picture

9 Jun 2019 - 11:52 am | जालिम लोशन

एक नंबर