१०० टक्के मतदान

इरामयी's picture
इरामयी in काथ्याकूट
17 May 2019 - 12:14 pm
गाभा: 

गेल्या काही निवडणूकांचा आढावा घेतला तर असं दिसतं की भारतातील जवळपास ४०% मतदार जनता आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत.

सर्व जनतेने मतदान करावं, नोकरी धंद्याच्या व्यापामुळे मतदान केंद्रावर जायला जमत नाही अश्याप्रकारची कोणतीही अडचण कोणाला होऊ नये यासाठी सरसकट सर्वच कार्यालयांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या दिवशी हल्ली (सक्तीची) सुट्टी असते. तरीही ४०% जनता आपला अधिकार वापरत नाही. शहरांमध्ये मतदान न करण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. उदाहरणार्थ, पुण्यामध्ये यावर्षी केवळ ४९.८४% मतदान झालं. (दुवा पहा)

जवळजवळ १००% मतदान व्हावं यासाठी काय करता येईल? मतदान अनिवार्य करता येईल का? यातही अडचणी येऊ शकतात. मुख्य म्हणजे मतदान केलं याचा पुरावा काय? बोटावर शाई दिसली म्हणजे मतदान केलं असं ग्राह्य धरणं पुरेसं ठरावं का?

की मग आजच्या multimodal, multichannel च्या काळात मोबाईल फोनवरून मतदान करणं हा पर्याय वापरता येऊ शकेल का?

अजून काही प्रश्न -

स्त्रियांसाठी आणि वृद्धांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांत त्यांना जास्त वेळ उभं राहणं भाग पडू नये यासाठी बसण्याची पुरेशी सोय करणं अनिवार्य करता येईल का?

‌प्रत्येक मतदान कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तिथे होऊ शकणाऱ्या गैरप्रकारांचा संपूर्ण प्रतिबंध करता येईल का?

‌फर्स्ट एड, पाणी, आणि वैद्यकीय सेवा, fire extinguisher प्रत्येक मतदान केंद्रावर असणं आवश्यक करता येईल का?

या सर्व विषयांवर मिसळपावच्या सभासद/वाचकांची काय मतं आहेत ते जाणून घ्यायला आवडेल. कृपया "मत"दान करावं.

प्रतिक्रिया

ओम शतानन्द's picture

17 May 2019 - 1:08 pm | ओम शतानन्द

१) ओंन लाईन किंवा जिथे असू तेथील मतदान केंद्रावर वोटिंग करता आले पाहिजे
२)VOTER लिस्ट मधील नाव व आधार लिंक करावे , आणि जो कुणी मतदान करणार नाही त्यास आर्थिक दंड , दुसर्या तिसर्या वेळेस वाढता दंड करणे

जेम्स बॉन्ड ००७'s picture

17 May 2019 - 7:11 pm | जेम्स बॉन्ड ००७

पहिला मुद्दा - शंभर टक्के सहमत
दुसरा मुद्दा - पहिला मुद्दा जर सरकारने यशस्वीरीत्या राबवला तरच थोड्याफार प्रमाणात सहमत ('मतदान हा हक्क आहे, कर्तव्य नाही' या तरतुदीमुळे पूर्ण सहमती देऊ शकत नाही)

विजुभाऊ's picture

17 May 2019 - 1:56 pm | विजुभाऊ

१०० % मतदान हे कधीच शक्य होत नाही. विशेषतः जेथे मतदार संख्या लाख्काच्या घरात असते.
संसदेतही अध्यादेश असेल तरीही कोणीना कोणी गैरहजर असतेच.
अगदी अपवादात्मक स्थितीत एखाद्या बूथवर १००% मतदान होते.
उदा या वेळेस
It was not unusual for Malogam, the one-voter polling station in the Hayuliang Assembly constituency in Arunachal Pradesh, to record 100% voting on April 11, the first phase of polling.
That very day, Meghalaya’s smallest polling station, accessible only by boat, too had a voter turnout of 100%. येथे मतदार संख्या आहे ३३.
booth number 174 at Bommanabudni Govt Higher Primary School in Mudhol taluk under Bagalkot Lok Sabha constituency has recorded 100% polling percentage.

All 435 voters exercised their franchise in the said booth. Booth number 102 at Mantur, also in Mudhol taluk, witnessed 102 voters of the 103 enrolled, turned up for voting.

महासंग्राम's picture

17 May 2019 - 2:28 pm | महासंग्राम

सर्वात आधी सर्व मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे गरजेचे आहे. ३-३ वेळा नाव नोंदवून हि मतदान यादीत नाव येत नाही लोक कसे मतदान करणार ?

जेम्स बॉन्ड ००७'s picture

17 May 2019 - 7:08 pm | जेम्स बॉन्ड ००७

सगळ्या गोष्टी नियम, कायदे यांमधून शक्य होत नाहीत.. 100 टक्के मतदान ही आदर्श परिस्थिती आहे. यांमध्ये मतदान न करणारे तसेच यंत्रणासुद्धा तेवढ्याच प्रमाणात दोषी आहे. अर्ज देऊनसुद्धा सध्या राहत असलेल्या ठिकाणी नाव न येणं, बाहेरगावी असलेले विद्यार्थी वगैरे अडचणी सुद्धा असतातच.

काही वेळा प्रवास करून मत द्यायला जायचं तर सगळे उमेदवार एकाच माळेचे मणी असा प्रकार असतो.

श्रीरंग_जोशी's picture

17 May 2019 - 8:21 pm | श्रीरंग_जोशी

१००% नाही परंतु सध्या होते त्यापेक्षा बरेच अधिक मतदान व्हावे असे मलाही वाटते. सध्याची मतदान प्रक्रिया जी केवळ एकाच मतदानकेंद्रात ११ तासांच्या दरम्यान मतदान करण्याची संधी देते ती याबाबत अनेक मतदारांसाठी अन्यायकारक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. अमेरिकेतले काही आठवडे अगोदर होऊ शकणारे अर्ली व्होटिंग पाहिल्यावर आपल्या प्रक्रियेतले हे दोष प्रकर्षाने जाणवले.

मिपावरच ६ वर्षांआधी मी हा प्रतिसाद लिहिला होता. तो इथे च्योप्य पस्ते करतो.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी आजवर एकदाही मतदान करू शकलो नाही. जेव्हा मी पहिल्यांदा मतदान करू शकेल असे वाटत होते तेव्हा लोकसभा व विधानसभा दोन्हींच्या निवडणूका वेळेपूर्वी झाल्या. त्यानंतर ५ वर्षांनी माझे नाव मतदारयादीत असूनही स्वतःच्या गावापासून ६०० किमी दूर राहत असल्याने व माझी परीक्षा सुरू असल्याने तेव्हाही मतदान करू शकलो नाही. त्यानंतरच्या निवडणूका मी भारताबाहेर असतानाच झाल्या.

मला तर असे सुचवावेसे वाटते की भारतीय नागरीक संपूर्ण भारतातून स्वतःच्या मतदारसंघाचे मतदान करू शकला पाहिजे.
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी ओळखपत्र तपासून व मतदारसंघनिहाय नाव तपासून त्या मतदार संघाचे सुरक्षित (जालावर नसलेल्या वेबसाईटचे) वेबपेज उघडावे व त्या मतदाराला स्वतःचे मतदान करू द्यावे.

निवडणूकीच्या दिवशी स्वतःच्याच गावात उपस्थित राहणे प्रत्येकाला शक्य नसते. विद्यार्थी असेल तर परीक्षा वगैरे असू शकतात, नोकरी असेल तर सुटी मिळण्यास समस्या असू शकतात. मतदान करण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमूळे प्रत्यक्षात तसे शक्य नसते. अन केवळ त्या कारणासाठी प्रवासाचा खर्च करणेही प्रत्येकाला जमेल असे नाही.

त्याखेरीज राजकीय पक्षांची जी ओरड असते की परप्रांतियांची नावे खोटेपणाने घुसवली जातात त्याचे कारणही शिल्लक राहणार नाही. १५ वर्षे वास्तव्याच्या अटी पूर्ण केल्याखेरीज स्थानिक मतदारसंघाचे मतदान करण्याची पात्रता येण्याची अंमलबजावणी करणेही अधिक परिणामकारक होईल.

मतदान एकच दिवस ठेवण्याचीही काही गरज नाही. पूर्ण महिनाभरात प्रत्येक मतदाराला तीन ते चार दिवस - वेळांचे पर्याय द्यावेत. उदा. मे ७ सकाळी १० ते ११, मे १२ दुपारी १ ते २, मे १७ दुपारी ४ ते ५, मे २९ सकाळी ९ ते १०. अन एक दोनदा असे पर्याय न घेता नेहमीसारखे मतदानाची प्रक्रीया पार पाडावी.

सूरक्षा यंत्रणांवरही ताण पडणार नाही. शिक्षक, सरकारी कर्मचार्‍यांना या कामास जुंपण्याचे प्रयोजनही संपेल.

कृपया या प्रस्तावातल्या सूचनांचा आशय लक्षात घ्यावा, अंमलबजावणी यापेक्षाही अधिक परिणामकारकपणे करता येईलही.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महासंग्राम's picture

18 May 2019 - 9:57 am | महासंग्राम

वेबपेज ला हॅकिंगचा धोका आहेच कि बाहेरून नसला तरी आतल्या कुणी तरी वेबपेज हॅक केलं तर काय घ्या

श्रीरंग_जोशी's picture

19 May 2019 - 4:37 am | श्रीरंग_जोशी

मतदारांना ठिकाण विरहीत अन अधिक काळामध्ये त्यांच्या सोयीनुसार मतदान करण्याची संधी मिळावी हे उद्दिष्ट आहे. तांत्रिकदृष्ट्या जे सुरक्षित असेल ते पर्याय वापरावे. सध्याही सुरक्षा बलांमधील सैनिकांना व इलेक्शन ड्युटीवरील सरकारी कर्मचार्‍यांना पोस्टल बॅलेटने मतदान करता येतेच. पोस्टल बॅलेटप्रमाणेच काही प्रकार यासाठी वापरता येऊ शकेल.

मराठी_माणूस's picture

18 May 2019 - 6:00 pm | मराठी_माणूस

खालील आजच्या टाइम्सच्या लिंक वर खाली एक फोटो आहे "AROUND THE WORLD" ह्या शिर्षका खाली (पान १८)

https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/TimesOfIndia/#

वोटींग ची इच्छा असेल तर सोयी/सुविधा गैरलागु होतात

गोंधळी's picture

19 May 2019 - 11:18 am | गोंधळी

१०० टक्के मतदान होउ शकत नाही अस मला वाटत.

पण तंत्रज्ञानाचा वापर करुन उदा. ऑनलाइन पध्दतीचा वापर करुन मतदान सोप व जलद होउ शकत व निकालही त्याच दिवशी मिळु शकतो.

याचा फायदा म्हणजे खर्च खुप प्रमाणात कमी होईल व मनुष्यबळ ही अत्यंत कमी लागेल.

मराठी कथालेखक's picture

20 May 2019 - 4:44 pm | मराठी कथालेखक

एका जिल्ह्यात येणार्‍या विविध मतदारसंघात शक्यतो एकाच दिवशी मतदान ठेवणेही गरजेचे आहे.
यंदा पुणे आणि बारामतीकरिता २३ एप्रिलला मतदान होते तर मावळ व शिरुरकरिता ३० एप्रिलला.
कंपन्या, कार्यालयांना सूटी असते ती ते ज्या मतदारसंघात येतात त्या दिवशी. जसे हिंजवडितल्या कंपन्या बारामती मतदार संघात येतात (सुटी-२३ एप्रिल) पण त्यात काम करणारे बरेच लोक पिंपरी-चिंचवडमध्ये राहतात त्यांचा मतदारसंघ मावळ आहे त्यामुळे त्यांना मतदानाच्या दिवशी (३० एप्रिल) सुटी मिळाली नाही.
पुणे, हडपसर (मतदारसघ - शिरुर) येथील काही मतदारांच्याबाबत हेच झाले असण्याची शक्यता आहे. पुण्यात मतदान कमी झाल्यामुळे अनेक मंचांवर पुणेकरांवर टीका झाली पण या मुद्द्याकदे दुर्लक्ष झाले.
असेच इतर काही जिल्ह्यांत घडले असण्याची शक्यता आहे.

अवांतर :

स्त्रियांसाठी आणि वृद्धांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांत त्यांना जास्त वेळ उभं राहणं भाग पडू नये यासाठी बसण्याची पुरेशी सोय करणं अनिवार्य करता येईल

या ठिकाणी स्त्रिया व वृद्ध यांऐवजी 'सर्व गरजूंसाठी' असं जास्त योग्य ठरेल असं वाटतं. काही पुरुषही शारिरिकदृष्ट्या दुर्बल , आजारी वगैरे असू शकतात पण हे लक्षात न घेता पुरुषांबद्दलची सरसकट असंवेदनशीलता खटकणारी आहे.

काही पुरुषही शारिरिकदृष्ट्या दुर्बल , आजारी वगैरे असू शकतात पण हे लक्षात न घेता पुरुषांबद्दलची सरसकट असंवेदनशीलता खटकणारी आहे.

पूर्णपणे मान्य!

आणि हे सुद्धा खरं आहे की पुरूषांनाही रांगेत बराच वेळ उभं राहिल्याने थकवा येऊ शकतो. कदाचित स्त्रियांचा थकवा दिसून येतो, पुरूष शांतपणे सहन करतात.

असंवेदनशीलतेबद्दल माफी असावी.

मराठी कथालेखक's picture

21 May 2019 - 6:27 pm | मराठी कथालेखक

मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

मित्रहो's picture

22 May 2019 - 11:04 am | मित्रहो

माझ्या अनुभवानुसार रांगेपेक्षा वोटर लिस्टमधे नाव नसणे हि मोठी समस्या आहे. काही वर्षापूर्वी मी बंगलोरला होतो. विधानसभेचो वोटींग केले. वेळ लागला त्यावेळेला मुलगा लहान होता म्हणून आधी मी नंतर बायको असे करुन मतदान केले. त्यानंतर बरोबर तीन ते चार महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होती. काहीही बदल झाला नव्हता. यावेळेला माझे नाव लीस्टमधे नव्हते. बायकोचे होते. तिचा पत्ता हा c/o माझ्या नावाने होता. तिचे नाव होते माझे नाही. मी आळस केला होता आताच निवडणुका झाल्या परत काय बघायचे आहे.
रांगेच्या बाबतीत पूर्वी तास दीड तास लागायचा कधी जास्तीच. गेल्या काही वर्षातला माझा अनुभव खूप चांगला आहे. पाच ते दहा मिनिटांच्या वर वाट बघायची गरज पडली नाही. खूप जास्त बूथ झाले आहेत.
बाकी मूलभूत गरजा पूर्ण कराव्या जसे पाणी, बसायला जागा वगैरे या मुद्याशी सहमत