✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(उष:काल)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sun, 05/12/2019 - 10:56
पेरणा अर्थात हळू हळू एकेक करत उलगडत चालले आहे... ज्याच्याकडे पहात पहात आम्ही आमचे मार्ग शोधायचो तो तारा आता कितीतरी मागे पडला आहे आणि तो एकुलता एक चंद्रही... ज्याची स्वप्नं दाखवत दाखवत आईने दुधभात भरवला दररोज नव्याने प्रकाशमान होणार्‍या सत्याला मी तर्काच्या कसोटीवर जोखत राहतो आणि मनातल्या मनात विचार करत रहातो उद्या कोणती नवी जाणीव उलगडेल ! आज सकाळी डोळे उघडले तर ते समोरचे हिरवेकंच झाड मोहराने गच्च बहरले होते त्याचा मंद सुवास आसमंत दरवळत होता आता लवकरच ते मधुर फळांनी लगडलेले असेल या विश्वाच्या पासार्‍यातली एकेक रहस्य हळूहळू उलगडत चालली आहेत अलगद, हळुवार, पण अतिशय स्पष्ट पणे जो मुलगा समोरच्या मैदानात मनसोक्त हुंदडायचा त्याने आज हिमालयाचे एक उत्तुंग शिखर सर केले , त्या मुलाचे डोळे आता हिमालयाच्या पलिकडचे क्षितीज शोधत आहेत.... जुन्या गोष्टी वेगळे रुप घेउन नव्याने समोर येणे ही आजकाल जणू नित्याची गोष्ट झालीय... अंतिमसत्या पर्यंत पोचण्याची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे , काही काळा पूर्वी अनंत वाटणारे हे विश्र्व ज्याचा अवाका अमर्याद होता, आज जाणवले की ते माझ्यातच सामावले आहे आता नवा दरवाजा उघडेल माझ्यासाठी हा उष:काल... मला खात्री वाटते की लवकरच मला उलगडेल, या विश्र्वाचे रहस्य आणि मग सज्ज होईन मी ... अजून एका नव्या शोधासाठी पैजारबुवा,

प्रतिक्रिया द्या
3904 वाचन

💬 प्रतिसाद (6)

सुडंबन सुरेख जमले आहे.

यशोधरा
Sun, 05/12/2019 - 11:10 नवीन
सुडंबन सुरेख जमले आहे.
  • Log in or register to post comments

जबरा

नाखु
Sun, 05/12/2019 - 12:10 नवीन
लागले नेत्र पैलतिरी पै बुवांच्या आत एक कवीसुद्धा दडला आहे हे जाणून असलेल्या मंडळाचा सभासद नाखु
  • Log in or register to post comments

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/12/2019 - 12:20 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

झकास

जालिम लोशन
Sun, 05/12/2019 - 13:46 नवीन
ह्याला म्हणतात positive attitude.
  • Log in or register to post comments

वा!

चांदणे संदीप
Mon, 05/13/2019 - 08:18 नवीन
सकारात्मक गोष्टी आवडतात. ही कविताही अतिशय आवडली. प्रत्येक ओळीगणिक एक वीट रचली जाऊन शेवटी स्वयंप्रेरणेचा, मार्गदर्शक दीपस्तंभ बांधला गेला. पैजारबुवा दंडवत. ____/\____ Sandy
  • Log in or register to post comments

दंडवत.

नि३सोलपुरकर
Mon, 05/13/2019 - 12:01 नवीन
पैजारबुवा ____/\____. सकारात्मक कविता आवडली
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा