अनोळखी शिक्षक
आज अंक्याची mains असल्याने सकाळी साडेआठलाच हडपसरला गेलो होतो.त्याला केंद्रावर सोडून लगेचच परत यायला निघालो.
PMTटँडवर वेळ सकाळची असूनसुद्धा गर्दी होतीच.कोथरुड डेपोची बस पकडायला मी गेलो तर माझ्या आधी १०- १५ मंडळी बसच्या पुढच्या दारातून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. बसायला जागा मिळणार नाही असच वाटत होत पण हार मानिन तो मी कसला?? त्याच गर्डीमधून धक्के देत, मोबाईल आणि पकिटकडे लक्ष्य देत मी बसमध्ये शिरलो.नक्कीच काहीतरी achieve केल्याची फिलिंग होती....!!!
बसमध्ये पहिली windo seat मिळाली होती. शेजारची सीट अजूनही रिकामी होती.. समोरून येणाऱ्या ४-५ मुलींपैकी एक तरी शेजारी बसेल आणि हा गर्दीचा प्रवास मस्त होईल असं वाटलं.पण सांगू का माझा माझ्या लक वर पूर्ण विश्वास आहे..गेल्या आठ एक वर्षात केलेल्या दहाएक हजार किलोमीटर च्या प्रवासात साठ सत्तर वर्षांच्या म्हाताऱ्या माणसानंशिवाय कुणाच्या शेजारी बसायच नशीब लाभलं नाही...!!
आजही तेच झालं एक साधारण सत्तरीतले आजोबा ज्यांचा चेहरा म्हातारपनामुळे थकला आहे ते माझ्या शेजारी येऊन बसले.मी नेहमीप्रमाणेच ' असो चालायचंच..' म्हणून कधी एकदा माझा स्टॉप येतोय याची वाट पाहू लागलो.
पाचच मिनिटात आजोबांनी उठून एका लग्न झालेल्या स्त्रीला जागा देऊन स्वतः उभे राहिले. मी त्या आजोबांना जागा न देता तसाच बसून राहिलो.पण काही वेळाने मनाची नाही पण जनाची लाज वाटून मी त्या आजोबांना माझ्या जागेवर बसा म्हणालो.
आजोबांच्या आणि त्या बाईच्या संभाषणावरुन अस कळलं की ते तिचे वडील आहेत आणि ती गर्भवती असल्याने तिला बाळंतपणासाठी माहेरी नेत असावेत.मला बापाचा आपल्या मुलीबद्दलचा एक हळवा कोपरा दिसला.
अर्धा तास तरी उभे रहायच असल्याने मी PMTच्या खिडकीला पाठ टेकवून उभा राहिलो होतो.आपल्याच तंद्रीत BYN च्या भागातली melodious गझल गुणगुणत खिडकीतून बाहेर बघत होतो.किती अप्रतिम गझल होती ती..!!
"यू तो बंझर सा था मेरा आशियां,
महाफिले आपके आनेसे सजी...
वक्त बेवक्त है मेरे हालात ये,
आपका हुस्न ' जश्न ए सैलाब' जी...."
पाच दहा मिनिटे होत नाहीत तोपर्यंत ते आजोबा पुन्हा उठले आणि एकाला जागा दिली.तो माणूस आजोबंपेक्षा खूप लहान वाटत होता. मग मात्र वाटलं मी उगाचच जागा दिली.हे म्हातारं कुणासाठीपण जागा सोडतय...!!
त्या अजोबाबद्दल मनात राग राग करत असताना ज्याला जागा दिली त्याच्या हाताकडे लक्ष्य गेलं.त्या व्यक्तीच्या कोपराच्या पुढच्या हाताची नीट वाढ झाली नव्हती.त्या अर्धवट वाढ झालेल्या हाताने ती एक बॅग सांभाळत बसमधे चढला होता....
त्या अजोबांबद्दलच्या रागाची जागा आता respect ने घेतली होती. मी आजोबांकडे पाहिलं तर ते हसले आणि म्हणाले की माझ्यापेक्षा त्या जागेची जरुरत त्या व्यक्तीला आहे .माझीच मला लाज वाटली.माझ्यासारखी घोड्यासारखी वाढलेली तरुण मंडळी सीटवर असे बसतात की कोणाचा बाप जरी आला तरी जागेवरून उठणार नाही..!! अश्या माजुरड्या वृत्तीने प्रवास करत असताना हा सत्तरीच्या तरुण वेगळीच शिकवण देऊन देला....!!! Thanks आजोबा..
Follow me-
myviews09007.blogspot.com
Chittmanthan.ooo
प्रतिक्रिया
छान अनुभव
भारी अनुभव टिपलाय. सुरवातीला
हेच म्हणतो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Tashkent Files | Official Trailer |सुंदर आणि मन:स्पर्शी
सुंदर आणि मन:स्पर्शी
सुंदर आणि मन:स्पर्शी
ठिक
भावा पहिली गोष्ट मी तिशीचा नाही माझ वय २२ आहे आणि दुसरी गोष्ट
कथाबोध आवडला
वखवख आणि दवणीय हे शब्द
नुकत्याच वयात आलेल्या सोळा
मी याच अनुषंगानं माझं मत
> एखाद्या हॉटेलची स्वागतिका
फक्त अपेक्षा असतात.. पुर्ण
का रडवतां रे असं.
मिपावर स्वागत
.
स्मोक टेस्ट...
धन्यवाद भाऊ
> बसमध्ये पहिली windo seat
बाजूला तशी सूचना लिहिलेली
इथले इतर लेखनही वाचा आणि
+१ सहमत
लिहीत राहा शुभेच्छा
टीकात्मक प्रतिसादांकडे
उत्तम लिहिताय. येऊ द्या आणखी
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
प्रयत्न चांगला आहे.