चित्रपट परिचय - जलेबी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
२०१६ च्या ह्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेले नसले तरी एका बंगाली चित्रपटाचा हा रिमेक आहे असे विकीपिडीयावर वाचल्याने उत्सुकतेपोटी डाउनलोड करुन मी हा चित्रपट बघितला.
चित्रपटाचे शीर्षक जलेबी असले तरी ही गोड-गोड प्रेमकथा नाही.
चित्रपटाच्या सुरवातीस नायिका आयेषा मुंबई-दिल्ली ट्रेनच्या प्रवासाला निघते.
आधीच निराश आणि वेदनेने व्याकूळ असलेल्या आयेषाला एक समवयस्क अनोळखी स्त्री अनू या प्रवासात भेटते. अखंड बडबड करणार्या अनूला आयेषा सुरवातीला काहीशा अनिच्छेनेच उत्तर देत असते. पण हळूहळू आयेषाचा एक समांतर प्रवास सुरु होतो .. आठवणींचा आणि वेदनेचा. वेळोवेळी वेदना अनावर होवून , उठून दरवाजात येत , डबडबत्या डोळ्यांनी आठवणींत हरवणारी आयेषा आपल्याला चित्रपटभर दिसत रहाते . आणि फ्लॅशबॅकमधून तिची कथा उलगडू लागते.
जुन्या दिल्लीतील एका जुन्या हवेलीत आपल्या आई व बहिणीसोबत राहणारा देव आणि मुंबईची आयेशा यांची ही कथा आहे. देवचे आपल्या कुटूंबावर, १५० वर्षे जुन्या हवेलीवर, जुन्या दिल्लीतील जुनाट गल्ल्यांवर प्रेम आहे. तिथल्या वातावरणातच तो रमतो. कॉलेजात इतिहास विषय शिकवण्यापेक्षा गाईड बनून लोकांसोबत इतिहास जगण्यात त्याला अधिक रस आहे ..तर आयेषा बिनधास्त आहे.. तिला लेखिका बनायचेय, जग फिरायचेय. उत्कटपणे जगणारी आयेषा देवच्या प्रेमात पडते . गल्लीतील रस्त्यात उभी राहून ओरडून खिडकीत उभ्या देवला लग्नाकरिता विचारणारी , लग्नांतर घरात चोरुन सिगरेट ओढणारी बिनधास्त आयेशा फ्लॅशबॅक मधून समोर येते.
दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्ती प्रेमात पडल्या पण एकत्र येवून सुखाने नांदू शकल्या नाहीत तर काय ? नाते संपले तर प्रेम संपते का ? या आणि अशा प्रश्नांभोवती चित्रपट फिरत रहातो.
सात वर्षापुर्वीची आयेषा काहीशी उथळ , बेजबाबदार रंगवली आहे तर आताची आयेषा निराश, व्याकूळ हृदयात वेदना घेवून आहे. सिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनवर ट्रेनचा प्रवास संपतो. सोबतच आयेषाच्या वेदनांचा प्रवासही संपतो. रुढार्थाने जरी गोड शेवट होणे (नायक -नायिकेने एकत्र येणे) शक्य नसते तरी एका असह्य मानसिक वेदनेतून आयेषाची मुक्तता होते.
चित्रपटाला बरा-वाईट-चांगला-अप्रतिम असा कोणताही शेरा देण्यापेक्षा मी इतकेच म्हणेन की आयेषाची वेदना नक्कीच हृदयास स्पर्षुन जाते , तरी भावूक प्रेमकथा ज्यांना आवडतात त्यांना आवडू शकेल असा हा चित्रपट आहे.
प्रतिक्रिया
अरे वाह !
नक्कीच बघा आणि सांगा..https:/
हो ना
धन्यवाद..
चांगला परिचय.
धन्यवाद
> २०१६ च्या ह्या चित्रपटाला
२०१८ चा आहे चित्रपट.
इजाजत पाहिला नाही पण रेनकोट
ओरिजनल बंगाली सिनेमा सहज कुठे
अरेरे बंगाली सिनेमा बघायचा
मी फक्त काही सेकंदांचे काही
पण 'ईजाजत' मात्र
मराठी कथालेखक,
चार गाणी आहेत आणि गायिका फक्त
प्राक्तन चांगला वाटला असे इथे
लेडीजबायका
तुमच्या शब्दातुन कळलेला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Arjuna Kruta Kali Stuti from Mahabharathaधन्यवाद
जलेबी ज्याच्यावर बेतलेला आहे
नायक भूतकाळात अडकलेला आणि
नाही.. दोघंही मूव्ह ऑन केलेलं
दोघांनीही मुव्हऑन केलं असेल
हो.. तसं म्हंटलं तर बंगाली