देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
21 Jan 2019 - 7:27 pm

देवा, क्लोरोफिल देतो का रे , क्लोरोफिल

दे ना रे मजला

मी कि नई छान छान खायला

करून घालेन तुजला

कशाला हवाय डोक्याला ताप नि तो पगार

कशाला होतील चोऱ्या नि माऱ्या

कुठेच पडणार नाहीत दरोडे कि होणार नाहीत कुणाचे खून

लुटेल , हो फक्त लुटेल

ते सूर्यनारायणाचे ऊन

तू काया बनवलीस

सोबतीला कमी कि काय म्हणून माया बनवलीस

खायला तोंड दिलेस नि भरायला पॉट

तरी बी सारे शोधत बसलेत

कुठं लागतोय का ते जॅकपॉट ?

झाड बघा ना, कुठंच जात नाही

तिथेच राहतं नि ऊन खाऊन जेवण बनवून देतं

मलाही आवडेल तसं राहायला

काहीही नको ,

हवंय फक्त ऊन आणि ऊन लुटायला

मस्तपैकी लुटून , छान छान जेवण बनवायला

स्वतःच हाताने ते मी बायकोला वाढेन

आणि बदल्यात अजून थोडी मुलेबाळे काढेन

पिलावळ वाढली तरी फरक काय पडतोय

साऱ्यांचं जेवण तर मीच तयार करतोय

पगार नको कि गाडी नको

फुक्कट फालतू चढाओढी नको

किरणावरती किरण शोषित जाईन

मस्तपैकी जेवण सर्व्ह करत जाईन

त्यासाठीच अंगात क्लोरोफिल लागेल

ते असलं तरंच हे कोडं सुटेल

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

जीवनमानराहणीव्यक्तिचित्रणगुंतवणूक

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

24 Jan 2019 - 6:33 pm | जालिम लोशन

लिहते रहा.

श्वेता२४'s picture

25 Jan 2019 - 2:38 pm | श्वेता२४

कविता स्वगत म्हणल्यासारखी असली तरी आयडीया भारी वाटली.

कसं सुचत ? यावर मीही विचार करतो

इथेतिथे बघता बघता मेंदूवर वार होतो

मग येते , एक झिणझिणी,,नखशिखांत

टंकून , सोडून देतो आंजावर , मग बैसतो निवांत

तुमची वाट बघत .... ==))

उपेक्षित's picture

25 Jan 2019 - 2:55 pm | उपेक्षित

:) मस्त

खिलजि's picture

25 Jan 2019 - 3:06 pm | खिलजि

धन्यवाद सर्वाना

दुर्गविहारी's picture

25 Jan 2019 - 7:21 pm | दुर्गविहारी

कल्पना भारी वाटली ! :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jan 2019 - 9:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत !

तुम्हाला, सबकॉन्शस लेव्हलवर स्पायरोगायरा (Spirogyra: common names include water silk, mermaid's tresses, and blanket weed) बनायचे असेल... कारण क्लोरोफिलने परिपूर्ण असलेल्या त्या जीवाच्या प्रत्येक पेशीची ओळख, "Independent in existence and self-sufficient in nutrition" अशी करून दिली जाते. :) ;)

श्वेता२४'s picture

25 Jan 2019 - 9:25 pm | श्वेता२४

तुम्हाला, सबकॉन्शस लेव्हलवर स्पायरोगायरा (Spirogyra: common names include water silk, mermaid's tresses, and blanket weed) बनायचे असेल.
:):):)

पुनःश्च धन्यवाद सर्वाना ...

@ म्हात्रे सर

" स्पायरोगायरा " हे विशेषण बाकी भारी वाटलं .. पुन्हा एकदा बॉटनीचे अन झूलॉजिचे वर्ग आठवले..

चामुंडराय's picture

30 Jan 2019 - 8:23 am | चामुंडराय

खिलजी मस्त आयडियाची कल्पना !

मला पूर्वी पासून क्लोरोफिलची क्रेझ आहे.
वेअरेबल क्लोरोफिलचे कपडे घालून मी बाहेर उन्हात फिरतोय आणि स्किन पॅच मधून ग्लुकोज डिरेक्ट रक्तात जातेय.
किंवा
क्लोरोफिल वापरून झाडे फोटोसिंथेसिस ने ऊर्जा तयार करताहेत आणि ती ऊर्जा आपण टॅप करून वापरतो आहे अशा कल्पना सुचतात.

रच्याकने आयडियाचे पेटंट घेता येते का?

आपल्या कार्बन बेस जगात ग्लुकोज व्यतिरिक्त आणखी काय ऊर्जा स्त्रोत्र म्हणून वापरले जाते?

धन्यवाद चामुंडरायसाहेब

प्रसाद गोडबोले's picture

30 Jan 2019 - 2:08 pm | प्रसाद गोडबोले

छान !

पण

तुम्हाला अपेक्षित असलेला परिणाम क्लोरोफिल ने साध्य होईल असे वाटत नाही तस्मात कवितेत फक्त एक साधी सुधारणा सुचब्वतो :

देवा, मारुआना देतो का रे , मारुआना ?

खिलजि's picture

30 Jan 2019 - 4:13 pm | खिलजि

मारुआना मी घेतलीय

कधीच डोक्यात जाऊन बसलीय

आता लग्न झालंय रे ,

म्हणूनच तर देव देव सुचतंय

शिडा असतो तर थैमानाची गरजच नव्हती

मला भिडण्याची वादळाची पण कुवत नव्हती

आकाश आजही मला बघते ,सलामी देते

पण मी जराशी गडबड केली

तर आमची हि मलाच ठोकते

म्हणून जाऊ दे म्हणतो साऱ्याना

नजरेतच धरून ठेवतो कामावरच्या पऱ्यांना

ब्याद कशाला पाळायची

कुणाला हौस आहे उगाच मारून घ्यायची

चित्रगुप्त's picture

1 Feb 2019 - 6:31 pm | चित्रगुप्त

मी मूळ कविता तर आवडलीच, शिवाय बोनस म्हणून मिळालेली प्रतिसादातली कविता तर तुफानच आहे.
बुद्ध - महावीरांनी वनात अनेक वर्षे तपश्चर्या केली, त्यापैकी अगदी थोडे दिवस अन्न घेतले होते असे ऐकले आहे. त्यांना सूर्यप्रकाशातून/ वातावरणातून ऊर्जा घेण्याची विद्या साध्य झालेली असेल का ? असे काही लोक अजून असल्याचे अधून मधून वाचायला मिळते.
अश्याच आगळ्या वेगळ्या कल्पना/कविता जरूर लिहीत रहा.

धन्यवाद चित्रगुप्त साहेब ..