टीना, मोदीजी आणि डिसऍडव्हान्टेज

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in राजकारण
16 Dec 2018 - 7:24 pm

अटलजींनी, २ खासदार संख्या असलेल्या भाजपच्या कितीतरी आधीपासून, आणि नंतरही कितीतरी वर्षे, भाजपची धुरा सांभाळली. त्यांनी ८० च्या दशकातच, अनेक तत्कालीन युवा नेतृत्वगुण असलेले उमेदवार हेरून त्यांना ग्रुम केलं. त्यांनी प्रभावीपणे तत्कालीन भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली.
८० च्या दशकात महाजन/स्वराज/राजनाथसिंह (व इतर अनेक) यांचे कर्तृत्व अटल बिहारी वाजपेयी यांनी बरोबर हेरले. भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली.

मोदीजींनी गेली काही वर्षे भाजपाची धुरा सांभाळली आहे. गेल्या काही वर्ष्यात भाजपाला केंद्रात व अनेक राज्यात सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या (डिसेंबर २०१८) विधानसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपाला थोडासा धक्का नक्कीच बसला आहे, परंतु त्यामुळे सुतक करावे असं काही वातावरण नाही. आजवर अनेक पेचप्रसंग आले आणि गेले पण, त्यातून निभावून जाण्याची क्षमता/अनुभव मोदीजींत नक्कीच आहे.
मोदींवरती श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षांतर्गत बळ मोदीजींच्या मागे आहे, जनमानसातील त्यांची प्रतिमा अजूनही लोकप्रिय आहे.

पण मोदीजी एकाकी पडलेत का ? भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा विचार केल तर , (प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर) मोदीजींच्या अनुपस्थितीत, भाजपला केंद्रीय निवडणुकीत लीड करायला, दुसऱ्या फळीतल्या (भविष्यात) भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही.
भाजप थिंक टॅन्कच्या निसटलेल्या धोरणांपैकी हे एक असावे काय ?

पक्षांतर्गत-टीना* फॅक्टर भाजपचा डिसऍडव्हान्टेज ठरेल काय ?

(*टीना = There Is No Alternative = अशी पर्सिव्हड राजकीय स्थिती की जिथे नेतृत्वाला पर्याय उपलब्ध नसतो )

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

27 Dec 2018 - 6:55 pm | डँबिस००७

माईसाहेब ,

तुमचे ते हे आता पर्यंत बातम्यांकडे तुम्हाला समतोलपणे कसे बघावे हे सांगत होते पण आता ह्या लोया केसमध्ये मात्र तुमच्या त्यांनी तोंड ऊघडलेल नाही फक्त तुम्हीच बोलत आहात, तुम्ही तुमच्या त्यांना जबरदस्तीने सुट्टी वर पाठवलेले आहे का ?

अजून साहेबांची भूमिका निश्चित होत नाहीये, त्यामुळे "हे" सध्या कोणती ठाम भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसावेत.. ना जाणो नंतर यु टर्न मारायला लागला तर?

सुबोध खरे's picture

28 Dec 2018 - 9:55 am | सुबोध खरे

माईसाहेबांचे "हे" बहुधा निकालपत्र वाचन करीत असावेत. आपण घेतलेली एक वैचारिक भूमिका साफ चुकीची निघाली याचे वैषम्य वाटत असावे त्यांना म्हणून मौन बाळगून आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Dec 2018 - 11:16 am | माईसाहेब कुरसूंदीकर

ह्यात वैचारिक भूमिकेचा प्रश्न कुठे आला ? खोट्या एन्काउंटरच्या खटल्यात एक न्यायाधीश नेमला जातो.(जे.टी. उत्पात). त्यांची अचानक बदली केली जाते. त्या जागी लोया येतात. त्यांचा सरकारी विश्राम्गृहावर असताना संशयस्पद मृत्यु होतो. त्याचे नातेवाईक संशय व्यक्त करतात. त्यांच्या भगीनी "लोया ह्यांच्यावर दबाव होता. असे टी,व्ही.वर सांगतात "मुंबईत फ्लॅट मिळेल, १०० कोटी देऊ' अशा ऑफर्स असतात. लोया ह्यांचा पुत्र व वडिलही संशय व्यक्त करतात. एका हॉस्पिटलतर्फे खोटा ई.सी.जी. दाखवला जातो. लोया ह्यांचा मोबाईल ३ दिवसांनी सर्व डेटा डिलीट करून परत दिला जातो.
(माजी) सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे विशिष्ट केसेसचा हवा तसानिकाल लावण्यासाठी काय काय करत होते, हे आता जगजाहीर झाले आहे. जानेवारीत ज्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन "लोकशाही धोक्यात आहे' असे सांगितले त्यामागे हे 'लोया प्रकरण'होते.
(ह्यात वैचारिक भूमिका वगैरे नाही. अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते. हरेन पंड्या खून, सोहराबुद्दीन्, कौसर बी.. अशा अनेक खोट्या चकमक प्रकरणात अमित शहा ।यांच्यावरच संशय होता. ह्या प्रकरणांतले अनेक अधिकारी ४/५ वर्षे जेलची हवा खाउन बाहेर आले आहेत. शहा खुद्द तडीपार होते.)
हे सर्व असले तरी भाजपा सरकार देशात बर्यापैकी काम करीत आहे असे आमचे मत आहे.

सुबोध खरे's picture

28 Dec 2018 - 12:11 pm | सुबोध खरे

बरं
तुमच्या "ह्यांनी" सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तरी पूर्णपणे वाचला असेल ना? मग त्यात एकमताने निकाल कसा आला? त्यात त्यांनी स्पष्टपणे अर्जदारांचे म्हणणे चूक आहे आणि कारवान या मासिकाने केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत असे लिहिलेले आहेत.
एकही न्यायाधीशाने आपले विरोधी मत नोंदविले नाही. त्यातून तो निकाल मुळातच न्या. चंद्रचूड यांनी लिहिला आहे जे आपले मत निर्भीडपणे व्यक्त करतात( जसे आधार केस मध्ये त्यांनी विरोधी मत नोंदवले होते).
आता सर्वोच्च न्यायालय पण विकले गेले आहे किंवा दबावाखाली असा निकाल देते असेच जर आपल्या "ह्यांचे" मत असेल तर विषयच संपला. कारण मग तुम्हाला न्याय मिळू शकेल अशी एकही जागा भारतात शिल्लक नाही.
मोदी हुकूमशहा आहेत म्हटले तर २०१९ मध्ये निवडणूक होणार नाही आणि झाल्या तरी श्री मोदी सत्ता हस्तांतरित करणारच नाहीत( इति विद्वान श्री कुमार केतकर)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Dec 2018 - 2:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

असं कसं, असं कसं, आम्हाला सोईचं नसेल ते सर्व खोट्ट्ट्च्च्च... सुप्रिम कोर्टच काय खुद्द परमेश्वर प्रत्यक्ष समोर येऊन म्हणाला तरी ते खोट्ट्ट्च्च्च असेल! =)) =)) =))

यालाच हल्ली भारतिय विचारवंतीपणा म्हणतात ;)

असं निर्लज्जपणे सतत केल्यास एखाद-दुसर्‍याला राज्यसभेची जागा मिळू शकते असे दिसल्यावर हल्ली खूप जणांना ती स्वप्ने पडू लागली आहेत असे टिव्हीवरील गदारोळात दिसू लागले आहेच. =)) =)) =))

(प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर) मोदीजींच्या अनुपस्थितीत, भाजपला केंद्रीय निवडणुकीत लीड करायला, दुसऱ्या फळीतल्या (भविष्यात) भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही.
भाजप थिंक टॅन्कच्या निसटलेल्या धोरणांपैकी हे एक असावे काय ?

पक्षांतर्गत-टीना* फॅक्टर भाजपचा डिसऍडव्हान्टेज ठरेल काय ?

तुम्ही कितीही चावटपणा केला तरी तुम्हाला जे हवे आहे तसले इथे कोणी बोलायची शक्यता नाही...
कारण आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

गब्रिएल's picture

29 Dec 2018 - 9:47 pm | गब्रिएल

आजून काय मिळेना झालं तर काय शोदलं तर म्हने मोदी आजारी पडल्ये तर काय? आरे त्ये तुमा रागा-चरण-घट्ट-धरारे पार्टीच्या लोकन्ना गजाआड पोचवून आराम कर्नार आहेत, आशी आंतर्गत बातमी हाये !

आजच म्हने त्यो मायकेल की फायकेलनं कोर्टात तुम्च्या बाईसायेब आनी युवराज्यांचे नाव काडलं म्हने. तिकडबी बगा जरा. नायतर उगा पंचात होयाची. :)

Blackcat's picture

29 Dec 2018 - 11:12 pm | Blackcat (not verified)

इथल्या इथे मोदींच्या कारकिर्दीत सलमान , 2 जी वाले सुटले. पवारना पद्म मिळाले.

हा तर परदेसीच , कधीही फूरर होईल.

सुबोध खरे's picture

28 Dec 2018 - 11:33 am | सुबोध खरे

भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही.
"डोळे उघडा" एवढेच मी म्हणेन

वेडसर's picture

28 Dec 2018 - 12:00 pm | वेडसर

सुषमा स्वराज, गडकरी यांच्यासारखी चांगली लायक लोकंही आहेत की!

आणि सध्या तरी २०१९ करता मोदीजीच चांगले खमके आहेत की!

पुढचं पुढे बघू. आत्ताच कशाला चिंता?!

काय म्हणता?

पुढचं पुढे बघू. आत्ताच कशाला चिंता?!

काय म्हणता?

यु आर राईट ...
मग त्याच न्यायाने ,
आत्ताच, पंतप्रधान पदासाठी विरोधी पक्षांनाही, तुमच्या कडे ऑप्शन काय ? हे विचारायला नको .. पुढचं पुढे बघू. आत्ताच कशाला चिंता?!

काय म्हणता?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

28 Dec 2018 - 2:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

विरोधी पक्षांनी पर्याय दिला की लगेच त्या व्यक्तीबद्दल समाजमाध्यमांत 'बातम्या' पसरवायच्या, त्या व्यक्तीची जुनी भाषणे खोदून काढून काही 'मसाला' मिळतो, का ते पहायचे असा '(रि)पब्लिक गेम' खेळायचा...अशी मांडणी असावी.. असे ह्यांचे मत.

Blackcat's picture

28 Dec 2018 - 2:50 pm | Blackcat (not verified)

ती त्यांची जुनी पद्धत आहे , अगदी तुकारामापासून

डँबिस००७'s picture

28 Dec 2018 - 10:42 pm | डँबिस००७

ओ हो हे दुखण आहे ?
सध्या चंद्रगुप्त मौर्य सिरीयल चालु आहे त्यात भारतातल त्याकाळातल सर्वात मोठ व बलाढ्य राज्य मगध चा राजा धनानंद हा नापित (न्हावी जातीचा) होता अस दाखवलय !! हे शक्य होत ?

उगा काहितरीच's picture

29 Dec 2018 - 6:21 am | उगा काहितरीच

कुच भी !

माई, अग पण , मूळ विचारलेला प्रश्नाचे कोणी मुळी उत्तरच देत नाहीये !
मूळ प्रश्न होता ...

(प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर) मोदीजींच्या अनुपस्थितीत, भाजपला केंद्रीय निवडणुकीत लीड करायला, दुसऱ्या फळीतल्या (भविष्यात) भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही.

आता , देव न करो , पण जवळ जवळ सत्तरीत पोहोचलेले मोदीजी, समजा (फक्त समजा हं) सडन कार्डियोव्हॅस्कुलर फेल्युअरने निधन झाले तर ?
एखाद्या जहाजाचा कप्तान जसा अचानक मृत पावला तर जसे फर्स्ट ऑफिसर हा त्याची जागा घेतो, कारण ही एक स्टॅंडर्ड ऑप सिस्टिम असते.
एका छोट्या जहाजासाठी एवढी एसओपी असते ... एवढ्या मोठ्या पोलिटिकल सिस्टमचे काय ?
मूळ प्रश्न परत विचारतो
(प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर) मोदीजींच्या अनुपस्थितीत, भाजपला केंद्रीय निवडणुकीत लीड करायला, दुसऱ्या फळीतल्या (भविष्यात) भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही.
भाजप थिंक टॅन्कच्या निसटलेल्या धोरणांपैकी हे एक असावे काय ?

पक्षांतर्गत-टीना* फॅक्टर भाजपचा डिसऍडव्हान्टेज ठरेल काय ?

ट्रम्प's picture

29 Dec 2018 - 2:29 pm | ट्रम्प

काँग्रेस ला गेली 25 / 30 वर्ष पुढचे सर्वमान्य नेतृत्व कोण ? हा प्रश्न सोडवता आलेला नाही , रागा चा बुद्धयाकं वाढेपर्यंत म्याडम व त्यांच्या प्रसिद्ध सल्लागार चौकड़ी नी गुजराल , राव आणि सिंग ही ताटाखालची मांजरे पंतप्रधान पदावर काँग्रेस नी बसवली . हि सगळी मांजरे काँग्रेस हाय कमांड व सल्लागार चौकड़ी च्या इशऱ्यावर उठबस करत होती व हाय कमांड ला अनुकूल निर्णय घेत होती हे सर्वश्रुत आहे .

त्याच काळात पवार साहेबांनी इटली च्या मैडम च्या पंतप्रधान होण्याच्या आकांक्षा धुळीस मिळावल्या होत्या . राजीव गाँधीच्या ( 1991) निधना नंतर सोइस्कररित्या राष्ट्रीय राजपुत्र समझदार होईपर्यंत 2014 पर्यन्त काँग्रेस ने अध्यक्ष आणि पंतप्रधान पदी सांगकामे बसवले होते . आता 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्याच कित्तेक सहकाऱ्याना राष्ट्रीय पुत्राची पंतप्रधान पदासाठी उमेदवारी मान्य नाही आणि काँग्रेस कुठल्याही परिस्थितित काँग्रेस स्वबळावर सत्तेत येवू शकत नाही .

अशा परिस्थितित काँग्रेस चे पुढील नेतृत्व कोण करणार ? असा प्रश्न कूलगाय नां पडला पाहिजे पण भाजप चे कुसळ बघण्याची सवय असणाऱ्यानां काँग्रेस चे मुसळ कसे दिसणार ?

सुबोध खरे's picture

28 Dec 2018 - 8:03 pm | सुबोध खरे

माईसाहेबाना त्यांच्या "ह्यांनी" लोया प्रकरणाला "बगल" देण्याचा सल्ला दिला आहे असे ऐकिवात आले. ))==((

वेडसर's picture

28 Dec 2018 - 5:59 pm | वेडसर

अगदी करेक्ट आहे तुमचं..

सुबोध खरे's picture

28 Dec 2018 - 12:45 pm | सुबोध खरे

सध्या तरी २०१९ करता मोदीजीच चांगले खमके आहेत की!

पुढचं पुढे बघू

२०१९ ला विरोधी पक्षांसाठी कोण आहे पंतप्रधान पदाचा उमेदवार? राहुल गांधी मायावती मुलायम सिंह ममता कि चंद्राबाबू

वेडसर's picture

28 Dec 2018 - 8:06 pm | वेडसर

वरीलपैकी सगळ्यांनाच PM व्हायचे आहे हाच तर मोठा क्रायसिस आहे :)

गब्रिएल's picture

29 Dec 2018 - 9:48 pm | गब्रिएल

आजून काय मिळेना झालं तर काय शोदलं तर म्हने मोदी आजारी पडल्ये तर काय? आरे त्ये तुमा रागा-चरण-घट्ट-धरारे पार्टीच्या लोकन्ना गजाआड पोचवून आराम कर्नार आहेत, आशी आंतर्गत बातमी हाये !

आजच म्हने त्यो मायकेल की फायकेलनं कोर्टात तुम्च्या बाईसायेब आनी युवराज्यांचे नाव काडलं म्हने. तिकडबी बगा जरा. नायतर उगा पंचात होयाची. :)

Blackcat's picture

29 Dec 2018 - 11:15 pm | Blackcat (not verified)

इथल्या इथे मोदींच्या कारकिर्दीत सलमान , 2 जी वाले सुटले. पवारना पद्म मिळाले.
हा तर परदेसीच , कधीही फूरर होईल.

.......

त्या अपशकुनी ऑफिसची शांती झाली की नाही अजून ?
http://www.saamana.com/bjp-new-head-quarter-is-unlucky-for-them/

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Dec 2018 - 7:05 am | माईसाहेब कुरसूंदीकर

शक्यता आहे. गंभीर प्रकरणातल्या आरोपींच्या चौकशीची विधाने ताबडतोब मिडियाकडे पोचवली जातात हे पाहून सक्तवसूली संचालनायलाच्या अधिकार्यांनाही पद्म मिळायला हवे असे ह्यांचे मत.

Blackcat's picture

30 Dec 2018 - 7:56 am | Blackcat (not verified)

तो असे म्हणाला , असे सरकारी लोक बोलतात
नंतर कोर्टात तो म्हणतो मी बोललोच नव्हतो.

मागे चिदम्बरमच्या मुलाने काहीतरी कुठेतरी स्टेटमेंट सांगितले , आता काँग्रेस , गांधी , चिदम्बरम वगैरे जाणार , मोदींचा मास्टर स्ट्रोक वगैरे व्हाट्सएपवरून फिरत होते , त्या स्टेटमेंटचे काय झाले ?

ट्रेड मार्क's picture

30 Dec 2018 - 9:58 am | ट्रेड मार्क

ऑगस्ता वेस्टलँड डील मधील दलाल मिचेल क्रिस्टियानोला केवळ सरकारच्याच नव्हे तर सरकार आणि सैन्यदल यांच्यातील संभाषणाची तसेच निर्णयांची संपूर्ण माहिती होती. तुम्ही ED आणि भारतीय मीडिया काय घेऊन बसलात?

तुमची भूमिका अजूनही स्पष्ट होत नाहीये, एवढे आरोप होऊनही कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात का आनंदी?

भाजपाच्या काळात कर्जप्रकरणे केलेले लोक मनमोहनवर सिनेमा बनवत आहेत .
Anupam Kher essays the role of former Prime Minister Dr. Manmohan Singh’s in ‘Accidental Prime Minister’ which releases on 11th January, 2019. The movie, based on the book by the same name by Sanjay Baru, is a fictionalized version of the tenure of Dr. Singh as the Prime Minister of India and his relationship with the Gandhi family-led Congress party.

 

While the former Prime Minister maintains his usual grace by refusing to be drawn into the controversy over the film, many have questioned the propaganda and timing just before the upcoming 2019 Lok Sabha elections.

https://www.khabarbar.com/entertainment-lifestyle/makers-of-accidental-p...

Amidst all the controversies that have sparked for and against the backdrop of the movie, it is important to learn more about Vijay Gutte, the director of the movie. Vijay is the son ofRatnakar Gutte, leader of BJP ally Rashtriya Samaj Paksha (RSP) and main accused in the alleged Rs. 328-crore sugar factory scam in Maharashtra. The opposition in Maharashtra has alleged that funds from this scam have been diverted to produce the propaganda movie.

 

Congress spokesperson Sachin Sawant then said this clearly shows the link between the filmmakers and the BJP, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS).

ट्रेड मार्क's picture

31 Dec 2018 - 6:06 am | ट्रेड मार्क

हिंदूंच्या देवीदेवतांपासून ते हिंदुस्थानातल्या शूर राजेरजवाडे व त्यांच्या राण्यांना विचित्र पद्धतीने दाखवल्यावर ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून आरडाओरडा होत होता ते लॉजिक इथे लागू होत नाही का? आता ममो सिंग किंबहुना त्यांच्यापेक्षाही राजघराणं आता आपल्या देवीदेवतांपेक्षा मोठं श्रद्धास्थान झालं आहे?

बाकी २००२ च्या दंगलींवर किती सिनेमे निघाले आणि ते कधी कशी प्रदर्शित झाले यावर थोडं संशोधन करा.

सुखी's picture

13 Feb 2019 - 9:51 pm | सुखी

बरेच प्रतिसाद वाचून schizophrenic discussion चाललंय की काय असच वाटतंय