Skip to main content

टीना, मोदीजी आणि डिसऍडव्हान्टेज

लेखक mrcoolguynice यांनी रविवार, 16/12/2018 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
अटलजींनी, २ खासदार संख्या असलेल्या भाजपच्या कितीतरी आधीपासून, आणि नंतरही कितीतरी वर्षे, भाजपची धुरा सांभाळली. त्यांनी ८० च्या दशकातच, अनेक तत्कालीन युवा नेतृत्वगुण असलेले उमेदवार हेरून त्यांना ग्रुम केलं. त्यांनी प्रभावीपणे तत्कालीन भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली. ८० च्या दशकात महाजन/स्वराज/राजनाथसिंह (व इतर अनेक) यांचे कर्तृत्व अटल बिहारी वाजपेयी यांनी बरोबर हेरले. भाजपाची भक्कम दुय्यम फळी उभारली. मोदीजींनी गेली काही वर्षे भाजपाची धुरा सांभाळली आहे. गेल्या काही वर्ष्यात भाजपाला केंद्रात व अनेक राज्यात सत्तेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. नुकत्याच झालेल्या (डिसेंबर २०१८) विधानसभा निवडणुकीतील पराभवाने भाजपाला थोडासा धक्का नक्कीच बसला आहे, परंतु त्यामुळे सुतक करावे असं काही वातावरण नाही. आजवर अनेक पेचप्रसंग आले आणि गेले पण, त्यातून निभावून जाण्याची क्षमता/अनुभव मोदीजींत नक्कीच आहे. मोदींवरती श्रद्धा असलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षांतर्गत बळ मोदीजींच्या मागे आहे, जनमानसातील त्यांची प्रतिमा अजूनही लोकप्रिय आहे. पण मोदीजी एकाकी पडलेत का ? भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा विचार केल तर , (प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर) मोदीजींच्या अनुपस्थितीत, भाजपला केंद्रीय निवडणुकीत लीड करायला, दुसऱ्या फळीतल्या (भविष्यात) भाजपचा चेहेरा बनू शकेल असं एकही नाव डोळ्यासमोर येत नाही. भाजप थिंक टॅन्कच्या निसटलेल्या धोरणांपैकी हे एक असावे काय ? पक्षांतर्गत-टीना* फॅक्टर भाजपचा डिसऍडव्हान्टेज ठरेल काय ? (*टीना = There Is No Alternative = अशी पर्सिव्हड राजकीय स्थिती की जिथे नेतृत्वाला पर्याय उपलब्ध नसतो )

वाचने 51066
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

सध्या तरी २०१९ करता मोदीजीच चांगले खमके आहेत की!

पुढचं पुढे बघू २०१९ ला विरोधी पक्षांसाठी कोण आहे पंतप्रधान पदाचा उमेदवार? राहुल गांधी मायावती मुलायम सिंह ममता कि चंद्राबाबू

In reply to by सुबोध खरे

वरीलपैकी सगळ्यांनाच PM व्हायचे आहे हाच तर मोठा क्रायसिस आहे :)

आजून काय मिळेना झालं तर काय शोदलं तर म्हने मोदी आजारी पडल्ये तर काय? आरे त्ये तुमा रागा-चरण-घट्ट-धरारे पार्टीच्या लोकन्ना गजाआड पोचवून आराम कर्नार आहेत, आशी आंतर्गत बातमी हाये ! आजच म्हने त्यो मायकेल की फायकेलनं कोर्टात तुम्च्या बाईसायेब आनी युवराज्यांचे नाव काडलं म्हने. तिकडबी बगा जरा. नायतर उगा पंचात होयाची. :)

In reply to by गब्रिएल

इथल्या इथे मोदींच्या कारकिर्दीत सलमान , 2 जी वाले सुटले. पवारना पद्म मिळाले. हा तर परदेसीच , कधीही फूरर होईल. ....... त्या अपशकुनी ऑफिसची शांती झाली की नाही अजून ? http://www.saamana.com/bjp-new-head-quarter-is-unlucky-for-them/

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

शक्यता आहे. गंभीर प्रकरणातल्या आरोपींच्या चौकशीची विधाने ताबडतोब मिडियाकडे पोचवली जातात हे पाहून सक्तवसूली संचालनायलाच्या अधिकार्यांनाही पद्म मिळायला हवे असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

तो असे म्हणाला , असे सरकारी लोक बोलतात नंतर कोर्टात तो म्हणतो मी बोललोच नव्हतो. मागे चिदम्बरमच्या मुलाने काहीतरी कुठेतरी स्टेटमेंट सांगितले , आता काँग्रेस , गांधी , चिदम्बरम वगैरे जाणार , मोदींचा मास्टर स्ट्रोक वगैरे व्हाट्सएपवरून फिरत होते , त्या स्टेटमेंटचे काय झाले ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ऑगस्ता वेस्टलँड डील मधील दलाल मिचेल क्रिस्टियानोला केवळ सरकारच्याच नव्हे तर सरकार आणि सैन्यदल यांच्यातील संभाषणाची तसेच निर्णयांची संपूर्ण माहिती होती. तुम्ही ED आणि भारतीय मीडिया काय घेऊन बसलात? तुमची भूमिका अजूनही स्पष्ट होत नाहीये, एवढे आरोप होऊनही कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात का आनंदी?

भाजपाच्या काळात कर्जप्रकरणे केलेले लोक मनमोहनवर सिनेमा बनवत आहेत . Anupam Kher essays the role of former Prime Minister Dr. Manmohan Singh’s in ‘Accidental Prime Minister’ which releases on 11th January, 2019. The movie, based on the book by the same name by Sanjay Baru, is a fictionalized version of the tenure of Dr. Singh as the Prime Minister of India and his relationship with the Gandhi family-led Congress party.   While the former Prime Minister maintains his usual grace by refusing to be drawn into the controversy over the film, many have questioned the propaganda and timing just before the upcoming 2019 Lok Sabha elections. https://www.khabarbar.com/entertainment-lifestyle/makers-of-accidental-… Amidst all the controversies that have sparked for and against the backdrop of the movie, it is important to learn more about Vijay Gutte, the director of the movie. Vijay is the son ofRatnakar Gutte, leader of BJP ally Rashtriya Samaj Paksha (RSP) and main accused in the alleged Rs. 328-crore sugar factory scam in Maharashtra. The opposition in Maharashtra has alleged that funds from this scam have been diverted to produce the propaganda movie.   Congress spokesperson Sachin Sawant then said this clearly shows the link between the filmmakers and the BJP, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS).

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हिंदूंच्या देवीदेवतांपासून ते हिंदुस्थानातल्या शूर राजेरजवाडे व त्यांच्या राण्यांना विचित्र पद्धतीने दाखवल्यावर ते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून आरडाओरडा होत होता ते लॉजिक इथे लागू होत नाही का? आता ममो सिंग किंबहुना त्यांच्यापेक्षाही राजघराणं आता आपल्या देवीदेवतांपेक्षा मोठं श्रद्धास्थान झालं आहे? बाकी २००२ च्या दंगलींवर किती सिनेमे निघाले आणि ते कधी कशी प्रदर्शित झाले यावर थोडं संशोधन करा.