नं पाठवलेलं पत्रं

Pradeep Phule's picture
Pradeep Phule in जनातलं, मनातलं
9 Sep 2018 - 11:56 am

प्लीज, इकडे बघ ना..! मला तुझ्या हातांकडून वचन हवय, कि तू हे पत्रं फाडणार नाहीस. या पत्रातुन जणू मीच तुझ्याशी बोलत आहे. प्रत्यक्ष बोलायचं तर खूप आहे, पण त्यासाठी हवा एकांत, आणि तोहि मिळणे कठीण, म्हणून हा सारा खटाटोप. लिहायचं खूप आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा लिहायला बसतो, आणि मग शब्द ययाती मधल्या अल्के सारखे गट्टी फू करून बसतात. आणि मी सगळं काही विसरून जातो. मी तुला या शुल्लक पानासोबत एक छानस कार्ड ही देऊ शकलो असतो, पण असं केल्यामुळे मी तुला आणखी एकदा विनवणी करत आहे कि काय, असा तुझा गैरसमज झाला असता, आणि तू हे पत्र फाडून टाकल असतं. आणि तसही माझ्या वागण्यातून तुला त्रास जाणवेल, असं मला वागायचं नाही. ज्या व्यक्तीला आपल्या वागण्याचा त्रास होतो, ते प्रेम कसले.. ? छे ते प्रेम असूच शकणार नाही. खरं प्रेम राग, लोभ, वासना, द्वेष यां पलीकडे गेलेल असत.

तुझे ते "तीन शब्द" माझ्या मनात अजूनही वावटळ निर्माण करतात. गरम लोह वितळवून कानात ओतावे तसे ते शब्द माझ्यावर परिणाम करून गेले. जाऊ दे..! असं म्हणतात कि, कोणतही सत्कृत्य किंवा दुष्कृत्य करण्या आधी आई वडिलांचा चेहरा समोर आणावा, पण त्यावेळेस मी नक्की काय करत होतो, ते माझा मीच समजू शकलो नाही. तुह्या प्रीतीत जणी काही सगळ्या गोष्टींचा विसर पडला होता जणू काही..!

मला माहीत आहे कि, तुझा मन माझ्याविषयी अगदी पाषाणच झाल आहे. पण पाषाणालाही कोमल करण्याच काम मी करणार आहे. मी तुझ्या मनाला दररोज प्रेमरूपी फुले देत राहणार. ती प्रेमरूपी फुले तू , झिडकारून लावशील. कदाचित त्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीस. किंवा एखाद्या कागदाप्रमाणे चुरगाळून फेकून देशील. पण एक दिवस असा येईल कि ती प्रेमरूपी फुले तुला केसात माळावीशी वाटतील, त्यांना ओंजळीत घेऊन मनसोक्त सुगंध घ्यावासा वाटेल. आणि त्याच दिवशी तू खऱ्या अर्थाने माझी झालेली असेल. कदाचित हा दिवस महिन्याने किंवा अगदी वर्षानेही येऊ शकतो. मी तुझ्या शब्दांची वाट आयुष्यभर पाहावयास तयार आहे. खर प्रेम व्यक्त करण्यासाठी असा "नियोजित दिवस" कधी नसतो ना गं..?

तू मला नकार दिलास, आणि सर्वांना सांगून मोकळी झालीस. पण याचं कारण नेमक काय असू शकत, हा एकच प्रश्न मी तुला विचारत आहे. मी गरीब आहे म्हणून तू मला नकार दिला आहेस का..? आणि तसं असेल तर खूप चांगल आहे. कारण मी माझ्या पायावर उभा राहिल्यावर तरी मला काहीतरी चांगल ऐकायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे.

सांग ना मला, मी इतका वाईट आहे का गं..? फक्त एकदा हा प्रश्न मनाला विचार. सगळी उत्तरं तुला मिळून जातील. तुला वाटत असेल कि मी विसरलो म्हणून, पण श्वास घेणं कोणी विसरत का..? मी तुझाशी बोलणार, पण त्यामधून हि तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहणार. "समझने वालों को सिर्फ, इशारा काफी ..!" असं म्हणतात ना.

माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून या पत्राबाबत तू कुणाकड़े अवाक्षरही काढणार नाहीस याची मला खात्री आहे. मी अजून पूर्णपणे तुझा झालेलो नाही, म्हणून शेवटी "तुझाच" लिहण्याचा मला काहीही अधिकार नाही.

मांडणीविचारलेख

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

9 Sep 2018 - 7:07 pm | ज्योति अळवणी

तिने नकार दिला तो स्वीकारायला शिकलं पाहिजे.

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2018 - 1:23 pm | चौथा कोनाडा

वाह,
उत्स्फुर्त व उत्कट प्रकटन ! आवडले.
पुढं काय झालं हे वाचायला आवडेल.

मराठी कथालेखक's picture

10 Sep 2018 - 2:16 pm | मराठी कथालेखक

तुमची प्रेयसी मिपावर असेल आणि ती तुमचं हे पत्र वाचेल अशी आशा करतो.
तुमचं तिच्यावर खूप प्रेम असल्याने थोडा जास्त प्रयत्न करुन बघताय हे समजण्यासारखे आहे पण फार जास्त प्रयत्न करण्यात अथवा एकतर्फी प्रेमात अती वहावत जाण्यात अर्थ नाही.
तुम्ही क्या यही प्यार है नावाचा चित्रपट पाहिला आहे का ? नसेल तर नक्की बघा एकदा.
बाकी स्वतःकडे दोष अथवा कमीपणा घेण्याचे, न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. तुमच्या आसपास २५ मुली तरी असतील पण त्यातली तीच एक तुम्हाला आवडली याचाच अर्थ इतर २४ जणी आवडल्या नाहीत. पण याचा अर्थ त्या २४ जणींत काही कमतरता आहे असे होत नाही ना. मग तीच बाब तुम्हालाही लागू होते.
बाकी प्रेमाच्या प्रवासात तुम्हाला शुभेच्छा