बेडूक उड्या - लहान मुलांसाठी यूट्यूब चॅनल

Primary tabs

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
6 Sep 2018 - 7:37 pm
गाभा: 

भूमिका बदलतात आणि बदललेल्या काळाची ओळख होते. पालक झाल्यावर लहान मुलांनी ऐकायची गाणी, गोष्टी याचे बदललेले अवतार समोर आले. आता मुलांना वाचायला पुस्तकं कमी आणि बघायला व्हिडिओज जास्त आहेत हे लक्षात आलं. या नव्या डिजिटल माध्यमात असलेलं मराठी बालसाहित्य मात्र पालक म्हणून मला कधी तुटपुंजं वाटलं तर कधी उथळ. कुठलाही दृश्याचा आधार नसताना फक्त एकदा ऐकून पाठ होणाऱ्या कविता, आजही संपूर्ण आठवणाऱ्या गोष्टी, हसत खेळत म्हटलेली बाराखडी, पाढे हे सगळं बदललेल्या डिजिटल माध्यमात पुरेसं उपलब्ध नाही असं लक्षात आलं.

मग आपणच चांगल्या मराठी बालसाहित्याची डिजिटल रुपात निर्मिती का करू नये? असा विचार केला. तेंव्हापासून शोध, वाचन, चिंतन सुरु झालं. मी आणि माझी बहीण, Arnika Paranjape, आम्ही एकत्रपणे या संकल्पनेवर काम करू लागलो. मराठीतल्या गोष्टी, कविता, गाणी, आणि एकूणच चांगली भाषा मुलांच्या कानावर पडावी, त्यांच्या विचारांना चालना मिळावी हा प्रांजळ हेतू होता. त्या हेतूला आज मूर्त स्वरूप आलंय. 'बेडूक उड्या' हा आमचा यूट्यूब चॅनल आजपासून सुरु होत आहे.

या चॅनलवर काय असेल? व्हिडिओ रुपात बालसाहित्य असेल.
गाणी असतील, कविता असतील, गोष्टी, खेळ, गमती असतील
काळानुरूप आणि कालाबाधित; रंजक तरीही विचारप्रवर्तक; मुलांना रमवणारं, आणि खुलवणारं; आठवणीत हरवलेलं आणि नवीन घडवलेलं असं सर्वसमावेशक बालसाहित्य असेल.

तुमच्या मुलामुलींना जरूर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ दाखवा.

चॅनलला आवर्जून भेट द्या, सदस्यत्व घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ येताच तुम्हाला सूचना मिळेल.

https://www.youtube.com/channel/UCxvNbqrI_I9ob9yAILjVwjw/

आमच्या या प्रयत्नाला तुमचा प्रतिसाद मिळेल, प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे.

- अपूर्व ओक

प्रतिक्रिया

लौंगी मिरची's picture

6 Sep 2018 - 8:05 pm | लौंगी मिरची

छान उपक्रम :)

कंजूस's picture

6 Sep 2018 - 10:44 pm | कंजूस

आवडला चानेल.

सतिश गावडे's picture

6 Sep 2018 - 10:53 pm | सतिश गावडे

काही व्हिडीओ पाहीले. खुपच छान आहेत. तुमच्या या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा.

अर्थात या तुमच्या खारीचा वाटा उचलण्याने "इंग्लिश मिडीयम" वाल्यांवर कितपत परिणाम होईल याबद्दल शंका आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2018 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पृहणिय उपक्रम. तुमच्या या वाटचालीची अशीच माहिती आम्हालाही देत रहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2018 - 1:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्हिडिओंंमधला मजकूर आणि सादरीकरण दोन्हींची प्रत उत्तम आहे. मराठीमध्ये अश्या उपक्रमाची खूपच निकड होती. शाळकरी मुले असलेल्या नातेवाईकांना दुवा पाठवला आहे.

सोन्या बागलाणकर's picture

7 Sep 2018 - 4:06 am | सोन्या बागलाणकर

उत्तम उपक्रम!
तुमच्या ह्या प्रयत्नामुळे परदेशी राहणार्यांना पण आपल्या मुलांना मराठी बडबडगीतांची ओळख करून देता येईल.
तुमच्या ह्या प्रयत्नासाठी अनेक शुभेच्छा!

पैलवान's picture

7 Sep 2018 - 7:12 am | पैलवान

वेल्लाजी, खूप खूप छान उपक्रम!!!

मराठी डिजिटल माध्यमांतील कंटेंटची कमतरता मलाही मागच्या २-३ वर्षात खूप जाणवली आहे. काही लोकप्रिय बालगीते उपलब्ध आहेत पण अतिशय मोजकी.
तुमचा उपक्रम खूप खूप मोठा होवो ही मनापासून शुभेच्छा!!

ता.क. आमच्या ४वर्षाच्या चिरंजीवाला 'रंग' दाखवला. आणि त्याला तो आवडलासुद्धा. लाल, पिवळा, हिरवा त्याला चांगलं कळतं, पण तोंडात रेड, येलो, ग्रीन बसलंय. याचा नक्की उपयोग होईल, अशी खात्री आहे.

परत एकदा खूप शुभेच्छा!!

पिलीयन रायडर's picture

7 Sep 2018 - 11:19 am | पिलीयन रायडर

सगळे व्हिडीओ उत्तमच झालेत! मला अंकाचा तर विशेष आवडला. दर्जा अगदी ग्रेटच झालाय व्हिडीओचा.

आता पारंपरिक आजी सांगायची तशा कथा (ज्या आजकाल फार कुठे ऐकायला मिळत नाहीत), गाणी, कविता वगैरे येऊ दे. अत्यन्त उत्सुकतेने वाट बघत आहे.

कुठेही काहीही मदत लागली तर नक्की कळवा. मिपाकर पण आनंदाने सहभागी होतील. इथे आपण चांगला डेटाबेस उभा करू शकतो गोष्टींचा.

प्रसाद_१९८२'s picture

7 Sep 2018 - 11:35 am | प्रसाद_१९८२

चॅनेल सबस्क्राईब केला आहे.

वेल्लाभट's picture

7 Sep 2018 - 12:01 pm | वेल्लाभट

लौंगी मिरची,
सतिश गावडे,
कंजूस,
डॉ. सुहास म्हात्रे,
बागलाणकर,
प्रसाद
मनापासून धन्यवाद :) आशीर्वाद असूदेत

पैलवान भाऊ, ऐकून बरं वाटलं व्हिडिओ मुलाला आवडला ते. असेच उत्तमोत्तम व्हिडिओ आणत राहू.

धन्स पिरा, तुझी नेहमीच अमूल्य मदत होत आलीय. पुढेही लागणार आहे अर्थात. पारंपारिक कथा, कविता, सगळं येतंय हळू हळू. पडद्यामागं काम चालू आहे.

मिपाकरांना या निमित्ताने एक आवाहन करतो. कुणाकडे सामान्यतः ऐकिवात नसलेल्या, अप्रचलित पण विचारमूल्य असलेल्या गोष्टी, कविता असतील, आजी आजोबांनी, आईबाबांनी सांगितलेल्या आठवत असतील, तर मला व्यनि करा. मला तुमची मदत होऊ शकेल. _/\_

नाखु's picture

7 Sep 2018 - 12:09 pm | नाखु

स्वीडन स्थित भाचीला लिंक पाठवित आहे

शुभेच्छा

वेल्लाभट's picture

8 Sep 2018 - 10:21 pm | वेल्लाभट

अनेक आभारः)

वकील साहेब's picture

7 Sep 2018 - 4:40 pm | वकील साहेब

खूप छान उपक्रम सुरु केला आहे. काही बडबड गीते, गोष्टी, उखाणे जमतील तसे व्यनि करतो. अधिक जाणून घ्यायला आवडेल.
तुमच्या कार्याला शुभेच्छा

वेल्लाभट's picture

9 Sep 2018 - 12:30 pm | वेल्लाभट

धन्यवाद वकील साहेब ! वाट बघतो व्यनि ची

सहमत आहे सर्वांच्या मताशी . खासकरून मुलांसाठी उपयुक्त ठरेल आणि हि जी लिंक दिली आहे त्याबद्दल धन्यवाद . वाचनखूण साठवत आहे ....

वेल्लाभट's picture

9 Sep 2018 - 12:31 pm | वेल्लाभट

धन्स :)

पद्मावति's picture

7 Sep 2018 - 7:27 pm | पद्मावति

वाह, सुंदर उपक्रम.

वेल्लाभट's picture

9 Sep 2018 - 12:31 pm | वेल्लाभट

धन्यवाद :)

स्मिता.'s picture

7 Sep 2018 - 8:07 pm | स्मिता.

अत्यंत सुंदर आणि स्तुत्य उपक्रम! व्हिडिओचा दर्जासुद्धा छान. सध्या जालावर उपलब्ध असलेले मराठी बालसाहित्य इंग्रजी बालसाहित्याच्या मानाने फारच तुटपुंजे आणि बटबटीत (माझा मुलगा घाबरतो) आहे. त्यातुलनेत 'बेडूक उड्या' फारच छान आहे. भरभराटीसाठी खूप खूप शुभेच्छा!
या उपक्रमाकरता हातभार लावायला आवडेल.

वेल्लाभट's picture

9 Sep 2018 - 12:32 pm | वेल्लाभट

हो जरूर. धन्यवाद :)

मी तुमच विडिओ चॅनेल अजून बघितल नाहीये, नक्कीच बघेन. या निमित्ताने पण आत्तापर्यंत जे काही मराठी साहित्य मी माझ्या लहान मुलाला (सध्या ६ वर्ष, मी ३-५ वर्षाचा असताना बराच प्रत्न केला)

१. मराठी गोष्टी - खूप हिंसाचार दाखवतात. २-३ उदाहरण देते
a . जवळपास प्रत्येक गोष्टी मध्ये कोणीतरी मरत, आणि मेलेल्या व्यक्ती / प्राणी शेजारी रक्त सांडलंय असा पण दाखवतात
b . एक बदकाची गोष्टी होती. बदक दिसायला छान नसतं त्याच्याकडे पैसे चांगले कपडे नसतात म्हणून उंदीर कोंबडा त्याला जत्रेला नेट नाहीत. त्यात त्या बदकाला आधी वाईट बोलतात. त्यात ज्या पद्धतीने ते बदकाला बोलतात "त्या भिक्कारड्या बदकाला कशाला आपल्या बरोबर न्यायचं ". ३-४ वर्षाच्या मुलाला हे दाखवाची गरज नाहीये असं वाटतं

c. काही गोष्टी मध्ये सुरवात करतात "फार फार वर्षा पूर्वी .... " पुढची २-३ मिनिट एकाच चित्र दिसत राहतं. लहान मुलांसाठी हा वेळ खूप आहे. इंग्रजी कार्टून मध्ये चित्र दर २-३ सेकंद मध्ये बदलतात. मुलं आवडीने बघतात.

d. हनुमान च्या कार्टून विडिओ मध्ये तो लहान असताना मस्तीखोर दाखवलाय. तो ऋषींच्या डोक्यावर फळं घाण टाकतो, प्राण्यांना मारतो. आमच्याकडे पण एका डबक्यात पाणी साचलं होत त्यात दगड मारून झाले, "हनुमान मारतो ना तसाच दगड मारला मी बेडकांना" नशीब त्या डबक्यात बेडूक पण नव्हते.

मराठी पुस्तकांची पण तशीच तऱ्हा आहे, चित्र कमी कधी कधी नाहीतच. रक्त वगैरे पण नीट दाखवलेलं असतं .
मी पंचतंत्र / महाभारत मधल्या गोष्टी ऐकवायचं बंद केलाय.

मराठी गाणी त्या मानाने खूप खूप चांगली आहेत, ती बरेचदा बघितली जातात.

स्मिता.'s picture

8 Sep 2018 - 5:14 pm | स्मिता.

हाच अनुभव माझाही आहे. किमान दर्जाचे ग्राफिक्स, बाल-विसंगत भाषा आणि दृष्य, इ. बर्‍याच गोष्टी आहेत. काही दर्जेदार इंग्रजी व्हिडिओ बघून नक्कीच शिकता येईल.

एक शंका: काही चांगल्या इंग्रजी कार्टून व्हिडिओची भाषा बदलून मराठीत आणता येतील का? अर्थात हे कायदेशीररित्या करणं बरंच क्लिष्ट असावं.

खरं म्हणालात, हे मलाही जाणवलं.

मात्र अजून एक गमतीशीर आहे. माझ्याकडे २-३ ऑडियो सीडी आहेत. त्यात जवळपास सगळेच निवेदक अतिशय नाटकी विचित्र पद्धतीने बोलतात (असं मला वाटायचं) पण मुलाला ते प्रचंड आवडतं

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2018 - 3:13 am | टवाळ कार्टा

लय भारी

थॉर माणूस's picture

8 Sep 2018 - 5:16 am | थॉर माणूस

उत्तम उपक्रम. विडीओज पण छान जमलेत. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना चॅनल शेअर केले आहे.

लई भारी's picture

8 Sep 2018 - 1:09 pm | लई भारी

आम्हाला याची गरज होतीच :)
मुलींना दाखवतो आता हे व्हिडीओ!
आपल्या उपक्रमास शुभेच्छा!

अतिशय स्पृहणीय उपक्रम. आपण काही तरी करायला हवं हे अनेकांना वाटत असतं पण एवढं मनावर घेऊन ते प्रत्यक्षात उतरवणं क्वचित घडतं - त्यासाठी वेल्ला तुझं खास अभिनंदन. बेला ला दाखवायला या चॅनल चा खास उपयोग होणार आहे - तिथे आमच्या मराठी शाळेत पण दाखवेन मी हा चॅनल :) तुला भरपूर शुभेच्छा !

वेल्लाभट's picture

9 Sep 2018 - 12:36 pm | वेल्लाभट

टका, थॉर माणूस, लई भारी,
अनेक अनेक आभार.

सृजा, वेळोवेळी मत, सूचना मागून पुढेही तसदी देईनच, पण तरीही आत्ता विशेष आभार.

स्रुजा's picture

20 Sep 2018 - 12:32 pm | स्रुजा

एनिटाईम!

ज्योति अळवणी's picture

9 Sep 2018 - 7:42 pm | ज्योति अळवणी

खूप चांगला उपक्रम

उगा काहितरीच's picture

9 Sep 2018 - 8:09 pm | उगा काहितरीच

शुभेच्छा ...

मस्त उपक्रम. ह्याची खूप गरज होती.

श्वेता२४'s picture

10 Sep 2018 - 2:30 pm | श्वेता२४

माझ्या 2.5 वर्षाच्या मुलाला खूप आवडले. विशेषता रंग व अंकांचा खूप आवडला. त्यातही रंगांचे उच्चार तांबला, नालिंगी असे बोबडे आहेत, आणि तो स्वतादेखील असेच बोबडे उच्चार करतो त्यामुळे तो विडीओ बघून खोखो हसला आणि मला म्हणाला आई तो तांबला नाई तांबला म्हनतोय. बाकी काही सुधारणा सुचवायच्या आहेत त्या व्य.नि. करते.

वेल्लाभट's picture

10 Sep 2018 - 3:38 pm | वेल्लाभट

धन्यवाद श्वेता, प्रतिसाद वाचून फार छान वाटलं. जाणीवपूर्वक बोबडे बोल ठेवले होते त्याचा परिणाम झाला यात मोठा आनंद आहे.

व्यनिला उत्तर देतोय.

जयन्त बा शिम्पि's picture

16 Sep 2018 - 5:15 am | जयन्त बा शिम्पि

फारच छान व उपयुक्त उपक्रम आहे. मला आवडला. आता माझ्या नात-नातुंना नक्की दाखविणार. शुभेच्छा.

सुमो's picture

16 Sep 2018 - 5:24 am | सुमो

आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना सलाम.

अनेक शुभेच्छा.

सुधांशुनूलकर's picture

17 Sep 2018 - 8:35 pm | सुधांशुनूलकर

सगळे व्हिडिओ फुरसतीत पुन्हा बघीन. माझ्याकडून काही सहभाग होण्यासारखा असेल तर त्याही दृष्टीने विचार करतोय.

डॉ श्रीहास's picture

24 Sep 2018 - 6:47 pm | डॉ श्रीहास

काका तुमचा अनुभव नक्कीच कामाला येणार... मला पूर्ण खात्री आहेच

मदनबाण's picture

22 Sep 2018 - 1:46 pm | मदनबाण

अतिशय सुरेख उपक्रम... :)
लेकीसह ३ही व्हिडियो पाहिले. :) अंकगीत फारच आवडले ! :)
अश्या बाल साहित्याची फार गरज आहे...
तुमच्या चॅनलला आणि उप्रक्रमास खुप सार्‍या शुभेच्छा. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nirvana Shatkam (Ameya Records)

निशाचर's picture

23 Sep 2018 - 5:06 am | निशाचर

उत्तम उपक्रम

वेल्लाभट's picture

24 Sep 2018 - 5:04 pm | वेल्लाभट

निशाचर, मदनबाण, सुमो, जयन्तशिम्पी खूप खूप धन्यवाद,
नूलकर काका, स्वागत आहे!

डॉ श्रीहास's picture

24 Sep 2018 - 6:45 pm | डॉ श्रीहास

सबस्क्राईब केला लगेच... मातृभाषेतून शिक्षण आणि त्याचा बुध्यांकाशी संबंध ह्यावरचं संशोधन हे फारच महत्वाचं अाहे असं सांगतंय ....

आता पुढला टप्पा वेगवेगळे विषय आणि त्यांची मांडणी ह्यासाठी शुभेच्छा , अजिबात थांबू नका अखंड चालू द्या हा चॅनल :))

वेल्लाभट's picture

25 Sep 2018 - 11:44 am | वेल्लाभट

डॉ श्रीहास, तुमच्या शब्दांनी खूप प्रेरणा मिळाली, _/\_