Skip to main content

बालगीते

बेडूक उड्या - लहान मुलांसाठी यूट्यूब चॅनल

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 06/09/2018 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
भूमिका बदलतात आणि बदललेल्या काळाची ओळख होते. पालक झाल्यावर लहान मुलांनी ऐकायची गाणी, गोष्टी याचे बदललेले अवतार समोर आले. आता मुलांना वाचायला पुस्तकं कमी आणि बघायला व्हिडिओज जास्त आहेत हे लक्षात आलं. या नव्या डिजिटल माध्यमात असलेलं मराठी बालसाहित्य मात्र पालक म्हणून मला कधी तुटपुंजं वाटलं तर कधी उथळ. कुठलाही दृश्याचा आधार नसताना फक्त एकदा ऐकून पाठ होणाऱ्या कविता, आजही संपूर्ण आठवणाऱ्या गोष्टी, हसत खेळत म्हटलेली बाराखडी, पाढे हे सगळं बदललेल्या डिजिटल माध्यमात पुरेसं उपलब्ध नाही असं लक्षात आलं. मग आपणच चांगल्या मराठी बालसाहित्याची डिजिटल रुपात निर्मिती का करू नये? असा विचार केला.