बेडूक उड्या - लहान मुलांसाठी यूट्यूब चॅनल
भूमिका बदलतात आणि बदललेल्या काळाची ओळख होते. पालक झाल्यावर लहान मुलांनी ऐकायची गाणी, गोष्टी याचे बदललेले अवतार समोर आले. आता मुलांना वाचायला पुस्तकं कमी आणि बघायला व्हिडिओज जास्त आहेत हे लक्षात आलं. या नव्या डिजिटल माध्यमात असलेलं मराठी बालसाहित्य मात्र पालक म्हणून मला कधी तुटपुंजं वाटलं तर कधी उथळ. कुठलाही दृश्याचा आधार नसताना फक्त एकदा ऐकून पाठ होणाऱ्या कविता, आजही संपूर्ण आठवणाऱ्या गोष्टी, हसत खेळत म्हटलेली बाराखडी, पाढे हे सगळं बदललेल्या डिजिटल माध्यमात पुरेसं उपलब्ध नाही असं लक्षात आलं.
मग आपणच चांगल्या मराठी बालसाहित्याची डिजिटल रुपात निर्मिती का करू नये? असा विचार केला. तेंव्हापासून शोध, वाचन, चिंतन सुरु झालं. मी आणि माझी बहीण, Arnika Paranjape, आम्ही एकत्रपणे या संकल्पनेवर काम करू लागलो. मराठीतल्या गोष्टी, कविता, गाणी, आणि एकूणच चांगली भाषा मुलांच्या कानावर पडावी, त्यांच्या विचारांना चालना मिळावी हा प्रांजळ हेतू होता. त्या हेतूला आज मूर्त स्वरूप आलंय. 'बेडूक उड्या' हा आमचा यूट्यूब चॅनल आजपासून सुरु होत आहे.
या चॅनलवर काय असेल? व्हिडिओ रुपात बालसाहित्य असेल.
गाणी असतील, कविता असतील, गोष्टी, खेळ, गमती असतील
काळानुरूप आणि कालाबाधित; रंजक तरीही विचारप्रवर्तक; मुलांना रमवणारं, आणि खुलवणारं; आठवणीत हरवलेलं आणि नवीन घडवलेलं असं सर्वसमावेशक बालसाहित्य असेल.
तुमच्या मुलामुलींना जरूर आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ दाखवा.
चॅनलला आवर्जून भेट द्या, सदस्यत्व घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ येताच तुम्हाला सूचना मिळेल.
https://www.youtube.com/channel/UCxvNbqrI_I9ob9yAILjVwjw/
आमच्या या प्रयत्नाला तुमचा प्रतिसाद मिळेल, प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे.
- अपूर्व ओक
याद्या
14014
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
छान उपक्रम :)
आवडला चानेल.
काही व्हिडीओ पाहीले. खुपच छान
स्पृहणिय उपक्रम. तुमच्या या
व्हिडिओंंमधला मजकूर आणि
In reply to स्पृहणिय उपक्रम. तुमच्या या by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम उपक्रम!
खूप खूप छान उपक्रम!!!
सगळे व्हिडीओ उत्तमच झालेत!
छान उपक्रम.
लौंगी मिरची,
छान उपक्रम
अनेक आभारः)
In reply to छान उपक्रम by नाखु
खूप छान उपक्रम सुरु केला आहे.
धन्यवाद वकील साहेब ! वाट बघतो
In reply to खूप छान उपक्रम सुरु केला आहे. by वकील साहेब
सहमत आहे सर्वांच्या मताशी .
धन्स :)
In reply to सहमत आहे सर्वांच्या मताशी . by खिलजि
वाह, सुंदर उपक्रम.
धन्यवाद :)
In reply to वाह, सुंदर उपक्रम. by पद्मावति
सुंदर उपक्रम
हो जरूर. धन्यवाद :)
In reply to सुंदर उपक्रम by स्मिता.
मी तुमच विडिओ चॅनेल अजून
अगदी अगदी
In reply to मी तुमच विडिओ चॅनेल अजून by वीणा३
खरं म्हणालात, हे मलाही जाणवलं
In reply to मी तुमच विडिओ चॅनेल अजून by वीणा३
मात्र अजून एक गमतीशीर आहे.
लय भारी
उत्तम उपक्रम. विडीओज पण छान
धन्यवाद!
अतिशय स्पृहणीय उपक्रम. आपण
टका, थॉर माणूस, लई भारी,
एनिटाईम!
In reply to टका, थॉर माणूस, लई भारी, by वेल्लाभट
खूप चांगला उपक्रम
शुभेच्छा ...
मस्त उपक्रम. ह्याची खूप गरज
मस्त आहेत विडीओ
धन्यवाद श्वेता,
In reply to मस्त आहेत विडीओ by श्वेता२४
फारच छान व उपयुक्त उपक्रम आहे
छानच संकल्पना
अभिनंदन आणि शुभेच्छा
काका तुमचा अनुभव नक्कीच
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा by सुधांशुनूलकर
अतिशय सुरेख उपक्रम... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirvana Shatkam (Ameya Records)उत्तम उपक्रम
निशाचर, मदनबाण, सुमो,
मनापासून धन्यवाद...
डॉ श्रीहास, तुमच्या शब्दांनी