गावाकडची गोष्ट

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
18 Aug 2018 - 7:29 pm

अरे .. ! ये दिनू अरे थांब कि थोडा वेळ मला पण यायचं आहे . तू असा एकटाच कसा चालला
पण दिनू च लक्ष आज कुणाकडेच नव्हतं त्याला आज काहीही करून त्या गावाबाहेरच्या पडक्या विहिरीचं रहस्य शोधायचं होत मागील एक महिन्या पासून त्या विहिरीजवळ मेलेली मांजर दररोज टाकलेली असायची . ,
पण आज दिनूला या गोष्टीची खूपच चिड आली होती कि कोण आहे या मागे जो दररोज एका निष्पाप प्राण्याचा जीव घेतोय दिनू त्याच्या विचारात चालला होता मागून अमित पळत पळत त्याच्या जवळ येऊन थांबला त्याने दिनूला असा घाई घाईत कुठे चालला आहेस म्हणून विचारलं तेव्हा दिनूने त्याला आपण कुठे चाललो आहोत याची माहिती अमित ला दिली .
अमित पण मग दिनू सोबत निघाला संध्याकाळचे सात वाजत आले होते सूर्य बुडून बराच वेळ झाला होता . शेतातून येणारी तुरळक माणसेच दिसत होती . , दिनू आणि अमित थोड्याच वेळात विहिरीजवळ येऊन पोहोचले बघतो तर विहिरीजवळ एक पांढरी मांजर फिरत होती ती सारखी म्याव म्याव करत विहिरीच्या भोवती फिरत होती अमित आणि दिनू बाजूला उभे राहून त्या मांजरीकडे बघत होते
.
.....................................................................................
आता बराच अंधार पडला होता ,. दिनू आणि अमित अजूनही शांत उभे होते ती मांजर आता समोरच्या पिंपळाच्या झाडाकडे निघाली होती झाडाजवळ पोहचताच त्या मांजरीचे रूप रूप विरळ होत गेले आणि त्या ठिकाणी एका पांढऱ्या साडीतली बाई निर्माण झाली . अमित तर हे सर्व बघून पूर्ण पणे घाबरून गेला त्याला पूर्ण पणे घाम फुटला पण दिनू ने त्याला धीर दिला कि घाबरू नको शांत उभा रहा आणि पुढे काय होतंय या ककडे नीट लक्ष दे !
पण या दोघांना माहीतच नव्हते कि आज त्याच्या वर वाईट वेळ येणार आहे ,. झाडाजवळ उभी असलेली बाई बघता बघता त्या झाडावर सरसर चढली झाडावरून तिने या दोघांवर एक मंत्र टाकला क्षणात या दोघांचं रूपांतर मांजरी मध्ये झाले दिनू आणि अमित ला काय करावे सुचत नव्हते पण दोघांनी वेळीच सावध होत गावाकडे धाव मारली त्या भयानक जागेच्या बाहेर येताच मंत्राचा प्रभाव कमी झाला आणि हे दोघे पुन्हा मानवी रूपात आले ,. दिनू आणि अमितला तर त्या चेटकिणीची धडकीच भरली होती कसे बसे दोघे गावात आले अमित तर दिनूला खूप शिव्या देत होता . पुंन्हा कधी त्या विहिरीकडे परतणार नाही याची शपथ च अमितने घेतली दिनूला पण आपण जास्तच जोश मध्ये चूक केल्याचं समजले . मनातून दिनू पण खूप घाबरला होता पण सांगतोय कुणाला
इकडे विहिरीजवळ ती बाई अजूनही आपले सावज शोधत भटकत होती ,. वातावरणात एक गारवा पसरला होता त्या पडक्या विहिरीजवळ अजूनही भयानक शांतता होती गावात सगळीकडे शुकशुकाट होता दूरवरून मांजरीचा आवाज येत होता तो आवाज ऐकून गावातील एक मांजर त्या दिशेने चालली होती तिच्या शेवटच्या प्रवासाला .......

कथालेख

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

18 Aug 2018 - 8:05 pm | टर्मीनेटर

भारी लिहिलंय.

जेम्स वांड's picture

18 Aug 2018 - 9:01 pm | जेम्स वांड

थोडक्यात गोडवा प्रकारे तुफान बार उडवला!