गोष्ट जन्मांतरीची

Primary tabs

विकास's picture
विकास in काथ्याकूट
18 Sep 2007 - 6:49 am
गाभा: 

मिसळपाव या उपक्रमावर, जो काही चालू केल्या केल्या ऐन गणपतीत काही जणांनी शिमगा केला, तो वाचताना जे वाटले, त्याबद्दलचे हे मनोगत! :)

आंतर्जालावर मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव या तीन मराठी संकेतस्थळांशी माझा संबंध त्याच क्रमात आला. यातील आंतर्जाल कालचक्राच्या संदर्भात मनोगत प्रौढावस्थेत, उपक्रम पौंगाडावस्थेत आहेत तर मिसळपाव "तान्हेच" म्हणायला हवे. आता तान्ह्याबद्दल त्याला शिंग फुटे पर्यंत बोलणे अयोग्य वाटते. पण मनोगत आणि उपक्रम या दोन्हीमधे व्यक्तीस्वभावाप्रमाणेच चांगल्या-वाईट गोष्टी आढळतील. त्यात प्रत्येकाचा हवा असलेला आणि नसलेला लोकसंपर्क घडणे पण साहजीकच आहे. वास्तवीक ही तीन संकेत स्थळे आणि अनेक इतर (मला माहीत नसलेली) जी अनेकांच्या सहकार्याने चालत आहेत, मोठी होत आहेत ते वास्तवीक पहाता, देशविदेशातील समस्त मराठी समाजाला अभिमानाची गोष्ट आहे, असायला हवी. त्यात जर का स्पर्धा चालू झाली तरी काही चूक नाही , उलटी हवीच, जो पर्यंत त्याचे रुपांतर व्यक्तिगत अहंकारात होत नाही. म्हणुन विचारावेसे वाटते की त्याचा व्यक्तिगत "इगो इशू" करत "घालीन डवी टांग पाडीन उताणा, असाच आमुचा मराठी बाणा" या पद्धतीने वागणे योग्य आहे का?

मराठ्यांचा (

आज आपण एका वेगळ्या अर्थाने हेच नाटक तर जगत नाही ना असे वाटू लागले. त्यासाठी केवळ "शहाण्यासारखे" वागण्याची सर्व जबाबदारी तात्यांवर आणि मिसळपाव वर टाकणे हा अन्याय होईल. म्हणून वाटते की, जेथे जेथे गुंडोपंतांच्या भाषेत, आपण पिंक टाकत असू , तेथे आपल्या प्रतिक्रीया आणि क्रीया, या आंतर्जालावरील मराठी वृद्धींगत होण्याच्या मधेतर येणार नाहीत ना याची काळजी आपण सर्वांनीच घ्यावी. म्हणून काही गोष्टी लिहाव्याशा वाटतातः

  1. आयोजकांनी एकमेकांविरुद्ध "नो फर्स्ट यूज" (टिका/ व्यक्तिगत होणे) असा अलिखीत करार करावा.
  2. सदस्यांनी एकमेकांची थट्टा मस्करी जरूर करावी, पण मस्करीची कुस्करी होणार नाही ना याची एक समंजस सदस्य म्हणून काळजी घ्यावी
  3. आपण सर्वच वयाने आणि (होपफुली बहुतेक सर्वच) डोक्याने प्रौढ झालो आहोत. त्याबरोबर विचार, आचार आणि आदर्शांचे कॉक्रीटीकरणपण झालेले आहे. परीणामी विरुद्ध विचारांशी न पटणे, वाद होणे हे होणारच पण ते किती करावे. तेंव्हा "ऍग्री टू डिसऍग्री" हे समजून वागले पाहीजे असे वाटते.

असो. सुरवातीस म्हणल्याप्रमाणे मिसळपाव चालू झाल्या झाल्या जे काही वाद एका "काथ्याकूट" मधे पहायला मिळाले ते वाचल्यावर जे काही वाटले ते लिहीत आहे...

प्रतिक्रिया

सहज's picture

18 Sep 2007 - 7:29 am | सहज

मार्मीक प्रतिक्रीया दिली आहे. आपले व्यक्तिगत मत व असूया ही मराठीचा आंतरजालीय वापर / वावर ह्याच्या मधे आणू देऊ नका ही तमाम मराठी संकेतस्थळांच्या वाचनकर्त्यांना कळकळीची विनंती.

मिसळपावला निदान ६ महीने तरी होऊदे मग करा तुमचा परखडपणा. असो ह्या निमीत्ताने मिसळपाव पंचायतीला देखील मौलीक अनुभव मिळाला त्याचा ते योग्य वापर करतील.

भारतातल्या चळवळवाचकांना (ज्यांना भांड्णात रस आहे) त्यांना विनंती की आम्हाला (भारताबाहेरील वाचकांना) मराठीसाठी मिळालेले हे सर्व पर्याय/साधने हवी आहेत, कृपया एका कंपूने दुसर्‍या कंपूला चीत करताना आमची गैरसोय होती आहे याचे भान ठेवावे.

----------------------------------------------------------------------
शिकलेली लोकपण असे करायला लागली तर चांगलय म्हणा शिक्षणाचे स्तोम जरा कमी होइल. :-)

विसोबा खेचर's picture

18 Sep 2007 - 8:06 am | विसोबा खेचर

विकासराव,

आपला लेख थोडक्यात परंतु टू द पॉईंट वाटला.

मराठ्यांचा (

सहमत आहे..

आणि मिसळपावचं म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे मिसळपाव हे कुठल्याच संकेतस्थळाविरुद्ध स्पर्धा करण्याकरता निर्माण झालेलं नाही, ना त्याने कुठल्या संकेतस्थळाशी स्पर्धेची भाषा केली आहे ना कधी करेल! उलटपक्षी सर्व बलाढ्य मराठी संकेतस्थळांचे एक लहान भावंड अशीच केवळ मिसळपावची स्वतःबद्दल भावना आहे आणि राहील!

तात्या.

विकास's picture

18 Sep 2007 - 8:35 am | विकास

>>>आणि मिसळपावचं म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे मिसळपाव हे कुठल्याच संकेतस्थळाविरुद्ध स्पर्धा करण्याकरता निर्माण झालेलं नाही, ना त्याने कुठल्या संकेतस्थळाशी स्पर्धेची भाषा केली आहे ना कधी करेल!

मला कल्पना आहे त्याची तात्या. मी त्या उद्देशाने कुठल्याच संकेतस्थळाबाबत म्हणले नव्हते. बर्‍याचदा अशी स्पर्धा "उत्साही" सहभागाने सभासदांच्या हातून नकळत घडू शकते असे मात्र वाटते..

सर्किट's picture

18 Sep 2007 - 9:28 am | सर्किट (not verified)

आहो, आजवर स्पर्धेतूनच प्रगती होते, वगैरे आम्ही काय काय लिहिले, त्याचा काहीही उपयोग नाही ?
स्पर्धा हवीच. आपल्या पहिल्या प्रेमावर कुठल्या तरी स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याने तिथले सदस्य किती चेकाळले होते, हे ध्यानात घ्या.
एकीकडे स्पर्धा नाही म्हणायचे, आणि नगण्य स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला म्हणून एकमेकांना अभिनंदन पर प्रतिसाद द्यायचे. हे कुठल्या नीतीत बसते ?
ही स्पर्धा आहे, हे जाहीर रीत्या सांगा.
म्हणजे, आम्ही पूर्णपणे तुमच्या बाजूचे.

- सर्किट

आजानुकर्ण's picture

18 Sep 2007 - 9:31 am | आजानुकर्ण

स्पर्धा वाईट असते असा समज नको तात्याबा!
स्पर्धेनेच प्रगती होते.

(स्पर्धेचा अंपायर) आजानुकर्ण

खिलाडू वृत्तीने स्पर्धा करण्यास काहीच हरकत नाही.. पण त्याला इर्षेचे स्वरूप नको इतकेच..

गुंडोपंत's picture

18 Sep 2007 - 8:09 am | गुंडोपंत

छान विकास राव!
उत्तम लिहिलेत.

मी तर म्हणतोय अशी जास्तीत जास्त स्थळे जोडा.
म्हणजे एकाच आयडी वर सगळीकडे जाण्याची सोय द्या...
असो,
ते जमले नाही असे दिसते. मराठे पडलो ना आपण! ;)

आपला
गुंडोपंत

सर्किट's picture

18 Sep 2007 - 9:24 am | सर्किट (not verified)

गुंडोपंत,

तुमच्या व्यायामामधून वेळ काढूनः

्हणजे एकाच आयडी वर सगळीकडे जाण्याची सोय द्या...

ही उत्कृष्ट सूचना दिल्याबद्दल खूपच कौतिक करावेसे वाटते. आहो, आम्ही गेल्या वर्षभर आणखी काय सांगतो आहोत? शशांक ने उपक्रम काढले, त्याचे आणि वेलणकरांचे तर काही भांडण नाही ना ? मग त्या दोघांनी आधी सदस्यांच्या सूचीची एकत्रितता करावी. मग आपण मिसळपाव आणि "मनोक्रम" च्या एकत्रतेविषयी बघू. कसे ?

- सर्किट

गुंडोपंत's picture

18 Sep 2007 - 10:16 am | गुंडोपंत

नको!
मनोक्रम होण्यापेक्षा वेगळेच बरे!
काय व्हायची ती स्पर्धा होऊ देत. पाहता येईल... वाचक जेथे जातील तेच स्थळ टिकेल!

आपला
गुंडोपंत

बेसनलाडू's picture

18 Sep 2007 - 10:40 am | बेसनलाडू

कॉन्टेन्ट शेअरिंग/कोलॅबरेशन आणि सेवा (सर्विसेस) ज्या संकेतस्थळांवर, तेथे वाचक हे आजच्या इंटरनेटचे (वेब २.०) आणि येत्या युगातील इंतरनेटचे सूत्र आहे. सबब, सेवा पुरविणार्‍या संकेतस्थळांमध्ये स्पर्धा समजून घेता येईल. मात्र मनोगत, उपक्रम, मिसळपाव इत्यादी संकेतस्थळांमधील (यांना 'अड्डे' हा शब्द खूपच छान वाटतो! बरेच 'भाई' आणि 'बाप माणूस' क्याटेगरीतील लोक असतात येथे!) स्पर्धा तितकीशी प्रबळ नाही, जितकी याहू, गूगल, मायक्रोसॉफ्ट या सेवादात्यांमधली आहे/असेल, असे मला वाटते. मनातले काहीही लिहिण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देणे/मिळणे, ही 'सेवा' नाही, तर चैन आहे; गरज नाही, उपलब्धी (ऍक्ससरी?) आहे. लेखनच करायचे असेल, इतरांनी लिहिलेले वाचायचे असेल, त्यावर टीकाटिप्पणी करायची असेल, तर ब्लॉगस्पॉट आहे, वर्डप्रेस आहे, एम एस एन स्पेसीज, याहू ३६० आहे आणि बराहासारख्या सॉफ्टवेअरमुळे मराठी आणि इतर भारतीय भाषांमधून लिहिणेही शक्य झाले आहे. तसेच मराठी संकेतस्थळांमधील स्पर्धांसाठीचे सर्वसंमत निकष अस्तित्त्वात नाहीत. ठराविक विषयांना वाहून घेतलेल्या संकेतस्थळांना (सुरेशभट.इन, अवकाशवेध इ.) मनोगत, उपक्रम, मिसळपावसारख्या संकेतस्थळांबरोबर सामाईक छत्राखाली आणणे हे या स्थळांच्या उभारणीच्या पायाभूत तत्त्वांमधील टोकाच्या वेगळेपणामुळे शक्य नाही. त्यामुळे संकेतस्थळांच्या जडणघडणीच्या तांत्रिक बाबी, सदस्यसंख्या, अप-डाउन टाइम अशा फुटकळ निकषांवर आधारीत संकेतस्थळांची सकसता कशी बरे ठरविणार? लोकप्रियता अजमावण्यासाठी निष्पक्ष निवडणुका, सर्वेज नाहीत; ते करणार्‍या संस्था नाहीत. म्हणूनच कॉन्टेन्ट शेअरिंग/कोलॅबरेशन च्या तत्त्वावर मनोगत, मिसळपाव, उपक्रम सारख्या स्थळांची एकत्र जोडणी आणि त्यावर वावरण्यासाठी एकच आय डी ('युरो' सारखे सामाईक चलन च्या धर्तीवर) ही गुंडोपंतांची कल्पना अतिशय स्तुत्य वाटते. किंबहुना अशा जोडण्यांमधून स्पर्धा अधिक रसपूर्ण करता येईल, असे माझे वैयक्तिक मत (मी माझे मराठी संकेतस्थळ 'ब' च्या मराठी संकेतस्थळाशी जोडतो. क आणि ड असेच करतील कदाचित आणि मग आम्ही (मी-ब आणि क-ड) वाचकांना जास्तीत जास्त सुविधा (चैनी!) कशा उपलब्ध करून देता येतील याचा, अधिकाधिक वाचकांना आकर्षित कसे करता येईल याचा खेळ खेळू) चूभूद्याघ्या
(आँत्रप्रेनर) बेसनलाडू

सर्किट's picture

18 Sep 2007 - 10:53 am | सर्किट (not verified)

अगदी मनातले बोललात, बेसन लाडू !!!

- सर्किट

गुंडोपंत's picture

19 Sep 2007 - 5:21 am | गुंडोपंत

आपले मुद्दे पटले
फक्त या मुद्या व्यतिरीक्त.

चैन ही गरजेत खुप लवकर बदलते.
त्यामुळे काहीकाळाने ही स्थळे गरज म्हणूनही पुढे येतीलच यात शंका वाटत नाही.

आपला
गुंडोपंत

ॐकार's picture

18 Sep 2007 - 9:06 pm | ॐकार

शोधा पाहू - ड्रुपल ( आवृत्ती ६ - बीटा) आणि ओपन आय. डी.
:)