वार्‍याची डरकाळी !

Primary tabs

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
10 Jul 2018 - 4:19 pm

मी कॉलेजमध्ये असतानाची आठवण.

आमच्या कॉलेजमध्ये मुलामुलींना व प्राध्यापकांना योगासानांची माहिती व्हावी म्हणून एक सत्र आयोजित केलं होतं. त्यासाठी एक योगशिक्षकआले होते. आमच्या कॉलेजचा बॅडमिंटन हॉल त्यांना त्यासाठी वापरायला दिला होता.

आमचे नेहमीचे विषय आपापल्या वर्गांमध्ये चालू होतेच. शिवाय योगाचे देखील. आमचा रसायनशास्त्राचा वर्ग चालू होता. आमच्यापैकी बरेच विद्यार्थी योगासनासाठी गेलेले होते. त्यामुळे आमचंही अभ्यासात फारसं लक्ष नव्हतं.

जवळजवळ पन्नास विद्यार्थी आसनं करंत होते. मधेच बॅडमिंटन हॉलमधून प्रचंड गर्जना ऐकू आल्या. कॉलेज दुमदुमलं! तेव्हां आम्हाला माहीत नव्हतं पण नंतर कळलं की त्यांना सिंहासन शिकवत होते. (याची सिंहमुद्रेशी गफलत करू नये. सिंहमुद्रेत आवाज अगदी नगण्यच येतो. सिंहासनात आsss र्ह ! अशी सिंहगर्जना करायची असते!) आमच्या वर्गात हास्याचे फवारे उडले!

थोड्या वेळानी योगसनं आटपून परतलेली मुलं वर्गात शिरल्याबरोबर सरांनी विचारलं, "काय केलंत रे?"

"जाड्या सांग रे!" बाकीच्यांनी जाड्याला पुढे केलं. (तेव्हां शाळा कॉलेजच्या मुलांत अंगानी जाड किंवा चष्मा लावणारा मुलगा क्वचितच दिसायचा. त्यांची खरी नावं कोणीच वापरायचे नाहीत. त्यांची रूढ नावं म्हणजे 'जाड्या'आणि 'बॅटरी'. आश्चर्य म्हणजे त्यांनाही या नावांत काही अनुचित वाटायचं नाही!)

आयुष्यात पहिल्यांदाच आसनं केलेल्यांना आसनांची नावं लक्षात राहणं अवघडच! त्यामुळे सगळ्यात जे शेवटी केलं होतं त्याच आसनाचं नाव त्याला आठवत होतं. ते त्यानी सांगितलं.

"आम्ही पवनमुक्तासन केलं!!" हास्यस्फोट झाला! हसून हसून सबंद वर्ग गडाबडा लोळायला लागला!

आलेल्या मुलांना कळेच ना आम्ही का हसतोय ते! दुसरा एक मुलगा म्हणाला, "तरी ते म्हणंत होते की ज्यांनी नुकताच डबा खाल्ला आहे त्यांनी हे आसन करू नका म्हणून."

झालं!! हसण्याचा दुसरा अटॅक पहिल्यापेक्षा जोरात! श्वास देखील घेता येई ना!

कॉलेजच्या मैत्रिणी आजही जेव्हां भेटतो तेव्हां आठवून खळखळून हसू येतं!

कथाविनोदलेखअनुभव

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

10 Jul 2018 - 10:21 pm | ज्योति अळवणी

हा हा हा

झक्कास!

खरच आमच्यावेळी मुलगे आणि मुली एकमेकांना आडनावाने हाक मारायचे. नाहीतर मग जाड्या, बॅटरी, झम्पि अशी टोपण नावं असायची.

सोन्या बागलाणकर's picture

11 Jul 2018 - 3:58 am | सोन्या बागलाणकर

खिक्क!
तोंडात चिवड्याचा बकाणा भरला होता तो बाहेर उडू नये म्हणून रुमाल दाबावा लागला.

स्वीट टॉकरीणबाई's picture

11 Jul 2018 - 9:37 am | स्वीट टॉकरीणबाई

धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2018 - 12:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

खी खी खी. भारी किस्सा !

खुप हसले. छान लिहीलाय किस्सा.

गामा पैलवान's picture

11 Jul 2018 - 5:25 pm | गामा पैलवान

स्वीट टॉकरीणबाई,

एकसमयावच्छेदेकरून सामुदायिक पवनमुक्तासन ही संकल्पना मोठी उत्तेजक आहे. इंडिया गॉट टॅलंट सारख्या कार्यक्रमांत आजमावून पाहिली पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

मदनबाण's picture

11 Jul 2018 - 9:25 pm | मदनबाण

खी.खी.खी...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जिंदगी में पेहला पेहला तूने मुझको प्यार दिया है... :- Mohabbat (1985)

आम्ही एकमेकांना बापाच्या नावांनी हाका मारत असू

स्वीट टॉकरीणबाई's picture

13 Jul 2018 - 4:33 pm | स्वीट टॉकरीणबाई

सगळ्यांना धन्यवाद!

चौथा कोनाडा's picture

21 Jul 2018 - 10:57 pm | चौथा कोनाडा

हा हा हा ... भारी किस्सा !