मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (२)

माहितगार · · काथ्याकूट
पहिल्या भागात हिंदू मुस्लिम धर्मांतर्गत विवाहाच्या सामाजिक-राजकीय पैलुंच्या इतिहासाचा अंशतः विचार केला. हिंदू परंपरावाद्यांनी आताच्या काळात १८ पेक्षा अधिकच्या वयोगटास थांबवणे आता त्यांच्या सहज बसची बात राहिलेली नाही . कोर्ट कचेरी १८+ वर्षे वयाच्या मुला मुलींची जी काही बाजू असेल ती घेणार . प्रतिष्ठेसाठी कायदा हातात घेणे ऑनर किलींग या तसेही आदर्श बाबी नाहीत आणि २१ व्या शतकात त्याला स्थान नाही. मिडिया, सोशल मिडिया चार दिवस चघळेल नंतर परिस्थिती तुमची तुम्हालाच हाताळावी लागणार . परिस्थितीच्या नावाने रडणार कि त्यातल्या त्यात रचनात्मक काय करता येईल हे पहाणार, हे ठरवले पाहीजे. हिंदू मुलींचे मुस्लिम मुलांशी लग्न झाले कि मुस्लिम मुलीही हिंदू मुलांशी लग्ने झाल्याची काही उदाहरणे पुरोगामींकडून दिली जातात, हि लोकसंख्या प्रोपोर्शनेट असती तर हिंदूंएवजी मुस्लिम समाज काळजीत पडला असता. मुस्लिम स्त्री अजूनही अंशतः पडद्यात आणि पारिवारीक विवाहात अडकलेली आहे. किंवा शिक्षण घेतले तरी सहसा उर्दू माध्यमातून घेतले गेल्यामुळे मेट्रोपॉलीतील कॉन्व्हेट शाळातून शिकणार्‍या काही मुली को एज्युकेशन मध्ये पोहोचतात तेवढाच काय तो सहसा हिंदू मुलांशी संपर्क येत असणार, हिंदू मुलांचीही मोठ्या प्रमाणावर अरेंज्ड मॅरेजेसच होतात मग मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलगा असे विवाह-लव्ह मॅरेज त्याच प्रोपोर्शन मध्ये दिसत नाहीत. पण समजा एखाद्या हिंदू मुलास अथवा कुटूंबास मुस्लीम मुलीशी शोधून विवाह करुन सून म्हणून परिवारात स्विकारुन घ्यायचे असेल तर काय मार्ग असू शकतात अशा मुली उपलब्ध असू शकतात का ? कोणत्याही समाजातील लिबरल लोकांची एकुण संख्या किती ते शैक्षणिक, सामाजिक, राजकिय परिस्थितीवर अवलंबून असले तरी किमान १५% ते २० % लिबरल तुम्हाला कोणत्यही समाजात सापडावेत उर्वरीत ८५ पैकी केवळ १५ टक्के कट्टर असण्याची शक्यता असते मधला ७० टक्के वर्ग सहसा परंपरावाद्यांच्या बाजूने उभा असतो पण या ७० टक्क्यांना पालकांनी दिलेल्या बेसिक इंट्रो पलिकडे स्वतःच्या धर्माचाही अभ्यास नसतो तत्वज्ञानाची तात्विक भूमिका घेता येणे दूरची गोष्ट असते. म्हणजे तुम्ही स्विकारण्यास तयार असाल आणि तत्वज्ञानाचा अभ्यास तुमचा स्वतःचा पक्का असेल तर १५ टक्के समाजातील मुली सहज तर उर्वरीत ७० टक्के पैकी जराशा प्रयत्नाने विवाहास उप्लब्ध होऊ शकाव्यात. असे होईलच याची गॅरंटी नाही म्हणून चुभूदेघे . आता मुस्लिम मुलींशी संवाद वाढवण्याचे मार्ग कोणते असू शकतील ? -वृत्तपत्रिय जाहीराती विवाह पोर्टल हे सहज मार्ग असावेत. अर्थात जे काही कराल ते कायदेशीर मार्गाने मुलीच्या पालकांची आणि भावांची संमती घेऊन केले म्हणजे शांततेत पार पाडणे सोपे होऊ शकते - त्यांच्या कडचे अधिकतर विवाह परिवारात होतात त्यामुळे परिवारातले अथवा त्यांच्या जातीतले पर्यायी प्रोपोजल असेल तर जनुकीय दृष्ट्या परिवारीय अथवा जातीअंतर्गत विवाहापेक्षा आंतरधर्मीय विवाह श्रेयस्कर असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. एक तर महिलांसाठी १/३ आरक्षणाचे समर्थन करणे . हिंदू मुलांशी विवाह करणार्‍या मुस्लिम महिलांना खास करुन तलाक पिडीतांना नौकर्‍यात आणि उत्पादन कौशल्याचे ट्रेनिंग व फायनान्सला प्राधान्य देणे, विशेषतः खेळ, नाटय, अभिनय, नृत्य, संगित, साहित्य, काव्य, चित्र, मुर्तीकला अशा असंख्य कलातील कलात्मकता विकसित करण्यास हिंदू संसकृती इस्लामी संस्कृती पेक्षा नक्कीच अधिक मोकळीक अधिकृतपणे देऊ शकते या सकारात्मक बाजुस पुढे ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. आता दोन्ही बाजूने येणारी नेहमीची समस्या त्यांच्या मुलामुलींचे आणि पालक आणि नातेवाईकांचे मुर्ती पुजा अणि अनेकेश्वर पद्धत चुकीची असल्याचे रोज ब्रेन वॉशींग झालेले असते. इथे हिंदू धर्मातील तत्वज्ञानाची बाजू मजबूत आहे पण त्या बाबत भूमिका मांडणी अधिक व्यवस्थित जमली पाहिजे. पहिला प्रश्न मी कोणत्या जातीत येणार असा फसवा प्रश्न विचारला जाऊ शकतो ईस्लाम-ख्रिश्चन मध्ये जाणारा प्रत्येक नवा ईस्लाम-ख्रिशचन मधील विशीष्ट जात पंथात लगेच जोडून घेत नसतो तसे गरजेचेही नसते , इतर धर्मात जाती नाहीत तसे हिंदू धर्मातही अधिकृतपणे कोणतीही जात अस्तित्वात नाही हे लक्षात आणून दिले पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय इत्यादी वर्ण स्विकारणे गरजेचे राहीलेले नाही पण तुम्हाला तुमच्या समाधानसाठी हवा असेल तो निवडायचा असल्यास निवडा. तुम्ही अमुकच का निवडला हे विचारण्यास कुणिही येऊ शकत नाही. दुसरी बाब त्यांच्या लक्ष्यात आणून दिली पाहिजे की ईश्वराच्या निर्गुण निराकार असण्या बद्दलच्या फेज मधून हिंदू धर्म केव्हाच पुढे येऊन त्याने नंतर ईतर विवीध पद्धतीने ईश्वरा शी जोडून घेण्यास प्रत्येकाला मोकळीक दिलेली आहे. तुम्ही भारत देशावर आई या रुपा एवजी समजा वेगळ्या नात्याने जोडून घेता तसेच काहीसे हिंदू धर्मात इश्वरीय शक्तीशी केवळ गुलाम नात्याने जोडून न घेता विवीध नात्यांनी जोडून घेता येते. 'हिंदू धर्मातील एक एक मुर्ती एक एक पुस्तकातील ईश्वरीय शक्तीचे स्मरण देते . ' हे वाक्य तुम्हाला समजले नाही तरी मुस्लिमांना समजण्यास सोपे जावे. कारण त्याच्यांत ईश्वराची जाणीव व्हावी म्हणून सुर्य चंद्रादी तार्‍यांची योजना केलेली आहे हे समजते- तशीच हि इश्वराची आठवण करण्याची मुर्तींची योजना आहे. हे ही पचनी पडेलच असे नाही आणि पचनी पडलेच पाहिजे असेही नाही हे त्यांच्या आधी लक्षात आणून दिले पाहीजे. अगदी ईश्वराचे नामःस्मरण करनारेअनेक स्पिकर लावून त्यांची मुर्ती बनवली तर मुर्ती पुजा विरोधक काय भूमिका घेतील माहित नाही पण पादुका पुजेच्या विरोधात भूमिका घेणे सर्वात कठीण असावे. पण एवढेही नको असेल तर कोणतीच मुर्ती नघेता कोणताही ग्रंथ घेऊन किंवा ग्रंथा शिवाय पण हिंदू रहाता येते आता तेही नकोय कुराण (किंवा बायबल किंवा अजुन कोणता आहे तो ) सांभाळायचा आहे तर हिंदू धर्म वस्तुतः धर्म ग्रंथ, प्रार्थना पद्धती सर्वाचेच स्वातंत्र्य देतो दुसर्‍यांच्या प्रार्थना आणि भक्ती पद्धतीचे स्वातंत्र्य हिरावू नका, स्वतःच्या देशावर प्रेम करा म्हणजे झाले. तिसरी बाब हि लक्षात आणून दिली पाहिजे की बर्‍याचदा धर्म आणि संस्कृतीची गल्लत केल्याने बरीच पंचाईत होते, हिंदू धर्मातील अनेक प्रथा परंपरा या सांस्कृतिक आहेत. हिंदू धर्मीय प्रत्येक गोष्टीत देव किंवा ईश्वरी शक्ती पहातो म्हणजे प्रत्येकाने पाहिले पाहिजे असे नाही किंवा म्हणून टाळले पाहिजे असे नाही. हिंदू धर्मीय प्रकाश स्त्रोतांना पाहूनही नमस्कार करता त म्हणून तुम्ही ते सगळे प्रकाश स्त्रोत वापरणे सोडू शकत नाही . रांगोळी सारख्या अनेक कला व्यक्ति चित्रांशिवाय काढणे शक्य आहे . एकुण सामाजिक-राजकीय सक्रीय हिंदूंनी स्वतःच्या मनातली असुरक्षीततेची भावना दूर करून घेण्यासाठी मंगलमय हिंदू संस्कृतीची कवाडे मुस्लिम महिलांना मनमोकळे पणाने उघडली पाहीजेत असे वाटते. * मुस्लिम महिलांनी मुस्लीमेतरांशी विवाहाबद्दल एका आमेरीकन लेखकाचा उदारपंथी दृष्टीकोण असलेला लेख * Why this deference towards Islam? सुनील शरण टाईम्स ऑफ ईंडिया २७ ऑगस्ट २०१८ * हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, (३) * टिकटॉक एका खुपलेल्या विषयाची चर्चा हि जाहीरात, जाहिरात आहे अद्याप वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती असती तर जाहिरातीची जरुरी भासली नसती.

वाचने 28573 वाचनखूण प्रतिक्रिया 70

मराठी कथालेखक गुरुवार, 06/28/2018 - 15:37
कुणी कुणाशीही लग्न करा .. इतरांना त्याने काय फरक पडतो ?.. तशीही धर्मही संकल्पनाच आता कालबाह्य होत आहे (याबद्दल एक लेख लिहण्याचे मनात आहे.. बघू कधी जमते ते)

In reply to by मराठी कथालेखक

सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/28/2018 - 16:35
हिंदू धर्मांतर्गत कोणीही कोणाशी ही आणि मुस्लिम धर्मांतर्गत कोणीही कोणाशी ऐच्छिक लग्न केले तर थोडासा च प्रॉब्लेम येऊ शकतो . पण लव जिहाद मध्ये बऱ्याच वेळा हिंदू मुलींची मुस्लिम मुलं हेतुपुरस्सर जाळ्यात ओढून फसवणूक करतात .आपल्या महाराष्ट्रात असल्या जास्त घटना घडत नसतील पण उत्तर भारतातील कित्तेक प्रकरणे न्यायालयात पोहचतात . माझ्या माहितीतील ऐका सद्गगुणि डॉक्टरांना एकच मुलगी अन तीही डॉक्टर झाली होती , कॉलेज मध्ये असताना वर्गातील मुस्लिम मुला बरोबरच प्रेमप्रकरण त्यांच्या रजिस्टर लग्नापर्यंत गेलं . सुरवातीला तो मुलगा स्वतः ला पुरोगामी दाखवत होता , काही महिने त्याने स्वतः चे आईवडील आणि मुस्लिम धर्म यापासून फारकत घेऊन त्या मुली बरोबर संसार केला . पण थोड्याच दिवसांत त्याचे कट्टर रक्त त्याला धर्मा पासून वेगळे राहू देईना ,मग त्याने मुलीला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती करू लागला . शेवटी घटस्फोटा साठी फ्यमिली कोर्टात केस पेंडिंग आहे . इकडे मुलीच्या बापाने हाय खाल्ली आणि त्यामुळे त्याची डॉक्टरकी ही बसली . मीडिया मध्ये अशा घटना प्रसिद्ध होत नाहीत पण ज्या प्रसिद्ध होतात त्या हिमनगाचे टोक आहे . थोडक्यात काय की जो पर्यंत ते दोघे वेगळे राहत होते ते पर्यंत ठीक चालले होते , पण नंतर त्याच्या कट्टरपंथीपणा मुळे घात झाला . मी तर अस ऐकलय की उनाडक्या करत फिरणाऱ्या मुस्लिम तरुणांना हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी फंडिंग केलं जातं . आणि कायम मुस्लिम मुलगा हिंदू मुलगी अशीच प्रकरणे का घडतात ? याच्या उलट हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी अशी लग्न का होत नाहीत ? बॉलीवूड मधील खानावळ च्या प्रभावामुळे हिंदू मुली ही काही प्रमाणात त्यांच्या जाळ्यात सापडत असतील .

In reply to by सोमनाथ खांदवे

मराठी कथालेखक गुरुवार, 06/28/2018 - 17:37
हे जाळ्यात ओढणं वगैरे अविश्वसनीय वाटतं.. एखादी मुलगी परधर्मातीलच काय पण परजातीतील किंवा घरी पसंत नसलेल्या कोणत्याही मुलाच्या प्रेमात पडली की 'मुलाने जाळ्यात ओढले /फूस लावली' ई ओरड करत मुलावरच खापर फोडले जाते. पण यात काही तथ्य नाही. सज्ञान झालेल्या मुलीला घरच्यांनी सारासार विचार करुन निर्णय घेण्यास सक्षम का बनवले नाही ? बरं फंडिंग करुन मुली कशा पटवल्या /जाळ्यात ओढल्या जातात ? रेस्टॉरंट /सिनेमाच्या खर्चासाठी असते का हे फंडिंग ? मुलाने भरपूर पैसे खर्च केले की हिंदू मुली पटतात असे आहे का ? तुम्ही दिलेल्या उदाहरणातील मुलगी सुखवस्तू घरातली व सव्तःही डॉक्टर होती म्हणजे मुलाच्या खर्च करण्याच्या क्षमतेचे तिला अप्रुप असायचे कारण नव्हतेच. झालंच तर मला नाही वाटत कोणतेही मुस्लिम पालक आपल्या मुलाला म्हणत असतील की 'बाबा रे तू शक्यतो हिंदू मुलीशीच लग्न कर'.. शक्यतो सर्वच पालकांचा कल असतो की आपल्या पाल्याने (मुलगा वा मुलगी कोणीही) आपल्याच जाती व धर्मातील जोडीदार निवडावा, तर काही मुक्त विचारांचे पालक अशी अपेक्षा ठेवत नाही त्यावेळी साधारणतः त्यांचे म्हणणे असते की "तुला आवडेल त्या व्यक्तीशी तु लग्न कर , जाती धर्माबद्दल आमचा काही आग्रह नाही" बाकी प्रेमविवाह असो वा ठरवून केलेला , कोणतेही लग्न अपयशी ठरु शकते आणि अशा अपयशी लग्नातून बाहेर पडण्याकरिता कायदेशीर मार्ग आहेतच. 'लव्ह जिहाद' वगैरे काल्पनिक गोष्टी दोन समाजात अविश्वासाचे वातावरण निर्माण करीत आहेत.

In reply to by मराठी कथालेखक

सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/28/2018 - 18:09
मला माहित असलेली घटना सांगितली , त्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो " प्रेमविवाह असो वा ठरवून केलेला , कोणतेही लग्न अपयशी ठरु शकते " बरोबर , पण स्वधर्मातील प्रेमविवाह पेक्षा कॉन्ट्रास्ट धर्मातील प्रेमविवाह च अपयश दोघांनाही ज्यास्त त्रासदायक असते .पुन्हा मुस्लिम त्यांच्या धर्मा बाबत जेवढे कट्टर असतात तेवढे हिंदू नसतात हे तरी मान्य कराल का नाही ? हाच कट्टरपणा शेवटी प्रेमविवाह अपयशी ठरवत असेल असं माझं वयक्तिक मत आहे . फंडिंग उनाडक्या करणाऱ्या टपोरी मुलांना केलं जात ही मुलं कॉलेज पाशी घिरट्या घालत असतात .त्या टपोरी मुलांना आणि त्यांच्या आईबापाला कसल आलंय सोयरसुतक .

In reply to by सोमनाथ खांदवे

मराठी कथालेखक गुरुवार, 06/28/2018 - 19:18
फंडिंग उनाडक्या करणाऱ्या टपोरी मुलांना केलं जात ही मुलं कॉलेज पाशी घिरट्या घालत असतात
काही प्रश्न : १) अशा टपोरी मुलांच्या प्रेमात मुली कशा पडतात ? त्यांची पैसे खर्चण्याची क्षमता फक्त कामी येते का ? हिंदू मुलांकडे अशी क्षमता नसते का ? २) तुम्ही दिलेले उदाहरण या प्रकारातले वाटत नाही. डॉक्टर मुलगा टपोरी असेल असे वाटत नाही. मग त्याला फंडिंग केले गेले होते का ? त्याला हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले होते का ? ३) फंडिंगचा लाभ घेत मुस्लिम मुलाने हिंदू मुलीला पटवल्याचे एखादे उदाहरण तुमच्या माहितीत आहे का ? ४) एखादी सुंदर हिंदू युवती समाजात वावरत असताना तिच्यावर लट्टू होवून तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणांमध्ये हिंदूंचे प्रमाण जास्त असेल की मुस्लिमांचे ? जर मुस्लिम तरुणांचे प्रमाण जास्त आहे (एखादा मुस्लिमबहूल भाग असेल समजा) तर सख्याशास्त्राच्या नियमाप्रमाणे तिचे मन मुस्लिम तरुणावर जडण्याची शक्यता वाढते. पण जर अशा मुस्लिम तरुणांची संख्या कमी असूनही ती मुलगी एखाद्या मुस्लिम मुलाकडे आकृष्ट होत असेल तर असे का होते याचा खोलवर शोध घेण्याची गरज आहे. ५) याउलट टपोरी मुलांना मिळणार्‍या फंडींगवर लव्ह जिहाद चालते /यशस्वी होते असे मानणे म्हणजे हिंदू मुलींवर तुम्ही एक गंभीर आरोप करत आहात असे नाही वाटत का तुम्हाला ?
मुस्लिम त्यांच्या धर्मा बाबत जेवढे कट्टर असतात तेवढे हिंदू नसतात
नक्की सांगता येणार नाही. कट्टर असणे म्हणजे काय याची व्याख्या तितकीशी स्पष्ट नाही. त्या व्याख्येबद्दल पुन्हा कधीतरी पण... टपोरी मुले सुद्धा धर्माच्या बाबत कट्टर असतात का ?

In reply to by मराठी कथालेखक

माहितगार गुरुवार, 06/28/2018 - 20:51
साधरणतः १५ टक्के लिबरल सगळी कडे असणार असे धरुन चालू , पण त्यांना बोलण्याची संधी किती मिळते आणि ते बोलतात किती दॅट व्हॉट मॅटर्स. बोलक्या पुरोगाम्यांचे प्रोपोर्शन त्यांच्यात किती दिसते ? आपल्या मिपावरचे पुरोगामी मुस्लिम पत्नी आणि मुस्लिम सुना आणून त्यांचे पुरोगामीत्व सिद्ध करतील कि बोलाचीच कढी बोलाचाच भात ?

In reply to by माहितगार

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 12:14
आपल्या मिपावरचे पुरोगामी मुस्लिम पत्नी आणि मुस्लिम सुना आणून त्यांचे पुरोगामीत्व सिद्ध करतील कि बोलाचीच कढी बोलाचाच भात
म्हणजे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी एखाद्या मुलाने ठरवून मुस्लिम मुलीशी लग्न करायला हवे का ? प्यार किया नही जाता हो जाता है याबद्दल आपलं काय मत आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

माहितगार Fri, 06/29/2018 - 12:22
एक मिनीट, ज्यांची लव मॅरेजेस होऊ शकली नाही त्यांची अरेंज्ड मॅरेजेस होऊ शकतात की नाही ? वधू वर परिचय मेळावे होऊ शकतात की नाही ? म्हणजे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी मुलांवर त्यांचे स्वतःचे धार्मीक विश्वास न बदलता वधू वर परिचय मेळावे, अरेंज्ड मॅरेजेस जूळवण्यात पुढाकार घेता येऊ शकतोच की. सिद्ध करावयास सांगितले कि मार्ग शोधायचे सोडून पळवाटा शोधणारे पुरोगामीत्व काय कामाचे ?

In reply to by मराठी कथालेखक

सोमनाथ खांदवे Fri, 06/29/2018 - 13:35
" प्यार किया नही जाता , हो जाता है '' मग हिंदू साहिष्णुवादी , पुरोगामी आपल्या मुलांचे मुस्लिम मुलीशी अरेंज मॅरेज सुद्धा करू शकतात .

In reply to by सोमनाथ खांदवे

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 13:44
जर ठरवून केल्या जाणार्‍या विवाहाच्या बाबतीत 'जाती आणि धर्माची अट नाही' अशी भूमिका एखाद्या मुलाने आणि त्याच्या पालकांनी घेतलेली असेल तर त्या मुलाचे लग्न मुस्लिम मुलीशीही होवू शकते. अर्थात त्याकरिता अशीच भूमिका असलेले मुस्लिम मुलीचे कुटूंबही त्यांना भेटायला हवे . जाता जाता: हिंदू मुला मुलींचे फक्त मुस्लिमच नाहीतर इतरही धर्मात आंतरधर्मीय लग्न होत असतात. जसे मी स्वतः हिंदू नाही पण माझी पत्नी हिंदू आहे आणि हे लग्न उभय घरांत आणि नातेवाईकांस देखील अगदी आनंदाने मान्य आहेच. तेव्हा हिंदू मुस्लिम लग्नाबद्दलच इतका बाऊ का असावा ?

In reply to by मराठी कथालेखक

माहितगार Fri, 06/29/2018 - 13:53
तेव्हा हिंदू मुस्लिम लग्नाबद्दलच इतका बाऊ का असावा ?
या चर्चेचा क्रम आधी यावा याच अपेक्षेने हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, परस्पर अविश्वासाची कारण मिमांसा, विश्वास प्रक्रियेची पुढील दिशा हा चर्चा धागा आधी काढला. समाजमनात दडलेला शतकोंशतकांचा परस्पर अविश्वास आहे हे वस्तुनिष्ठ वास्तव काही कारण असल्या शिवायाच तयार झाले नसावे. अविश्वास तात्पुरते ब्रश असाईड करून पुरोगामीत्वाची गाडी जबरदस्तीने हाकायची या बाबत मी साशंक आहे. जे तापुरते ब्रश असाईड केले ते पुन्हा गोल फिरुन वापस येत रहाते.

In reply to by माहितगार

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 14:29
पुरोगामीत्वाची गाडी जबरदस्तीने हाकायची या बाबत मी साशंक आहे.
कशाला जबरदस्तीने हाकायची ? लग्न हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मानणे म्हणजे पुरोगामित्व. मी एखाद्या हिंदू व्यक्तीला (मुलगा/मुलगी) मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यापासून रोखणार नाही तसेच 'तु पुरोगामी असेल तर मुस्लिम व्यक्तीशी लग्न कर आणि तुझे पुरोगामित्व सिद्ध कर' अशी विचित्र गळही घालणार नाही. जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की जातीबाहेर वा धर्माबाहेर लग्न करुन आपल्याला जोडलेल्या नव्या लोकांशी नीट जुळवून घेता येणार नाही तर त्याला जबरदस्तीने त्याला /तिला परजाती/धर्मात लग्न करण्यास उद्युक्त करण्याची गरज नाही.

In reply to by मराठी कथालेखक

माहितगार Fri, 06/29/2018 - 16:29
...कशाला जबरदस्तीने हाकायची ?
मिपाच्या कट्ट्यावर हिंदू मुलांसोबत - त्यांचा धर्म कायम राहून मुस्लीम मुलींचे भरीव प्रमाण दिसत नाही तो पर्यंत मराठी लेखक महोदयांची सर्व स्वप्ने अन इक्वल फिनॉमीना आहेत - इथे ती कम्युनीटी मराठीत शिक्षण घ्यावे मराठीत संवाद साधावे याबाबत प्रगल्भ नाही मिपाच्या कट्ट्यांवर कधी दिसतील तेव्हा पाहु खाली बिरबलाची खिचडी शिजणे बाकी आहे हे दाखवून दिले आहे. बिरबलाची खिचडी शिजत नाही तो पर्यंत पुरोगाम्यांनी कितीही सजावट केली तरी ती आतून पोकल आणि आधार हिन आहे हे नक्की. असो तुर्तास एवढेच.

In reply to by माहितगार

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 17:01
मिपावर किती मुस्लिम आहेत हे कुणाला माहित आहे का ? इथे सगळ्या सदस्यांनी आपला धर्म उघड केला आहे का ? मराठीतून शिक्षण !!-- आता इंग्लिशमाध्यमातून शिक्षण घेण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे. त्यात सर्व धर्मीयांचाच समावेश असावा. तसेही 'मुस्लिमांचे मराठीतून शिक्षण वा मुस्लिमांचा मिपावरील सहभाग' हा धाग्याचा मूळ विषय होता असे वाटत नाही. असो. बाकी बिरबलाची खिचडी वगैरे... तुमचा प्रतिसाद किती हुकलेला आहे हेच दाखवून देतात. असो.. जर तुम्हाला नेमका सूर आणि मुद्दे सापडलेच तर अधिक चर्चा करायला आवडेल. तोपर्यंत अल्पविराम. धन्यवाद.

In reply to by मराठी कथालेखक

सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/28/2018 - 21:02
डॉक्टर मुलगा आणि टपोरी गँग या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत तुम्ही प्रतिसादात मिक्स करताय .डॉक्टर मुलाचं प्रकरण हे आपल्या उच्चवर्गीय सुशक्षित समाजात घडलेली घटना आहे , तर टपोरी मूल ही झेड पी क्लास , मध्यम गरीब मुलींना टार्गेट करतात 'अशी माझी ऐकीव माहिती आहे ' असं मी सांगितले होते . मी हे उत्तर भारतीय मित्रां कडून ऐकले होते दंगलीत जाळपोळ , तलवारी घेऊन फिरणारे हे टपोरी धर्मांध असतात त्यांना सामाजिक एकोपा ,राष्ट्रीय संपत्ती रक्षण याच्याशी काही घेणे देने नसते अस मला वाटत . याबद्दल तुमचं मत वेगळं असू शकत . प्रतिसादात सुरवातीलाच मी सांगितले होते " महाराष्ट्रातील घटना कमी असतील " पण उत्तर भारतात याचे प्रमाण खूप असल्या मुळे लव जिहाद हे कारण वारंवार उसळणाऱ्या दंगली साठी पुरेसे ठरते . तुमच्या म्हणण्यानुसार लव जिहाद अस काही नसतं तर आपण निरो सारख फिडेल वाजवत बसू या !!!!!

In reply to by सोमनाथ खांदवे

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 12:17
ऐकीव माहितीतल्या लव्ह जिहाद बद्दल मी आता अधिक काय बोलू ? मी पण भूता खेतांच्या वगैरेही खूप गोष्टी ऐकत आलो आहे. पुर्वी खोडून काढायचा प्रयत्न करायचो पण आता ऐकून मान डोलावतो :)

In reply to by मराठी कथालेखक

सोमनाथ खांदवे Fri, 06/29/2018 - 13:44
तुम्ही प्रत्येक वेळेस गडबड करताय राव ! उत्तर भारतातील मित्रा कडून "मी त्या टपोरी मुलांचे हिंदू मुलींनां " जाळ्यात ओढण्या बद्दल ऐकल्याच बोललो आणि तुम्ही लव जिहाद ऐकीव माहिती बद्दल बोलताय , अहो लव जिहाद ची माहीत ऐकण्याची गरजच नाही .एक सर्च मारला तर भरपूर लव जिहाद च्या बातम्या सापडतात आणि त्या मुख्य करून हिंदू मुली फसल्या च्याच असतात , आता हिंदू मुलीचं का हे तुम्ही सांगा समजावून. लव जिहाद मध्ये हिंदू मुली जास्त का असतात ? मी तुमच्या प्रतिसादाची वाट बघतोय

In reply to by सोमनाथ खांदवे

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 13:51
बरं माझा गोंधळ होतोय आणि मी गडबड करतोय हे मान्य करतो हवं तर पण माझा साधा प्रश्न आहे लव्ह जिहाद नेमका कसा होतो हे थोडं तपशीलवार -तुमच्या शब्दांत सांगाल काय ? (कृपया मल जालावर शोधण्यास सांगू नका वा दुवे देवू नका) हिंदू मुलींना नेमके कसे फसवले जाते ? थोडं मार्केटिंगच्या भाषेत सांगायचं तर लव्ह जिहाद करणार्‍या (पक्षी हिंदू मुलींना जाळ्यात ओढणार्‍या) मुस्लिम तरुणांचा unique selling point (USP) काय असतो की ज्यावर हिंदू मुली भाळतात ?

In reply to by मराठी कथालेखक

सोमनाथ खांदवे Fri, 06/29/2018 - 21:12
थँक्स गॉड , चला तुम्ही मान्य तरी केले की तुमचा गोंधळ होतोय , नाहीतर होतंय काय की तीच गोष्ट गिरवून गिरवून सांगावी लागते आणि परिणाम शून्य .समजत नसेल तर गोष्ट वेगळी न समजण्याचे नाटक असेल तर वेळ जातो हो !!!!! 1 ) " लव जिहाद होतो कसा आणि हिंदू मुलींना नेमके फसवले जाते कसे ? " याची तुम्हाला तपशीलवार माहिती हवीय आणि तुम्हाला इंटरनेट वरील दुवे न देता . अस सांगून तुम्ही एक प्रकारे पराभव च मान्य केला आहे . 2 ) तुम्हाला इंटरनेट वरील बातम्या वर विश्वास नाही ? की तुम्ही त्या बातम्या खोट्या ठरवू शकत नाही ? 3 ) चला आपण " लव जिहाद " अस काही नसतं थोडा वेळ मान्य करू या , मग भारतात तील हिंदू मुलीं मुस्लिम मुलां बरोबर लग्न करणे ,धर्मांतर चा दबाव यांचे पुरावे नामांकित वर्तमानपत्रांच्या वेब पेज वर असताना तुम्ही नाकारू कसे शकता ? अरे हो , सॉरी !! सॉरी !!! मी विसरलो होतो तुम्ही तर दुवे देऊ नका म्हणून सांगितले होते , मग मला एक सांगा तुमच्याच आणीबाणी च्या दुव्यावर तुम्ही इंटरनेट चे दुवे का मागत होता ? असला दुटप्पीपणा का करता ? ही तुमच्या दुव्या ची लिंक , किमान हा तरी इंटरनेट चा दुवा पाहण्याचे कष्ट घ्याल का ? https://www.misalpav.com/comment/reply/42897/1002468

In reply to by सोमनाथ खांदवे

मराठी कथालेखक Sun, 07/01/2018 - 13:05
अस सांगून तुम्ही एक प्रकारे पराभव च मान्य केला आहे
हो हो अगदी.. पराभव म्हणजे काय अगदी पुर्ण भूईसपाटच झालो की हो मी. झालंच तर 'चर्चा करण्याची आदर्श पद्धत' असा काही पुरस्कार मिपावर असेल तर तो तुम्हालाच मिळायला हवा याकरिता मी तुमचे जोरदार समर्थन करावं म्हणतो. फक्त लव्ह जिहाद नेमका कसा होतो हे काही माझ्या अजून ध्यानात आलं नाही. पण तो दोष नक्कीच माझ्या अल्पबुद्धीचा असावा. तर ते असो. बाकी आणीबाणीच्या धाग्यावर मी स्वतःचे अनुभव लिहा असंच लिहिलं होतं.. पण 'सर टोबी' या मिपाकरांनी एका मिपा धाग्याची /धाग्यावरील प्रतिसादाचीआठवण काढली म्हणून कदाचित त्या धाग्यावर कुणीतरी प्रत्यक्ष अनुभवाचे बोल लिहिले असतील या अपेक्षेने मी त्यांना त्या धाग्यासंबंधी विचारणा केली... पण या दोन धाग्यांची गुंतागुंत करण्याची तसदी घेत तुम्ही माझा दुटप्पीपणाचा अपराध मला दाखवण्याचे पुण्यकर्म केलेत त्याबद्दल मी तुमचा शतःशा ऋणी आहे.

In reply to by मराठी कथालेखक

चौथा कोनाडा गुरुवार, 06/28/2018 - 23:16
१) अशा टपोरी मुलांच्या प्रेमात मुली कशा पडतात ? त्यांची पैसे खर्चण्याची क्षमता फक्त कामी येते का ? जिथं भिवंडी कल्याण सारख्या भागातून उच्च शिकक्षित मुस्लिम मुलांना पद्धतशीरपणे जाळ्यात ओढुन इसिसमध्ये भरती केले जाते, त्या पुढं लव्हजिहादसाठी जाळ्यात ओढणं फारच किरकोळ वाटते ! जबरदस्त यंत्रणा काम करत असतील पार्श्वभुमीवर !

In reply to by चौथा कोनाडा

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 12:25
जिथं भिवंडी कल्याण सारख्या भागातून उच्च शिकक्षित मुस्लिम मुलांना पद्धतशीरपणे जाळ्यात ओढुन इसिसमध्ये भरती केले जाते, त्या पुढं लव्हजिहादसाठी जाळ्यात ओढणं फारच किरकोळ वाटते !
दोन्ही फार वेगळ्या गोष्टी आहेत. मुस्लिम युवकांना इसिस वा तत्सम अतिरेकी संघटनेत ओढणारे लोक हे मुस्लिमच असतात , ते या तरुणांना 'मुस्लिमांवर कसा अन्याय होतो आहे , मुस्लिम कसे संकटात आहेत वगैरेच्या कथा ऐकवून' थोडक्यात त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करुन त्यांना या संघटनेत ओढले जाते... (काही प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनाही अशाच प्रकारे हिंदू तरुणांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात हे तुम्हाला मान्य असावे.. अगदी हे लव्ह जिहादही मला तशातलेच प्रकरण वाटते.. असो) पण मुस्लिम तरुण हिंदू तरुणींना काय सांगून जाळ्यात ओढत असतील असे तुम्हाला वाटते ?

In reply to by सोमनाथ खांदवे

विशुमित गुरुवार, 06/28/2018 - 17:48
सुरवातीला तो मुलगा स्वतः ला पुरोगामी दाखवत होता , काही महिने त्याने स्वतः चे आईवडील आणि मुस्लिम धर्म यापासून फारकत घेऊन त्या मुली बरोबर संसार केला . पण थोड्याच दिवसांत त्याचे कट्टर रक्त त्याला धर्मा पासून वेगळे राहू देईना ,मग त्याने मुलीला मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती करू लागला >>> ==>> हे लय भारी आहे. आमच्याकडे लग्न ठरवायच्या आधी बोली केली जाते (याद्या म्हणा) की मुलीला लग्न झाल्यावर पुढील शिक्षण घेऊ देईन, नोकरी करू देईन, गावात न ठेवता मुलगा नोकरी करतो तिथे बरोबर घेऊ जाऊ दिले जाईल. पण लग्नानंतर मुलगा आई-बापाखातर भलतेच वागतो आणि वाद होऊन केस फॅमिली कोर्टात जाते. हा पण सेम प्लॉट वाटतो.

In reply to by मराठी कथालेखक

डँबिस००७ गुरुवार, 06/28/2018 - 23:43
तशीही धर्मही संकल्पनाच आता कालबाह्य होत आहे हे कधी झाल ब्वा ?? काय पण बोलतात !! एका गावात एक धर्म न मानणारा (पण मुळात हिंदु ) मनुष्ष रहात असे ! गावात दंगा झाला आणि त्यात ह्या माणसाला ठार मारले गेले ! एका मुसलमान माणसाने धर्म न मानणार्याला ठार मारले !!

In reply to by डँबिस००७

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 12:40
धर्म कालबाह्य होत आहे कारण न्यायव्यवस्था आणि राज्य सरकारे ही धर्माधिष्ठीत नाही. रोजचे व्यवहार धार्मिक पुस्तके वाचून पार पडत नाहीत त्याकरिता नियम , कायदे समजून त्याप्रमाणे वागावे लागते. धर्माचा उपयोग अध्यात्मिक गरज भागवणे आणि सण-उत्सव साजरे करणे याकरिता उरला आहे.

In reply to by मराठी कथालेखक

माहितगार Fri, 06/29/2018 - 13:15
धर्म कालबाह्य होत आहे कारण न्यायव्यवस्था आणि राज्य सरकारे ही धर्माधिष्ठीत नाही.
अंशतःच मान्य, चहाचा कप आणि ओठ यात अंतर असते असे म्हणतात . भात शिजला का ? याचे उतर हो किंवा नाही, असे असणे अपेक्षीत असते . भात शिजत आहे - हे विधान कधी कधी बिरबलाच्या खिचडीलाही लागू पडते. एनी वे, भारतात ज्या धर्मियांच्या विवाह आणि कुटूंब विषयक कायद्याचे कोडीफिकेशन अद्याप झालेले नाही त्यांच्या समकालीन कालानुरुप सुयोग्य बदलांसह कोडीफिकेशनचे आपण समर्थन करता असा घेता येईल का ? असे असेल तर आपण आपली हि भूमिका भांडे ल लपवता उघडपणे मांडावी मग आपल्या भूमिकेचे निश्चिअत स्वागत करता येईल . त्याच वेळी जो पर्यंत चहा पिला का ? अथवा भात शिजला का चे उत्तर निरपवाद होकारार्थी येत नाही तो पर्यंत , आपल्या 'धर्म कालबाह्य होत आहे' ह्या वाक्याची व्हॅल्यू भविष्यकालीन भाकित एवढीच रहाते त्या पलिकडे नव्हे.

In reply to by माहितगार

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 14:05
संक्रमण एका दिवसात पुर्ण होत नाही.. ते पुर्ण होण्यास काही काळ जावा लागतो , पण म्हणून "संक्रमण होत आहे" ही स्थिती नाकारणे किंवा तिला निरर्थक ठरवणे फारसे उचित होणार नाही. असो. धर्म कालबाह्य होत आहे असे मी म्हंटले कारण औपचारिकरीत्या आता 'कायद्याचे राज्य आहे' पण असे असले तरी अनेक लोकांच्या मनात धर्माचे महत्व आहे. न्यायव्यवस्थेकरिताही ही काही लोक जात्/खाप पंचायतीकडे बघतात. पण हे दीर्घकाळ टिकणार नाही. म्हणून in progress आहे. असो.

माहितगार गुरुवार, 06/28/2018 - 18:36
मनातला लेख जरुर लिहावा. मीही अज्ञेय आहे सर्वच धर्म कालबाह्य झाले तर तत्वतः फरक पडत नाही , कारण एक तर ते नसतील किंवा त्यांचे एकत्रिकरण झालेले असतील एकाच एक धर्माची सवय झाल्या नंतर त्याचेही काही वाटत नाही पण एकत्रिकरण झालेला एकच एक धर्म असेल तर त्यास विविधताही म्हणता येत नाही.
कुणी कुणाशीही लग्न करा .. इतरांना त्याने काय फरक पडतो ?
परिवारांतर्गत विवाहांबद्दल अल्पसा साशंक आहे , बाकी निवडस्वातंत्र्याबद्दल सहमत आहे. ईतरांना फरक पडावयास नको पण आज आपण म्हणता तेवढी आदर्श स्थिती आलेली आहे असे म्हणता येते का ?
.. तशीही धर्मही संकल्पनाच आता कालबाह्य होत आहे
कम्युनीस्टंना शंभर वर्षापुर्वी असेच काहीसे वाटले नव्हते का ? मी अगदी मागच्या धाग्याच्या चर्चेत मनुस्मृती आणि कुराण हे शब्द गूगल वर किती शोधले जातात याचे गूगल ट्रेंड्स आलेखाच्या साहाय्याने विश्लेषण दिले होते. गूगल ट्रेंड्सचे आलेख मिपात का कोण जाणे एंबेड करता आले नव्हते पण खालील दृश्य पुरेसे बोलके असावे.
गूगल ट्रेंडवरची मनुस्मृती वि. कुराण शब्द शोध भारतात घेतला जाण्याचे प्रमाण बघीतल्यास कुराण हा शब्द मनुस्मृती शब्दाच्या ३० ते ८० पट अधीक शोधला जातो सुद्धा अ‍ॅव्हरेज ४० पट अधीक आहे आणि जेव्हा की मुस्लीम लोकसंख्या भारताच्या १५ ते फारतर २० टक्के असेल प्रदेश निहाय स्थिती पाहिली तर हिमाचल, हरियाणा आणि छत्तीसगढ या केवळ तीन राज्यात मनुस्मृती शब्दाचा अधिकतम शोध कुराणच्या तुलनेत १० टक्के पर्यंत म्हनजे तेथे सुद्धा कुराण शब्दाचा शोध दहापट आहे. ओडीसा आणि उत्तराखंदातून कुराण शब्दाचा शोध १४ ते १६ पट आहे. पंजाब, राजस्थान, युपी, बिहार, मध्यप्रदेश या पाच राज्यात मनुस्मृती पेक्षा कुराण शब्दाचा शोध २०पटीने अधिक आहे. दिल्ली गुजरात महाराष्ट्र कुराण शब्दाचा शोध ३० पट आहे म्हणजे मनुस्मृती शब्दाचा शोध कुराण शब्दाच्या शोधाच्या केवळ ३ % आहे, प. बंगाल , मणिपूर कर्नातक आसाम चंदीगढ कुराण शब्दाचा शोध मनुस्मृती शब्दाच्या ५० मट आहे म्हणजे मनुस्मृती शब्दाचा शोध केवळ २ % आहे. बाकी दक्षिणी राज्ये म्हणजे तामीळ नाडू , तेलंगाणा, आंध्रा मनुस्मृती शब्दाचा शोध कुराण शब्दाच्या तुलनेत केवळ १ टक्का आहे म्हणजे कुराण शब्दाचा शोध तिथे १०० पट आहे तर काश्मिर गोवा आणि पुर्वोत्तर भारतात मनुस्मृती शब्दाचा शोध घेतला जात असल्याचे दिसत नाही.
आपण म्हणताय तेव्हा आणखी एक दोन विश्लेषणे करुन पहातो काय रिझल्ट येतात ते.

In reply to by माहितगार

मराठी कथालेखक गुरुवार, 06/28/2018 - 19:40
कोणता शब्द किती शोधला जातो याच्या आकडेवारीने काय फरक पडतो ? Indian constitution वा भारतीय राज्यघटना हा शब्द तर नक्कीच खूप कमी शोधला जात असेल. पण त्याने काय होते ? देश तर घटनेच्या आधारानेच चालला आह ना ? धर्म ही संकल्पनाच आता कालबाह्य होत आहे असे मी म्हंटले त्याचे कारण व्याहवारिक आणि सामाजिक जीवनात धर्माची आवश्यकता फारशी उरली नाही. न्याय व न्यायव्यवस्था ही समाजाची एक सार्वत्रिक आणि सर्वकालिन गरज आहे. पुर्वी न्यायव्यवस्था या धर्मावर आधारित होत्या, राजाने चालवलेला राज्यकारभार धर्मतत्वांवर आधारीत असावा अशी अपेक्षा होती. समाजाला न्यायव्यवस्था पुरवण्याचे काम बहुतांशी धर्माने आणि धर्माने चालणार्‍या सत्तांनी केले. पण आता धर्माची जागा राज्यघटनेनी घेतली आहे. त्यामुळे धर्माची गरज फक्त आध्यात्मिक निकड भागवणे हीच बहुतांशि राहिली आहे... असो.. या विषयावर स्वतंत्र लेख होवू शकतो.

गवि गुरुवार, 06/28/2018 - 19:27
किमान दहा वर्षांचा डेटा जमवून, किती हिंदू मुस्लिम विवाह (एकूणपैकी) ते निश्चित करून, त्यापैकी: १. १० वर्षांपर्यंत यशस्वी / आनंदाने टिकले (किंवा अगदी आनंदाखेरीज का होईना पण टिकले) २. किती वधू हिंदू आणि किती वर हिंदू ही आकडेवारी उपलब्ध झाल्याशिवाय काही बोलणे म्हणजे फक्त स्पेक्युलेशन. हीच आकडेवारी हिंदू ऐवजी अन्य धर्म घेऊन भारताखेरीज अन्य जगासाठीही पाहता येईल.

In reply to by गवि

सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/28/2018 - 20:35
बरुबर हाये पण आस्ली आकडीवारी गुगल वर भेटनार नाय ना ! आणि आपल्या सगळयाना अनुभवाचा बोल चालत नाय , ज्याला त्याला लिंक पायजे आस्ते .

माहितगार गुरुवार, 06/28/2018 - 19:47
...तशीही धर्मही संकल्पनाच आता कालबाह्य होत आहे
* गूगल ट्रेंड्स गॉड सुप्रीम बिईंग वि. अथेईझम युएसए. आमेरीकेत २००४ ला गॉड सुप्रीम बिईंगचा शोध अथेईझमच्या केवळ दहा पट होता २०१४ पासून २५ पॉईंटने वाढून तो १४ पट झाला आहे. * फ्रांन्स २०१५ पासून गॉड ५० पॉइंटने वाढतोय अथेईझमच्या दहापट होता बारा पट तरी झालाय * युकेत आधीच अधिक होते ते ९च्यापटीच्या एवजी परमेश्वर नास्तिकतेच्या तुलनेत १२ पट झालाय * रशियात परमेश्वर २००४ च्या तुलनेत २००८ पर्यंत चौपटीने मोठा झाला २०१५ पासून शोध मायन पॉइंटने कमी झालाय दिसतोय पण एव्हरेज नास्तिकांच्या १३ पट आहे. * चीन मधील गूगल आकडेवारी किती रिलायएबल म्हणता येईल माहित नाही पण तिथे २०१५ पासून अनेक पटींनी वाढून दहापट मोठा झालाय * सौदी अरेबीया २०१५ नंतर २५ पॉईंटने परमेश्वर मोठा होताना दिसतोय अ‍ॅव्हरेज अथेईझम पेक्षा ९पट मोठा आहे , इथे अथेईझम शोधले जाते हेच अनपेक्षीत आहे. अर्थात इमिग्रंट्सचा डाटावर परिणाम आणि स्थानिक सौदींच्या मतात फरक असू शकतो. * पाकीस्तानात गॉड सुप्रीम बीईंग कमी शोधले जाताहेत याचे कौतुक वाटते कदाचित उर्दू शोध अधिक असल्यास डाटा वेगळा येत असेल. तरीही अथेईझमच्या नऊ पट परमेश्वर सातत्याने मोठा आहे असे दिसते. * भारता गॉड सुप्रिम बीईंगचा शोध २०११ मध्ये २५ पाँञने वाढला अथेईझम पेक्षा अ‍ॅव्हरेज ३५ पटीने मोठा आहे. * आता जागतिक बघू २०१० ते २०१८ गॉड सुप्रिम बिईंगचा शोध ५० पॉईंटने वाढलाय अथेईझम पेक्षा अ‍ॅव्हरेज १५ पट आहे, वाढ होऊन वीसपट आहे.
मला माहित नाही नास्तिक मंडळी या आकडेवारीकडे किती आनंदाने पाहू शकतील पण जे आहे ते तुर्तास असे दिसते आहे. इतर धर्मनावे आणि धर्म ग्रंथ नावे वापरुन अशाच तुलना करता येतील पण ढोबळ अंदाजा येण्यास एवढे तुर्तास पुरे असावे.

In reply to by माहितगार

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 12:42
नास्तिकांना काही शोधायची गरज पडत नाही हो.. तसेही जे अस्तित्वात नाही ते शोधून काय उपयोग ? तर ते असो. बाकी या शोधाशोधीबद्दल माझा वरचा प्रतिसाद पुन्हा वाचू शकता.

माहितगार गुरुवार, 06/28/2018 - 19:57
असो , या विशीष्ठ धाग्याचा विषय मुस्लीम मुलींना हिंदू मुलाम्शी विवाह करण्याच्या संधी सुरक्षीतपणे कशा वाढवायच्या आणि हिंदू परिवारात त्यांना आनंदाने सहभागी कसे करुन घ्यायचे हा आहे. मडळी , धागा लेखासाठी असलेल्या मुख्य विषयाकडे याल काय ?

सोमनाथ खांदवे गुरुवार, 06/28/2018 - 21:58
https://m.navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/crime/ankit-saxena-murder-case-charge-sheet-filed-accused-accepted-their-crime/articleshow/64052532.cms हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांच्या प्रेमप्रकरणांत हिंदू मुलाला मारहाण किंवा मृत्यू आणि हिंदू मुलगी व मुस्लिम मुलगा यांची प्रकरणे न्यायालयात जातात कारण हिंदू मध्ये सहिष्णुता ठासून भरलेली असते .

सलिल्_गुमास्ते गुरुवार, 06/28/2018 - 22:34
https://www.telegraph.co.uk/news/2017/12/09/grooming-gangs-muslim-men-failed-integrate-british-society/ https://www.bbc.com/news/uk-england-south-yorkshire-28939089 https://www.birminghammail.co.uk/news/midlands-news/gang-members-filming-rape-attacks-13619424 https://www.independent.co.uk/news/uk/home-news/grooming-gang-newcastle-asian-pakistani-bangladeshi-muslim-response-faith-leaders-operation-shelter-a7888946.html

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/28/2018 - 23:39
सोमनाथ खांदवे साहेब इथल्या दीड शहाण्यांना लव जिहाद सारखा गंभिर मुद्दा लक्षात येणार नाही. कारण त्यांना सगळं आलबेल वाटतं. म्हणून समजावून सांगण्यात अर्थ नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विशुमित Fri, 06/29/2018 - 09:56
अतिशहाण्यांना सदा न कदा "हम खतरो में है" असेच वाटत असते. णून समजावून सांगण्यात अर्थ नाही. बाकी शुभेच्छा..!

In reply to by विशुमित

मराठी कथालेखक Fri, 06/29/2018 - 12:33
+१ लोकांमध्ये असुरक्षिततेची आणि अन्यायाचे बळी होत असल्याची भावना निर्माण करुन ध्रुवीकरण निर्माण करायचे हा उद्देष असतो अशा लोकांचा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माहितगार Fri, 06/29/2018 - 13:20
असुरक्षिततेच्या भावनेच्या कारण मिमांसे च्या चर्चे साठी पूर्ण स्वतंत्र धागा हिंदू मुस्लीम आंतरधर्मीय विवाह, परस्पर अविश्वासाची कारण मिमांसा, विश्वास प्रक्रियेची पुढील दिशा असताना तिकडे चर्चा करावयाचे सोडून या धागाचर्चेत अवांतर करण्याचे प्रयोजन अनुषंगिक असले तरीही कळत नाही. असो.

धर्मराजमुटके Fri, 06/29/2018 - 20:45
कारण हिंदु मुलींचे चेहरे पाहून त्या मुली आहे की म्हातार्‍या ते कळते. मुस्लीम मुली बुरख्यात असल्यामुळे ती मुलगी आहे, कि विवाहित आहे की म्हातारी काही कळत नसावे. असा अंदाज ! तस्मात मुस्लिम मुलगी हिंदू मुलगा अशी जोडी हवी असल्यास बुरखा पद्धत बंद करावी लागेल. अवांतर : आपलं ठेवायचं झाकून दुसर्‍याचं पहायचं वाकून ही म्हण इथे वापरल्यास योग्य राहिल काय ?

In reply to by धर्मराजमुटके

माहितगार Sat, 06/30/2018 - 09:06
...आपलं ठेवायचं झाकून दुसर्‍याचं पहायचं वाकून ही म्हण इथे वापरल्यास योग्य राहिल काय ?
अल्पश्या बदलाने होय, 'आपलं ठेवायचं झाकून, दुसर्‍याचं घ्यायचं अत्याग्रहाने मागून' नक्कीच लागू पडावी.
...तस्मात मुस्लिम मुलगी हिंदू मुलगा अशी जोडी हवी असल्यास बुरखा पद्धत बंद करावी लागेल.
पडदा पद्धती हि एक समस्या आहेच, त्या शिवाय विवाह परिवारातल्या परिवारात करणे हि दुसरी सुद्धा समस्या आहे. दोन्ही विषयांवर अलिकडेच धागे काढून झालेत. त्या चर्चातही अवश्य सहभाग घ्यावा. त्या शिवाय सेक्युलर नॉन उर्दू को एड एज्युकेशन पासूनही मुस्लिम मुलींना दूर ठेवले जाते, हिंदू धर्माबाबत नसत्या ब्रेन वॉशींगची जबरदस्ती होते त्यामुळे मुस्लिम मुलींना हिंदू मुलांशी विवाहाच्या समान संधी पासून दूर रहावे लागते, समान न्यायाच्या तत्वाने हा मुद्दा नक्किच महत्वाचा आहे.
....मुस्लीम मुली बुरख्यात असल्यामुळे ती मुलगी आहे, कि विवाहित आहे की म्हातारी काही कळत नसावे. असा अंदाज !
मुस्लिम ते मुस्लिम विवाहातही कळण्यास काय मार्ग आहे ? आणि त्यांच्यातला पडदा आणि बुरख्यासहीत दाखवण्याचा कार्यक्रम कसा वर्क आऊट होतो ह्याची कल्पना नाही. पण एक मोठे प्रमाण ३० ते ४० टक्के तरी पारिवारीक विवाहाचे असते आणि बुरखा घालण्यास सुरवात होण्याच्या आधीच्या अगदी लहानपणच्या स्मृती आठवणीत असू शकणे काही मुलांसाठी शक्य असावे . पण सगळ्यांच्या लहानपणच्या स्मृती एवढ्या शार्प असतीलच असेही नसावे. त्यामुळे मुस्लिम मुले सहज दिसणार्‍या हिंदू मुलींच्या मागे पडत असण्याची आपण व्यक्त केलेली शक्यता अगदीच नाकारता येत नाही असे वाटते.

सोमनाथ खांदवे Fri, 06/29/2018 - 22:36
बोंबला , इतका वेळ चाललेल्या काथ्याकूट मध्ये बुरखा , तीन तलाक हे मुद्दे विसरलो होतो की राव ! पुढील वाक्य मराठी कथालेखक यांचेच आहे "धर्म ही संकल्पनाच आता कालबाह्य होत आहे असे मी म्हंटले त्याचे कारण व्याहवारिक आणि सामाजिक जीवनात धर्माची आवश्यकता फारशी उरली नाही. न्याय व न्यायव्यवस्था ही समाजाची एक सार्वत्रिक आणि सर्वकालिन गरज आहे. पुर्वी न्यायव्यवस्था या धर्मावर आधारित होत्या, राजाने चालवलेला राज्यकारभार धर्मतत्वांवर आधारीत असावा अशी अपेक्षा होती. समाजाला न्यायव्यवस्था पुरवण्याचे काम बहुतांशी धर्माने आणि धर्माने चालणार्‍या सत्तांनी केले. पण आता धर्माची जागा राज्यघटनेनी घेतली आहे. त्यामुळे धर्माची गरज फक्त आध्यात्मिक निकड भागवणे हीच बहुतांशि राहिली आहे... " मराठी कथालेखक यांच्या म्हणण्यानुसार जर धर्माची जागा राज्यघटनेनी घेतली आहे तर तीन तलाक हि पद्धत स्रियांसाठी अन्यायकारक असताना तीन तलाक कायद्या विरोधात मौलावी पुरस्कृत हजारो मुस्लिम स्रियां चे मोर्चे का काढले गेले ? आणी मुस्लिम समाजा कडून स्रियांना बुरख्यातून स्वातंत्र्य का भेटत नाही ?

In reply to by सोमनाथ खांदवे

माहितगार Sat, 06/30/2018 - 08:43
ह्या मुद्द्या च्या वेगळ्या बाजूची चर्चा मी वर केली, त्यास बिरबलाची खिचडी शिजत आहे असे उत्तर आले. हिंदूंच्या समाज सुधारणेची खिचडी लगेच शिजली पाहीजे आणि इतरांबाबत चाहे सो समय लेलो संक्रमण अपना समय लेता है. आक्षेप पुरोगामीत्वाला नाही निरपेक्षतेच्या गोंडस नावा खाली लपवलेल्या सापेक्षतेला आहे. धर्मच काल बाह्य झाला तर धार्मीक अल्पसंख्यंकांसाठी वेगळ्या सोईंचे प्रयोजन उरत नाही. अशाच पद्धतीने भारतीय राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच, धार्मीक स्वातंत्र्याला मुलभूत आधिकाराचा दर्जा भारतीय राज्यघटनेत असण्यास प्रयोजन रहात नाही या मुद्द्यावर श्रीमान मराठी कथालेखक यांनी सहमत होऊन भूमिका स्पष्ट करावयास हवी.

सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 12:02
मिपावरील तमाम पुरोगामी सभासदांना वाऱ्यावर सोडून लष्कर ए काँग्रेस च्या अध्यक्षा सारखे ' मराठी कथालेखक ' अचानक सुट्टीवर गेले आहेत , मला तर ते मंगुशेठ चा अवतार वाटत होते .

In reply to by सोमनाथ खांदवे

मराठी कथालेखक Sun, 07/01/2018 - 13:11
"चर्चा करताना वैयक्तीक हल्ले करु नये, विचारांचे खंडन करावे. पण मिपाकरांवर लेबल्स लावू नये" अशी भाबडी आशा घेवून मी मिपावर वावरत होतो. असो... तुमचं चालू द्या..

In reply to by विशुमित

माहितगार Sat, 06/30/2018 - 12:47
मुद्दे मुद्यांनी खोडावेत. तर्कदोष असतील तर नजरेत आणावेत. त्या पलिकडे जाऊन मिपावर बालिशपणाच कळस चढवलात. मिपावर बालिशपणाच कळस चढवलात. अभिनंदन...!! आता मोठे होण्यासाठी तयारी करा. Grow up Champ...! हे सर्व व्यक्तीलक्ष्य तर्कदोषातच बसते. आम्ही बालीश तर तुम्ही बालीश आम्ही दहा बालीश तर तुम्ही हजार बालीश , आमचे परदादा बालीश तर तुमची पतवंड बालीश ! हा सगळा बालीशपणात तर्कदोष तर्कदोषच रहात असावेत.

In reply to by माहितगार

विशुमित Sat, 06/30/2018 - 14:27
माहितगार जी हा प्रतिसाद तुमच्यासाठी नव्हता. मिपा पेजच्या लेआऊट मुळे तुम्हाला वाटले असेल कदाचीत. तर्कशास्त्री म्हणून मिपावर तुमचे खूप मोठं स्थान आहे. त्या बाबतीत आम्ही अंड्यात पण नाही असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कृपया गैरसमज नसावा.

In reply to by विशुमित

सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 12:58
खूप लवकर विसरलात हो !!!! , बलिशपणा तुम्ही करत होतात . ऊठसूट संपादक , तालुका , मा . शरद पवार यांचे उल्लेख करून . त्यामुळे आता आता या वरच्या वर्गात .

In reply to by सोमनाथ खांदवे

विशुमित Sat, 06/30/2018 - 14:51
मी विसरलो नाही. सं.मं. बाबतीत मी मान्य केले होते. तुम्ही विसरलात आणि येथे त्याचा उल्लेख करून कोतेपणा केलात. असो...! === बाकी लोकांना मिपा व्यतिरिक्त ईतर ही कामे असतात. कोणी पळून जात नाही. काही बालीश किंवा आधीच चर्चा करून चोथा झालेल्या प्रतिसादांना लोक फाट्यावर पण मारतात. === मी वरच्या वर्गात कधीच आलोय. कदाचित दुसर्या तुकडीत असल्याने तुम्हाला दिसत नाही.असो..!! === मंगूंची जास्त आठवण येत असेल तर व्यनी करा.. दुसर्यांचे संबंध जोडण्याचा धंदा बंद करा.

In reply to by विशुमित

सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 18:54
विशुमित साहेब , अशी रफटफ भाषा वापरून तुम्ही मिपावरील सभासद कमी नका करू हो !! म्या सुद्धा तुम्हाला घाबरून मिपा सोडणार व्हतो पण आता बळबळ वुसण आवसान आनून बोलतोय . आणि कसं आसतंय की आपल शिक्षान , आणि आपला पत्ता आपल्या भाषेत दिसतो . कशाला उगीचच दुसऱ्याला इनाकारण टप्ल्या मारायच्या ? मराठी कथालेखक नीं दोनचार मुद्दे माझ्यावर फेकून नंतर ते दिसत नव्हते म्हणून मी त्यांना चर्चेत आणण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही मध्येच ........ चालायचंच . आणि मंगुशेठ ने माझ्या नावाचा अपभ्रंश करून , पातळी सोडून भरपूर केविलवाने विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण मी त्यांना शोधून चर्चेत आणायचा प्रयत्न करत होतो . असू द्या हार न मानता आपल्याला वादविवाद घालायचे आहेत .

In reply to by विशुमित

सोमनाथ खांदवे Sat, 06/30/2018 - 13:16
खूप लवकर विसरलात हो !!!! , बलिशपणा तुम्ही करत होतात . ऊठसूट संपादक , तालुका , मा . शरद पवार यांचे उल्लेख करून . त्यामुळे आता आता या वरच्या वर्गात .

धर्मराजमुटके Sat, 06/30/2018 - 15:07
Social Media Day च्या निमित्तानं निदा फाजलींच्या या दोन ओळी सांगाव्याशा वाटतात. दुश्मनी लाख सही, खत्म न किजे रिश्ता दिल मिले या ना मिले, हात मिलाते रहिये! योगेश मेहेंदळे यांचा लोकसत्तातील हा लेख वाचावा असे सुचवितो.