....कार्यकर्ता 2
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एके दिवशी साहेबांनी सत्तूला बोलावले. म्हणाले, "आपलेच दात आणि आपलेच ओठ. चिरंजीव ऐकायला तयार नाहीत. पण मला चिरंजीवा पेक्षा सत्तू कार्यकर्ता जवळचा आहे. ज्यानं माझ्यासाठी उभी हयात घालवली, त्यांना आम्ही विसरणार नाही. पण चिरंजीव ऐकत नाहीत. आम्ही काय करावं? तू म्हणशील तस करू."
साहेबांची अवस्था बघून सत्तूला भरून आलं. सत्तूनं साहेबाना ठामपणे सांगितलं, "धाकल्या साहेबांचा अर्ज भरा. घरातच फाटाफूट नको. आम्ही पक्षासाठी एवढे दिवस राबलो. आता साहेबांच्या घराण्यासाठी राबु........"
सत्तूला उदास वाटत होतं.
हयात राजकारणात घालवली. घरात बापाच्या जागी साहेबांचा फोटो लावला. बागा पण गेल्या. शेती संपली. घरदार उध्वस्त झालं. पोरगा निवडून येणार या आशेवर बाप मरून गेला. बायका पोरं देशोधडीला लागली. बरोबरीचे मित्र प्रगती करुन कुठल्या कुठं गेले. आपण मात्र साहेबांचे खंदे समर्थक. विश्वासू साथीदार.
घरात नाही ज्वारीचा दाणा आणि आणि पुढारी उताणा, अशी अवस्था.
उद्या पोरांनी विचारलं तर बापाचं कर्तव्य काय सांगायचं ???????
सत्तुला सकाळी उशिरा जाग आली ती धाकल्या साहेबांच्या हाकेनं. सत्तू जागा होऊन बाहेर आला. धाकल्या साहेबानी पाय धरले. म्हणाले, "तुमच्या सारखे कार्यकर्ते आहेत म्हणूनच राजकारणात आमच्या घराण्याचं नाव आहे. आता आमचं निवडून येणं तुमच्याच हातात आहे." धाकल्या साहेबानी पुन्हा एकदा पाय धरले. सत्तूने त्यांना उठवले......
धाकल्या साहेबांच्या प्रचारासाठी सत्तू नावाचा कार्यकर्ता कामाला लागला. त्याने पुन्हा पायाला भिंगरी बांधली..... समाप्त
प्रतिक्रिया
गेले ते दिवस. आता गडी खाऊन
हायला ५०० म्हणाजे बरा आहे की
लेखनशैली आवडली.
आभारी आहे पुढील वेळी आजून
पुढील वेळी आजून चांगले लिहण्याचा प्रयत्न करीन.
हे असले कार्यकर्ते कुठेच
जुन्या काळातील निष्ठावान
कथा छानच लिहीलिय
धन्यवाद एकाच भागात लिहायची
सत्तू
एकदम हे आठवलं..