कुलदिपक भाग ५

विप्लव's picture
विप्लव in जनातलं, मनातलं
19 Jun 2018 - 11:09 pm

बहता हे मन कही, कहा जानती नही
कोई रोक ले यही, भागे रे मन चला आगे रे मन कही
जाने किधर जानू ना
मेघा स्वतःशीच गुणगुणत स्वयपाकघरात काम करत असते. पण तिच कामात लक्ष कुठ असत ते तर कधीच गेलं पुण्याला विकी सोबत
कालचा तो प्रसंग तिच्या डोळ्या समोरुन झरझर सरकू लागतो. शेवटी चाचरत का कसेना तिने विकीच्या हातात हात देऊन त्याच्या मैत्रिला पुष्टी दिली.
' त्याच्या हातात हात दिला मी. किती छान वाटल ना! तो स्पर्श मला हवाहवासा का वाटतोय. परत कधी भेट होणार आमची. छे बाई ईतकी का उद्विग्न होतेय मी त्याच्या भेटीसाठी? काय होतय मला हे? कशातच का मन लागत नाहीये? '
" अग ये पोरी ध्यान कुटं हाय? आगं भाजी पार करपून कोळसा झाला की ग बाय. आगं जाळ कमी कर की. देवादेवा काय करु या पोरीचं? ऊठ बाई तितनं म्या करते सैपाक, तू जाऊन भैरनं कापडं काडून आण. कुठं ध्यान असतय बयेच काय माहिती?"
आईच्या ओरडण्यासरशी मेघा एकदम भानावर येते न तिला जाणिव होते स्वतःःच्या पराक्रमाची. जिभ चावत ती तिथून ऊठते न सरळ बाहेर धूम ठोकते धुणं काढायला.
संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्ती करुन थोड वाचन करायला पुस्तक हातात घेते खरी पण पुस्तकांच्या पानांशी चाळा करण्याखेरीज तिच दुसर्या कशातच मन लागत नाही.
' जो हाल दिल का ईधर हो रहा है।
वो हाल दिल का उधर हो रहा है।
जाने जा दिलोंपे प्यार का
अजबसा असर हो रहा है। '
हेडफोन लावून गाणी ऐकत असताना विकीच्या मनात फक्त मेघाचेच विचार सुरू असतात. ' मला जे वाटतय ते तिला देखील वाटत असेल का? आत्ता ती काय करत असेल? माझाच विचार करत असेल तर?' अन् स्वतःशीच तो हसतो पण हे शमूच्या नजरेतून सुटत नाही बरं का!
" बघू ताप तर नाही ना आला तुला? नाही, मग असा स्वतःशीच का हसतोयस?"
" न नाही कुठं काय? क काहीच नाही. मी कुठे हसतोय? उगाच काहीतरी बोलू नको." बोलता बोलता घाम फुटला विकीला. ' काय यार ही शमि पण ना. हिच्या पासून काही लपत नाही. पक्की चतूर आहे ही. आता काहीतरी करून विषय बदलला पाहिजे नाहीतर ही परत डोके खात बसेल.'
" शमे सगळी कागदपत्रे घेतली आहेस ना. काही विसरली तर नाही ना? नाहीतर बसशील ऐनवेळी रडत."
" ए गप रे दादुल्या. सगळ घेतलय मी. न परत नीट तपासून पण पाहिलंय. काही विसरली नाही मी. मी काही एवढी वेंधळी नाही काही."
--------------
मेघा अन् विकी ची भेट होऊन एक महिना उलटून गेला आहे. पण त्याच्या मनातील त्या भेटीच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.
" मिस मेघा इथेच राहतात का? " मेघाला भेटायला कोणी तरी आलय.
" हो मीच मेघा. बोला काय काम होत? "
" हे पत्र आहे तुमच्या नावाच. संध्याकाळी परत येतो उत्तर न्यायला."
एवढं बोलून त्याने पत्र मेघाच्या हाती दिलं अन् सायकलवर टांग मारून तो निघून ही गेला. मेघा मात्र पुतळ्या सारखी जागीच खिळून राहिली. मला कोणी पत्र पाठवलं? हा मुलगा कोण होता? याला कुठं तरी पाहिल्या सारख वाटतय पण कुठं?
मेघाने पत्र वाचायला सुरुवात केली.

प्रिय मेघा
चालेल ना ग मी तुला प्रिय म्हंटल तर? काय लिहू न काय नको असं झालंय. आठवतंय आपली पहिली भेट? मी तर तुला पाहताक्षणीच तुझ्यात हरवून गेलो होतो. तुझे ते सुंदर टपोरे डोळे, त्या काळ्याभोर केसांची लांबसडक वेणी. अश्या स्वर्गिय सौंदर्यांची वर्णने केवळ कथा कादंबऱ्या मध्येच पहायला मिळते. पण मी ते प्रत्यक्षात अनुभवलय. अन् डोळ्यात साठवलय सुद्धा. हसू नकोस हसतेस काय?
माहितेय मी जरा जास्तच फिल्मी होत आहे पण काय करु. जेव्हा पासून तुला मी पाहिलय तेव्हा पासून मी माझा राहिलोच नाहि ग. कधी हे माझे वेडे मन तुझे झाले कळलच नाहि. तुला देखील अगदी असंच वाटतयं ना? प्लिज खरं सांग.
तुझ्या उत्तराची चातकासारखी वाट पाहणारा तुझाच
विकी.

ह्या पत्राची ४-५ वेळा पारायणे करून झाली तरी तिचा विश्वास बसत नव्हता की हे खरंखुरं पत्र आहे जे तिला विकीने लिहील आहे.
हातात पेन घेऊन ती लिहायला बसली. पण पहिल्याच ओळीवर सारखी अडखळत होती. काय लिहू? कशी सुरुवात करु हेच तिला सुचेना......
मनातल्या भावना कागदावर उतरवून तिने लिफाफ्याची घडी घालून पुस्तकात ठेऊन दिली.
डोळे मिटून शांतपणे ती विचार करु लागली.
' खरच त्याच्या मनात असणाऱ्या माझ्या विषयीच्या भावना यथार्थ असतील का? हे जे घडतय ते योग्य आहे? की फक्त आकर्षणाचा खेळ? '
ती विचारमग्न असताना अचानक कुणाच्या तरी हाकेने तिची तंद्री भंग झाली.
" मिस मेघा आहेत का घरात?"
" हो आलेच." बाहेर येऊन पाहते तर तोच सकाळचा युवक दारात थांबलेला.
" उत्तर न्यायला आलोय. तयार आहे ना?"
मिश्किलपणे हसत त्याने विचारले.
" त्या आधी माझ्या प्रश्नाच उत्तर दे. आपण या आधी भेटलोय का कधी? मला तुमचा चेहरा ओळखीचा वाटतोय." जासूस मेघा जागी झाली.
" हो तुम्ही डि.एडचा अर्ज भरायला आलेल्या, तिथे मी पण आलेलो अर्ज भरायला. माझा मित्र पण होता सोबत विकी. आठवल ना."
' अच्छा असे आहे तर. तरीच याला कुठंतरी पाहिल्या सारख वाटतय. ' मेघा स्वतःशीच बोलली.
" मग देताय ना पत्र?" युवक
" तुमच्या मित्राने ही भरलेला का अर्ज? आणि तुमचं नाव नाही सांगितलं." मेघा
" नाही तो पुण्याला असतो इंजिनिअरिंगला. तो फक्त माझ्या सोबत आलेला. आणि माझं नाव अजय आहे."
" अच्छा मग.." मेघाच बोलन मध्येच तोडत तो बोलला " अहो किती प्रश्न विचारताय? पुढच्या वेळसाठी काहीतरी शिल्लक ठेवा." अन् तो निघून ही गेला पत्र टपाल पेटी मध्ये टाकायला.
आता तुम्ही म्हणाल की मेघा कडे विकीचा पत्ता कुठून आला? तर मेघाने पत्ता लिहलाच नव्हता. अजयने पत्ता टाकला होता
____
इकडे काही दिवसांनी विकीला पत्र मिळाले. ज्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. पत्र फोडून त्याने वाचायला घेतले.
मेघाच्या पत्रात काय लिहिले आहे ते कळेल पण पुढच्या भागात

- क्रमशः
- (विप्लव)

कथालेखविरंगुळा