तुझे डोळे

Primary tabs

कौस्तुभ आपटे's picture
कौस्तुभ आपटे in जे न देखे रवी...
7 Jun 2018 - 10:47 pm

सागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले
अन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे
घडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे
तुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥

मुग्धता कधी सुमनांची,
चारुता कधी चंद्राचि,
नयनातुन ती सांडते.
गुढता गहन कोड्याची,
कल्पना नव्या कवीतेची,
नजरेतुन ती मांडते.

या तुझ्या लोचनी, खोल गेलो किती,
तरीही त्रुप्ती मना ना मिळे.
बाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी,
जैसे लळा लावते गोजीरे
गोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥१॥

स्वप्न हे कितीक स्वप्नांचे,
अंजने आणिक सुरम्यांचे,
विरघळावे तुझ्या लोचनी.
साकडे तुला अश्रुंचे
ढळू नको कधी दुखा:ने
मरण यावे तुझ्या पापणीत

अंबरीचा वसा, निखळल्या तारका,
जणू ह्या चक्षुंतुनी साचले.
तव नेत्रांची सुधा, जी मिळे तो सोहळा,
म्हणुनी झुरती किती बापुडे
बापुडे...तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥२॥

गीत- कौस्तुभ

https://www.youtube.com/watch?v=SC920jcJQx4
हे गाणे मी नुकतेच youtube वर प्रकाशीत केले आहे. वरील लींक वर ते ऐकता येईल.ह्याचे गीत आणि संगीत माझे असून मझा मित्र निखिल श्रीधर ने ते गायले आहे. तरी आवडल्यास किंवा काही सुचना असल्यास जरुर कळवा. धन्यावाद.

संगीतकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

8 Jun 2018 - 11:59 am | प्राची अश्विनी

छान झालंय.

कौस्तुभ आपटे's picture

9 Jun 2018 - 12:01 pm | कौस्तुभ आपटे

धन्यवाद

श्वेता२४'s picture

8 Jun 2018 - 2:43 pm | श्वेता२४

.

कौस्तुभ आपटे's picture

9 Jun 2018 - 12:01 pm | कौस्तुभ आपटे

धन्यवाद

विशुमित's picture

9 Jun 2018 - 12:20 pm | विशुमित

गाणे ऐकले ... मस्त झाले आहे.
निखिल श्रीधर छान गायले आहे.

सतिश गावडे's picture

9 Jun 2018 - 12:41 pm | सतिश गावडे

छान झाले आहे गाणे. आवडले.

पद्मावति's picture

9 Jun 2018 - 2:52 pm | पद्मावति

खुप सुंदर.

प्रमोद देर्देकर's picture

9 Jun 2018 - 3:17 pm | प्रमोद देर्देकर

मस्त खूप सुंदर

कौस्तुभ आपटे's picture

9 Jun 2018 - 8:14 pm | कौस्तुभ आपटे

धन्यवाद.आवडल्यास शेअर करा

Topi's picture

9 Jun 2018 - 11:13 pm | Topi

छान आहे

कौस्तुभ आपटे's picture

10 Jun 2018 - 5:42 pm | कौस्तुभ आपटे

धन्यवाद

मदनबाण's picture

10 Jun 2018 - 9:23 am | मदनबाण

गाणे ऐकले, छान आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malhar

कौस्तुभ आपटे's picture

10 Jun 2018 - 5:42 pm | कौस्तुभ आपटे

धन्यवाद

खिलजि's picture

11 Jun 2018 - 1:24 pm | खिलजि

छान झालंय. या पावसाच्या सरींमध्ये खूप छान वाटलं ऐकताना .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Jun 2018 - 9:53 pm | हणमंतअण्णा शंकर...

आवाज आवडला. संगीत यथातथा आहे. काव्य सुमार आहे. प्रयोग (सर्जन) काय आहे हे कळले नाही.
प्रतिक्रिया थेट असली तरी नाउमेद होऊ नका. प्रयत्न स्तुत्य आहे.
तुमच्याकडून अजून दर्जेदार गाणी ऐकायला मिळोत ही सदिच्छा!

कौस्तुभ आपटे's picture

14 Jun 2018 - 11:00 pm | कौस्तुभ आपटे

मला माहीत्ये मी फार चांगलं लिहीत नाही. मला चालीवरच सुचते...त्या मुळे काही मर्यादा येतात..पण 'सुमार' हा शब्द फारच लागला...सुमार म्हणजे फारच टाकाऊ असा मला समजलेला अर्थ आहे.उदा. सुमार बियाणे , सुमार माल इ. असो मला इथे कोणताही बचाव करायचा नाही :)...पण कुणाला आपल्या काव्यासाठी असा शब्द वापरावासा वाटावा ही मझ्यासाठी चिंतनाची बाब आहे...आणि ते चालू झाले आहे...म्हणून तुमचे आभार...अशा परखड प्रतिक्रिया देणारे दुर्मीळ...तुमच्या या प्रतिक्रियेला मी टाकिचे घाव समजतो आणि माझ्या पुढील कलाकृतीला देवपण येईल अशी आशा बाळागतो :)
-धन्यवाद

वाचून ठिकठाक वाटली कविता. पण ऐकायला मात्र खुपच आवडले गाणे. मस्तच झालय. छान!

शाली's picture

13 Jun 2018 - 10:48 am | शाली

lyrics ऐवजी छान व्हिडीओ क्लिप्स असत्या तर आणखी छान वाटले असते.

कौस्तुभ आपटे's picture

14 Jun 2018 - 11:03 pm | कौस्तुभ आपटे

व्हिडिओ बद्दल विचार चालू आहे.. लवकरच तोही रिलीज करण्याचा प्रयत्न करू....प्रतिक्रिये बद्द्ल आणि सुचनेसाठी धन्यवाद