सागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले
अन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे
घडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे
तुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥
मुग्धता कधी सुमनांची,
चारुता कधी चंद्राचि,
नयनातुन ती सांडते.
गुढता गहन कोड्याची,
कल्पना नव्या कवीतेची,
नजरेतुन ती मांडते.
या तुझ्या लोचनी, खोल गेलो किती,
तरीही त्रुप्ती मना ना मिळे.
बाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी,
जैसे लळा लावते गोजीरे
गोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥१॥
स्वप्न हे कितीक स्वप्नांचे,
अंजने आणिक सुरम्यांचे,
विरघळावे तुझ्या लोचनी.
साकडे तुला अश्रुंचे
ढळू नको कधी दुखा:ने
मरण यावे तुझ्या पापणीत
अंबरीचा वसा, निखळल्या तारका,
जणू ह्या चक्षुंतुनी साचले.
तव नेत्रांची सुधा, जी मिळे तो सोहळा,
म्हणुनी झुरती किती बापुडे
बापुडे...तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥२॥
गीत- कौस्तुभ
https://www.youtube.com/watch?v=SC920jcJQx4
हे गाणे मी नुकतेच youtube वर प्रकाशीत केले आहे. वरील लींक वर ते ऐकता येईल.ह्याचे गीत आणि संगीत माझे असून मझा मित्र निखिल श्रीधर ने ते गायले आहे. तरी आवडल्यास किंवा काही सुचना असल्यास जरुर कळवा. धन्यावाद.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9518
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान झालंय.
धन्यवाद
In reply to छान झालंय. by प्राची अश्विनी
छान आहे
धन्यवाद
In reply to छान आहे by श्वेता२४
गाणे ऐकले ... मस्त झाले आहे.
छान झाले आहे गाणे. आवडले.
खुप सुंदर.
मस्त खूप सुंदर
धन्यवाद
छान आहे
धन्यवाद
In reply to छान आहे by Topi
गाणे ऐकले, छान आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malharधन्यवाद
In reply to गाणे ऐकले, छान आहे. by मदनबाण
छान झालंय. या पावसाच्या
आवाज
धन्यवाद
In reply to आवाज by हणमंतअण्णा शंक…
वाचून ठिकठाक वाटली कविता. पण
lyrics ऐवजी छान व्हिडीओ
धन्यवाद
In reply to lyrics ऐवजी छान व्हिडीओ by शाली