✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बाबा नव्हताच तिथे .....

अ
अनाहूत यांनी
Fri, 06/01/2018 - 13:21  ·  लेख
लेख
स्वप्नातही मला कायकाय सुचत , मी सायंटिस्ट असते तर माझे बहुतेक शोध स्वप्नातून जागी झाल्यावरच लागले असते . आताही किती भारी सुचलंय मला . हे आधी बाबाला सांगते त्याला हे फार आवडेल आणि त्याचही तो काहीतरी सुचवेल . बाबा, अरे बाबा कुठे आहेस ? घरभर फिरून आले पण बाबा नव्हताच तिथे . अरे मी काय शोधतेय , बाबा तर किती वर्ष झाली सोडून गेलाय आपल्याला .... कायमचा . मला का आठवलं नाही . का बाबा सोडून दुसरं काही आठवल नाही . असच आहे . मला असं काही सुचलं कि फक्त बाबा हवा असतो बाकी काही नाही . पण आता तो नाही . पण असं कस होईल . आजही त्याची आठवण येते आणि तो नाही असं वाटतच नाही कधी . बाबाशिवाय कोणताही दिवस गेला नव्हता घडलेली प्रत्येक गोष्ट त्याला सांगितल्याशिवाय ती पूर्णच होत नव्हती . कधीकधी असं व्हायचं त्याची फार आठवण यायची आणि तो हजर व्हायचा तिथे त्याला कस कळायचं माहित नाही पण यायचा तो आताही त्याची फार आठवण येतेय येईल का तो . हे सगळं स्वप्न होऊन भुर्रर्रकन उडून गेलं तर म्हणून मी डोकावून पहाते बाबाच्या नेहमीच्या जागी, मी लहानपणी अशीच लपत छापत जायचे आणि त्याला दचकवायचे . तीच खोली , तीच खुर्ची पण... पण बाबा नव्हताच तिथे .....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
1446 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

//पण बाबा नव्हताच तिथे ...//

जयंत कुलकर्णी
Sun, 06/03/2018 - 15:02 नवीन
//पण बाबा नव्हताच तिथे ...// छोटे पण ह्र्दयस्पर्षी !
  • Log in or register to post comments

खूप खूप आभारी आहे

अनाहूत
Sun, 06/03/2018 - 15:27 नवीन
खूप खूप आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा