आंतरजालावरील वाचनीय..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
27 Oct 2008 - 11:32 am
गाभा: 

राम राम मंडळी,

दिवाळीच्या मुहूर्तावर "आंतरजालावरचे वाचनीय" हे एक नवीन सदर सुरू करण्यास मिसळपावला आनंद होत आहे..

आज मनोगत, उपक्रम, मायबोली, अनेक मराठी ब्लॉग्स, इत्यादी मराठी संकेतस्थळांवर बरेच काही लिहिले जात आहे. मग ती एखादी उत्तम कविता असो, एखादा ललितलेख असो, किंवा एखादी वाचनीय व माहितीपूर्ण चर्चा असो..

आपल्यातले काही मिपाकर हे मिपासोबतच आंतरजालावर इतस्तत:ही फिरत असतात. त्यांच्या नजरेला जर मनोगत, उपक्रम, मायबोली इत्यादींवर प्रकशित झालेले आणि आवर्जून वाचावे असे काही साहित्य दिसले आणि ते मिपाकरांनीही वाचावे असे जर त्यांना वाटले तर त्यांनी संबंधित लेखनाचा दुवा या सदरात अवश्य द्यावा..जेणेकरून इतर इच्छुक मिपाकरांनाही ते वाचता येईल..

एखाद्या जरी मिपाकराला केवळ या धाग्यात दिलेल्या दुव्यामुळे काही चांगल्या वाचनीय साहित्याची माहिती मिळाली आणि त्याला ते वाचता आले तरी या धाग्याचा उद्देश सफल झाला असे आम्ही म्हणू..

यामुळे "मराठी आंतरजाल" म्हणजे "हे विश्वची माझे घर.." अशी भावना वाढीस लागेल, तसेच मिपाचे सभासदही यामुळे अधिकाधिक बहुशृत होतील असा आमचा विश्वास आहे!

आमच्यापासूनच सुरवात करतो --

नुकताच उपक्रम या संस्थळाचा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे. अंक वाचनीय आहे, तो या दुव्यावर जाऊन इच्छुकांना वाचता येईल..

असाच विचार जर प्रत्येकच मराठी संस्थाळाच्या चालकांनी केला तर किती छान होईल! ;)

असो,

आपला,
(राष्ट्रवादी, मराठीवादी) शरदतात्या अभ्यंकर. :)

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2008 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मायबोलीचा सुंदर दिवाळी अंक इथे पाहा !!!

नमोगताचा दिवाळी अंक अजून कसा प्रसिद्ध झाला नाही कोणास ठाऊक :?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येथे वाचता येईल.
(दुवादार)बेसनलाडू
पहिल्याच चाळणीत अंक एकंदर आवडला. या वर्षीच्या अंकाची मला जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये म्हणजे लेखनविषयानुरूप चित्रे व सजावट तसेच मुद्देसूद, मार्मिक संपादकीय.
(वैशिष्ट्यपूर्ण)बेसनलाडू
सवडीने अंक वाचून काढला गेला की लेखनाबाबत काय ते लिहिणे शक्य होईलसे वाटते.
(वाचक)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

28 Oct 2008 - 5:59 am | विसोबा खेचर

पहिल्याच चाळणीत अंक एकंदर आवडला.

सहमत आहे.. आमच्या पहिल्या प्रेमाचा दिवाळी अंक खरंच सुरेख आहे! शक्तिवेलूचे हार्दिक अभिनंदन...:)

आपला,
(मूळचा मनोगती) तात्या.

सुवर्णमयीने या दिवाळी अंकाकरता लेखांची जमवाजमव करण्याकरता बरीच मेहनत घेतल्याचे कळते! :)

आपला,
(माहीतगार) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2008 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुव्यावरुन मोठ्या उत्सुकते पाहिले तेव्हा, पहिल्याच दर्शनाने प्रेमात पडावे वगैरे असे मुखपृष्ठ, आकर्षक बांधणी नसल्यामुळे जरा भ्रमनिरास झाला. अजून अंक नीट चाळला नाही, वीजभारनियमन सांभाळून लेखन वाचून काढतो मग काही एका निकषांवर यावे लागेल. जालावर प्रतिभावान असलेली मराठी माणसं वेगवेगळ्या ठिकाणी अंकाच्या निमित्ताने लिहिताहेत ही एक वाचक म्हणुन आनंदाची गोष्ट वाटते.

-दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

28 Oct 2008 - 2:39 pm | छोटा डॉन

येथे वाचता येईल.

आत्ताच पाहिला आणि फर्स्ट इंप्रेशनने व्यवस्थीत वाटला.
नक्की वाचु असे ठरवले ..
(वाचक)डॉन्यालाडू

पहिल्याच चाळणीत अंक एकंदर आवडला. या वर्षीच्या अंकाची मला जाणवलेली ठळक वैशिष्ट्ये म्हणजे लेखनविषयानुरूप चित्रे व सजावट तसेच मुद्देसूद, मार्मिक संपादकीय.

चित्रांची रेलचेल आहे आणि मान्यवर व गाजलेल्या लेखकांचे लेखन आहे, त्यामुळे अंक वाचनीय असेल अशी आशा आहे.
"अनु" ची कथा वाचली व आवडली.
संपादकीयही समर्पक व यथायोग्य वाटले ....
मांडणी सुलभ असल्याने वावर सोपा आहे.
(सुस्पष्ट)डॉन्यालाडू

सवडीने अंक वाचून काढला गेला की लेखनाबाबत काय ते लिहिणे शक्य होईलसे वाटते.

+१, असेच म्हणतो
(सहमत)डॉन्यालाडू

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2008 - 2:31 pm | बिपिन कार्यकर्ते

आतुरतेने वाट बघत होतो. आज बघितला.

अंकाची मांडणी छान आणि सुस्पष्ट आहे. वेगवेगळ्या विभागात सहजतेने हिंडता येत आहे. बहुतेक वेळा आंतरजालावरील दिवाळी अंक माझा अभिमन्यू करतात. इथे तसे नाही वाटले. रंगसंगती छान.

रावसाहेबांचे 'केतकर' बघितले. अनुक्रमणिकेतली बहुतेक नावे ओळखीची आणि उत्सुकता वाढवणारी आहेत. लवकरात लवकर वाचायला पाहिजे असे वाटायला लावणारी.

बिपिन कार्यकर्ते

घाटावरचे भट's picture

28 Oct 2008 - 2:42 pm | घाटावरचे भट

अंक चांगला वाटला. सजावट आणि मांडणी मात्र जरा साधी वाटली, अधिक आकर्षक करता आली असती. दिवाळी अंकाचा फील येत नाही. लेखन थोडेफार चाळलें, आवडले. २-४ कथा वाचल्या, चांगल्या उतरल्या आहेत. शुद्धलेखनावरचे लेख तिथेही आहेत, वाचले नाहीत. ललित विभागही चांगला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान भागातील लेखही पाहिले, प्रतिशब्दांचा अतिरेकी वापर पटला नाही. एकूणात अंक व्यवस्थित उतरला आहे.

--(साधा आणि शुद्ध) भटोबा

विनायक प्रभू's picture

27 Oct 2008 - 12:03 pm | विनायक प्रभू

ह्याला म्हणतात खिलाडू व्रुत्ती. बरे वाटले.
मि.पा. वर लिंक मिळाली म्हणुन वाचले दोन चार. काय जमल नाय बॉ.
अवांतर : मला सर्व प्रकराच्या स्प्रिरिट वर प्रेम आहे.

विसोबा खेचर's picture

27 Oct 2008 - 12:06 pm | विसोबा खेचर

ह्याला म्हणतात खिलाडू व्रुत्ती. बरे वाटले.

प्रभूसाब, अभि आपने तात्याको अच्छी तरहसे पेहेचाना नही है! हे मराठी आंतरजालावरचं राजकारण तर तात्याके बाए हाथ का खेल है! :)

आपला,
शरदतात्या पवार.

सखाराम_गटणे™'s picture

27 Oct 2008 - 12:15 pm | सखाराम_गटणे™

तात्यांचा उपक्रम स्तुत्य आहे, त्यांनी त्याचे मनोगत अशाप्रकारे व्यक्त करुन मायबोलीवर प्रेम दाखवले आहे.

सखाराम देशमुख

---
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

विकि's picture

30 Oct 2008 - 11:02 pm | विकि

तात्या तु एकाच दगडात अनेक पक्षी मारले की.

अमोल केळकर's picture

27 Oct 2008 - 12:17 pm | अमोल केळकर

आपला हा अतिशय चांगला धागा होऊ शकतो.
अनुदिनी / वर्तमानपत्र / मराठी संकेतस्थळे यावरील उत्तम गोष्टींचा आस्वाद एकाच ठिकाणी सापडेल .
मिळून सार्‍याजणीचा हा दिवाळी अंक ही वाचनीय आहे

आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मनीषा's picture

28 Oct 2008 - 1:21 pm | मनीषा

अतिशय स्तुत्य उपक्रम !!

अथांग सागर's picture

29 Oct 2008 - 1:46 am | अथांग सागर

म.टा. चा दिवाळी विशेषांक इथे वाचता येईल.

या विशेषांकातील मुंबईबद्दलचा हा लेख खुप आवडला.

--अथांग सागर

वर्षा's picture

30 Oct 2008 - 10:42 pm | वर्षा

वाचायला भरपूर काही आहे. पण कुठलाच ऑनलाईन अंक प्रिंट करुन वाचायची सोय दिसली नाही :(
असो.
-वर्षा

अथांग सागर's picture

30 Oct 2008 - 11:00 pm | अथांग सागर

म. टा. मधील प्रत्येक लेख तुम्ही प्रिंट करुन वाचू शकता...

म.टा. दिवाळी विशेषांकातील हा लेख कुणीही चुकवू नये असा.

--अथांग सागर

नारायणी's picture

30 Oct 2008 - 11:35 pm | नारायणी

ईतका छान लेख सुचवल्याबद्दल धन्यवाद सागर. आफलातुन आहे. पण हे अमलात येईल असे वाटत नाही. अहो, पंतप्रधानासहीत अनेक अर्थतज्ञ सत्तेत येउन गेले, त्यांना का हे माहित नसेल? पहिला तो मोठया नोटांचा प्रकार तरी सगळ्यांना माहितचं असेल पण अमलात आणला तर राजकारण्यांचीच सगळ्यात जास्त गोची नाही का होणार? :)
(जाणकारांनी या विषयावर वेगळा धागा उघडुन चर्चा केल्यास वाचायला आवडेल.)

वर्षा's picture

30 Oct 2008 - 11:08 pm | वर्षा

हो मटामध्ये तशी सोय दिसली.
(पण तरी प्रत्येक लेखाच्या प्रिंट मारत बसाव्या लागतील...त्यापेक्षा पीडीएफ असती तर!)
अवांतर प्रश्नः मटाच्या बहुतांची अंतरे या सदरासाठी इ-पत्र (इमेल) करायचे असल्यास मटाचा इमेल आयडी काय आहे? कोणाला माहिती असल्यास सांगावा. धन्यवाद
-वर्षा

भाग्यश्री's picture

30 Oct 2008 - 11:42 pm | भाग्यश्री

बाकीचे माहीत नाही.. पण मायबोलीचा अंकाची पीडीएफ, २-३ आठवड्यात उपलब्ध होत असते.. तेव्हा प्रिंट मारता येईल.

मला मायबोलीचा अंक खूप आवडला.. कंटेंट्,डिझाईन्स्,दृक-श्राव्य विभाग, मान्यवरांच्या आवाजातले ऑडीओज.. रेलचेल आहे! अर्थात, ९-१० वर्षं जालावरचा अंक काढत असल्याचाही फायदा असेल..
उपक्रमचाही अंक मस्त आहे. पहील्या अंकाच्या मानाने सफाई अप्रतिम.. कंटेंट काही काही फारच माहीतीपूर्ण वाटतो.. पण त्यात ललित असण्याची शक्यता नसल्याने ठीक आहे..

मनोगतचाही थोडाफार वाचला.. कथा वगैरे छान. मात्र मांडणी, किंवा सजावट फारच बाळबोध. स्पेश्शल सजावट दिसली नाही काही. प्रेक्षणिय वाटत नाही त्यामुळे.

भाग्यश्री's picture

30 Oct 2008 - 11:43 pm | भाग्यश्री

सकाळचा दिवाळी स्पेशल अंक ऑनलाईन उपलब्ध आहे का? असेल तर प्लीज लिंक द्यावी .. मला सापडत नाहीए.

वर्षा's picture

30 Oct 2008 - 11:57 pm | वर्षा

मागच्या वर्षी मायबोली अंकाची पीडीएफ नव्हती काढली. :( यावेळेस बघूया
बाकी मायबोली आणि मनोगतबद्दलच्या तुझ्या मतांशी सहमत.
-वर्षा

धम्मकलाडू's picture

31 Oct 2008 - 12:48 am | धम्मकलाडू

मनोगताच्या दिवाळीच्या साइटवर रंग कमीच वापरले आहेत. का ते कळत नाही. रंग खूप वापरता आले असते. अगदी रेलचेल करून टाकायची होती. दिवाळी वाटायला हवी. तसाही वेबवर खर्च थोडीच येतो रंग वापरायला वेब डिझाइनिंग करणार्‍याला. याशिवाय दिव्यांची गर्दी हवी होती. काही फटाकड्याही हव्या होत्या. मोकळी जागा कशाला सोडली आहे कळत नाही. गज्जगज्ज भरून टाकायची ना. मला डिझाइनिंगमधले काही कळत नाही. पण आपण उचलली जीभ लावली आणि लावली टाळ्याला. उपक्रमाच्या अंकाबाबतही असेच.

मी भाग्यश्रीशी सहमत आहे. मायबोलीचा दिवाळी अंक सुरेख आणि अप्रतिम. किती दिवे. लालपिवळ्या रंगाच्या कित्ती कित्ती लाघवी छटा. फटाके. नक्षीकाम. लेखनाभवतीची चौकटही किती दिवाळीमय. अंक वाचताना कानात नुसत्या फुलबाज्या वाजत होत्या कानाखाली. मायबोलीचे डिझाइन सिंधीछाप झाले आहे असे एखादा कुजकटच म्हणेल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आजानुकर्ण's picture

31 Oct 2008 - 1:48 am | आजानुकर्ण

मी सुद्धा सहमत आहे.

आपला,
रंगरंगोटी बाबत चिकट
(डिंकलाडू) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

31 Oct 2008 - 2:00 am | विसोबा खेचर

अरे वा! मनोगताच्या दिवाळी अंकाविषयी मिपावर अगदी छान चर्चा सुरू आहे! :)

चालू द्या...! :)

आम्ही हा धागा इथेच ठेवत आहोत...साला, पब्लिकभी क्या याद करेगा! ;)

आपला,
(जिन्दादिल मुख्यमंत्री) अरूणतात्या सरनाईक.

बाय द वे, आजकाल मिपा ही अनेक मनोगतींकरता डोकेदुखीही ठरली आहे त्यामुळे मिपासंबंधी आणि आमच्या संबंधी मुक्त गरळ ओकण्यास मिळावी म्हणून आज काही ब्लॉग्जही मोठ्या जोमाने सुरू आहेत याचे आम्हाला कौतुक आहे. ती मंडळी तरी काय करतील बापडी? गरळीचा कुठे तरी निचरा होणे आवश्यकच असते ना! ;)

त्यामुळे मिपाच्या जिवावर बेटे आपला ब्लॉग चालवत आहेत झालं! चालवोत बापडे. माझा आशीर्वाद आहे.! :)

तात्या.

आजानुकर्ण's picture

31 Oct 2008 - 2:15 am | आजानुकर्ण

किंबहुना मिपाचा स्वत:चा अंक नसल्यामुळे आंतरजालीय दिवाळी अंकांबद्दल निष्पक्ष समीक्षा व तुलना येथे होऊ शकेल असे वाटते.

आंतरजालीय अंकांबद्दल सकाळमध्ये आलेली बातमीही वाचा.

http://www.esakal.com/esakal/10312008/Specialnews103B0675C4.htm

आपला,
(तौलनिक) आजानुकर्ण

विसोबा खेचर's picture

31 Oct 2008 - 11:42 am | विसोबा खेचर

किंबहुना मिपाचा स्वत:चा अंक नसल्यामुळे आंतरजालीय दिवाळी अंकांबद्दल निष्पक्ष समीक्षा व तुलना येथे होऊ शकेल असे वाटते.

या प्वॉईंटशी आम्ही सहमत आहोत..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2008 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किंबहुना मिपाचा स्वत:चा अंक नसल्यामुळे आंतरजालीय दिवाळी अंकांबद्दल निष्पक्ष समीक्षा व तुलना येथे होऊ शकेल असे वाटते.

सहमत आहे.

इतर आंतरजालीय दिवाळी अंकाबद्दल वाचून आनंद घेत आहे. पण 'एका' दिवाळी अंकाची तुलना करायची मला खूम-खूमी येत आहे. करु का प्रयत्न ;)

स्वगत :माझ्या लेखनाचे शिर्षक साधारणतः असे असेल. ''मला न आवडलेला ऑनलाइन दिवाळी अंक : वर्ष दुसरे''

विसोबा खेचर's picture

31 Oct 2008 - 12:03 pm | विसोबा खेचर

सर, प्लीज गो अहेड... :)

(आवडीनं ए रोचं तिकिट काढून बसलेला) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Oct 2008 - 1:02 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

31 Oct 2008 - 1:16 pm | छोटा डॉन

सर, प्लीज गो अहेड...

असेच म्हणतो, आपली सहज म्हणुन तुलना कराच ...
होऊन जाऊ द्या सर ...

आम्ही कवापासुन ढोल-ताशे आणि गुलालाची पोती घेऊन बसलो आहे ...
म्हणा "गणपत्ती बाप्पा मोरया" आणि होऊन जाऊ द्या ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अधिक माहितीसाठी येथे पहा.
माझ्याकडे हा अंक डीवीडी वर दृक्-श्राव्य स्वरूपात आहे. तो पूर्ण पाहून-ऐकून झाला की त्याबद्दल सविस्तर लिहिणे शक्य होईलच; शिवाय प्रताधिकारांचे उल्लंघन होत नसेल, तर काही निवडक लेख,कविता,कार्यक्रम यांच्या चित्रफिती आंतरजालावर चढवता येणेही शक्य होईल.
अंकाची किंमतः १५ अमेरिकन डॉलर्स. अंक भारतात विक्रीसाठी उपलब्ध नाही.
(माहितीदाता)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

31 Oct 2008 - 2:24 am | आजानुकर्ण

चैत्र-
लेखक: जी. ए. कुलकर्णी

बेला एवढे चढव बरे.

आपला,
जी. ए. आजानुकर्ण

अमोल केळकर's picture

31 Oct 2008 - 9:34 am | अमोल केळकर

स्टार माझाचा ऑन लाईन दिवाळी अंक
माझी दिवाळी
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा