✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अस्साच जळत राहिलास तर , जाताना पाणी पण महाग होईल

ख — खिलजि, Mon, 05/07/2018 - 13:14
मित्रा कधी जळू नकोस कुणावर इतका कि स्वतःच्या बुडाचीच आग होईल अस्साच जळत राहिलास तर जाताना पाणी पण महाग होईल काव्यातडाग नव्हे हे अथांग समुद्र तो दुर्दैवी तोच जो रसिकांना पामर समजतो वंदनीय मज सारे, तुही त्यात दुजा नसे नित्य नवी कल्पना काव्यदेवी देत असे हताश होऊ नको इतक्यात कि पाठीला बाक येईल कवन जरा नीट कर नाहीतर प्रतिभेला डाग येईल विझलेयत निखारे कधीच , लाव्हाहि निद्रिस्त तो नको फुंकर मारू आता जळून सारे राख होईल मारू नको टिचकी कधी इशाराही नको मजला मी सुखात या जागी जरी असे मी एकला आशा करतो काव्यदेवते आता तरी त्याला जाग येईल मित्रा हे नाही समजलं जर तुला तर पुढे दुर्दैव तुझा भाग होईल दुर्दैव तुझा भाग होईल........... -}--> " खिलजी " उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर -}-->

प्रतिक्रिया द्या
5560 वाचन

💬 प्रतिसाद (9)

लगेच अनन्त प्रतिसाद?

श्वेता२४
Mon, 05/07/2018 - 14:38 नवीन
बाकी तुमचे काव्य आम्हास आवडते. लिहीत राहा
  • Log in or register to post comments

"अस्सच चरत राहिलास तर ,

टवाळ कार्टा
Mon, 05/07/2018 - 14:57 नवीन
"अस्सच चरत राहिलास तर , जाताना कागद पण महाग होईल" असे "शी"घ्र काव्य होउ शकेल यावर ;)
  • Log in or register to post comments

तुमचे

जेम्स वांड
Mon, 05/07/2018 - 15:02 नवीन
हाग्रही प्रतिपादनआवडले
  • Log in or register to post comments

कधी कधी वाईट वाटतं

खिलजि
Mon, 05/07/2018 - 16:22 नवीन
कधी कधी वाईट वाटतं जणू अश्रूही स्वस्त होतात पण दुर्लक्ष करता तिथे दिवस कसे मस्त जातात मला माहित आहे मी प्रतिभेशी घटस्फोट घेतला आहे उरावर नाचू नका माझ्या मी माझाच कडेलोट केला आहे तो छिन्नविछिन्न देह आणि त्याचे झालेले तुकडे अजूनही तिथेच असतील विखुरलेले नका जुळवू परत त्यांना आता ते निखारे कधीच आहेत विझलेले चित्कार उठतो मनात नेहेमी तेव्हा दग्धभू धोरण स्वीकारतो मीच स्वतःला तेव्हा एक " भ्याड पळपुटा" समजतो तो का येतो ( प्रतिसाद ) कुणाचा ? कुठून येतो ते देव जाणे मी मात्र तीळतीळ तुटतो करतो नको ती जहाल कवने मला तुलाही दुखवायचं नाही आहे कारण तुझ्यात ती मूर्तिमंत प्रतिभा आहे मी एक सामान्य कल्पना धारक बोल फक्त एकदा , फक्त एकदा " तुझी मैत्री मान्य आहे " सोड ते पाश त्या जुन्या आठवणी इथे कुणीच अजरामर नसतो ना असतात कुणाच्या विखारी वाणी चल दोघेही पुन्हा मित्र होऊ , करू धमाल गाणी सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

मस्त मुक्तक !

अनन्त्_यात्री
Mon, 05/07/2018 - 16:32 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

धन्यवाद साहेब .. मैत्री करून

खिलजि
Mon, 05/07/2018 - 16:49 नवीन
धन्यवाद साहेब .. मैत्री करून तर बघा एकदा . मज्जा येईल . आजपासून आपण मित्र आहोत तर मग .. सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

धन्यवाद सर्व वाचकांचे आणि ???

खिलजि
Mon, 05/07/2018 - 16:23 नवीन
धन्यवाद सर्व वाचकांचे आणि ??? सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments

पाडली वाटत एक नविन कविता

अक्षय कापडी
Mon, 05/07/2018 - 17:53 नवीन
पाडली वाटत एक नविन कविता आवडली कस म्हणू
  • Log in or register to post comments

:D:D:D:D

खिलजि
Mon, 05/07/2018 - 18:26 नवीन
स्वागत आहे मित्रा इथे ... कसं काय चाललंय , बरं हाय ना . काय सिद्धेश्वर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा