हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
18 Apr 2018 - 12:00 pm

तिच्या आवडीनिवडीसाठीच

मी मैत्रीलाच गहाण ठेवलं

ते बोलावयाचे नेहेमी मजला

यायला सांगायचे नाक्यावर

एकही धड वाटत नव्हता तिला

एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं

शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा

नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं

त्यांना खबर पोहोचताच याची

सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं

लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं

चंडी रूप धारण करून मग तिनं

सर्वांचंच पायताण करून टाकलं

प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला

अश्या मित्रापेक्षा सर्वाना वेटरच बरा वाटला

नशेत साऱ्यांनी फोन करून शिव्यांचं दान वाटलं

उमजता मज मेख सारी

सालं प्रेमाचं रूप भयाण वाटलं

समजावून थकलो सर्वाना ,

पण कुणाला मी तिच्या हातातलं श्वान वाटलं

तर कुणाला तिचं पायाखालचं बारदान वाटलं

वेळ गेली, काळ गेला , आधी मला नाव ठेवायचे

हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं

सिद्धेश्वर विलास पाटणकर

माझी कवितामार्गदर्शनमुक्त कवितारतीबाच्या कविताधोरण

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

18 Apr 2018 - 11:53 pm | गामा पैलवान

सिद्धेश्वर विलास पाटणकर,

हाहाहा ! ज्याम आवडली कविता. प्रेम च्या जागी प्रेमकविता असं कल्पून पहा. सोन्याहून पिवळं !

आ.न.,
-गा.पै.

जाताजाता : तुमच्या नावाचं काही करा हो. कवितेचा भाग वाटतो. मध्ये अलगत्वनिर्देशक पाचर माराच अशी : ---------------------------------------------------------

खिलजि's picture

20 Apr 2018 - 4:25 pm | खिलजि

@ गा पै , हे असं टंकायचं ठरवलं आहे आजपासून ... बादवे अभिप्रायाबद्दल धन्यवाद

{{{{{{{{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}}}}}}}}}}

चित्रगुप्त's picture

19 Apr 2018 - 4:46 am | चित्रगुप्त

मजेदार कविता.

धन्यवाद चित्रगुप्त साहेब ,,

सिद्धेश्वर विलास पाटणकर