Skip to main content

द्विधा मनाची....

लेखक पारोळेकर यांनी शनिवार, 25/10/2008 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
एकाकी भटकतोय या अनोळखी दुनियेत सोबतीला नाही कुणी या एकेरी वाटेत... दिसत होतं लांबच लांब आकाश दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण दिसत होतं एकच झाड त्याची होती आकाशाकडे मान माझ्यासारखीच द्विधा त्याची ही खंत होती मनात माझ्यासारखं असू नये कोणी हीच प्रार्थना करतो सद्गुरू चरणात रेटता रेटता... दिसलं एक विसाव्याचं ठिकाण जाऊन पाहतो तर काय? माझ्या आधीच तेथे कुणी विराजमान तेथून जावं की थांबावं हाच होता प्रश्न मनात कुणी मिळेल जीवाभावाचं या अनोळखी जगात....
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1648
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कविता करण्याचा प्रयत्न चालू ठेवा ला जोडण्याच्या नादात कवितेतील गोडवा हरवून जाउ देउ नका तुम्हाला शुभेच्छा.....!