२g केस मधून सर्वजण निर्दोष
तडफदार पत्रकार गोपीकृष्णन, शालिनी आणि प्रवीण जैन , एकाकी योद्धे स्वामी ह्यांनी अथक प्रयत्नांनी आणि स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता २g घोटाळा उघडकीस आणला होता. नेहमी प्रमाणे भाजप आणि मोदींच्या गलथान कारभाराने त्याच्या कष्टावर पाणी पडले आहे. आधीच मोदींनी स्वामींना वगैरे दूर ठेवले त्यानंतर २०१४ मध्ये मुकुल रोहतगी ह्यांना AG म्हणून ठेवले (जे सध्या बचावपक्षाचे वकील आहेत).
सुप्रीम कोर्टने CBI चे तळी उचलून धरत १२२ परवाने रद्द सुद्धा केले होते. परवाने रद्द केले तर आता घोटाळा नाही असे कोर्ट कसे म्हणू शकते ? ज्यांचे परवाने रद्द झाले त्यांना आता नुकसान भरपाई द्यायला नको का ?
महत्वाचा मुद्दा : कोर्टाने आरोपीना पुराव्याच्या अभावी निर्दोष ठरवले आहे. IPC प्रमाणे आरोपीनी लांच घेतली हे CBI सिद्ध करू शकली नाही. त्यामुळे सिब्बल आणि इतर काँग्रेसी मंडळी scam झालेच नाही असा धिंगाणा घालत आहेत ती निव्वळ धूळफेक आहे. scam झाले पण नक्की कुणी केले ठाऊक नाही हा प्रकार आधी बोफोर्स, अगस्टा, चारा घोटाळा इत्यादी गोष्टींत झाला होता तोच इथे घडला आहे.
भ्रष्ट नेत्यांना कोठडीत टाकण्याची मोदी ह्यांना अभूतपूर्व संधी होती. ती संधी त्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्र्यांच्या निष्क्रियते मुळे गमावली आहे. २G ह्या सर्व प्रकरणात भाजपने कमालीची apathy दाखवली होती. कदाचित अरुण जेटली सारखे घरभेदी भाजपात घर करून आहेत आणि त्याची किंमत मोदींना चुकवावी लागेल असेच चित्र आहे.
इतिहास :
१. २G प्रकरणाला सर्वप्रथम पायोनीर चे गोपीकृष्णन ह्यांनी वाचा फोडली.
२. सुनील जैन आणि शालिनी ह्यांनी त्यानंतर प्रकरण वाढवले. (business standard)
https://realitycheck.wordpress.com/2009/10/26/sunil-jain-on-the-spectrum-scam-and-the-corrupt-state/
३. हा विषय सर्वप्रथम संसदेत कुणी मांडला तर कर्नाटकचे अपक्ष खासदार राजीव चंद्रशेखर ह्यांनी
https://twitter.com/rajeev_mp/status/943694266940907520
४. मुकुल रोहतगी ह्यांना मोदी ह्यांनी २०१४ साली AG म्हणून नेमले ह्याला स्वामी आणि इतर लोकांनी कडाडून विरोध केला होता
https://twitter.com/timesofindia/status/943785744597786625
हा पराभव मोदी ह्यांना थोडे आत्मचिंतन करायला भाग पाडेल अशी आशा आपण करू शकतो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
२-जी भ्रष्टाचाराच्या
आताच आदर्श प्रकरणासंबंधी
एखाद्या लोकप्रतिनिधीवर खटला
ती पाच लाखाची भानगड आहे काही
भ्रष्ट नेत्यांना कोठडीत
भ्रष्ट नेत्यांना कोठडीत टाकण्याची मोदी ह्यांना अभूतपूर्व संधी होती. ती संधी त्यांनी आपल्या आणि आपल्या मंत्र्यांच्या निष्क्रियते मुळे गमावली आहे. २G ह्या सर्व प्रकरणात भाजपने कमालीची apathy दाखवली होती. कदाचित अरुण जेटली सारखे घरभेदी भाजपात घर करून आहेत आणि त्याची किंमत मोदींना चुकवावी लागेल असेच चित्र आहे.मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा खटल्याची निम्मी सुनावणी पूर्ण झाली होती. एकदा आरोपपत्र दाखल होऊन सुनावणी सुरू झाली की सरकार त्यात काहीही करू शकत नाही. मनमोहन सिंग सरकारच्याच काळात खटल्याला सुरूवात झाली होती. दुर्दैवाने असं दिसतंय की त्यांनी मुद्दामच आरोपपत्र व साक्षीपुरावे ठिसूळ ठेवले होते. न्यायाधीशांनी सर्व वस्तुस्थिती व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लक्षात न घेतात निकाल दिलेला आहे. हा निकाल किंवा आजच आलेला आदर्श प्रकरणावरील निकाल, यावरून असं दिसतंय की न्यायालय वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून निकाल देत आहे व त्यामुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन व राजमान्यता मिळत आहे.मोदी जेव्हा पंतप्रधान झाले
२०१३ मध्ये मंत्रालयाला आग
कागदपत्रे फक्त मंत्रालयात असतात का ??
कारण
या सरकार वरील विश्वास उडाला
अवांतर : २०१९ ची व्यूहरचना
गामा महाराज,
आरोपपत्र कुठाय?
ते शंकराचार्य राहिलेच. पण ते
माझा आसाराम बापुना १००%
हताश होण्याचा अनुभव
एक सरकास्टिक व्हौट्स अप आला होता ....
ब्लॅक बक वर चारा खाल्ल्याचा
बरेच जूने रोचक व्यंगचित्र
चाराघोटाळा प्रकरणातील एका
भाऊ तोरसेकरांचा लेख
नीट काही कळले नाही वरचे वाक्य
समजत नाही
अल्पमतातील सरकार चालवण्यासाठी
माझ्या मते मोदी हे "टास्क
काही अंशी सहमत!
@गॅरी ट्रुमन पण पुरवणी
सहमत आहे
ट्रुमनजी सहमत आहे, एकूणच
थोडासा अहो रूपं अहो ध्वनी सारखा प्रकार आहे का?