✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

ओ
ओम शतानन्द यांनी
Sat, 11/18/2017 - 12:48  ·  लेख
लेख
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
87363 वाचन

💬 प्रतिसाद (413)

प्रतिक्रिया

ते पुरोहित होऊ शकतील

अनन्त अवधुत
Wed, 11/22/2017 - 09:39 नवीन
ते संन्याशी होऊ शकतील. तुम्ही भिक्खू , पाद्री सोबत तुलना करताय तर संन्याशी म्हणून तुलना जास्त योग्य होईल. कारण संन्याशी सुद्धा संसार सोडून देव/ धर्माला वाहून घेतात. सध्या हिंदू समाजाची रचना अशी आहे कि ज्या जातीत जन्म झाला ती बदलता येत नाही. त्यामुळे ते जातीने ब्राह्मण होऊ शकणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

ब्राह्मण शब्द गंडलेला आहे.ती

Ram ram
Wed, 12/06/2017 - 21:53 नवीन
ब्राह्मण शब्द गंडलेला आहे.ती वृत्ति आहे. महान विचार,सात्विक आचरण, सतत इशचिंतन हे ब्राह्मण्य आहे. जन्माने ब्राह्मण जेव्हापासून अस्तित्वात आले त्या दिवशी सत्व लोप पावले. रच्याकने duishen तुमची शाळेच्या दाखल्यावर जात कंची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

पण तोच ओबीसी समाजातील /

arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 17:27 नवीन
पण तोच ओबीसी समाजातील / क्षत्रिय/ वैश्य समाजातील बांधव ब्राह्मण होऊ शकतील काय?
होऊ शकतात. पण ते कस्टमरला (जे ओबीसी, क्षत्रीय, वैश्य असतात) त्यांना चालेल काय? ब्राह्मणांनी तर असा कधी विरोध केलेला नाही. कितीतरी अब्राह्मण जाती पौरोहित्य करतात - जंगम, भगत, इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

मनुस्मृतीच्या काळात तरी

arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 17:24 नवीन
मनुस्मृतीच्या काळात तरी व्हायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

ह्म्म.. बरोबर आहे.. पण आज जर

आनन्दा
Sun, 11/19/2017 - 09:51 नवीन
ह्म्म.. बरोबर आहे.. पण आज जर विचार केलात तर बर्‍याचश्या शासकीय सेवा, खाजगी आस्थापने, समाजसुधारणा करणारे लोक इत्यादींमध्ये ब्राह्मणांचे प्रमाण लक्शणीय आहे. आणि हे आरक्षण असूनदेखील. दुर्दैवाने सत्ता अन्य समाजघटकांच्या हातात असूनदेखील अश्या मोक्याच्या जागांवर ब्राह्मण जागा अडकवून बसलेले असल्यामुळे हा प्रोब्लेम झालाय. असो, ब्राह्मणांनी तरी याचा विचार का करावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

"दुर्दैवाने" या शब्दाची जागा

आनन्दा
Sun, 11/19/2017 - 10:39 नवीन
"दुर्दैवाने" या शब्दाची जागा कदाचित चुकलीय. "सत्ता अन्य समाजघटकांच्या हातात असूनदेखील अश्या मोक्याच्या जागांवर दुर्दैवाने ब्राह्मण जागा अडकवून बसलेले असल्यामुळे" असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

ब्राह्मण जागा अडकवून बसलेले

सुबोध खरे
Mon, 11/20/2017 - 20:23 नवीन
ब्राह्मण जागा अडकवून बसलेले हे कसे काय बुवा? म्हणजे सत्ता हातात नसून जागा अडकवण्याची क्षमता आहे ब्राम्हणांच्यात? मग काही तरी वेगळे असेल कि त्यांच्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

<<<मग काही तरी वेगळे असेल कि

विशुमित
Tue, 11/21/2017 - 17:20 नवीन
<<<मग काही तरी वेगळे असेल कि त्यांच्यात?>>> ==>> काही वेगळे बिगळे नाही . सामान्य माणसाचा IQ असतो तेवढाच असतो. स्वस्ताईत ज्यांनी ज्यांनी सरकारी नोकऱ्या पकडल्या त्यांच्या २ पिढ्यांचं कल्याण झाले असे आमचे आजोबा सांगतात. हे पटले सुद्धा. आमचे फादर जुनी मॅट्रिक फेल आणि इलेकट्रीशनचा कोर्स करून देखील एम ई सी बी वाले ओढून नोकरीला घेऊन जात होते. पण ते घरच्या जुन्या समजुतीमुळे गेले नाहीत. या उलट आमच्या चुलत्यांनी टाईमपास म्हणून इर्रीगेशन मध्ये नोकरीला गेले आणि साहेब होऊन रिटायर झाले. त्यांची दोन्ही मुलं परदेशात मोठं मोठ्या हुद्द्यावर आहेत. आम्ही अजून इथेच आहोत. पण आमच्या पुढच्या पिढीला असेच मागासलेले ठेवणार नाही. त्यामुळे जाती निहाय वेगळा असा काही गुण असतो आणि तो भविष्यात राहील अशी संभावना कमी वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हा प्रश्न निझामाच्या

arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 16:30 नवीन
हा प्रश्न निझामाच्या मंत्र्याला विचारला होता. तो १९४७ ते १९४९ काळात हैदराबादेत फक्त ब्राह्मण हिंदूंना मारत होता. त्याच्या मते एकदा ब्राह्मण पडले कि बाकी हिंदू फटकन पडतात. सगळे संस्थान फटकन इस्लामिक होइल. पण त्यावेळी ब्राह्मणांच्या रक्षणासाठी मराठे नि लिंगायत मधे पडले नि लोचा झाला. ============================= इंग्रजांनी काय केलं? फक्त ब्राह्मणांना फुरोगामी केलं, मस्तपैकी न्यूनगंड दिला आणि तो सर्व हिंदूंमधे पसरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

सुखीमाणूसजी...

Duishen
Sun, 11/19/2017 - 03:15 नवीन
सुखीमाणूसजी, जातीविरहित हिंदूधर्म असावा का? याबाबत आपले मत काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

होय जात विहीत असावा

सुखीमाणूस
Sun, 11/19/2017 - 07:29 नवीन
आणि हिन्दु धर्मातल्या प्रत्येकाला हवा तो व्यवसाय करता यावा. भारताची लोकसंख्या आटोक्यात राहावी. प्रत्येक स्त्री व पुरुषाला मानाने व मनासारखे जगता यावे. विन विन situation यावी. म्हणजे जात जपण्याचा प्रयत्न न होता प्रादेशिक वैशिष्ट्ये जपली जावीत, पण भारत एक रहावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

फ़ारच आशावादी आहात तुम्ही. We

आवशीचो घोव्
Mon, 11/20/2017 - 10:07 नवीन
फ़ारच आशावादी आहात तुम्ही. We can not expect Utopia though. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे

arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 16:18 नवीन
ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात जास्त हानी हिन्दु धर्मांची होते आहे.
ज्या ब्राह्मनेतर हिंदूंना ब्राह्मणांची वाट लावायची आहे त्यांचा भविष्यात जोगेंद्रनाथ मंडल होणे अपरिहार्य आहे. हिंदू धर्माचं ब्राह्मणांनी टेंशन घेऊ नये. गेला तर गेला उडत. शेवटी काश्मिरात आज फुटिरांचं नेतृत्व करणारे सगळे पूर्वाश्रमीचे ब्राह्मण आहेत, दुसरे हिंदू नाहीत. मंजे अगदी धर्मांतर, देशांतर, निष्ठांतर करूनही त्यांच्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित आहे. ----------------------------- उलट ब्राह्मणांनी फटकन धर्मांतर होऊ द्यावं. सत्ता राहिलच, आणि ब्राह्मण म्हणून शिव्या बसणार नाहीत. हा गेम इतिहासात अनेक ब्राह्मणांनी खेळलाय. आताचे आरेसेसवाले उगाच ताणून धरताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण

arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 16:09 नवीन
आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण आहेत का?
लोक एकीकडे आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण आहेत का? असं म्हणतात आणि दुसरीकडे इतिहासात ब्राह्मणांनी लै अन्याय केले, पापाचरण केले मंतात. च्यायला, अवघडै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

तुमचे नाव पगला गजोधर आहे

ओम शतानन्द
Sat, 11/18/2017 - 20:19 नवीन
तुमचे नाव पगला गजोधर आहे त्यामुळे बहुधा तुम्ही असले पागलपणाचे प्रश्न विचारात आहात , तुम्हाला वरील विषय का मांडला आहे तेच समजलेले नाही हिंदू मुलीना पटवून त्यांच्याशी लग्न करून त्यांच्याकडून आपली संतती पैदा करणे व आपल्या संख्याबळात वाढ करणे ज्या योगे काही वर्षाने लोकसंख्येत बदल होऊन मुस्लिमबहुल क्षेत्र निर्माण होतील, एकेक प्रांत इस्लाममय करण्याचा हा एक मार्ग आहे. हिंदू समाज हा लिबरल असल्यामुळे इतर धर्मीयांबाबत सहसा सहयोगाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. हिंदू आपल्या मुलांवर संस्कार करण्यात ,धर्माबद्धल आत्मीयता निर्माण करण्यात , इस्लामचे सत्य स्वरूप व त्यापासून हिंदुना असलेलेला धोका याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या बाबतीत कमी पडतो . हिंदू मुली आणि मुस्लीम मुलगा यांचे लग्न होण्याचे प्रमाण आणि मुस्लीम मुलगी व हिंदू मुलगा यांचे लग्न होण्याचे प्रमाण हे थोड्या फार फरकाने समसमान असते तर हा विषय गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नव्हती पण चित्र नेमके उलट आहे , आणि ह्या मागे काही strategy निश्चित आहे , पगल्या माणसांनी या विषयात नसते फाटे फोडण्याचे कारण नाही , हिंदू मुस्लीम आणि सवर्ण दलित हे विषय एकसारखे नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

तुमचा प्रतिसाद वाचला सर

जेम्स वांड
Sat, 11/18/2017 - 21:04 नवीन
मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींसोबत विवाह करून आपली संतती वाढवून एक एक प्रांत इस्लाममय करणे हा प्लॅन मुस्लिमांचा असावा असे आपले म्हणणे आहे असे समजले. एक धर्मप्रेमी मनुष्य म्हणून तुमची कळकळ नीट पोचली, पण काही तांत्रिक प्रश्न पडलेत, १. एक हिंदू मुलगी, ती मुस्लिम झाल्यावर एकंदरीत किती (अपर लिमिट मुले) निरोगी आणि पुढे 'युद्ध करण्यालायक' जन्माला घालू शकतील? २. मुले जन्मण्याची वृत्ती पूर्णपणे धर्मावर अवलंबून असते? २०११ च्या जनगणना आकड्यांनुसार भारतात स्त्रीयांचा जननदर (वूमन फर्टिलिटी रेट ) बऱ्यापैकी म्हणजे दिसून येण्याइतपत कमी झालाय, तो आकडा भारतीय जनगणना कार्यक्रमासारख्या एका विशाल प्रकल्पांतर्गत जमा करून अतिशय काटेकोर छाननी केलेला असतो, हे बहुतेक आपण सुद्धा जाणतो दोघं. ह्यात हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील स्त्रियांचा जननदर कमी झाला आहे, अश्या बातम्या त्याचवेळी आल्या होत्या, हा डेटा ग्राह्य धरला तर त्याला जमेस धरून बोलले तर मुस्लिम लोकसंख्या आडमाप वाढेल हे भावनिक दृष्टीने बरोबर वाटले तरी आकडेवारीनुसार तसे होईल असे वाटत नाही, मग काही मुर्खमुली फशी पडल्या तर काय होणार आहे खास? लोकसंख्या वाढीवर धार्मिक छाप किती हे पाहायला मी इंडोनेशिया ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या मुस्लिम राष्ट्राचा पॉप्युलेशन डेटा पाहिला , गंमत म्हणजे तिथे २०१०- २०१२ पर्यंत म्हणजे दोनच वर्षात स्त्री जननदरात दिसून येण्यालायक गटांगळी दिसली, पार कॉन्ट्रसेप्टिव पेनिट्रेशन पण ६१% आलं, बहुसंख्य मुसलमान असलेल्या देशात हे कसे साधले असेल? मला वाटते, धर्म धर्म किंवा nationalism कितीही नाकारले तरी इस्लामने तरीही, भूगोलपरत्वे मानवी शारीरिक, मानसिक जडणघडणीत फरक हा पडतोच, इस्लाम ख्रिस्ती धर्म ते जमेस धरत नाहीत म्हणून ते अवैज्ञानिक धर्म होत, हिंदुत्व तितकं लिबरल (बदनाम शब्द आहे खरं दुसरा सुचलं नाही) आहे, आहे म्हणून वैज्ञानिक धर्म आहे. असं एकंदरीत माझं मत, तुमच्याकडे काही आकडेवारी असली तर द्या, सांख्यिकी माझा विषय नाही, त्यामुळे मी चुकू शकतो, थोडं संभाळून दुरुस्त करून द्याल ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओम शतानन्द

अभ्यासू आकडेवारीशी

तर्राट जोकर
Sat, 11/18/2017 - 21:22 नवीन
अभ्यासू आकडेवारीशी शतानंदसारख्या मुस्लिमफोबिया झालेल्यांना काही घेणे देणे नसते. आकडेवारी अभ्यास वगैरे आलं की त्यांचं डोकं हँग होतं. त्यांना त्यांच्या आवडत्या गॄहितकाशी संबंधित चमचमीत सनसनाटी सांगा, गावभर लोकांचे कान फुंकत फिरतील. पण थोडा अभ्यास करायला सांगा, पाय लावून पळून जातील. इतकेच काय तर आकडेवारी मांडली तरी मुस्लिमांची खरी आकडेवारीच नसते, ते खोटे बोलतात, मुलं बायका लपवून ठेवतात वगैरे पर्यंत इथल्या अभ्यासु-ज्ञानी सदस्यांचे मत वाचले आहे. तेव्हा मुस्लिमांविरुद्ध वातावरण तापवण्याच्या लाइफटाइम मोहिमेवर असलेल्या लोकांना घेरी आणणारे प्रश्न टाकू नका वांडसाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

तुमचा प्रतिसाद तूर्तास, शिलकीत टाकतो तर्राट साहेब

जेम्स वांड
Sat, 11/18/2017 - 21:31 नवीन
ओम शतानंद साहेबांचा काय प्रतिसाद येतो ते अनुभवून पाहावे म्हणतो. तुमच्या निरीक्षणाचा आणि अनुभवाचा आदर आहेच, फक्त मला ओमजी ह्यांच्या सुसंगत प्रतिसादाची वाट पाहावी वाटते आहे, कारण ते तसा प्रतिसाद देतील असा आशावाद आहे मला थोडा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गझवा इ हिंद

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 11/19/2017 - 10:08 नवीन
होगा जरूर होगा!!! चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

खरे अहे..

आनन्दा
Sun, 11/19/2017 - 10:36 नवीन
खरे अहे.. १. परंतु सध्या भारत दार उल हब अहे.. आणि भारतात कडवे मुसलमान अनेक आहेत हे देखील वेळोवेळी दिसून येत आहे. २. कोणतेही युद्ध हे नैतिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अश्या सगळ्या पातळ्यांवर लढले जाते. त्यामुळे लव्ह जिहाद नावाची संकल्पना अस्तित्वातच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कदाचित त्याचा परिणाम आकडेवारीवर प्रभाव टाकण्याइतका मोठा नसेल, पण जर बहुसंख्य समाजाने दुर्लक्श केले तर भविष्यकाळात ही एक मोठी समस्या बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर अजून तो रोग डोळ्यांना दिसण्याइतका मोठा झालेला नाही, म्हणून इलाज करायची गरज नाहे असे म्हण्ण्यासारखे आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

हिंदू समाज हा लिबरल ....

Duishen
Sun, 11/19/2017 - 03:29 नवीन
सर, खाली काही उदाहरणे - केंद्र सरकारच्या अहवालानुसार (एन. सी. आर. बी.) दर सव्वा तासाला एका हिंदू महिलेचा हुंडा बळी जातो हे हिंदू समाज हा लिबरल असल्याचे लक्षण आहे का? सन २०१५ मधे एस.सी. एस.टी यांच्यावरील अत्याचाराच्या एकूण ५५९१७ घटना पोलीसदरबारी नोंद झाल्या. दबावामुळे नोंद न झालेल्या घटना यापेक्षा अधिक आहेत. ५५९१७ एका वर्षात म्हणजे दिवसाला साधारण १५३ घटना म्हणजे तासाला ६ घटना याचाच अर्थ दर ३० मिनिटाला ३ अत्याचाराच्या घटना म्हणजे दर १० मिनिटाला १ एससी किंवा एस.टी कुठेतरी बळी पडत आहे. हिंदू समाज हा लिबरल असल्याचे लक्षण आहे का? वरील विधान लिहितांनाच भारतात कुठल्यातरी एससी किंवा एस.टीचा बळी जात असणार.... माहितीची लिंक http://ncrb.nic.in/StatPublications/CII/CII2015/FILES/Figures%20at%20a%20Glance%202015-15.11.16.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ओम शतानन्द

लिबरलिझम ,

जेम्स वांड
Sun, 11/19/2017 - 09:23 नवीन
त्यातही, धर्म अधिष्ठित 'मॉब लिबरलिझम' हे अबसोल्युट असते किंवा मी तसे सुचवतोय, असा आपला गैरसमज झाला आहे बहुतेक, धर्म जात आधारित लिबरल विचार म्हणजे एखाद्याच्या टिकेकडे कीती कानाडोळा केला जाऊ शकतो ते, असे माझे वैयक्तिक मत आहे. अबसोल्युट लिबरल कोणीच नसतं, अगदी व्होल्टेयर , रुसो, वॉशिंग्टन कोणीच लिबरल नव्हते अन आजचे तथाकथित लिबरल सुद्धा लिबरल नसतात, त्यामुळे हिंदुधर्म सुद्धा अबसोल्युट लिबरल नाही, पण एकंदर जागतिक पातळीवर जे काही 'धार्मिक आघाडीवर' सुरू आहे त्या अँगल मध्ये पाहता हिंदुत्व (राजकीय नाही धर्म म्हणून) बरंच लिबरल आहे, तुम्ही मायक्रो विचार करताय मी मॅक्रो इतकेच अंतर होय, मी ५०% असहिष्णु आहे म्हणजे ९९% असहिष्णु असणाऱ्यापेक्षा लिबरलच आहे नाही का? आता जर त्या ५०% ला पर्सेन्टाईल मध्ये कन्व्हर्ट केले अन मायक्रो विचार केला तर मी शंभर टक्के असहिष्णु आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

जेम्स जी

Duishen
Sun, 11/19/2017 - 15:13 नवीन
जेम्स जी, प्रतिसादाबाबत धन्यवाद! माझा प्रश्न ओम जी यांच्या "हिंदू समाज हा लिबरल असल्यामुळे ..." या विधानाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

@ Duishenकेंद्र सरकारच्या

सुबोध खरे
Mon, 11/20/2017 - 20:39 नवीन
@ Duishen केंद्र सरकारच्या अहवालानुसार (एन. सी. आर. बी.) दर सव्वा तासाला एका हिंदू महिलेचा हुंडा बळी जातो हे हिंदू समाज हा लिबरल असल्याचे लक्षण आहे का? For example, the oft-cited claim (including by Kapil Sibal on 26 May 2017 in this article) that 68% of all divorced women are Hindus while only 23.3% are Muslims, is flimsy and meaningless. Hindu women outnumber Muslims by five times, so it is only logical that the share of Hindu women in the divorced women population will be higher. http://www.livemint.com/Opinion/ydCWT2mGxmg4d9NXrMaxEI/Hindus-and-Muslims-The-true-picture-of-divorce.html Out of all divorced women, 65.9 per cent were divorced orally. http://indiatoday.intoday.in/story/triple-talaq-muslim-women-supreme-court-sharia-law-islam/1/916882.html हि आकडेवारी काय दाखवते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

सुबोधजी, कृपया उदाहरणे ...

Duishen
Tue, 11/21/2017 - 03:54 नवीन
सुबोधजी. माझे उदाहरण हुंडाबळी प्रथेबाबत आहे. आपण घटस्फोटाच्या उदाहरणाशी तुलना करीत आहात. कृपया मुस्लीम धर्मातील हुंडाबळीचे (!) उदाहरण देऊन मला समजावून सांगा. मला जाणीव होती की कुणीतरी वाचक मुस्लिमांशी तुलना करणारे प्रतिसाद देतील. म्हणून मी खास हिंदूधर्माचे लक्षण असणारे उदाहरण दिले. सुबोधजी, पण जरी आपण ही तुलना केली तरी त्यातून मी काय बोध घ्यावा? गुन्हा तो गुन्हाच. त्रास तो त्रासाच! "मुस्लिमांमध्ये घटस्फोटाचा दर ३.७ आणि हिंदूमध्ये तो २ आहे म्हणून हिंदू लिबरल आहेत.". हे तर्कशास्त्र अगम्य आहे. असा तुलनात्मक अभ्यास व्हावा पण तो श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी वापरू नये पेक्षा एखाद्या सामाजिक प्रश्नाचा ट्रेंड समजून त्यावर उपायासाठी असावा. इस्लामला आपण तुलना करण्याचे मानक मनात असणार. पण माझी दृष्टीने (वरील उदाहरणात) समता हे मूल्य तुलनेचे मानक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यांचा लिबरल म्हणजे

आनन्दा
Tue, 11/21/2017 - 16:29 नवीन
त्यांचा लिबरल म्हणजे परधर्मसहिष्णू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

प्रतिसाद आवडला....

मराठी कथालेखक
Sun, 11/19/2017 - 16:40 नवीन
प्रतिसाद आवडला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

पगला

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 11/19/2017 - 21:04 नवीन
सेक्युलर पब्लिकच माहिती नाय, पण आपण मात्र निव्वळ ह्याच कारणामुळे अश्या टाईपच्या प्रेम प्रकरणात पडलो नाय! 497 ए सोबत अट्रोसिटी दोन्ही नाय परवडायची बाबा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

जर ती उलगी धादांत खोटे विधान

मृत्युन्जय
Mon, 11/20/2017 - 12:04 नवीन
जर ती उलगी धादांत खोटे विधान करत असेल तर नक्कीच मी त्याचा विरोध करेन. अर्थात तिचे विधान खोटे पाडणे फारच सोप्पे असेल कारण तथाकथोत उच्च्वर्णीय जातीतील मुलाने स्वतःच्या मनाने एका तथाकथित निम्नजातीय मुलीशी लग्न केले तेथेच त्याचा काही गैर उद्देश नव्हता असे सिद्ध होइल. तुमच्या उदाहरणात मुलगी ब्राह्मण असेल आणि मुलगा दलित असेल तर मात्र खोटे सिद्ध करणे "थोडे " अवघड जाइल. असो. या प्रश्नाचा सदर धाग्याशी काय संबंध आहे ते कळाले नाही. सदर घटनेतील हिंदु मुलगी धादांत खोटे बोलते आहे असे काही तुम्हाला म्हणायचे असल्यास तसे पुरावे कृपया सादर करावेत अन्यथा मनमानी उदाहरणे देउन आपण लोकांची दिशाभूल करत आहात असा एखाद्याचा स्समज होउ शकतो. उद्या अश्याच आशयची उदाहरणे दाउद इब्राहिम, टायगर मेमन, अफझल गुरु, मोहम्मद अफरोज, मुकेश सिंग, रमण राघव यांचा बचाव करतानाही देता येतील (शेवटची २ नावे मुद्दाम शोधुन काढली नाहितर माझ्यावर मुस्लिम्द्वेष्टा भक्त असल्याचा आरोप व्हायचा). पण जर त्या उदाहरणांचा आणि वरील व्यक्तींचा संबंध नसेल तर एकाच मीटर मध्ये ती उदाहरणे देणे हे अतिशय अयोग्य, असंवेदनशील आणि असहिष्णु आहे याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

तर तुम्ही वरील पार्श्वभूमीवर,

arunjoshi123
Sat, 12/09/2017 - 16:06 नवीन
तर तुम्ही वरील पार्श्वभूमीवर, मुलाचा पक्ष कसा मांडणार ? त्याचा बचाव कसा करणार ???
त्याचा बचाव करण्याचा प्रश्नच येत नाही. मुलीने धर्मांतर करायचे पहिले मान्य केले नसताना तिला वैदिक पद्धती शिकवणं गुन्हा आहे. असली वकीली मी घेणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

पूर्वपुण्याईमुळे हिंदू धर्मात

श्रीगुरुजी
Sat, 11/18/2017 - 22:15 नवीन
पूर्वपुण्याईमुळे हिंदू धर्मात जन्म होऊनसुद्धा मुस्लिमाशी लग्न केल्याच्या चुकीची शिक्शा या मुलीला मिळत आहे़.
  • Log in or register to post comments

....

babu b
Sun, 11/19/2017 - 00:35 नवीन
उर्मिलाजी मातोंडकरजीनी काश्मिरी मुसलमानाशी लग्न केले म्हणे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पूर्वपुण्याईमुळे

Duishen
Sun, 11/19/2017 - 06:58 नवीन
दर सव्वा तासाला जी हिंदू स्त्री हुंडाबळी जाते तेही पूर्वपुण्याईमुळेच का?... आणि हुंडाबळी घेणे म्हणजे पाप नसेल ना..पेक्षा पुण्यकर्म आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आज रात्री १२ वाजता सुरू

मार्मिक गोडसे
Sat, 11/18/2017 - 22:56 नवीन
आज रात्री १२ वाजता सुरू होणारा 'ताऱ्यांचा'पाऊस इतक्या लवकर कसा सुरू झाला कोणास ठावूक?
  • Log in or register to post comments

लेख एकदम पटला

सुखीमाणूस
Sat, 11/18/2017 - 23:15 नवीन
मी मुम्बैत वाढल्याने जाती पाती आणि धर्म यात भेदभाव करत नाही. पुण्यात नोकरी साठी आले तेव्हा कोथरूड ते विमाननगर कंपनी बसने प्रवास करत असे. बस चालक मुसलमान होता. मी कोथरूडमध्ये शेवटी उतरायचे. कारण नसतांना त्याने एक दिवस आमचा एक अल्ला आणि तुमच्या धर्मात ३३ कोटी देव. अस कधि असत का वगैरे सुरू केले. ते 1999 साल होते. आधीचे मुम्बई दंगली व बॉम्ब स्फोट खूप जवळून अनुभवले होते. तेव्हा मी गप्प बसणे योग्य समजले. पण डोक्यात तिडीक गेलीच. आज मी जे स्वातन्त्र्य उपभोगत आहे आणि माणसासारखे व मनासारखे जगत आहे ते केवळ हिन्दु धर्मात जन्म घेतला म्हणुन. हा धर्म सहिष्णू आहे म्हणुन... तेव्हा माझा कायम प्रयत्न राहील की माझ्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना मानाने व मनासारखे जगायला मिळावे. मुसलमान मुलाशी लग्न करून असे आयुष्य मिळणे कठीण वाटते.
  • Log in or register to post comments

तर्राट जोकर यांना प्रतिसाद

गामा पैलवान
Sun, 11/19/2017 - 01:09 नवीन
तजो, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
खरं तर तुम्हा लोकांना फक्त तुमची काळजी आहे हे यानिमित्ताने उघडे पडले.
आहेच मुळी आमची आम्हाला काळजी. काश्मिरी ब्राह्मणांनी नाही घेतली स्वत:ची काळजी. त्यांची हालत दिसतेय आम्हाला. गेले ६५ वर्षं कसलंही आरक्षण वा संरक्षण नसतांना परत आज ब्राह्मणांच्या नावानेच बोंबाबोंब? नक्की प्रकार काय आहे? २.
१०० कोटी हिंदूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:ची चामडी वाचवायचा प्रयत्न चालू आहे तुम्हा लोकांचा.
नावाप्रमाणे तर्राट विधान आहे. कसली बंदूक? आणि कसली चामडी? पाकिस्तानात हिंदू औषधाला तरी उरलेत काय? बंगाल मध्ये घुसखोर मुस्लिम कसे शिरजोर झालेत ते दिसंत नाही काय? डोळे फुटले नाहीत आमचे. ३.
अजिबात गरज नसतांना हिंदुंचे स्वयंघोषित मार्गदर्शक होऊ जाता म्हणून विरोध होतो हे समजले नाही का इतक्या वर्षांत...?
ब्राह्मण जर स्वयंघोषित मार्गदर्शक असले तर मग विरोध कशाला? सरळ दुर्लक्ष करा ना ब्राह्मणांकडे. लक्ष द्यायची जबरदस्ती आजिबात नाही. त्याचं काये की दलित, शोषित आणि वंचितांच्या नावाखाली गेले ६५ वर्षं जोमात चाललेली दुकानं आता कोमात जाऊ लागलीयेत. म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात थयथयाट. आम्हाला कळतं हो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

गामाजी आपली काही पूर्वीची विधाने

Duishen
Sun, 11/19/2017 - 04:43 नवीन
मनुस्मृती भाग १ ब्राह्मण्याचा उदोउदो 23 Oct 2017 - 12:53 am | गामा पैलवान मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल. - मनुस्मृती भाग १ मधे आपले हे विधान होते. मनुस्मृती भाग १ मारवा यांना प्रतिसाद 20 Oct 2017 - 8:59 pm | गामा पैलवान यामधील आपली महिलांविषयीची मते मुद्दा क्र. ४ वरील आपले मत - यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत. मुद्दा क्र. ५ वरील आपले मत - निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. आता त.जो.जीना वरील प्रतिसाद देतांना आपण केलेली विधाने - १. आहेच मुळी आमची आम्हाला काळजी. काश्मिरी ब्राह्मणांनी नाही घेतली स्वत:ची काळजी. त्यांची हालत दिसतेय आम्हाला. २.ब्राह्मण जर स्वयंघोषित मार्गदर्शक असले तर मग विरोध कशाला? सरळ दुर्लक्ष करा ना ब्राह्मणांकडे. लक्ष द्यायची जबरदस्ती आजिबात नाही. ३. त्याचं काये की दलित, शोषित आणि वंचितांच्या नावाखाली गेले ६५ वर्षं जोमात चाललेली दुकानं आता कोमात जाऊ लागलीयेत. म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात थयथयाट. आम्हाला कळतं हो. मनुस्मृती भाग १ मधे आपण असे धाडसी विधान केले होते की "१०० कोटी" हिंदूनाही रुचेल.. पण स्त्रिया समान असत नाही असेही विधान केले. म्हणजे ५०% लोकसंख्येला (स्त्रियांना) तुम्ही सामाजिक सन्मान देत नाही. शिवाय "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही." असे सरसकटीकरण करणारे विधान केले आपण त.जोजीना प्रतिसाद देतांना दलित, शोषित आणि वंचितांबाबत पूर्वग्रहदुषित मत व्यक्त केले. आणि विधानात सरसकटीकरण जाणवते. शेवटी तर म्हणत आहात की "आहेच मुळी आमची आम्हाला काळजी." जर केवळ ब्राह्मण जात आणि त्यातही पुरुष एव्हडेच जर मर्यादित आपण विचार करीत असणार तर १०० कोटी हिंदू एकत्र तरी कसे राहणार? या संकुचित विचारसरांनीमुळेच एक-एक जात धर्मांतरित होऊन जात आहे धर्मांतर करून सरळ दुर्लक्षच करत आहे.. आणि हिंदूचे नुकसान करण्यास इस्लाम कशासाठी हवा?... मनुस्मृतीप्रणीत विचार करणारे हिंदूच हिंदू धर्माला अवघड परिस्थितीत आणून ठेवणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

काही प्रतिसाद..

Duishen
Sun, 11/19/2017 - 05:21 नवीन
काश्मिरी ब्राह्मणांनी नाही घेतली स्वत:ची काळजी. त्यांची हालत दिसतेय आम्हाला. जसे हैद्राबाद संस्थानात मुस्लीम राजा पण अधिकांश हिंदू प्रजा होती त्याच्या अगदी विरुद्ध काश्मीर मधे.. हिंदू राजा आणि मुस्लीम प्रजा.. दोन्ही राजे सरंजामशाहीचे पुरस्कर्ते आणि आणि जनतेला छळणारे! सरदार पटेलांमुळे त्यांना भारतात शामिल होणे भाग पडले. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराविषयी दोन्ही मते आहेत - एक मुस्लीम भय किंवा तत्कालीन सरकारी धोरणे (तेथील मुस्लिमांना शह देतांना पंडितांचा बळी जाऊ नये म्हणून त्यांचे संपूर्ण स्थलांतर करण्याचे धोरण). पण ते विस्थापित झाले आणि विस्थापानेचा त्रासही भोगत आहेत हे सत्य. शासन आणि असरकारी पातळीवर प्रयत्न चालू आहेत. काश्मिरी पंडितांना २% पासून ५% पर्यंत शिक्षण आणि नौकऱ्यामधे आरक्षण आहे. खुद्द महाराष्ट्र शासन त्यांना २% आरक्षण देत. शिवाय ते ओपन मधूनही अर्ज करू शकतात. http://www.milligazette.com/news/4750-job-quota-for-kashmiri-pandits http://indianexpress.com/article/india/india-news-india/kashmiri-migrants-to-continue-getting-5-quota-in-delhi-university-2816567/ माझे या आरक्षणाला पूर्णत: समर्थन आहे. पाकिस्तानात हिंदू औषधाला तरी उरलेत काय? बंगाल मध्ये घुसखोर मुस्लिम कसे शिरजोर झालेत ते दिसंत नाही काय? डोळे फुटले नाहीत आमचे. जर पाकिस्तानी लोकांनी इथल्या मुस्लिमांची काळजी केली तर आपल्याला चालेल काय! माझा एक प्रश्न आहे, गामाजी! १९८५ च्या आसपास स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडितांना अवघ्या काही काळातच आरक्षण मिळते आणि त्याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित होते पण ओबीसी समाजाला १९५० ते १९८९ अशी चाळीस वर्षे वाट का पहावी लागली. किंवा ज्या दलित, वंचित, पिडीत लोकांबाबत आपण पूर्वग्रहदुषित मत व्यक्त केले त्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सरकार एव्हडा ढिसाळपणा का दाखवते? शिवाय काश्मीरमधे ७.६% एस.सी. आहेत त्यापैकी कुणीच स्थलांतरित झाले / केले नाहीत का? त्यांच्या बाबत तर एकही अवाक्षर आजपर्यंत ऐकले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

गरजच नाही

सुखीमाणूस
Mon, 11/20/2017 - 19:36 नवीन
भारतातल्या मुस्लिमान्ची काळजी ईथेच secular हिन्दु घेत आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

secular

सुखीमाणूस
Mon, 11/20/2017 - 22:54 नवीन
काँग्रेस चे सरकार असताना का बरे इतर मागास वर्गीय आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिला?आणि आरक्षण मिळालेले २/३ पिढ्या नंतर स्वतहून आरक्षण का सोडत नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

तुमच्य का पोटात दुखतंय?

तर्राट जोकर
Tue, 11/21/2017 - 01:02 नवीन
तुमच्य का पोटात दुखतंय? तुमच्याकडे तर गुणवत्ता बौद्धिक पातळी कौशल्या धमक वगैरे आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

+१

एमी
Tue, 11/21/2017 - 02:08 नवीन
+१ 'देणारे' देतायत, घेणारे घेतायत, इतरांच्या पोटात कशाला उगाच दुखतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

समतोल विचार करत आहे

सुखीमाणूस
Tue, 11/21/2017 - 07:10 नवीन
म्हणजे माझे अगदी स्पष्ट मत आहे की कोणीही दानधर्म घेत पिढ्यानपिढ्या जगू नये. मग ते धार्मिक असो, सामाजिक असो की राजकीय. कारण दोन ते तीन पिढ्यांनंतर जर तुम्ही प्रगती केली नसेल तर आरक्षणाचा हेतू साध्य झाला असे होत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हा हा हा, दान धर्म? कोण करतंय

तर्राट जोकर
Tue, 11/21/2017 - 12:55 नवीन
हा हा हा, दान धर्म? कोण करतंय दानधर्म? तुम्ही? आरक्षणाच्या बेसिकबद्दलच तुमच्याकडे ज्ञानाचा उजेड आहे... अभ्यास वाढवा..... तुमच्या जळजळीचे कारण तिथेच दडलेले आहे. जोवर ही जळजळ आहे तोवर आरक्षणाची गरज राहणार. हे एकदाचे लक्षात घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

नम्रपणे सान्गु इछ्चिते

सुखीमाणूस
Tue, 11/21/2017 - 20:31 नवीन
जळ्जळ नाहि. ग्लोबलायझेशन मुळे बर चाललय. नोकरी केली व्यवस्थित. जळजळ आहे म्हणुन आरक्शणाची गरज आहे असे का बरे? विचार स्वातन्त्र्य सर्वाना आहे. त्यातुन भरपुर कर भरतो मग सजग पण असावे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आरक्षण = दानधर्म = कर भरतो

तर्राट जोकर
Wed, 11/22/2017 - 11:58 नवीन
आरक्षण = दानधर्म = कर भरतो अशी लाइन ऑफ थॉट आहे की काय? कर भरता म्हणजे उपकार नाही करत कोणी देशावर. कर भरणे दानधरमासारखा काही ऐच्छिक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

सुखीमाणुसजी, पक्षाधारित विचार...

Duishen
Tue, 11/21/2017 - 04:49 नवीन
काँग्रेस चे सरकार असताना का बरे इतर मागास वर्गीय आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिला? ...माझ्या दृष्टीने पक्ष महत्त्वाचा नाही पण पक्ष चालविणाऱ्यांची मानसिकता तितकीच संकुचित का? हिंदू स्त्रियांच्या माणूस म्हणून असणाऱ्या हक्कासाठी हिंदूकोड बिलाला विरोध करणारे कॉंग्रेसजनही होतेच. जर पक्ष घेऊन विचार करावयाचा झाल्यास १९९६ च्या सरकारने आरक्षणाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली असे आपले म्हणणे आहे का? आणि आरक्षण मिळालेले २/३ पिढ्या नंतर स्वतहून आरक्षण का सोडत नाहीत? आरक्षणाचा मूलाधार सामाजिकभेद / जातीव्यवस्था आहे. ज्या दिवशी जातीव्यवस्था बंद होईल त्यादिवशी आरक्षण बंद व्हावे. जातीव्यवस्थेचे मूळ उखडून पडले की आरक्षणाच्या फांद्या आपोआपच गळून पडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

कशी करायची

सुखीमाणूस
Tue, 11/21/2017 - 07:19 नवीन
जाती व्यवस्था दूर? उलट आता तर लोक जातींच्या नावाने जास्त जवळ येतानाही दिसत आहेत. हा एकप्रकारे आरक्षणाचा साइड इफेक्ट नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen

सुखीमाणूसजी, जाती व्यवस्था दूर?

Duishen
Tue, 11/21/2017 - 09:00 नवीन
जाती आधारित संघटनांमध्ये जिथे जिथे जाऊन चर्चा केली - दलित, आदिवासी, मराठा, ओबीसी, ब्राह्मण, भटके विमुक्त तिथे एक वेगळा दृष्टीकोन मिळाला. आपला देश जवळपास ३००० जातींमध्ये आणि २०-२५००० उपजातीमध्ये विखुरला आहे. दलितांमधील ५९ जाती आणि त्यांचा अनेक उपजाती "दलित" या संज्ञेखाली एकत्र येत आहे. मराठा समाजातही उपजाती एकत्र येऊन "मराठा" या जाती खाली एकत्र येत आहेत. ओबीसीमधील साधारणत: ५००० जाती "ओबीसी" या संज्ञेखाली एकत्र येत आहेत. ब्राह्मण देखील उपजाती सोडून (चित्पावन, देशस्थ, इ.) "ब्राह्मण" या जातीखाली एकत्र येत आहेत. मोठ्याप्रमाणावर जात म्हणून एकत्र येण असलं तरीही उपजाती हळूहळू संपत आहेत. त्या लवकर संपतील अश्यातला भाग नाही पण ही अभिसरणाची सुरवात नक्की आहे. दुसरा भाग जो निरीक्षणास आला आहे तो शोषित, पिडीत आहोत ही जाणीव झाली की संघटन तयार होतच. कामगारांचे संघटन तयार झाले तर ते भांडवलदारांच्या विरोधात असत की भांडवलशाहीच्या? शेतकऱ्याचे संघटन झाले की ते बिगर शेतकऱ्यांच्या विरोधातील की शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी? स्त्री संघटना निर्माण झाल्या की त्या पुरुषांच्या विरोधात असतात की पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या/ मूल्यांच्या? त्यामुळे आरक्षणामुळे निर्माण झालेले जाती-निर्मुलनातील टप्पा म्हणून जातिगत संघटनाकडे पाहावे, असे मला वाटते. तिसरा महत्त्वाचा भाग - जातीव्यवस्थेचा पाया हा सहजीवन (सहभोजन) बंदी आणि स्व-जातीत विवाह (जातीव्यवस्थेतही स्री त्या त्या जातीची खाजगी मालमत्ता म्हणूनच पहिल्या गेली आहे.त्यामुळे जाती-व्यवस्था घट्ट ठेवण्यात त्यांचा वापर केल्या जातो. त्यामुळे मला वाटते स्त्रियांनी हे जोखड झुगारले तर जाती अंताची लढाई सोपी जाईल.). त्यातील सहभोजन हे किमान महाराष्ट्रात बऱ्यापैकी साधारण झाले आहे. आंतरजातीय विवाह आणि त्यातून निर्माण होणारी संतती ही जातीव्यवस्थेला अनुकूल भूमिका कधीही घेणार नाहीत. त्यांच्या लेखी जात अनावश्यक ठरेल...आणि हे सर्व जाती हे एकमेकांच्या उणेदुणे काढत असतात तेही प्रमाण कमी होईल. चौथा महत्त्वाचा भाग - मानववंशशास्त्रानुसार एकही जात "शुद्ध" नाही. रक्तसंकर झालेला आहे. ज्यांना तर्काचे अधिष्ठान आहे ते किमान जातीव्यवस्थेचा पोकळपणा स्वत:च्या जीवनात तरी नाकारू शकतात आणि असे नाकारणारे भरपूर जण आहेत. आरक्षण देण्याचे मुळ कारण जातिव्यवस्थेच्या विषवल्लीत जो समानतेचा, अधिकाराचा अंश नाकारल्या गेला होता तो समानतेचा, अधिकाराचा अंश मिळवून देणे आहे. स्त्रियांना आरक्षण यासाठी नाही की ती अबला आहे किंवा तिच्याकडे बुद्धिमत्ता नाही; तिला आरक्षण यासाठी आहे की तिच्या आसपासची पुरुषसत्ताक व्यवस्था तिला समान मानत नाही आणि तिला समान संधी उपलब्ध करून देत नाही. ज्यादिवशी पुरुष स्त्रीला समान मानतील, त्यादिवशी स्त्रीला वेगळ्या आरक्षणाची गरज नाही. त्यामुळे मानसिकता प्रामुख्याने बदलायची असेल तर पुरुषसत्ताक व्यवस्था मानणाऱ्या पुरुषांची बदलायला हवी. तसेच विवेचन जातीगत आरक्षणासाठी आहे. यामुळे मला डॉ. अभिराम दीक्षित जवळचे वाटतात. त्यामुळे जातिगत संघटन होण हे साईड इफेक्ट असा नकरात्मक नसून चांगला आहे. ...फक्त पुढच्या पिढ्यांनी याला चांगले वळण द्यावे आणि जे कुणी जाती व्यवस्था मनात असतील ते तर याकडे नकारात्मक दृष्टीने बघून अपप्रचार करणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखीमाणूस

प्रतिसाद आवडला. सहमत आहे.

एमी
Tue, 11/21/2017 - 13:38 नवीन
प्रतिसाद आवडला. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Duishen
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा