मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(महाग्रु)

ज्ञानोबाचे पैजार · · जे न देखे रवी...
(महाग्रु) पेरणा क्र १ आणि पेरणा क्र २ सूर्य मी अन काजवे ते, जाणूनी होतो जरी राहतो धूंदीत माझ्या, पाठ माझी खाजरी आत्ममग्न उष्टपक्षी, म्हणती मला पाठीवरी मीच घडवले, मीच केले, ग्रेट माझी शायरी भेट जर झालीच आपुली, सोडेन ना तूजला घरी माझिया माझेच कौतुक, ऐकूनी तू दमला जरी समूळ पिळून्-बोरकर अज्ञ पामरांच्या माहिती साठी - उष्टपक्षी = शहामृग्

वाचने 9779 वाचनखूण प्रतिक्रिया 16

सिरुसेरि 02/09/2017 - 12:13
+१ . "चार होते कावळे ते , एक तो राजहंस मी " "भेदुनी उपहास त्यांचा , चाललो निश्चींत मी " --- तपीश .

दुर्गविहारी 02/09/2017 - 16:37
जबर्‍या !!!!!! _____/\______ बाकी डोकलाममधून चिनी सैनिकांनी माघार घेतली याला म्हाग्रुसुध्दा कारणी'भुत' आहेत म्हणे. डोकलाम सीमेवरच्या कुठल्यातरी मराठी सैनिकाने "चला ना गडे ( कि नागडे ) " हे निखळ निरागस बडबड गीत ( चित्रपट- नवरा माझा नवसाचा ) लावले होते. ते एकूनच चिनी सैनिक पँट आवळत पळाले म्हणतात. जय म्हाग्रु॥

माम्लेदारचा पन्खा 02/09/2017 - 23:19
सृष्टीची रचना ही माझी ,ब्रम्हदेव तो केवळ मुकादम मीच तो ब्रम्हांडाचा निर्माता, दिग्दर्शक बाकी सगळे पानीकम !

नाखु 04/09/2017 - 20:34
याचं पुरुष वर्तन करणेत यावं,"मी कशाला आरशात पाहू गं,मी ....." विडंबन जोरदार मोबाईल निरक्षर नाखू

ज्ञानोबाचे पैजार 05/09/2017 - 14:03
मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु ज्ञानाची खाण, दिसतो लहान, विगही छान, अकलेचे बाण, फुकटचा मान, मी लै महान, मारीतो चकरा शोधतो बकरा, अ‍ॅवॉर्ड फंक्शनला मारीतो चकरा, चकरा-बकरा, चकरा-बकरा,चकरा-बकरा, मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु मेरा देख जलवा, बळच हलवा, लैच कालवा, माना तुम्ही डोलवा, आम्हाला बोलवा, बोलवा-डोलवा, बोलवा-डोलवा, बोलवा-डोलवा मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु अटक मटक चवळी चटक, माझी खाजवुन, मला लटक चटक लटक, चटक लटक, चटक लटक, मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु गरा गरा, अन गरा गरा, मी चालतो बळच भरा भरा, हिरोइन दिसता बरी जरा, मी फुलवतो उगा माझा पिसारा, मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु ऐका ऐका माझे शेर ऐका, माझे भाषण ऐका, माझे विनोद ऐका, एका पेक्षा एक माझे अनुभव ऐका, कोणाला घडवले, सांगतो ऐका, मी कसा थोर ते नीट ऐका, फक्त ऐका, ऐका ऐका ऐका ऐका मी म्हागुरु, मी म्हागुरु, म्हणा म्हागुरु पैजारबुवा,