✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"अनिवासी" यांच्यासह पुणे कट्टा : रविवार, २७ ऑगस्ट '१७

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Fri, 08/18/2017 - 22:23  ·  लेख
लेख
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे (१५ ऑगस्ट १९४७) प्रत्यक्ष साक्षीदार असलेले (संदर्भ : एक आठवण) आणि राणीदेशनिवासी ज्येष्ठ मिपाकर "अनिवासी" सद्या पुण्याला भेट देत आहेत. त्यांच्याबरोबर एक मिपाकट्टा करायचे योजले आहे. त्याचा तपशील असा आहे... दिवस : रविवार, २७ ऑगस्ट २०१७ वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन (किंवा अधिक :) ) भेटण्याची जागा : जंगली महाराज मंदीराजवळील पाताळेश्वर लेण्यासमोरील हिरवळ कार्यक्रम :    १) हिरवळीवर (पावासाने हजेरी लावल्यास, लेण्यामध्ये) गप्पा    २) जमलेल्या मिपाकरांनी सर्वानुमते ठरवलेल्या जवळच्या एका उपहारगृहात ("तू तेरा, मै मेरा" बेसिसवर) भोजन नवीन-जुन्या, (वयाने) लहान-मोठ्या, लेखक-वाचनमात्र, इतर मिपाकरांशी प्रत्यक्ष ओळख असलेल्या-नसलेल्या... म्हणजे एकंदरीत सर्वच आजी-माजी-भावी-हौशे-नवशे-गवशे मिपाकरांचे कट्ट्यामध्ये स्वागत आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
17059 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

छान कट्टा . छान आठवणी .

सिरुसेरि
Mon, 08/28/2017 - 13:48 नवीन
छान कट्टा . छान आठवणी .
  • Log in or register to post comments

फोटो छान आलेत. ऑडिओ क्लिप

रेवती
Mon, 08/28/2017 - 17:27 नवीन
फोटो छान आलेत. ऑडिओ क्लिप पहिली ऐकायला नाही मिळाली पण दुसरी ऐकली. हसू आले. वृत्तांताची वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

हूज हू कळले तर बरे होईल

चामुंडराय
Tue, 08/29/2017 - 02:39 नवीन
.
  • Log in or register to post comments

सुरुवातीच्या फोटोंखाली सर्व

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/29/2017 - 23:37 नवीन
सुरुवातीच्या फोटोंखाली सर्व हजर लोकांची नावे (आयड्या) दिल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

कट्टा वृत्तांत - अनिवासी काकांसोबत पाताळेश्वर कट्टा

मोदक
Mon, 09/04/2017 - 11:00 नवीन
...तर एक्काकाकांनी अनिवासीकाकांसोबतच्या कट्ट्याचा धागा काढला आणि जायचे निश्चित झाले. इतक्या अनुभवसमृद्ध माणासाची भेट कोण चुकवणार..? सकाळी लवकरच कंजूस काकांना भेटायला जायचे ठरले मात्र अचानक निघालेली कामे आणि पुण्यातले ट्रॅफिक यांमुळे अंमळ उशीर झालाच. मी पोहोचलो तेंव्हा रस्त्यावरूनच वल्ली उर्फ प्रचेतस दिसला, वल्लीच्या अनेक माहेरांपैकी एका माहेरी कट्टा असल्याने तो असणारच हा अंदाज खरा ठरला. ;) सगा, खेडूत, एक्का काका अशी मंडळी गोल कोंडाळे करून गप्पा ठोकत होती. थोड्याच वेळात अनिवासी काका त्यांच्या बंधूंसोबत पाताळेश्वर लेण्यांच्या अंतर्भागातून आंम्ही बसलो तेथे आले. नंतर काकांसोबत गप्पा सुरू झाल्या. त्यांनी लंडनमध्ये पोटापाण्यासाठी केलेली वेगवेगळी कामे, तेथील महाराष्ट्र मंडळे आणि इन जनरल दोन मराठी माणसे मिळून तीन मंडळे कशी स्थापन करतात, लंडनच्या आजीबाईंच्या आठवणी अशा अनेक गंमती जमती ऐकायला जाम मजा आली. Image removed. नंतर हळूहळू तिथेही कंपू (:D) पडून उपकट्टे सुरू झाले. उपकट्टा - १ Image removed. उपकट्टा - २ Image removed. चला आपण तिकडे वडाच्या झाडाखाली बसूया असे कोणीतरी सुचवले - नेमके तेथे एक प्रि-वेडिंग शूट सुरू होते, त्यामुळे "तिकडे नको, त्यांना उगाच डिस्टर्ब नको" असा कोणीतरी त्या सूचनेचा निकाल लावला. हे दोघे वेगळ्याच विश्वात हरवले होते. Image removed. अनिवासी काकांनी एका कागदावर कट्ट्याला कोण कोण येणार हे लिहून आणले होते. Image removed. पुन्हा एकदा ओळख परेड पार पडली.. असाच एक प्रसन्न क्षण.. Image removed. अनिवासी काकांचे बंधू सायकलिंग करतात आणि मिपावर वाचनमात्र आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितले. यानंतर सर्वांचा निरोप घेऊन अनिवासी काकांनी रजा घेतली. नंतर पाचच मिनीटात प्रशांत मालक अवतरले.. मग मिपाचा इतिहास वगैरे गोष्टींची जुजबी उजळणी झाली. नंतर दहा मिनीटांनी कपिलमुनी आला. त्याच्या डोक्यावर "मी आहे मुनी" असे लिहिलेली गांधी टोपी नाही यावरून त्याची थोडावेळ खेचण्यात आली. एक ग्रुप फोटो घेऊन सर्वांनी खादाडीकडे प्रयाण केले. Image removed. शेवटी निघताना यापुढील कट्टा चाकण येथे मांसाहारी कट्टा करण्याचा प्लॅन ठरला आहे. झकास मजा आली.
  • Log in or register to post comments

एखादा कट्टा

विनोद वाघमारे
Tue, 09/05/2017 - 16:31 नवीन
मुंबई मध्ये सुद्धा होउन जाऊ द्या
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा