"अनिवासी" यांच्यासह पुणे कट्टा : रविवार, २७ ऑगस्ट '१७
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे (१५ ऑगस्ट १९४७) प्रत्यक्ष साक्षीदार असलेले (संदर्भ : एक आठवण) आणि राणीदेशनिवासी ज्येष्ठ मिपाकर "अनिवासी" सद्या पुण्याला भेट देत आहेत.
त्यांच्याबरोबर एक मिपाकट्टा करायचे योजले आहे. त्याचा तपशील असा आहे...
दिवस : रविवार, २७ ऑगस्ट २०१७
वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन (किंवा अधिक :) )
भेटण्याची जागा : जंगली महाराज मंदीराजवळील पाताळेश्वर लेण्यासमोरील हिरवळ
कार्यक्रम :
१) हिरवळीवर (पावासाने हजेरी लावल्यास, लेण्यामध्ये) गप्पा
२) जमलेल्या मिपाकरांनी सर्वानुमते ठरवलेल्या जवळच्या एका उपहारगृहात ("तू तेरा, मै मेरा" बेसिसवर) भोजन
नवीन-जुन्या, (वयाने) लहान-मोठ्या, लेखक-वाचनमात्र, इतर मिपाकरांशी प्रत्यक्ष ओळख असलेल्या-नसलेल्या... म्हणजे एकंदरीत सर्वच आजी-माजी-भावी-हौशे-नवशे-गवशे मिपाकरांचे कट्ट्यामध्ये स्वागत आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान कट्टा . छान आठवणी .
फोटो छान आलेत. ऑडिओ क्लिप
हूज हू कळले तर बरे होईल
सुरुवातीच्या फोटोंखाली सर्व
कट्टा वृत्तांत - अनिवासी काकांसोबत पाताळेश्वर कट्टा
एखादा कट्टा