"अशा का वागतात काही मुली?"

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
31 Jul 2017 - 4:06 pm
गाभा: 

आत्ताच एका 'फक्त प्रौढांसाठी' असणार्‍या WhatsApp ग्रुपवर(आता कुठला ग्रुप ते इथं नका विचारु!)एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली.यात काही मिपाकरही होते.

तर चर्चेचा विषय असा होता की 'तशा प्रकारच्या व्हिडिओजपैकी,काही व्हिडिओज हे मुलींना फसवून त्यांच्याच मित्राकडून नंतर डिलीट करण्याच्या वायद्याने काढले जातात.अर्थातच असं काही होत नाही.मैत्रिणीच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन हे व्हिडिओज संकेतस्थळांवर लिक केले जातात.

यात एका सदस्यांनी असा मुद्दा मांडला की "या मुलींना कळत कसं नाही? बॉयफ्रेंडच्या नको त्या मागण्यांना या मुली बळी कशा पडतात? यामुळे आपलं आयुष्य पणाला लागू शकतं हे या मुलींना का कळत नसावं?

या फसवणूकीला जशा मुली जबाबदार आहेत तशीच त्यांना फसवणारे त्यांचे बॉयफ्रेंडही तेवढेच जबाबदार आहेत.पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत यातून सर्वात जास्त त्रास हा मुलींनाच होतो.भोगावं त्यांना लागतं.घरातल्यांची नाचक्की होते ती वेगळीच!

अशा प्रकारचे व्हिडिओज चोरुनही काढले जातात.पण हा प्रकार घडतो केव्हा? जेव्हा ती मुलगी अशा प्रकारे मित्राच्या खुशीसाठी संमती देते तेव्हा! मग प्रश्न असा येतो की या मुली का तयार होतात अशा प्रकारांना? का ठामपणे नकार देऊ शकत नाहीत?बरं हा प्रकार अल्पशिक्षित मुलींबरोबर,खेड्यातच घडतो असं नाही अगदी शिकलेल्या शहरी मुलीही याला बळी पडतात.

बरं हे असे लबाड लांडगेच या मुलींना आवडतात.त्यांचं स्टायलिश वागणं,कपडे,गाडी हेही जोडीला असतं.
पण एखाद्या साध्या सरळ मुलानं यांना प्रपोज केलं की, "मी तुला किती चांगला समजत होते.तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं उत्तर मिळतं.

मुली किती लेवलपर्यंत जाऊन माती खाऊ शकतात याचं एक उदाहरण पाहण्यात आहे.
ही मुलगी BE Electronics चांगल्या मार्कांनी पासआऊट होती.एके ठिकाणचा कामाचा चांगला अनुभव होता.त्यानंतर आमच्या कंपनीत आली.इथे आधीपासूनच एक मुलगा टेस्टींगसाठी होता.याचं त्याच्या कॉलेजमधल्या दुसर्‍या एका मुलीबरोबर अफेअर होतं.तिच्याचबरोबर लग्नही ठरलं होतं.भावी बायकोबरोबर सगळे उद्योग करुन झाले होते.

ही कंपनीत आलेली मुलगी त्याने पाहिली.हीला मी पटवणारंच असं म्हणून प्रयत्न सुरु केले.तिचा पाठलाग करणे वगैरे प्रकार सुरु झाले.ती आणि तिची मैत्रीण दोघी एकत्रच घरी जायच्या अॅक्टीवावरुन.सुरुवातीला ही मुलगी आपण भलं आपलं काम भलं अशी होती.
हीच्या जोडीदार मैत्रिणीचे विचार म्हणजे प्रेमात पडायचं,नवर्‍याचा स्वभाव आधीपासून माहित असलेला चांगला अशा टाईपचे.तिच्या संगतीने हीचेही तसेच विचार.(अर्थात असे विचार काही गैर नाहीत)
पण तसा कोणी हीच्या जिवनात नव्हता.मग ह्या ठोंब्याचे प्रयत्न सुरु होतेच.आणि वाढले.तिच्या शिव्या खाऊन,अपमान होऊनही पिच्छा सोडत नव्हता.ती बोलली नाही की हा डबा खायचा नाही.
आता हीची ही जोडीदारीण हे सर्व प्रकार पाहत होती.तिने सुचवलं अगं एवढा मागं लागलाय तर नाही का म्हणतेस? प्रेमविवाह करायचा असं ठरलंय ना आपलं? दे त्याला रिस्पॉन्स!
डिपार्टमेंटमधल्या काही लोकांनी त्या मुलाबद्दल सांगितलं तरीही ती बदलली नाही.
स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मुळातच अक्कल नसल्याने तिने या मुलाला होकार दिला.तिला याचं लग्न ठरलंय हेही माहित होतं.तरीही मी निर्णय बदलायला लावीन असा विश्वास.दोघंही वाहवत गेले.सगळे "उद्योग" करुन झाले.यानं त्याचे फोटोही काढून ठेवले.
या मुलीच्या घरी ती या नालायकाबरोबर बोलत असताना बापानं पकडलं.झोडपून काढलं पण लग्न करीन तर याच्याबरोबरचं म्हटल्यावर बापानं मुंबईचं एक स्थळ काढलं.तो मुलगा स्वभावानं कसा आहे वगैरे न पाहता जबरदस्तीनं लग्न लावून दिलं.
या ठोंब्याच्या होणार्‍या बायकोलाही आपला होणारा नवरा इतका नालायक आहे हे माहित होतं तरीही गावभर फिरल्याने सगळीकडे प्रसिध्दी झाली होती.मग तिच्याबरोबर याचं लग्नही झालं.
या एका प्रसंगात एक नव्हे तर चक्क तीन पूर्ण बिंडोक मुली पाहिल्या.त्या पण शिकलेल्या,इंजिनियर मुली.

अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात.

"आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी!
दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही.

त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे.

आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं.

तिला इतके बोलूनही ती ऐकेना... समजावणार्‍यांनाच शिव्या द्यायची!.. शेवटी भातुकलीच्या खेळासारखं त्या बाहुला बाहुलीच लग्न(सगळ्यांच्या तोंडात हेच) मंदिरात लावून दिलं.

आता वर्ष झालं असेल मुलगा कुठंतरी दुकानात जॉब करतो... परिस्थिती बिकट म्हणून तीही आता सासू बरोबर मजुरी करते.... कुठं ते राजकुमारीच जगणं आणि कुठं आता काबाडकष्ट!

एकदा तिच्या नवऱ्या बरोबर नाश्ता करताना हॉटेल मध्ये भेटली... अक्षरशः रडली, वडील अाणि भाऊ बोलत नाहीत घरात येऊ देत नाहीत...मला मध्यस्ती कर म्हणून सांगत होती... विचारलं तिलाच शिव्या देताना थोडा का विचार केला नाहीस..??? तो पोरगा काहीच बोलला नाही.. बडवलेला म्हणून!

(सैराटचीच कथा फुलवल्यासारखी वाटेल पण हे खरं आहे.)

म्हणजे वास्तव समोर आलं की मग विचार करतात... पण त्याअगोदर केला असता तर ही वेळ अाली नसती.

कुठे चुकतं या मुलींचं? विश्वास ठेवण्यायोग्य माणूस त्यांना अोळखता येत नाही की प्रेमात पडल्यावर मेंदूत काही रासायनिक बदल होतात? की कशाची भितीच वाटत नाही यांना?

अशा का वागतात काही मुली?

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

31 Jul 2017 - 4:22 pm | अत्रन्गि पाउस

अशा का वागतात काही मुली !

mayu4u's picture

31 Jul 2017 - 4:24 pm | mayu4u

... एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल!

"अशा का वागतात काही मुली?"
- अक्कल नसल्याने!

बरं आता दिड वर्षात काही फरक पड्ला का मुलींमध्ये ;)

सौन्दर्य's picture

31 Jul 2017 - 8:43 pm | सौन्दर्य

साधारणपणे एकाच वयाच्या मुला-मुलीत, मुली जास्त mature असतात असं एकूण निरीक्षण आहे. मुली भावनेच्या भरात वहावत जात नाहीत, त्यांचे पाय नेहेमीच जमिनीवर असतात. शारीरिक संबंधात पुढील नको असलेले परिणाम मुलींनाच भोगावे लागतात ह्याची त्यांना जाणीव असते. तरी देखील त्या अश्या का वागतात ह्याचे एक कारण म्हणजे 'तारुण्य सुलभ भावना' हे असू शकते. दुसरे कारण म्हणजे आवडलेला मुलगा, मग तो कोणीही व कोणत्याही परिस्थितीतला असो, हातातून निसटून जाऊ नये म्हणून केलेली किंवा करावी लागणारी एक तडजोड, असू शकते.

त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अगोदरच बहिणीकडे शिकायला... राहतं दोन खणांचं कौलारू घर.. १० ते १२ गुंठे जमीन, अर्धवट शिक्षण म्हणून नोकरी नाही,आईवडील गावात एकाकडे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात कोणाकडेतरी रोजंदारीवर जायचे.

आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार.. देखणेपणावरती तर त्या मुलीला कुणीही पसंत केलं असतं.>>>>>

निव्वळ महान विचार आहेत.....दंडवत घ्यावा.

दशानन's picture

31 Jul 2017 - 8:54 pm | दशानन

सहमत!!

उपयोजक's picture

31 Jul 2017 - 9:07 pm | उपयोजक

कोणाचे?

ज्यांना उपप्रतिसाद दिला आहे त्यांच्याशी.

उपयोजक's picture

31 Jul 2017 - 10:59 pm | उपयोजक

लव जिहादमधे अशाच उथळ विचारांच्या हिंदु मुली फसत असाव्यात!

आपल्याकडे बहुसंख्य घरांमध्ये मुलींसाठी लग्न व संसार हेच मुख्य ध्येय म्हणुन मुलींवर ठासवले जाते. त्याचबरोबर २४ तास दुरचित्रवाणी, सिनेमे ईं. वरुन ईश्क, प्यार चा अविरत मारा चालु असतोच. मग थोडे वयात आल्याबरोबर काही लांडगे फायदा उठवतात व विचारांची काहीच खोली नसल्याने मुली फसतात .

Nitin Palkar's picture

31 Jul 2017 - 9:46 pm | Nitin Palkar

सारासार विचारशक्ती गहाण पडल्याने असे किस्से घडतात. या बरोबरच मुलांकडे पालकांचे पुरेसे आणि सजग लक्ष नसल्याने असे प्रकार घडतात. माझा मुलगा साधारण सातवी आठवीत असताना त्याच्याच वर्गातल्या एका मुलीचे आई वडील जे आमचे स्नेही आहेत, गप्पा मारायला आले असता त्या बी (मुलीची आई) म्हणाली, 'तुमचं बरं आहे हो, तुम्हाला मुलगा आहे काळजी करावी लागत नाही. मुलीची किती काळजी घ्यावी लागते....' त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो, "मुलींइतकीच मुलाची काळजी घ्यावी लागते, मुलांकडेही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. आपल्या मुलाने कुणाही मुलीचा गैरफायदा घेऊ नये असे संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतात".

उपयोजक's picture

31 Jul 2017 - 11:01 pm | उपयोजक

सहमत!

नीलमोहर's picture

31 Jul 2017 - 10:38 pm | नीलमोहर

अशा का वागतात काही मुली?
का वागतात काही मुली अशा?
वागतात का काही मुली अशा?
काही मुली अशा वागतात का?
मुली अशा काही वागतात का?
अशा मुली काही का वागतात?
का अशा काही वागतात मुली?
वागतात का मुली अशा काही?
काही मुली अशा का वागतात?
मुली अशा काही का वागतात?

विखि's picture

31 Jul 2017 - 10:59 pm | विखि

जब तक इस देस मे सनीमा है तब तक लोक ........ बनते रहन्गे !

रघुनाथ.केरकर's picture

1 Aug 2017 - 11:52 am | रघुनाथ.केरकर

खरय

गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल.

एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं

कोण आहेत हे तुमचे मित्र? अटक व्हायला पाहिजे अशा लोकांना.

प्रसाद_१९८२'s picture

1 Aug 2017 - 1:04 pm | प्रसाद_१९८२

अश्या रानटी प्रवृत्तीच्या लोकांमुळेच, गुन्हेगारी बळावते.
त्यांना काय करायचे आहे ते करु द्या की, तुम्ही कशाला मोरल पोलिसिंग करता. मला वाटते ज्यांच्याकडे मुली ढुंकुनही बघत नाहीत अशीच लोक दुसर्‍याच्या फाटक्यात पाय घालत असतात.

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 4:47 pm | उपयोजक

त्या रिकामटेकड्या मुलाला मारलं याचा राग येतो पण त्या मुलीची वाट लागली याचं वाईट नाही का वाटत?

आणखी एखादीची वाट लागू नये म्हणून सावध राहणं चूक आहे?

जेम्स वांड's picture

1 Aug 2017 - 7:22 pm | जेम्स वांड

सावध राहणे म्हणजे बडवणे ?

आपल्या देशात अहिंसा सर्वतोपरी आहे, म्हणून अगदी देशाची जरी वाट लागली तरी चालेल पण ....

मराठी कथालेखक's picture

2 Aug 2017 - 12:54 pm | मराठी कथालेखक

सहमत

रितसर तक्रार करून १५ वर्षे केस चालवणे हेच श्रेयस्कर.

कशाला मॉरल पोलिसिंग करत बसायचं? आपल्याला दुसरे काही उद्योग नाहीयेत का? ती मुलगी, तिचा नवरा, आणि त्यांचं नशीब, बघून घेतील!! आपल्याकडच्या लोकांना लष्करच्या भाकर्‍या भाजण्याची हौस फार. असं काही ऐकलं की घरचं कार्य असल्यासारखे जातात. मी तर माझ्या मित्रांना पण एकदा सांगून बघतो. तेही मित्र आहेत म्हणून, नाही ऐकलं तर मनात "झक मार" म्हणतो आणि सोडून देतो.

हो खरंय आपण आपलं पाककृती,कलादालन,भटकंती,रांगोळी,ज्वेलरी डिझायनिंग असे धागे काढलेले बरे नाही का?

हो खरंय आपण आपलं पाककृती,कलादालन,भटकंती,रांगोळी,ज्वेलरी डिझायनिंग असे धागे काढलेले बरे नाही का?

प्रतिसाद समजला नाही, जरा विस्तृतपणे सांगता का?

नगरीनिरंजन's picture

3 Aug 2017 - 2:06 pm | नगरीनिरंजन

इथे तर स्वतःच्या निर्णयस्वातंत्र्यासाठी काबाडकष्ट करणे, गरिबीतून स्वप्रयत्नाने वर येणे ह्यालाच वाईट म्हटलंय.
काबाडकष्ट केले म्हणजे आयुष्य बरबाद झाले असं समजणारे बहुदा रिकामटेकडे व परोपजीवी असतात.

एमी's picture

6 Aug 2017 - 6:47 am | एमी

+१.

काबाडकष्ट केले म्हणजे आयुष्य बरबाद झाले असं समजणारे बहुदा रिकामटेकडे व परोपजीवी असतात. >> त्यांचा तर उदोउदो चाललेला असतो की इथे सतत...भाकर्या बडवण्याची किंमत वगैरे...

विशुमित's picture

1 Aug 2017 - 2:15 pm | विशुमित

तुम्ही आधी टुक्कार पोरांची सांगत सोडा. असल्या उचापती मध्ये पडू नका. तुमचे लग्न झाले नसेल तर ते होण्यात पण अडथळे येतील. आपले शिक्षण नोकरी धंद्यात लक्ष घाला. इतरांच्या पोरींची जास्त काळजी करू नका. त्यांची काळजी करायला आपले प्रशासन खंबीर आहे.

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 4:41 pm | उपयोजक

खरंच का काय?

विशुमित's picture

1 Aug 2017 - 4:50 pm | विशुमित

मग तलवारी घेऊन रिकामटेकडी पोरं कापत सुटणार की काय?

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 5:30 pm | उपयोजक

बरं मग त्या रिकामटेकड्या मुलाला हातही न लावता किंवा त्याला एक पैसाही न देता त्या चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!

अभिजीत अवलिया's picture

1 Aug 2017 - 5:41 pm | अभिजीत अवलिया

चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!

तिचं भवितव्य कशात चांगल वाईट आहे ते तिला ठरवू दे की. तुम्ही फार फार तर समजावून सांगा. मुलाला गुरासारखे मारणे, हात मोडेपर्यंत मारणे असले प्रकार करायचा हक्क तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना कुणी दिला?

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 5:52 pm | उपयोजक

मी मारहाण केलेली नाही किंवा त्याचं समर्थनही केलेलं नाही.हा मित्राच्या गावी घडलेला प्रसंग आहे.
त्या मुलाला आधी समजावलंच नसेल डायरेक्ट मारलंच असेल कशावरुन?
समजावूनही बधला नसेल तर काय करावं? न कळत्या वयातलं कोणी भावनेत वाहून चुकीचा निर्णय घेत असेल तर माझा काय संबंध? माझ्या घरापर्यंत नाही ना आलं म्हणून तो घेऊ द्यावा का?इतकी डोळेझाक करावी का?

अभिजीत अवलिया's picture

1 Aug 2017 - 6:13 pm | अभिजीत अवलिया

<एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं../blockquote>
ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण केलीत असा होतो.

अवांतर — ही मोरल पोलिसिंगची हौस बर्याच लोकांना असते. विशेष करुन रस्त्यावर फुटकळ अपघात जरी झाला तरी हे लोक न्यायदान करायला हजर. गेल्या गुरवारी डांगे चौकात एका डाॅक्टरला गाडी चालवताना ब्रेन स्ट्रोक आला. त्यामुळे त्यांची गाडी दुसर्या कारला धडकली. मोरल पोलिस आले आणि डाॅक्टर दारु पिलेत असे अनुमान काढून त्यांना बेदम मारले. नंतर ते डाॅक्टर आहेत हे समजल्यावर पळून गेले.

अभिजीत अवलिया's picture

1 Aug 2017 - 6:18 pm | अभिजीत अवलिया

प्रतिसाद अर्धवट आला.

एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं..
— ह्याचा अर्थ तुम्ही पण मारहाण करणार्या ग्रुप मध्ये होता असा होतो माझ्या मते.

उदय's picture

1 Aug 2017 - 8:11 pm | उदय

अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात.

"आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी!
दिसायला फार सुंदर. तीचं आणि एका मुलाचं प्रेम साधारण ८वी ते ९ वीच्या दरम्यान जुळलं.. ती त्याच्यापेक्षा ६ महिन्याने मोठी... १२ वी नंतर त्या दोघांमध्ये खूप जवळीक झाली... ती मुलगी, तिची लहान बहीण आणि आजी गावी तर बाकी मुंबईला होते.. तो मुलगा दररोज त्या मुलीच्या रात्री १२ च्या नंतर घरी यायचा... तो मुलगा गावात बहिणीकडे राहायला होत म्हणून गावात रात्री मुलांच्या कट्ट्यावर येत असे... त्यामुळे संशय ही कोण घेत नसे... एखादा सापडला.. गुरालाही मारत नसतील एवढा बेदम मारला... त्या मुलीला दोन ठेवून दिलेल्या... पण घरी सांगितलं नाही... वाटलं सुधारेल... पण परत ६ महिन्यांनी ह्यांचे प्रकरण चालू... अाख्या गावभर झालं.. तरी ती मुलगी बेफिकर... शेवटी घरच्यांना समजलं... एकदा माझे मित्र आणि आम्ही काही जणांनी बाहेर पकडलं त्यांना.... त्या मुलीला ही बेदम मारलं... मुलाचा हात मोडेपर्यंत मारलं.. पण ती एवढी बेफिकीर की करीन तर हाच.. दोघानी ही २१ पार केल होतं.. तिला फार समजावलं पण ऐकेनाच... पळून जाऊ नये म्हणून मग लग्न लावायचा विचार केला... आम्ही सांगून टाकलं लग्नानंतर परत तोंड नाही दाखवायचं ती उलट बोलली तुमच्या सारख्या सैतानांकडे मला यायचं ही नाही.

बाकी चालू द्या.

मोदक's picture

1 Aug 2017 - 8:32 pm | मोदक

किंवा हा व्हिडीओ बघा.

वरील प्रतिसादाच्या आधी एक वाक्य आहे:
'अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात'
त्यामुळे सदर लेखक मारहाणीत सामील असल्याचे दिसत नाही.

प्रसाद_१९८२'s picture

1 Aug 2017 - 5:50 pm | प्रसाद_१९८२

बरं मग त्या रिकामटेकड्या मुलाला हातही न लावता किंवा त्याला एक पैसाही न देता त्या चांगल्या मुलीचं भवितव्य कसं वाचवायचं याचा सुयोग्य मार्ग सुचवा बघू!

===

मुलीचे भवितव्य वाचवायला,
एकाद्याला गुरासारखे मारणे, त्याचे हातपाय तोडणे हा "सुयोग्य" मार्ग आहे काय?

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 5:55 pm | उपयोजक

बरं मारहाण करणं चुकीचं असं समजू! मग योग्य मार्ग तुम्ही सुचवा! पण हमखास लागू पडला पाहिजे.

पिलीयन रायडर's picture

1 Aug 2017 - 6:04 pm | पिलीयन रायडर

मारहाणीचा मार्ग पडला का हमखास लागु?

पण हमखास लागू पडला पाहिजे.

मारहाणीचा मार्ग उपयोगी पडला नाही हे तुम्ही दिलेल्या उदाहरणावरूनच दिसून येते. उलट मारहाण केल्यामुळे त्यांचा लग्न करण्याचा निर्धार वाढला नसेल कशावरून (रिवर्स सायकॉलॉजि)?

मुलगी सज्ञान असेल तर तुम्ही तिला समजावून सांगितल्याशिवाय काहीही करू शकत नाही. तिला कोणी नुकसान पोहोचवत असेल तर पोलीसांत तक्रार करू शकता. बाकी प्रत्येक जण आपलं भाग्य स्वतः ठरवतो, ते त्याचे त्याला/तिला ठरवू द्यावे.

उदय's picture

1 Aug 2017 - 8:22 pm | उदय

मारहाण करणं चुकीचं असं समजू!
कुठल्याही परिस्थितीत मारहाण करणे हे चुकीचेच आहे आणि तुम्ही त्याचे समर्थन करताय, हे काही बरोबर नाही.

आदूबाळ's picture

1 Aug 2017 - 5:49 pm | आदूबाळ

मॉरल पोलिसींग की लत बहुत भयानक होती हय. त्यामुळे वर कितीकांनी सांगितलं तरी धागालेखकाला ते 'सत्कार्यात आलेले काटे' वाटतील.

आणि महाराष्ट्रात तशीही मॉरल पोलिसींगची जुनी परंपरा आहे. (उदा० पंचहौद मिशन प्रकरण)

काही नाही हो सकेशु, तुम्ही काही ऐकू नका या वैट्ट लोकांचं.

काय होते पंचहौद मिशन प्रकरण..?

पंचहौद मिशन नावाची (मिशनरी) शाळा होती (अजूनही आहे सुभाषनगरजवळ). त्यांनी १८९२मध्ये काही समारंभाप्रीत्यर्थ लोकमान्य टिळकांना आणि न्या० रानड्यांना शाळेत बोलावलं. समारंभ संपल्यावर चहा दिला. त्यांनीही तो प्यायला.

हे सगळं पेपरात छापून आल्यावर गदारोळ उठला. सनातनी लोकांच्या मते ख्रिस्ती लोकांच्या हातचा चहा पिणं हे पातक होतं. चुकीचं, अनैतिक होतं. त्याबद्दल या दोघांवर ग्रामण्य** बजावण्यात यावं अशी त्यांची मागणी होती. यात कोणीतरी शंकराचार्यांना आर्बिट्रेटर नेमलं. त्यांनी प्रायश्चित्त## घेण्याची शिक्षा फर्मावली. टिळकांनी घेतलं. रानड्यांनी काय केलं ते आठवत नाही.

**हे ग्रामण्य म्हणजे एक नंबर प्रकार असायचा. बेसिकली वाळीत टाकणे, पण त्यात इतरही काही विनोद होते. प्रबोधनकार ठाकर्‍यांनी या ग्रामण्य प्रकरणावर बरंच विस्तृत लिहिलं आहे.
##हाही एक नंबर प्रकार

पंचहौद फारच भारी प्रकरण झालं होतं. टिळकांनी देखील सहजा सहजी प्रायश्चित्त घेतलं नाही. आधी तर त्यांच्या वकीली डोक्याने "बटाटा पण आपला नाही, साबुदाणा पण नाही पण तो तर तुम्ही उपासाला पण खाता, शिवाय चहा चिनी मातीच्या भांड्यातुन दिला होता - तो निर्लेप च होता. फार काय, करणारे आचारी ब्राह्मण च होते" पर्यंत युक्तिवाद केले. ते नेहमीसारखेच प्रभावी देखील होते. शिवाय ग्रामण्याला भीक घालायची नाही हे त्यांनी ठरवलंच होतंं, वार्‍याशी सुद्धा भांडतील अशी आधीच ख्याती असलेल्या टिळकांना आणि त्यांच्या अ‍ॅटिट्युड ला या वाळीत टाकण्याचा असा कितीसा फरक पडणार आहे याची मुळात परंपरावाद्यांना देखील खात्री नव्हती. त्यांच्या मुलाची मुंज देखील त्याच काळातली . स्वतः पौरोहित्य करेन नाही तर काशीच्या ब्राह्मणांना बोलावेन वगैरे त्यांनी ठरवलं होतं (हा संदर्भ नीट आठवत नाहीये, खात्री करुन घ्यायला हवी) . कुटुंबाची मात्र त्यांच्या अवस्थ थोडी नाजुक झाली होती, मुलींबरोबर खेळायला कुणी मिळेना- घरी मदतीला आजुबाजुच्या बायका येईनात- पण जसा काळ पुढे जायला लागला तसा तो विरोध ही मवाळ व्हायला लागला कारण शेवटी वैयक्तिक हितसंबंध महत्वाचे असतातच - समाजाची भीती एका ठराविक मर्यादेपर्यंतच काम करते. होय नाही करता करता आणि " आम्ही म्हणलं नव्हतं टिळक छुपे सुधारक च आहेत" हे फार पुढे यायला लागल्यावर, त्यातल्या त्यात शंकराचार्यांची मध्यस्थी दोन्ही पार्टींना पटली आणि ते प्रकरण एकदाचं मिटलं.

सुधारकांनी नेहमीसारखं सगळंच थेट शिंगावर घेतल्याने त्यांना शंकराचार्यांची ही पळवाट उरली नाही आणि वाळीत टाकलेल्या लोकांच्या सुधारणेसाठी ते नेहमीसारखे एकटेच झगडत राहिले.

आदूबाळ's picture

2 Aug 2017 - 6:35 pm | आदूबाळ

...आणि या प्रकरणानंतर उण्यापुर्‍या वीस वर्षांत पुण्यात चहाची हॉटेलं जागोजाग झाली!

छ्या.. असे लिहायचे नै कै..

..आणि या प्रकरणानंतर उण्यापुर्‍या वीस वर्षांत पुण्यात चहावाल्यांना अच्छे दिन आले.

असे कैतरी लिहा. :D

स्रुजा's picture

3 Aug 2017 - 12:23 am | स्रुजा

हाहाहा भारी

हस्तर's picture

15 Jun 2020 - 8:01 am | हस्तर

माहित्ति बद्दल धन्य वाद

विशुमित's picture

1 Aug 2017 - 5:55 pm | विशुमित

लग्न करते वेळी मुलगी २१ वर्षाची होती, म्हणजे सज्ञान होती. तुम्ही सर्वानी समजावून पण पाहिले. तिने ऐकलं नाही. आता घेतलेल्या निर्णयामुळे रडत आहे. रडू द्यात की. तुम्ही कशाला जास्त काळजी करता.
याचा विपरीत परिणाम असा होईल की लोक तुम्हालाच म्हणतील हा "केअशु' का एवढा इंटरेस्ट घेतोय या मुलीबद्दल.
दुसरे म्हणजे त्या पोराचा तुम्ही हात मोडला. त्याने जर हाफ मर्डर ची केस तुमच्यावर ठोकली असती तर मग काय केले असते?
म्हणून म्हंटले टुक्कार पोरांच्या नादी लागून दुसऱ्याच्या बापासाठी आपली दाढी मिशा काढू नका. बाकी मर्जी तुमची.

सुयोग्य मार्ग म्हणाल तर एक भाऊ (मित्राची बहीण ती आपली बहीण) या नात्याने त्या मुलीने घेतलेला निर्णय सार्थ ठरवा म्हणून तिच्या गरीब रिकामटेकड्या नवऱ्याला कसे कामधंद्याला लावून त्यांची आर्थिक/सामाजिक परिस्थिती सुधारेल यासाठी प्रयत्न करा. हाणामारीच्या भानगडीत पडाल तर बाराच्या भावात जाल.

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 6:05 pm | उपयोजक

धाग्यावर बर्‍याच जणांचा प्रतिसाद हा मारहाण करु नका.लागते वाट मुलीची लागू द्या.तुम्हाला काय करायचंय? असा दिसतो आहे.पण धाग्याच्या नावाशी संबंधित प्रतिसाद येत नाहीयेत. मारहाणीवरच सगळ्यांचा फोकस आहे.

धागा मुली अशा का वागतात यामागची सामाजिक किंवा मानसिक कारणे शोधली जावीत त्याचा उहापोह व्हावा यासाठी आहे.

मुली अशा का वागतात हे जाणून तुम्ही काय करणार आहात ते आधी सांगा.

वरती नितीन पालकरांनी सुयोग्य शब्दात दिलेले उत्तर पुरेशे ठरावे असे वाटते.

बाकी त्या नागराजांनी सैराट काढून चूकच केली म्हणायची.

नगरीनिरंजन's picture

3 Aug 2017 - 2:13 pm | नगरीनिरंजन

प्रत्येकाला पैसा आणि त्यासाठी कोणाहीबरोबर राहणे पसंत असेल असे नाही. प्रत्येकाला आपले आयुष्य हवे तसे जगायचा अधिकार आहे. म्हणून मुली अशा वागतात आणि त्यांना तसे वागू द्यावे.
गोडबोल्या पोरांच्या नादी लागून दु:ख मिळाले तर मिळू द्यावे. तो त्यांचा जीवनानुभव आहे. उगीच दुसर्‍याला जपण्याच्या व बोन्साय करण्याच्या भानगडीत पडू नये असे मला वाटते.

अकिलिज's picture

1 Aug 2017 - 6:07 pm | अकिलिज

इमॅजीन करा.
तुम्ही मला कट्ट्यावर भेटला.... माझे मित्र आणि काही जणांनी तुम्हाला बेदम मारलं... हात मोडेपर्यंत मारलं.. तरीपण तुम्ही बेफिकीर... धागे काढीन तर असेच....

कसं वाटतंय. तुम्ही काय करावं आणि काय करू नये हे कुणी दुसर्‍यानी ठरवावं.

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 6:23 pm | उपयोजक

उदाहरण तरी व्यवस्थित द्या.
मी जर काहीच केलं नसेन तरीही तुम्ही मला का माराल?

इथे काही तरी घडलं मग मारहाण झाली ना?

अकिलिज's picture

1 Aug 2017 - 6:30 pm | अकिलिज

त्यांनी प्रकरण केलं. तुम्हाला आवडलं नाही (पक्शीः तुम्हाला असं काही प्रकरण करायाचा चान्स गावला नाही)

तुम्ही असा उदात्त धागा काढला. आम्हाला आवडला नाही.

वरुण मोहिते's picture

1 Aug 2017 - 6:10 pm | वरुण मोहिते

असाही एक धागा काढा . मी मोलाचे प्रतिसाद देईन . मी स्वतःच वाया गेलोय त्यामुळे . त्यात मारहाणी ची प्रवृत्ती असणारी ,मुलींना फसवणारी ,अश्या अनेक गोष्टी ऍड करता येतील . मुले अशी का वागतात असा धागा काढू काय म्हणता ?

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 6:25 pm | उपयोजक

नक्की काढा.पण सोबत याआधीचे राहिलेले धागेही काढा.किती दिवस वाट पहायला लावणार आहात?

मंगेश पाडगावकर यांची सुंदर कविता

तुमचं काय गेलं ?
याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं

करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?

तो तिला एकांतात
बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन
अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे
फूल होऊन पेटला

भेटला तर भेटू दे की
पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी
इतकं गरम झालं ?

त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी
वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,

घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,

लावलं तर लावू दे की
फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी
वेगळं काय केलं ?

त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच
टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,

गुलाबी थंडीचे
परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला
जवळ ओढून घेणारच

घेतले तर घेऊ दे की
व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं
त्याने थोडंच उचलून नेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा
तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा
त्यात तुमचं काय गेलं ?

विशुमित's picture

1 Aug 2017 - 6:21 pm | विशुमित

अर्रर्रर्रआ कहर च ..!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Aug 2017 - 4:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

-दिलीप बिरुटे

वर बर्‍याच प्रतिक्रिया वाचल्या. अनुभव विश्व मर्यादित असले कि अशा प्रतिक्रिया येणार हे अपेक्षित होते. बर्‍याच जणाना त्या मुलाला मारल हे खटकलय, पण लक्षात घ्या हि शेवटची पायरी आहे. आपणही आपल्या घरी लहान मुलाना प्रथम रागावतो आणि अगदिच निरुपाय झाला कि मारतो( असे मारावे कि नाही हा वेगळ्या धाग्याचा विषय) हिच गोष्ट त्या गावी झाली असणार हे लक्षात घेतले गेले नाही. मोठी शहरे सोडली तर लहान गावी अश्या गोष्टीचा बोभाटा पटकन होतो. घरात असे एखादे उदाहरण घडले तर त्या घरातील बाकीच्या मुलांच्या लग्नात तर अडचणी येतातच पण, भावकीत हि लग्न होताना अवघड होते. असे होउ नये ह्यासाठी त्या मुली व मुलाचे सुरवातीला काउन्सलींग केले गेले, तरी ही एकत नाही म्हणल्यावर नाईलाजानेच मारहाण झाली.यात घागाकर्त्याने एक मुध्दा लिहीला नाही आहे, त्या मुलीला जेव्हा सुरवातीला समजाउन सांगितले गेले कि तुझ्या आणि तुझ्या मुलाचा परिस्थिती असलेला फरक आणि लग्नानंतर तुझ्या जीवनशैलीत होणारा वाईट बदल ( जो तीला नंतर समजलाच) तेव्हा तीने, "माझे लग्न याच मुलाशी लावून दिले नाहीतर मी आत्महत्या करेन व चिठ्ठीत तुम्हा सगळ्यांची नावे लिहून ठेवेन". कायद्याची हि अक्कल त्या मुलीला आहे पण आपले भविष्यात नुकसान नको म्हणून आपल्याच भावकीतील लोकांना धमकी द्यावी अशी वाटते यात काही चुकीचे नाही? एका मुलीपायी होणारे सगळ्यांचे नुकसान या सर्व नातेवाईकांनी केवळ वर हि मंडळी म्हणत आहेत तसे केवळ "मोरल पोलिसिंग" नको यासाठी गप्प बसावे ? आणि असे काही त्यानी केले तर त्यांना एका फटक्यात टुकार, रानटी प्रवृत्ती ठरविणारे आहेतच .
हाच दॄष्टिकोण ठेवून जायचे ठरवले तर जरा कुठे निसर्गरम्य स्थळी , एखाद्या एतिहासिक ठिकाणी जरा एकांत दिसला कि चाळे करणारी मंडळी दिसतात, अगदी नवीन लग्न झालेल्या लोकांचे हेच प्रकार पहायला मिळतात. एक तर सर्वसामान्य लोक जरा बदल म्हणून बाहेर पडलेले असतात, तिथे जावे तर आपल्याच लहान मुलांसमोर हे असले प्रकार बघून निमूटपणे परत यावे लागते. यातून कधी कधी गावकर्‍यांचा किंवा स्थानिकांचा संमय सुटून मारहाण झालेली वाचायला मिळते. मोराल पोलिसींगचे डोस पाजण्यापेक्षा हे प्रकार का खपवून घ्यायचे ? याचे आधी उत्तर द्या. या प्रेमी जीवांनी किंवा लग्न झालेल्या जोडप्या किमान आपला उपद्रव ईतरांना होणार नाही याची जाणीव ठेवायला नको? अन्यथा काही बागेमध्ये व मंदिरामध्ये "इथे अश्लिल चाळे केले तर बांबुचे फटके मिळतील " असा बोर्ड लावायची वेळ का यावी?
माझा स्वताचा अनुभव देतो. एकदा पावसाळा संपता संपता रायगडला मी व माझा भाउ असे दोघेच गेलो होतो, मधला दिवस असल्याने गडावर फार गर्दी नव्हती. एक चार जणांचा ग्रुप होता. दोन मुले व दोन मुली. त्यात एक नवीन लग्न झालेले जोडपे होते. ठिकठीकाणी एकमेकाच्या गळ्यात हात घालून फोटो काढणे चालू होते. सुरवातीला मी दुर्लक्ष केले. मात्र जगदीश्वर परिसरातही हेच चाळे सुरु झाले. मंदिर परिसरात आपण आहोत याची साधी जाणीव त्याना नव्ह्ती. हेच चाळे करायचे होते तर महाबळेश्वर , माथेरान आहेच. ईथे मी आक्षेप घेतला. मग मात्र गड बघायला(?) आलेले हे तथाकथित पर्यटक मागे वळून न बघता परतीच्या वाटेला लागले. इथे मला कोणी कशाला हे मोराल पोलिसिंग किंवा दरडावल्याबध्दल पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे असे म्ह्णले तरी चालेल, पण काही श्रध्दा असलेल्या ठिकाणी असे चाळे करणे योग्य वाटत नाहीत. तुमच्या चार भिंतीत तुम्ही काहीहि करा.
मला काय त्याचे हि समाजातील वाढणारी प्रवॄत्ती अनेक अनिष्ट गोष्टीना प्रोत्साहन देते आहे. थेट धाग्याशी संबधीत नाही पण रहावत नाही म्हणून उदाहरण देतो, परवा पिंपरीमधे झालेल्या तरूणाच्या अपघाताचा प्रकार किंवा आटपाडी-मुंबई बसला झालेला दहिवडीजवळ अपघात, दोन्ही ठिकाणी मदत राहिली बाजुला मोबाईल मधून फोटो काढून शेअर करण्याची घाई बघायला मिळते.
बाकी धाग्याचा विषय नीट समजावून घेउन प्रतिक्रीया दिल्या जाव्यात असे वाटते.

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 6:32 pm | उपयोजक

कोणालातरी माझा मुद्दा समजला हे वाचून बरे वाटले.

काही मुद्दे लिहायचे राहीले असतील तर त्याबद्दल खरंच क्षमस्व!

काही जणांना हा धागा एकांगी वाटला असेल पण तुमच्या विस्तृत प्रतिसादामुळे दुसरीही बाजू लक्षात येईल मिपा सदस्यांच्या असे वाटते.

मनापासून आभार!!!

आपण पण लक्षात घ्यायला हवे की ते तरुण/तरुणी पण सर्वसामान्य असतात आणि जरा बदल म्हणून बाहेर पडलेले असतात. नवीन लग्न झालेले जोडपे होते, त्यांना पण प्रायव्हसी हवी असते जी कदाचित घरी मिळत नाही. (भारतातली प्रायव्हसी हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे, म्हणून जास्त चर्चा करत नाही.) मुळात चाळे करणार म्हणजे काय करणार? गळ्यात गळे घालून फिरतील, एकमेकांशी सलगीने चिकटून बसतील, किसिंग करतील अजून काय? भारताबाहेर आलात तर हे सगळे सर्रास दिसते आणि कुणाला (लहान मुलांना पण) त्याचे कौतुक नाही. भारतात पण घरात टीव्हीवर लहान मुले हे सगळे बघतातच. त्याच्यासाठी इतके मोरल पोलिसिंग, पोलिसांच्या ताब्यात द्यायची भिती किंवा थेट मारहाण कशाला?

दुर्गविहारी's picture

1 Aug 2017 - 10:33 pm | दुर्गविहारी

आपले उदारमतवादी विचार समजले. ह्या तरुण, तरूणीना बाहेर पडून फिरायला कोणीही अडवत नाही किंवा नुकतेच लग्न झाल्यामुळे असणारे एकमेवांविश्यी नैसर्गिक आकर्षण समजू शकतो. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही गोष्टींची काळजी घेण गरजेच आहे. काही शिस्त सांभाळणे आवश्यक आहे. आपल्या चाळ्याचा ईतराना त्रास होउ न देण तर आपण करू शकतो ना? मंदिराजवळ असताना आपला प्रेमाचा उमाळा आवरता येईल ना? बाकी बंद खोलीत तुम्ही काय करताय ह्यावर कोणी आक्षेप घेत नाहिये. भारताबाहेर काहिहि चालत असले तरी आपण ह्या गोष्टी करताना भारतात आहोत याचे भान ठेवायलाच हवे. हे प्रकार करताना कित्येकदा एकांतात या जोडप्याना गाठून गुंडानी लुटण्याची किंवा भावना चाळवल्या जाउन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. आपण या गोष्टीना निमंत्रण देणार आहोत्?त्याना या आधी चांगल्या भाषेत समजावले होते. आणि मिठ्या मारुन फिरायला महाबळेश्वर, माथेरान आहेतच. अखिल महाराष्ट्राला वंदनीय रायगडावर हे करायची गरज नव्हती.
बाकी सार्वजनिक जागी किसिंग, प्रेसिंग हे चाळे कायद्याने गुन्हा आहेत हे माहिती असेल अशी अपेक्षा करतो. पोलिसाची अश्या ठिकाणी चक्कर झाली हे प्रकार बंद होताना दिसतात, म्हणजे आपण काही चुकीचे करतोय हे यांना समजतय. भारतात मुलाबरोबर हे चाळे असलेले कार्यक्रम बघितली जातात हा निष्कर्ष कश्याच्या आधारावर काढला? आणि मुलांसमवेत असताना ईतर कुटूंबानी हे निमुटपणे चालवून घ्यावे अशी अपेक्षा तुम्हाला गैर वाटत नाही.

बाकी सार्वजनिक जागी किसिंग, प्रेसिंग हे चाळे कायद्याने गुन्हा आहेत हे माहिती असेल अशी अपेक्षा करतो. >>> हे मला माहीत न्हवते.
प्रश्न उदारमतवादी विचारांचा नाही, संकुचित मनोवृत्तीचा आहे. मिठ्या मारणे तर दूरची गोष्ट, भारतात तर नवरा-बायको हातात हात घालून गेले तरी संस्कृतीरक्षकांना चालत नाही.

कित्येकदा एकांतात या जोडप्याना गाठून गुंडानी लुटण्याची किंवा भावना चाळवल्या जाउन मुलीवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत. >> या अशा घटना भारतातच नाही तर भारताबाहेरपण होतात. सुनसान जागी कुणीही लुटला जाऊ शकतो, बलात्कार किंवा विनयभंग होऊ शकतो. तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?

मिठ्या मारुन फिरायला महाबळेश्वर, माथेरान आहेतच. अखिल महाराष्ट्राला वंदनीय रायगडावर हे करायची गरज नव्हती. >>> गडांवर जाऊन दारूपार्ट्या करणे, तिथे जाऊन आरडा-ओरडा करणे, घाण करणे या गोष्टी करताना भान ठेवले जाते का?

भारतात मुलाबरोबर हे चाळे असलेले कार्यक्रम बघितली जातात हा निष्कर्ष कश्याच्या आधारावर काढला? >>> टीव्हीवर काय प्रोग्राम दाखवतात ते मी स्वतः पाहिले आहे. शिवाय भारतात पॅरेंटल कंट्रोल्स ("V-Chip") किंवा प्रोग्राम रेटिंग प्रकार माझ्या माहितीत तरी नाहीत किंवा वापरले जात नाहीत. अन्यथा "मुन्नी बदनाम हुई" आणि "चोली के पिछे क्या है" सारखी गाणी प्राइम टाइममध्ये सर्रास दाखवली गेली नसती. का ही गाणी "चाळे" या सदरात बसत नाहीत?

भारतात तर नवरा-बायको हातात हात घालून गेले तरी संस्कृतीरक्षकांना चालत नाही.>>
माझे मत फक्त माझ्या अनुभवापुरते सांगितले आहे. सार्वजनिक जागी वावरताना किमान ईतरांनी आक्षेप घ्यावे असे वागु नये हे सांगावे लागते हे खरेच दुर्दैवी आहे. बर मग्न झालंय म्हणजे आयुष्यभर तुम्ही एकमेकांसोबत असणारच आहात ना?
हे असले चाळे करणारे बघून मुंबईला नॅशनल पार्कमधे बर्‍याच बलात्काराच्या घटना झाल्या होत्या. त्याचा संदर्भ होता. घटना जुन्या आहेत त्याची लिंक मला सापडली नाही.
गडावर चालणार्‍या प्रत्येक आक्षेपार्ह गोष्टींचा मी कडाडून विरोध करतो. या धाग्याशी काही संबध नव्हता म्हणून त्याचा उल्लेख केला नाही ईतकेच.
तुमच्या घरात असणार्‍या टि.व्ही. वर काहीही दाखविले जात असेल पण कोणते चॅनेल बघायचे यावर तुमचे नियंत्रण नाही? चॅनेल ब्कॉक करू शकतोच ना? आणि टि.व्ही. वर काहिही दाखविले जाते म्हणून प्रत्यक्षात या घटना मुलांसमोर धरबंद न ठेवता व्हाव्यात असे तुमचे म्हणने आहे काय?
बाकी धाग्याचा मुळ उद्देश, स्वताचे न्युड व्हिडीओ केवळ आपला मित्र सांगतोय म्हणून शेअर केल्याने होणार्‍या नुकसानाला त्या मुलीलाच तोंड द्यावे लागते हा असून केवळ एकच वाक्य उचलून त्यावर गदारोळ घालणारे सदस्य बघून कीव आली. मि.पा.वर हा धागा टाकायचा धागाकर्याचा उद्देश केवळ या माध्यमातून या अश्या मुलींपर्यंत हा संदेश पोहचला तर किमान आयुष्यात पुढे होणारे नुकसान टळेल ईतकाच आहे. त्याबध्दल काही चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.

अत्रे's picture

2 Aug 2017 - 12:54 pm | अत्रे

@दुर्गविहारी

गडावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी नवरा बायकोने - किंवा प्रेमी युगुलाने, हातात हात धरून चाललेले पाहिल्यास तुम्ही विरोध करता का?

एक चार जणांचा ग्रुप होता. दोन मुले व दोन मुली. त्यात एक नवीन लग्न झालेले जोडपे होते. ठिकठीकाणी एकमेकाच्या गळ्यात हात घालून फोटो काढणे चालू होते. सुरवातीला मी दुर्लक्ष केले. मात्र जगदीश्वर परिसरातही हेच चाळे सुरु झाले. मंदिर परिसरात आपण आहोत याची साधी जाणीव त्याना नव्ह्ती. हेच चाळे करायचे होते तर महाबळेश्वर , माथेरान आहेच. ईथे मी आक्षेप घेतला. मग मात्र गड बघायला(?) आलेले हे तथाकथित पर्यटक मागे वळून न बघता परतीच्या वाटेला लागले.

जमल्यास सविस्तर वाचायची सवय लावून घ्या. तरिही आपल्या सोयीसाठी माझी प्रतिसाद पुन्हा इथे चिकटवलाय. आपल्याला यात कुठे वाचायला मिळाले कि निव्वळ विवाहीत जोडप्यानी हातात हात घेतला याला मी आक्षेप घेतला. मी सुध्दा सुरवातीला दुर्लक्ष केल परंतु मंदिर परिसराला आणखी काही महत्व आहे, पावित्र्य आहे. तिथेही तुम्ही वागण्यावर नियंत्रण आणत नाही म्हणल्यानंतर सुचना देणे भाग पडले. बरे मी काही गड बघु नका किंवा परत जा असेही सांगितले नव्हते. बर याबध्द्ल ना त्याना खंत ना खेद. ईतके झाल्यानंतर एखाद्याने शांतपणे उरलेली ठिकाणे पाहून परतीची वाट पकडली असती, हे टोळके निर्लज्जासारखे हसत तिथून गेले. यांना टाईमपास करायचा होता. यासाठीच मी लिहीले आहे कि यांनी महाबळेश्वर किंवा माथेरान अश्या ठिकाणी अशी वर्तणूक केली असती तर मला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नव्हते.

आपल्याला यात कुठे वाचायला मिळाले कि निव्वळ विवाहीत जोडप्यानी हातात हात घेतला याला मी आक्षेप घेतला

मी असे म्हटलेच नाही की तुम्ही हात धरण्याला आक्षेप घेतला! मी फक्त विचारले , विरोध करता का म्हणून (कारण तुम्ही त्या कोटेशन ला वरती उत्तर दिले त्यातून मला कळले नव्हते). इन जनरल प्रश्न होता, त्या विशिष्ट घटनेबद्दल नव्हता. गैरसमज झाला असल्यास क्षमस्व.

शब्दबम्बाळ's picture

2 Aug 2017 - 1:24 pm | शब्दबम्बाळ

आपल्या गडांविषयीच्या भावनांचा आदर आहे पण एक सांगा... इतिहासात कधीच कोणी गडावर स्त्रीचा हात धरला नसेल?
इतिहासात कधीच कोणी गडावर एकमेकांना मिठी मारली नसेल?
पावित्र्य पावित्र्य जे सांगितलं जाते ते नक्की काय आहे? आणि कोण ठरवत हे पवित्र ते अपवित्र वगैरे?
एखाद्या लहान मुलाला कडेवर घेऊन प्रेमाने त्याचे चुंबन घेणारी आई अपवित्र कृत्य करत आहे म्हणाल का?
मग एखाद्या युगुलाने प्रेमभावनेने हे कृत्य केले तर ते अपवित्र कसे होते? याला काही विशेष नियम आहेत का?

भारतात लोकांना कुठल्याही बागेत अशी कृत्य केलेली चालत नाहीत, गडावर चालत नाहीत, घराबाहेर चालत नाहीत, हॉटेलच्या बंद खोलीत केली तरी पोलीस धाडी टाकून काहीही करू शकतात!(मुंबई मध्येच झालेलं हे!)
मग भारतात अशी कुठली जागा राहते हो वयात येणाऱ्या तारुण्यसुलभ भावना असलेल्या मुलांना व्यक्त व्हायला??
का त्यांनी व्यक्त व्हायचाच नाही कारण "आम्हाला" ते अपवित्र वाटते किंवा आक्षेप घेण्यासारखे वाटते?!
कधीपासून असे वाटू लागले भारतात? काही इतिहास वगैरे आहे का याला?

उद्या एखाद्या गटाला मुलाने मुलीशी बोलणे देखील आक्षेपार्ह वाटू लागले कि "फटके" द्यायचे का असे करणार्यांना?

आणि मी म्हणेन कि मग असे आक्षेप असणार्यांनीच पुढाकार घेऊन अशी उद्याने बनवावीत जेथे फक्त तरुण जाऊ शकतील मग! म्हणजे त्यांना बाकी कुठे जायला लागायचे नाही!

आणि एक चहावाला जर भारताचा पंतप्रधान होऊ शकतो तर आज "लायकी" नसणारा मुलगा/मुलगी उद्या काहीतरी करून दाखवणारच नाही असे का वाटावे? त्यांना उभे राहण्यास पाठबळ द्यावे उलट!

दुर्गविहारी's picture

2 Aug 2017 - 6:21 pm | दुर्गविहारी

तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे. तुमच्याच कुठल्या वाक्याचा संदर्भ कशालाच लागत नाही.
इतिहासात कधीच कोणी गडावर एकमेकांना मिठी मारली नसेल?
पावित्र्य पावित्र्य जे सांगितलं जाते ते नक्की काय आहे? आणि कोण ठरवत हे पवित्र ते अपवित्र वगैरे?
एखाद्या लहान मुलाला कडेवर घेऊन प्रेमाने त्याचे चुंबन घेणारी आई अपवित्र कृत्य करत आहे म्हणाल का?
मग एखाद्या युगुलाने प्रेमभावनेने हे कृत्य केले तर ते अपवित्र कसे होते? याला काही विशेष नियम आहेत का?

ईतिहासाचे उदाहरण घ्यायचे असेल तर बाजीराव मस्तानीचे आहेच. पण त्यांनी कुठल्या गड किल्ल्यावर मिठ्या मारुन बसल्याचा अस्सल पुरावा आपल्यापाशी आहे का? उलट पुणे-सासवड रस्त्यावर दिवे घाटाजवळ बाजीरावने मस्तानीसाठी "मस्तानी तलावाची" उभारणी केली, तिथे ते निसर्गाचा आनंद लुटत.
बाकी पावित्र्य , आईच्या कडेवरचे मुल असल्या कश्याचा कश्याशी संबध नसणार्‍या गोष्टींच्या व्याख्या आपणच करा आणि मग मला सांगा.

भारतात लोकांना कुठल्याही बागेत अशी कृत्य केलेली चालत नाहीत, गडावर चालत नाहीत, घराबाहेर चालत नाहीत, हॉटेलच्या बंद खोलीत केली तरी पोलीस धाडी टाकून काहीही करू शकतात!(मुंबई मध्येच झालेलं हे!)
मग भारतात अशी कुठली जागा राहते हो वयात येणाऱ्या तारुण्यसुलभ भावना असलेल्या मुलांना व्यक्त व्हायला??
का त्यांनी व्यक्त व्हायचाच नाही कारण "आम्हाला" ते अपवित्र वाटते किंवा आक्षेप घेण्यासारखे वाटते?!
कधीपासून असे वाटू लागले भारतात? काही इतिहास वगैरे आहे का याला?
केवळ शांतपणे गप्पा मारणार्‍या युगुलाला त्रास दिल्य्याची घटना तुम्ही सांगु शकाल? उगाच जाहीरपणे चुंबाचुंबी सुरु केली कि आक्षेप येणारच.
गडावर काय किंवा बागेत काय किंवा ईतरत्र काय, भारतात निदान मोकळेपणावर बोलण्याला काही बंधन नाही. तुम्ही ईतरांना आक्षेपार्ह वाटेल असे वर्तन केले तर ते पाँईट आउट केले जाणार. बंद खोलीत धाडी पड्ल्या म्हणताय, असे त्या बंद खोलीत काय घडतय जे कायद्याच्या रक्षकांना आक्षेपार्ह वाटतय? नक्कीच काहीतरी चुकीचे होत असणार म्हणूनच धाडी पडणार ना. तुम्हाला घर असताना लॉजमधे काय करताय? बरे हे लॉजही ठराविकच असतात. तिथे तुम्ही काय करताय हा प्रश्न पोलिसानी विचारू नये काय?

उद्या एखाद्या गटाला मुलाने मुलीशी बोलणे देखील आक्षेपार्ह वाटू लागले कि "फटके" द्यायचे का असे करणार्यांना?
हा दिव्य शोध आपणच लावलाय, मी नाही. आजअखेर तीनशे ट्रेक केले असतील आणि बर्‍याच ट्रेकमधे मुली सोबत होत्या. उलट त्याना गडावर काही त्रास होउ नये याचीच आम्ही काळजी घेतली आणि हो त्यात काही प्रेम असलेल्या जोड्याही होत्या.पण पुर्ण ट्रेकमधे कोणी मिठ्या मारून फोटो काढलेत किंवा ईतर काही चाळे केलेत असे कधीही झाले नाही. आपण जातोय ती विरभुमी आहे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हि भावना कायम मनात असायची.

आणि मी म्हणेन कि मग असे आक्षेप असणार्यांनीच पुढाकार घेऊन अशी उद्याने बनवावीत जेथे फक्त तरुण जाऊ शकतील मग! म्हणजे त्यांना बाकी कुठे जायला लागायचे नाही!
खुशाल बनवा. असल्या पीडा जिथे जातील तिथे बघायला लागणार नाही. काय तो कचरा एकाच जागी राहिल.

आणि एक चहावाला जर भारताचा पंतप्रधान होऊ शकतो तर आज "लायकी" नसणारा मुलगा/मुलगी उद्या काहीतरी करून दाखवणारच नाही असे का वाटावे? त्यांना उभे राहण्यास पाठबळ द्यावे उलट!
नक्कीच कतृत्ववान निघतील. पण त्यानी आपले कतृत्व आपल्या क्षेत्रात दाखवावे, जाहीर चाळे करण्यात नाही.

बाकी यानंतरचे उप प्रतिसाद थोडे विचारपुर्वक लिहाल आशी आशा करतो, अन्यथा त्यांना फाट्यावर मारण्यत तेईल.

इतकं पण काही अवघड नव्हतं...
आता तुम्ही हे किल्ल्यांचं/मंदिरांचं पावित्र्य म्हणता ते नेमके काय म्हणायचे? आता भारताच्या दक्षिणेकडे मंदिराच्या भिंतीवर कसल्या कसल्या मुर्त्या असतात. सगळे पाहतात ते... पण ते मंदिर पवित्र राहत का मग?
हा देखील आपलाच इतिहास आहे ना? मग अचानक मिठी मारणे किंवा चुंबन घेणे या गोष्टी "आपत्तीजनक"/हिडीस वगैरे कधीपासून समजल्या जाऊ लागल्या याची काही माहिती आहे का आपल्याकडे? नाही म्हणजे अशा युगुलांना दम देणारे/मारहाण करणारे जणू आम्ही आमचा इतिहास वाचवतोय अशा थाटात असतात! नक्की कुठल्या कालखंडापासून कुठल्या कालखंडापर्यंतचा इतिहास हे देखील सांगावे मग...

का केवळ "काही" लोकांना वाटत हे वाईट्ट आहे म्हणून ते "आपत्तीजनक" मानायचे सगळ्यांनीच?
या गोष्टीला काहीच कारण/इतिहास नसेल तर मग काय खात्री कि उद्या या लोकांना मुलं-मुली एकत्र फिरण्यावर पण आक्षेप यायचा नाही?

आणि ते उदाहरण म्हणाल तर, सार्वजनिक ठिकाणी आई तिच्या मुलाचा प्रेमाने पापा घेत असेल तरी पण संस्कृतीरक्षक जाऊन सांगतात का कि आम्हाला आक्षेप आहे या कृतीवर? नसतील तर असे का बरे? आक्षेप कृतीवर आहे ना? का फक्त मुलं-मुलींनी असे केले कि धरणी दुभंगते वगैरे...

पण पुर्ण ट्रेकमधे कोणी मिठ्या मारून फोटो काढलेत किंवा ईतर काही चाळे केलेत असे कधीही झाले नाही. आपण जातोय ती विरभुमी आहे

नाही म्हणजे मिठी मारण्यावर तुम्हाला काय आक्षेप आहे हे माझ्या आकलन क्षमतेच्या पलीकडे आहे!! गड-किल्ले वीरभूमी आहे ठीक पण तिथे लोक राहातच नव्हतेच का? स्त्री पुरुष एकत्र राहायचे नाहीतच का? कधी कुठले मुलं जन्माला आलेच नाही का? (हे बंद खोलीत झाले असेल असे म्हणालात तर तो मुद्दा खाली आहे) मग नक्की असे कोणते दिव्यत्व त्यांना आत्ता प्राप्त झालाय? का हे दिव्यत्व काही लोकांच्या विचारात आहे आणि आम्हाला किल्ल्यांकडे "अशाच" दृष्टीने बघायचंय म्हणून बाकीच्यांनी पण तसेच वागलं पाहिजे असे अलिखित नियम हवेत! कुठल्याही गोष्टीच अवडंबर वाईटच...
मारली मिठी कोणीतरी समजा तर असा कोणता बुरुज कोसळणार आहे?

वरच्या प्रतिसादात बंद खोलीत करा काय करायचंय असे म्हणणारे तुम्ही आता म्हणता घर सोडून बाहेर का जायचं असत?!

तुम्हाला घर असताना लॉजमधे काय करताय?

कहर आहे राव!! कोणी कुठं जायचं हे ते ज्यांना जायचंय ते ठरवतील! बाकीचे नाक खुपसणारे कोण?

ते कायद्याचे रक्षक यांनी जे दिव्य काम केलं होत हॉटेलच्या बंद खोल्या उघडून युगुलांना सतावून त्यावर हाय कोर्टाने फटकारलंय बर का "त्या रक्षकांनाही"
ILLEGAL, INTRUSIVE, UNCONSTITUTIONAL: HIGH COURT ON MADH MORAL POLICING
वाचा ही बातमी, जो कायदा वापरून (Section 110 ) पोलिसांनी असली कारवाई केली होती तो वापरण्यावर बंदी आणली गेलीये! आणि समिती नेमण्यात आली होती पोलिसांवर कारवाई साठी...
न्यायालयाने स्वतःहून युगुलांना फटके देणाऱ्यांना दिलेल्या फटाक्यांच्या दुप्पट फटके देण्याचा कायदा केला तर बाकीचे "रक्षक"पण शांत होतील.

त्यामुळे "नक्कीच काहीतरी चुकीचे होत असणार म्हणूनच धाडी पडणार ना." या वाक्याला काहीही अर्थ नाही! ही एकंदरीत मानसिकता आहे, जी स्वतःच्या संकुचित विचारांमुळे इतरांना कसे वागायचे हे शिकवत असते!

जी माहिती मी वाचली आहे त्यानुसार Section 294 जो आक्षेपार्ह कृतींसाठी आहे त्यात चुंबन अथवा मिठी यांचा स्पष्ट उल्लेख नाहीये पण संदिग्धतेमुळे तो कसाही वापरला जाऊ शकतो! भविष्यात त्यावर देखील कारवाई होईल अशी अपेक्षा आहे! तज्ज्ञांनी भर घालावी...

खुशाल बनवा. असल्या पीडा जिथे जातील तिथे बघायला लागणार नाही. काय तो कचरा एकाच जागी राहिल.

जास्त काही नाही यावर बोलायला पण घराबाहेर मिठी मारणारे अथवा चुंबन घेणारे "कचरा" असतात हि नवी माहिती मिळाली! पण मी म्हणतो अशा लोकांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावायला मग "रक्षकांनीच" पुढाकार घ्यावा मग! कारण आपत्ती त्यांनाच आहे...

बाकी पुढचा प्रतिसाद देण्याआधी विचार कराल अशी अपेक्षा आहे...

राही's picture

3 Aug 2017 - 3:48 pm | राही

मलाही प्रत्येक ठिकाणी पावित्र्याचा जयघोष करणे फारसे पटत नाही. स्वच्छता राखा, शांतता राखा हे योग्यच आहे. पण गडावर अमुक खाऊ नका, तमुक खाऊ नका हे काय आहे? गडकिल्ले जेव्हा जितेजागते होते तेव्हा काय तिथे कोंबडे-बकरे कापले गेले नसतील? जिथे अजूनही वसती आहे तिथे काय होत असेल?
तिथे काय मुले जन्माला आल्यामुळे पावित्र्यभंग होत असेल?
आलिंगन, चुंबन, हातात हात घेणे या अगदी साध्या गोष्टी आहेत. त्यापुढच्या गोष्टी चारचौघात कोणी करीत नाही. केले तर ते निखालस अयोग्य आहे. पण ते सार्वजनिक सभ्यता राखली जावी म्हणून. पावित्र्यभंग होतो म्हणून नव्हे.
काही शहरांमध्ये एखादे स्थान तीर्थ/क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असते. पण ते संपूर्ण शहरच 'पवित्र क्षेत्र' घोषित करून खाण्यापिण्याचे नियम जारी करण्याने काय साधते? उद्या अख्खे नाशिक शहर 'पवित्र क्षेत्र' बनले तर काय होईल?
मुख्य प्रश्न स्वच्छता, शांतता आणि सुव्यवस्थेचा आहे.

प्रसाद_१९८२'s picture

3 Aug 2017 - 4:52 pm | प्रसाद_१९८२

मुळात हे पावित्र्य, गडावर मांसाहार करु नये वगैरे गोष्टी,
आजकालच्या इंटरनेटछाप स्वंयघोषीत ट्रेकर्स(?) लोकांच्या डोक्यातली उपज आहे. बाकी जेंव्हा गड वापरात होते, शिवकाळातच नव्हे तर संस्थाने खालसा होईपर्यंत गडावर मांसाहार, मद्यपान वगैरे गोष्टी सर्रास होत असतील.

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Aug 2017 - 11:30 am | हतोळकरांचा प्रसाद

काय आहे- तिथे राहून कर्तव्य बजावताना शिवकाळातील लोकांनी केलेल्या गोष्टी आणि चैन म्हणून गडावर जाऊन केलेल्या दारूपार्ट्या यातला फरक समजावून घेणे गरजेचे वाटत नाही का? शिवकाळातील लोकांनी केलेल्या पराक्रमाच्या खुणा म्हणून आपण गड-किल्यांकडे बघतो. पावित्र्य वगैरे सोडा, पण आदर तर असेलच ना? आपल्या घरातल्या मोठ्या लोकांबद्दल आदर असतो म्हणून आपण आपल्या घरात दारूपार्ट्या मांडून नाही बसत, मग जी आदराची स्थळे, ठिकाणे आहेत तिथे हाच न्याय का लावता येऊ नये? गडावरील त्याकाळातील लोक मलविसर्जन करीतच होते ना म्हणून आज गडावर हागणदारी करणे योग्य होईल काय?

प्रसाद_१९८२'s picture

4 Aug 2017 - 12:46 pm | प्रसाद_१९८२

गडावरील त्याकाळातील लोक मलविसर्जन करीतच होते ना म्हणून आज गडावर हागणदारी करणे योग्य होईल काय?

==

खालील लेख बघा, मग कळेल सुट्ट्यांच्या दिवसात, हे तथाकथित ट्रेकर्स किल्ल्यांची काय अवस्था करतात ते.

https://www.maayboli.com/node/39036

arunjoshi123's picture

4 Aug 2017 - 12:53 pm | arunjoshi123

हे वाईट आहे ना? तेच तर म्हणायचं आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

4 Aug 2017 - 3:50 pm | हतोळकरांचा प्रसाद

एक्झॅक्ट्ली! ट्रेकर वि. प्रेमी युगुल हा मुद्दाच नाहीये इथे! ट्रेकर आहेत म्हणून त्यांनी घाण करावी असा मुद्दाही दुर्गविहारींनी मांडलेला दिसत नाही. मुद्दा साधा आहे ज्यांना ह्या गोष्टींची जाणीव नाहीये त्यांना जाणीव करून द्यावीच लागते. प्रत्येक वेळेला ती फक्त हिंसेने किंवा फक्त अहिंसेनेच करता येईल असे नाही.

कृपया आपण मजकुर पुर्ण वाचायची सवय लावून घ्या म्हणजे अश्या असंबध्द प्रतिसाद येणार नाहीत. आणि जमल्यास थोडा आभ्यास वाढवा म्हणजे वर आपण जसे प्रतिसाद दिलेत तसे पुन्हा होणार नाहीत.
आता तुम्ही ट्रेकर देखील घाण करतात ह्या अर्थाची लिंक दिलेली आहे. हि लिंक तुम्ही पुर्ण प्रतिसादासहीत वाचली तरी आहे का?
हे पहिलेच वाक्य घ्या.
" तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट"
वर मी बोल्ड केलेल्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल. तथाकथीत याचा अर्थ नीट माहिती आणि किमान शिस्त न पाळता आलेले ट्रेकर (याना ट्रेकर म्हणणेही अयोग्यच होईल). ह्या हौशी लोकांनी शिस्त पाळली नाही म्हणून हा धागा काढला आहे. एकदा सगळा धागा पुर्ण वाचा आणि मग अश्या लिंक द्या.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

उपेक्षित's picture

2 Aug 2017 - 8:56 pm | उपेक्षित

@ दुर्गविहारी ....

वरती शब्दबंबाळ यांनी तुमच्या विषयी सुरवातीलाच आदर व्यक्त करून प्रतिसाद दिला होता मग उगाच त्यांना फाट्यावर मारण्यात येईल वगेरे म्हणून हिणवण्याचा उद्देश कळला नाही कुणाला.
कसय तुमच्या कामाविषयी तुम्हाला असेल कौतुक आणि तुम्ही ३०० ट्रेक केले का ३००० केले याच्या शी इथल्या कुणाला काही घेणे देणे नाही पण किमान समोरचा तुमचा आदर करून प्रतिसाद देत असेल तर त्याचा आदर करा , ३०० ट्रेक करून महाराजांचा हा गुण घेता आला नसेल तर मग कठीण आहे.

आपला (जश्यास तसे उत्तर देणारा) उपेक्षित.

अतिशय समर्पक प्रतिसाद सायबाणु, पटले आपल्याला.

उपेक्षित's picture

2 Aug 2017 - 8:50 pm | उपेक्षित

शब्दबंबाळ यांना मागचा प्रतिसाद होता

उपयोजक's picture

2 Aug 2017 - 3:49 pm | उपयोजक

केवळ एकच वाक्य उचलून त्यावर गदारोळ घालणारे सदस्य बघून कीव आली.

मला तर सांगून सांगून कंटाळा आलाय. किव येण्यापुढचं काही असेल तर तेही आलंय!!!

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 4:07 pm | arunjoshi123

अहो, गदारोळ नक्की कशाबद्दल चाललाय हे तुमचाच धागा असून तुम्हालाच माहित नाही.
त्या कथेत अंततः त्या मुलीचं वाईट झालं आहे हा जो तुमचा प्रत्यक्ष अनुभव, माहिती इ इ आहे ती खरी नसून ती अत्यंत सुखात आहे आणि तुमचं तिच्या परिस्थितीबाबतचं अवलोकन चूक आहे असा प्रकार आहे. कळलं का?
लोकांनी कितीतरी प्रतिसादांत लिहिलं आहे - "ती गरीब आहे, सुखात आहे, फक्त तिला घरच्यांची आठवण येत आहे, नवर्‍यासोबत सुखी आहे, (कदाचित) आईबापाला घातलेल्या शिव्यांचा पश्चात्त्ताप आहे." पण मुलगा मनातनं उतरला वा त्याच्यासोबत पळ्याल्याचा पश्चात्ताप इ इ आहे असं कुठं नाहीच.
तसं उदारमतवादी लोकांना "त्या मारण्याचा" विसर पडला असता, पण जर तो मुलगा एक कुचकामी आणि पश्चात्ताप देणारा निर्णय असता तर!

ज्या मुली सधन घरात जातात त्या सुखीच असतात हा निकर्ष कशावरून काढला आहे लेखक महाशयांनी?

मुलीने घेतलेला निर्णय आततायीपणाचा का असेना पण तो सार्थ ठरवण्यासाठी तिने अपार आत्मविश्वास आपल्या नवऱ्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. ते करायचं सोडून मारझोड करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कचाट्यात सापडण्याची आणि मुलीची आणखी बदनामी होण्याची जास्त शक्यता आहे. हे जे काही मी लिहीत आहे ते सुद्धा माझ्या प्रत्येक्ष अनुभवातून केलेली गोळाबेरीज आहे. (प्रत्येक्षात घेतलेला अनुभव नंतर शेर करतो)
तुम्ही स्वतःच्या १० वर्षाच्या मुलांबाबत दिलेल्या उदाहरणात त्याने मोबाईल खेळणे नाही सोडले त्याला काय तुम्ही डांबून चाबकाचे फटके देणार का ?

मुलांचा पालकांवर विश्वास हवा आणि पालकांचा सुद्धा मुलांवर आदरयुक्त दरारा हवा तर अशा गोष्टी ना आळा बसू शकेल.

तुम्ही स्वतःच्या १० वर्षाच्या मुलांबाबत दिलेल्या उदाहरणात त्याने मोबाईल खेळणे नाही सोडले त्याला काय तुम्ही डांबून चाबकाचे फटके देणार का ?

अजिबात नाही. उदारमतवादी लोकांचा एक दरारा आहे आणि ते समोर नसले तरी पाहत आहेत या भितीपोटी मी हातही लावत नाही. (मराठी जालाचा सुपरिणाम!!)
==========================

मुलांचा पालकांवर विश्वास हवा आणि पालकांचा सुद्धा मुलांवर आदरयुक्त दरारा हवा तर अशा गोष्टी ना आळा बसू शकेल.

हवा मंजे काय?
समजा ६०% केसेस मधे आहे? उरलेल्या ४०% काय बोंबलत बसायचं?
"द ओन्ली सोल्यूशन ऑफ डीस्प्यूट रिझोल्यूशन इज अमिकेबल सेटलमेंट" हा काय सिद्धांत आहे?

वरुण मोहिते's picture

1 Aug 2017 - 6:33 pm | वरुण मोहिते

किल्ल्यांवरच्या भावनांना बाजूला काढून देत आहे लक्षात घ्या . ग्रामीण महाराष्ट्रात मुळात मुलींच्या भावनांना वाट मिळतच नाही . अगदी मुले पण घाबरतात फिरायला तर मुलींची काय कथा . हे वातावरण बदलून पहा पुढील १० वर्षात किती फरक पडेल . मैत्री ,प्रेम ह्या स्वाभाविक भावना आहेत. त्या दाबून ठेवल्याने अचानक अश्या गोष्टी घडतात . दुसरी गोष्ट कोणालाही अश्या वेळी बाजूला बसलेत काय करत असतील तरी जबरदस्ती खचितच नव्हती . अश्या वेळी मारहाण करून कोणाच्या मनावर काय परिणाम होतो ह्याचा विचार करावा . काही गोष्टी झाल्यात असतील ना मारहाणी च्या आधी हे आपले उत्तर सोयीस्कर आहे . तिसरी गोष्ट प्रत्येकवेळी माथेरान ,महाबळेश्वर ला जाण्याइतके पैसे सगळ्यांकडे असतील असं नाही . ह्याचा अर्थ काहीही करा बाहेर असे नाही पण मॉरल पोलिसिंग थांबवा . हिम्मत असेल तर पावसाळी ठिकाणी सार्वजनिक दारू पिणार्यांना धुमाकूळ घालणाऱ्या फाटकावून काढा . गुरासारखे मारा . पोलीस केस झाली तरी मी मदत कारेन नक्की .

उदय's picture

1 Aug 2017 - 8:40 pm | उदय

प्रेमभंग झाला म्हणून मुलीच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याचा प्रकार, हे एक टोक आणि तसेच मुलाला मारहाण करणे, हे दुसरे टोक. दोन्हीही बरोबर नाही.

या घटने पुरते बोलायचे तर जसे रोपवे चे पैसे घालून आडवळणाच्या रायगडावर या जोडप्याना येणे जमते, तसे सर्व दर्जाच्या आणि प्रकरच्या सोयी सुविधा असलेल्या माथेरान, महाबळेश्व्र अश्या ठिकाणी जाणे जमणार नाही असे आपल्याला वाटते. पैशाच्या प्रश्न नक्कीच नसवा. आणि या घटनेत मी मारहाण करायचा प्रश्नच आला नाही, फक्त त्यांना समजेल अश्या भाषेत सांगितल्याबरोबर त्यांनी काढता पाय घेतला. मुळात काही पहावे असा त्यांचा उद्देश नव्ह्ताच, फक्त एकांताचा गैरकायदा घेण्याची वॄत्ती दिसली.
बाकी यांच्या पेक्षा जास्त चीड दारू पिणार्‍या मंडळींची येती. हे एका दिवसात घाण करुन जातात आणि पुढच्या आठवड्या भराचे गड साफ करायचा कामाचा डोंगर निर्माण होतो. या लोकांची धुलाई बर्याचदा स्थानिक लोकांकडून झाल्याची उदाहरणे मी सांगु शकतो, पण परत धागा भरकटेल.
आणि वातावरण बदलायचे म्हणजे काय करायचे?असाच या प्रेमी युगुलांचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे नावे लिहून ठेवणे.
समजावून सांगुनही आपलाच ठेका चालू ठेवला कि मग समजणार्‍या भाषेतच सांगावे लागते.

ग्रामीण महाराष्ट्रात मुळात मुलींच्या भावनांना वाट मिळतच नाही .

म्हणजे नक्की काय काय होतं?

अजून एका सदस्यांनी असाच प्रेमज्वराचा अनुभव सांगितला.तो त्यांच्याच शब्दात.

मारहाणीचे अनुभव त्यांच्या एका ग्रुपमधील सदस्याचे आहेत.

अभिजीत अवलिया's picture

1 Aug 2017 - 6:56 pm | अभिजीत अवलिया

हम्म. साॅरी बर का केअशू साहेब. मी तुम्ही पण मारहाण करणार्या ग्रुप मधे होता असे समजल्याबद्दल.

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 7:43 pm | उपयोजक

धन्स अवलिया साहेब.मी दोन प्रसंग दिलेत पण सगळ्यांची चर्चा फक्त दुसर्‍या प्रसंगावरच का?

मारहाण करणं अयोग्य आहे.शिक्षा होऊ शकते हे माहित नसेलअसं वाटतंय का?

परिंदा's picture

1 Aug 2017 - 7:22 pm | परिंदा

केअशु,
तुम्हाला आणि तुमच्या मित्राला धन्यवाद.... त्या मुलीचा आणि तिच्या नवर्‍याचा "सैराट" न केल्याबद्दल!!

उपयोजक's picture

1 Aug 2017 - 7:53 pm | उपयोजक

सैराटचं उदाहरण चुकलंय. परशासारखा गरीब पण गुणवान पोरगा असता तर चाललंही असतं.पण इथे मुलगा उनाड,भंपक आहे. हा फरक लक्षात घेतलात तर बरं होईल.

त्या मुलाची परिस्थिती फार बिकट... अर्धवट शिक्षण.
आणि मुलीचे वडील मातब्बर, भाऊ सॉफ्टवेअर मध्ये, मोठी बहीण पण जॉबला... परिस्थिती ने तर जहागिरदार..

आता तुमच्या मते मातब्बर, जहागिरदार म्हणजे मुलगीचा तुम्हाला पुळका आणि मुलगा उनाड, भंपक कसा काय ते सांगा.

आणि एक लक्षात घ्या. तिचा निर्णय तिने घेतलाय. फळे चाखूदे. तिला आवडला. मग भले तो कसाही का असेना.

तुमची नक्की ईच्छा काय आहे ? तुमच्या आवडीच्या मुलाशी तिने संसार थाटायला हवा होता कां?

तुमच्या आवडीच्या मुलाशी तिने संसार थाटायला हवा होता कां?

बिंगो

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

1 Aug 2017 - 8:01 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

परींदाभाउ, अहो सैराट हा व्यवसायीक चित्रपट आहे व त्याचि मुख्य उद्देश पैसा कमावणे हाच होता. पैसा कमावण्यासाठी धक्कादायक, अतिरंजित कथानक व चित्रण लागतेच. याचा अर्थ महाराष्ट्रात उठता-बसता अशा गोष्टि घडतात असे नाही. त्यामुळे सैराट न केल्याबद्दल केअशु व त्यांच्या मित्रांना धन्यवाद देण्याची गरज नाही कारण ती आपल्या बहुतांषांची स्वाभाविक प्रवृत्ति नाही. अगदी उत्तरेतदेखील आता अशा घटना अपवादात्मक घडतात व काही झाले की च्यानलवाले त्याविषयी बातम्यांचा अनेक दिवस रतीब घालतात. आता, अशी एकही घटना घडु नये खरे तर. पण मग ती आदर्श व्यवस्था होईल व ते फक्त स्वप्नातच शक्य आहे.

वर बर्याच जणानी मोराल पोलिंसिंगसाठी गळे काढलेत, त्यांच्यासाठि दोन उदाहरणे देतो
१) आमच्याच अपार्टमेंट्मधे दुसर्‍या विंगमधे माझाच शाळामित्र रहातो. त्याची मुलगी आता आठवीत आहे. एका दुपारी घरात कोणी नसताना तीने तीच्या मित्राला घरी बोलावले. ती ,तीचा मित्र व शेजारीच रहाणारी तीची मैत्रीण असे तीघे गच्चीवर गेले. ते एका शेजारच्या फ्लॅट्मधे रहाणार्‍या व्यक्तीने बघीतले. काही शंका येउन ते मागोमाग गेले, तेव्हा ती व तीचा मित्र किसींग करीत होता व दुसरी मैत्रीण त्याचे व्हिडीओ शुटींग करीत होती, हा प्रकार पाहून त्या व्य्क्तीने तीच्या आई वडीलांना फोन केला ,नंतर सगळ्यांनी त्या मुलाला बदड्ले व त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले.
आज वरच्या प्रतिक्रीया वाचून मला कळले कि त्यांनी कित्ती घोर पाप केले. वास्तविक त्या व्य्क्तीने त्यांच्या मागोमाग जायलाच नको होते, गेल्यास तो जे प्रकार करीत होते त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे होते. शिवाय तीच्या वडीलांनी मारहाण करण्याएवजी त्या मुलाचे आभारच मानायला हवे होते, कारण परदेशात हे चालते ना! शिवाय सगळ्यांनी मिळून पाडगावकरांच्या कवितेचे सामुहिक वाचन करायला पाहिजे होते. आहाहा काय दृष्य असेल ना ते. पुढच्या वेळी असा काही प्रकार दिसला ना कि मी तरी मि.पा,च्या या घाग्याची प्रिंटाऔअट्च त्या मुलीच्या घरच्यांना देईन, म्हण्जे मुले काहिही करायला मोकळी. आता कोणी मुलगा कुठल्या मुलीची छेड काढली ना तर मी तरी अडवायला जाणार नाही, कारण," त्याने तीची छेड काढली, तुमचे काय गेल?" हा प्रश्न आहेच.
२) एका मुसलमान मुलाने माझ्या एका माहितीतील मुलीला ठरवून नादी लावले, ज्या दिवशी तीचा अठरावा वाढदिवस होता त्याच दिवशी पळून जाउन लग्न केल. आजही ती मुलगी दर्ग्या मोहल्लात कोंबड्यांची घाण काढताना दिसते. आज मि.पा.वरच्या प्रतिक्रिया वाचून कळले कि हे चालू द्यावे , नसते मोराल पोलिसिंग करू नये.

ते एका शेजारच्या फ्लॅट्मधे रहाणार्‍या व्यक्तीने बघीतले. काही शंका येउन ते मागोमाग गेले,

ठीकाय, आपण असं म्हणू की ह्या मागोमाग गेलेल्या व्यक्तीचा मुलगाच त्यात असता तर ह्या मागोमाग गेलेल्या व्यक्तीने काय केलं असतं?

उपयोजक's picture

2 Aug 2017 - 7:00 am | उपयोजक

माफ करा पण वरच्या मारहाणीच्या प्रसंगात इथल्याच कोणचीतरी बहिण,नातेवाइक असते तर काय झालं असतं? विचार करा.

आम्ही मारहाण न करता मुलीला समजावलं असतं वगैरे धाग्यावर लिहायला फार सोपं आहे त्यामुळे धाग्यावर समजुतदार,विवेकाने विचार करणारा अशी प्रतिमा होतही असेल पण प्रत्यक्षात मात्र असं काही घडलं तर झोडपणे,किंवा स्थानिक नगरसेवकाची मदत घेऊन त्या मुलाला बदडून काढण्याचा मार्गही अवलंबला जाईल एवढं नक्की!

बाकी चालू द्या!

पिलीयन रायडर's picture

2 Aug 2017 - 7:21 am | पिलीयन रायडर

कोण तुम्ही? नाही सांगाच की तुम्ही कोण???

उद्या समजा त्या मुलीचं रीतसर लग्न झालंही आणि त्यात तिला काही त्रास झाला तर घेणार का बहिणीची जबाबदारी? सांभाळणार का तिला?

दुसर्‍याला बदडुन काढायला काडीचीही अक्कल लागत नाही. म्हणुन ते करायला मजा वाटतेय. फक्त तुमच्या लेखी चूक असलं की बास. पण लागुन कोण गेले तुम्ही? कायद्याने तुम्हाला तुरुंगात का टाकु नये? मी असते ना त्या मुलीच्या जागी, तर एकेकाला मुस्काडात दिली असती आधी. आणा कोण नगरसेवक आणताय तो. हिम्मत कशी होते?? केस करायला हवी होती त्या मुलीने. हात तुटेस्तोवर मारता आणि वर तोंड करुन समर्थन करता?

आज लोकांना मारझोड होतेय.. उद्या जीव जाईल. (जो जातोच अनेक ठिकाणी..) तेव्हा काय करणार? घेणार का त्या मुलाची जागा? तिथे नाही सामाजिक कळवळा येत?

समजा कुणी चुकीचं वागत असेल तर आपण एखाद्याला समाजावुन सांगु शकतो. मारहाण नाही करु शकत. उगाच वाट्टेल त्या गोष्टीचे समर्थन करु नका.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Aug 2017 - 12:49 pm | हतोळकरांचा प्रसाद

त्या मुलीने का केस केली नसेल? एक उगी आपला अंदाज?

...मिपा वर पीर ताईंचा प्रतिसाद वाचला नसेल!

["जिभेचे हाड मोडले असेल!" या पु ल यांच्या "म्हैस " मधल्या वाक्याच्या चालीवर वाचावे ;)]

रामपुरी's picture

3 Aug 2017 - 6:57 pm | रामपुरी

"दुसर्‍याला बदडुन काढायला काडीचीही अक्कल लागत नाही"

छान छान.. दुसर्‍यांची अक्कल काढणारा एक आयडी गेला तरी त्याचा वारसा चालवणारे अजून आहेत हे पाहून परमसंतोष जाहला. चालू द्या

अच्छा, म्हणजे अशा वेळी उपयोगी पडतील म्हणूनच गुंड नगरसेवकांना निवडून आणतात वाटतं लोक! तरीच म्हटलं चांगली माणसं का निवडून येत नाहीत सहसा :)

प्रसाद_१९८२'s picture

2 Aug 2017 - 10:51 am | प्रसाद_१९८२

१) आमच्याच अपार्टमेंट्मधे दुसर्‍या विंगमधे माझाच शाळामित्र रहातो. त्याची मुलगी आता आठवीत आहे. एका दुपारी घरात कोणी नसताना तीने तीच्या मित्राला घरी बोलावले.

==

आता त्या मुलीनेच त्या मुलाला किसींग करायला स्वत:, घरी कोणीही नसताना बोलावले, तर त्यात मुलाचा दोष काय? आणि त्या मुलाबरोबरच, चूक मुलीची सुद्धा असताना फक्त त्या मुलालाच का बरे बदडले ?

दुर्गविहारी's picture

2 Aug 2017 - 12:26 pm | दुर्गविहारी

सविस्तर मी लिहीत बसलो नाही. पण त्या मुलीलाही बदडले तिच्या घरच्यानी आणि आता बरीच सरळ वागती आहे.
बाकी मुलाचा काय दोष असे आपण म्हणता? आधी बाहेर कुठेतरी किंवा शाळेत यांचे प्रकरण चालू झाले असले पाहिजे नाहीतर ती मुलगी उगाच कोणालाही बोलावून घेणार आहे का? आणि ईतके आंमत्रण आहे ह्या त्या मुलाला न कळण्याईतका तो भोळा होता असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

आणि ईतके आंमत्रण आहे ह्या त्या मुलाला न कळण्याईतका तो भोळा होता असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

तुम्हाला त्या वयात आमंत्रण मिळालं असतं तर तुम्ही काय केलं असतं याचा शांतपणे विचार करुन बघा एकदा.

वैयक्तिक हल्ले सुरु झालेत त्यामुळे मी थांबतो. मुद्दे नसल्यामुळेच हा प्रतिसाद आलाय असे गृहित धरतो. घडलेली घटना मी सांगितली उगाच त्या व्यक्तीचा मुलगा असेल तर, मुलगी असेल तर, भाचा असेल तर अशी कितीही लांबड लावता येईल. आपण खुशाल कल्पनाचित्र रंगवत बसावे. माझ्या मते त्या मुलाचा आणि मुलीचा दोघांचाही या प्रकरणात सारखाच दोष आहे. दोघेही अजुन आठवीत, म्हणजे शाळेत शिकत आहेत. शिक्षण हा मुळ उद्देश बाजुला ठेवून हे धंदे करायची गरज नाही.
बाकि आपल्याकडून हि अपेक्षा नव्हती. काही विचारपुर्वक प्रतिसाद आला तर उत्तर देवू आणि फाट्यावर मारण्याचा पर्याय आहेच.

बाकि आपल्याकडून हि अपेक्षा नव्हती

आमचीदेखील.

प्रसाद_१९८२'s picture

2 Aug 2017 - 12:59 pm | प्रसाद_१९८२

आणि ईतके आंमत्रण आहे ह्या त्या मुलाला न कळण्याईतका तो भोळा होता असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

<<

अहो अश्या वयात सर्वसाधरण मुले, अश्या प्रकारच्या आमंत्रणाची वाट देखिल पाहत नाहीत. तुमच्या कहाणीत तर त्या मुलींनी समोरुन आमंत्रण दिलेय, आता त्या मुलाच्या वयात असे आमंत्रण न स्विकाराणा मुलगा अगदीच बावळट म्हणावा लागेल.

शिवाय तीच्या वडीलांनी मारहाण करण्याएवजी त्या मुलाचे आभारच मानायला हवे होते, कारण परदेशात हे चालते ना!

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने परदेशी संस्कृती हीच देशाची प्रिस्क्राइब्ड संस्कृती म्हणून केव्हाची नोटिफाय केली आहे. असता कुठे?

वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात मुलीची पण तेवढीच चूक (चूक म्हणा, किंवा इच्छा म्हणा, सहभाग म्हणा), दिसतोय. असं असताना फक्त त्या मुलाला भंपक इ इ विशेषण आणि ती मात्र चांगल्या घरची मुलगी असं विभाजन जरा मजेशीर वाटतंय.

बऱ्याच उदाहरणात फक्त शारीरिक आकर्षण असतं, आणि पालकांच्या विरोधामुळे, आणि अडनिड्या वयात ते साहसी इ वाटत असल्यामुळे मुलं हट्ट सोडत नाहीत. मारून तर परिस्थिती अजूनच बिघडण्याची शक्यता असते.

माझी एक काकू म्हणायची, तुम्ही तरुण मुलं आमच्यावर चिडलेली असता, का स्वतःवर चिडलेली असता का दुनियेवर तेच कळत नाही. अडनिड्या वयातले शारीरिक बदल कोणालाही (मुलगा / मुलगी) विचित्र वागायला लावू शकतात. १-२ उपाय सुचवते. मारामारी अजिबातच करू नका, घराबाहेर कुठलीही गोष्ट जाण्या आधी हे करून बघा जमलं तर.

"आमच्या मित्राला ३ बहीणी आहेत... त्यातली ही दुसरी! " या उदाहरणात, मी तर म्हणते त्या मुलीला घेऊन , त्या मुलाच्या घरी (मोठा भाऊ, बहीण इ च्या सोबतीने), त्या मुलाच्या घरी चक्कर मारायला लावावी, आणि तिथे जे-जे काही आपल्या घरापेक्षा वेगळं दिसतं, ते ते आपल्या घरी करायला लावावं. उदा, त्या मुलाच्या घरी त्याची आई-बहीण भांडी घासत असेल आणि मुलीच्या घरी या सगळ्याला बाई असेल, तर मुलीला सांगावं, "बघ बाई, तुला ह्याच मुलाशी लग्न करायचं आहे तर या सगळ्याची सवय घे", तिने काही नवीन मागितलं तर "आत्ता आम्ही देऊ शकू, पण लग्न झाल्यावर तुला बहुतेक काटकसरीची सवय करावी लागेल असं दिसतंय, तर तू आत्तापासूनच सवय केलेली बरी, ही ४ कामं कर (सरळ घरातली धुणी-भांडी, केर-फारशी करायला लावावी), तुला आपल्या कामवाल्या बाईंना देतात तेवढे पैसे देते, त्यात काय जमेल ते - हवं ते विकत घे, आणि तसं जगायची आत्तापासून सवय लावून घे, कारण तू आमच्या मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे आम्ही तुला आर्थिक मदत नक्कीच करणार नाही, आणि हा मुलगा चांगला असेलही पण फार काही पैसे कमावेल असं वाटत नाही". मुलगी खरंच प्रेमात असेल तर ती यातून पण नक्की मार्ग काढेल, नसेल तर काय तो निर्णय घेईल. आणि शांतपणे तू आमचं ऐकलं नाहीस तर, आमची जवाबदारी नाही हे सतत सांगत राहावं.

आणि मुलगा किंवा मुलगी कोणीही खूपच काही चूक करतायत तर नीट आणि अधून -मधून बोलून दाखवत राहावं. आणि मुख्य म्हणजे आपल्या पैशावर ऐश करू देऊ नये, घरात जे काय होईल ते जेवायला मिळेल आणि सगळ्या गरजा (ऐश नाही) भागवल्या जातील, बाकी आपलं आपलं बघा म्हणून सांगावं. १८ च्या पुढील असेल तर सरळ बाहेर पार्ट-टाइम नोकरी करायला लावावी.

पैसा हा माणसाला भरकटवू शकतो तसंच जमिनीवर पण ठेवू शकतो. टिनेज मध्ये प्रेम करण एकदम सोपं असतं, भरपूर वेळ आणि हॉर्मोन्स + आई वडिलांचा पैसा + प्रेम निभावण्यासाठी काय करायला लागत याचा पत्ता नाही असं डेडली समीकरण असतं. त्यातलं पैसा काढून घेणं / मिळवायला प्रवृत्त करणं, आणि प्रेम निभवायला काय करायला लागतं ते सांगत राहणं एवढंच पालक म्हणून आपण करू शकतो.

पैशाचं महत्व कळल्यावर, ते मिळवण्यासाठी लागणारे कष्ट कळल्यावर एकूण निर्णयप्रक्रियाच बदलून जाते, आणि ती आयुष्यात खूप फायदेशीर ठरू शकते.

पिलीयन रायडर's picture

2 Aug 2017 - 7:26 am | पिलीयन रायडर

अगदी अगदी... साधारण एकाच वयाची मुलं आहेत ही. चूक दोघांचीही आहे. मुळात केवळ प्रेम असणं चुक नाही. आर्वजनिक ठिकाणी सभ्यपणे वागत नसतील तर तसं समजावुन सांगता येतं. प्रसंगी दरडावुन सांगताही येतं. पण मारामारीची गरज नाही. बाकी तुमच्या व्याखेत बसत नाही म्हणुन एखाद्याचं प्रेम चुकीचं नसतं.

अनेकदा समज कमी असते. त्यासाठी काऊन्सिलिंग सारखे माणसातले पर्याय आहेत जगात शिल्लक अजुन.

ह्यांनी मरुस्तोवर मारलं तरी काय करायचं ते केलंच ना त्या पोरांनी? काय फायदा झाला?

नीट बोलले असते त्या दोघांशी तर कदाचित ऐकलंही असतं.

अत्रे's picture

2 Aug 2017 - 8:10 am | अत्रे

+१००

सुंदर प्रतिसाद.

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 4:19 pm | arunjoshi123

वरच्या बहुतेक सगळ्या उदाहरणात मुलीची पण तेवढीच चूक (चूक म्हणा, किंवा इच्छा म्हणा, सहभाग म्हणा), दिसतोय. असं असताना फक्त त्या मुलाला भंपक इ इ विशेषण आणि ती मात्र चांगल्या घरची मुलगी असं विभाजन जरा मजेशीर वाटतंय.

भंपकपणा हे एक स्वतंत्र्य आहे आणि धागालेखकाने ते थेट वापरले आहे. गरिब तो भंपक असले काही लॉजिक मांडलेले नाही. म्हणून जे वास्तव लेखकाला माहित आहे त्यास प्रश्न का करावा?

पैसा हा माणसाला भरकटवू शकतो तसंच जमिनीवर पण ठेवू शकतो. टिनेज मध्ये प्रेम करण एकदम सोपं असतं, भरपूर वेळ आणि हॉर्मोन्स + आई वडिलांचा पैसा + प्रेम निभावण्यासाठी काय करायला लागत याचा पत्ता नाही असं डेडली समीकरण असतं. त्यातलं पैसा काढून घेणं / मिळवायला प्रवृत्त करणं, आणि प्रेम निभवायला काय करायला लागतं ते सांगत राहणं एवढंच पालक म्हणून आपण करू शकतो. पैशाचं महत्व कळल्यावर, ते मिळवण्यासाठी लागणारे कष्ट कळल्यावर एकूण निर्णयप्रक्रियाच बदलून जाते, आणि ती आयुष्यात खूप फायदेशीर ठरू शकते.

पैसे आणि प्रेम यांचा काय संबंध? प्रेम निभवायला पैसा किंवा त्याचा त्याग करायची शक्ती लागते हे कुठून आलं? प्रेम आणि पैसा दोन वेगळ्या अक्षांवर प्लॉट करता येतील. उगाच ज्याचं प्रेम आहे त्याला पैशाचं महत्त्व सांगून प्रेमातनं परावृत्त का करावं? शिकेल पाण्यात पडल्यावर पोहायला! संबंधच काय?

सौन्दर्य's picture

3 Aug 2017 - 1:36 am | सौन्दर्य

तुमचा प्रतिसाद पटला आणि म्हणून आवडला.

अच्छा, म्हणजे अशा वेळी उपयोगी पडतील म्हणूनच गुंड नगरसेवकांना निवडून आणतात वाटतं लोक!

एस's picture

2 Aug 2017 - 8:18 am | एस

असे प्रश्न हे भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमधील परस्परावलंबित्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अभावामुळे घडतात. समाजाने आता जास्त मोकळे व्हायला हवे. मुलामुलींना पंधरा-सोळा वयापासूनच स्वतंत्र राहायची आणि स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घ्यायची सवय लावावी. आपण नंतर त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये आणि त्यांच्यावर आपल्या म्हातारपणी अवलंबूनही राहू नये. मुलाबाळांच्या शिक्षणा-लग्नासाठी पै-पै जमवत बसण्यापेक्षा आधी आपल्या म्हातारपणाची आणि आजारपणाची तरतूद करण्यास प्राधान्य द्यावे. ग्रेट फ्रीडम कम्स वुइथ ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी हे त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवावे.

हे सगळं वाचायला जरा जड जाईल काहींना. पण समाजाची वाटचाल आता याच दिशेने होत आहे. आपण आपलं बघावं. लग्नेसुद्धा जास्त टिकणार नाहीत. एकेकाची एकापेक्षा जास्त लागणेही होतील. तेव्हा लग्नातून मिळणारे स्थैर्य हा प्रकारही संपेल. त्यामुळे प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाला स्वतःच्या आर्थिक स्वावलंबित्वाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच घ्यावी लागणार आहे.

अभिजीत अवलिया's picture

2 Aug 2017 - 10:02 am | अभिजीत अवलिया

सहमत आहे.
आपण कुणासाठी जगतो मुलांसाठीच ना, मुले म्हणजे म्हातारपणाची काठी वगैरे विचार फार जुने झाले आहेत असे वाटते. निदान मी तरी केवळ मुलांसाठी जगत नाही. आपले आयुष्य आपल्याला हवे तसे (फक्त दुसऱ्याला त्रास न देता) जगा. स्वत:च्या छंदांना वेळा द्या, आवडीनिवडी जोपासा. उगाच सगळ्या सोई मुलांना आयत्या मिळाव्यात म्हणून आपले आयुष्य कुढत जगायची किंवा तडजोडी करत जगायची काही गरज नाही.

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 2:04 pm | arunjoshi123

भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमधील परस्परावलंबित्व आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अभावामुळे घडतात.

जरा कार्यकारणभाव कळेल काय? म्हणजे आजकाल "भारतातील एकत्र कुटुंबपद्धती" हा शब्दप्रयोग वापरताना काही कार्यकारणभाव द्यावाच लागत नाही असा लोकांचा समज झालेला दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ असे प्रसंग भारतीय संसदीय लोकशाही वा भारतीय मुक्त अर्थव्यवस्था यांच्यामुळे का होत नाहियेत आणि भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमुळे का होत आहेत हे कळेल काय? कि भारतातील एकत्र कुटुंबपद्धती म्हटलं तर कोणतंही खापर बिनदिक्कत फोडता येतं असं काही आहे का?
====================================
भारतातील एकत्र कुटुंबपद्धतीमधे असं कोणतं वैयक्तिक स्वातंत्र्य नसतं जे नाभिकीय कुटुंबात असतं? ज्यामुळे असे प्रसंग होतात?

मुलामुलींना पंधरा-सोळा वयापासूनच स्वतंत्र राहायची आणि स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घ्यायची सवय लावावी.

हो ना, भारतात गावागावात मॅक्डॉनाल्ड आणि डॉमिनॉज आहेतच फडकं मारायला घराबाहेर पडल्यापडल्या!

आपण नंतर त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये आणि त्यांच्यावर आपल्या म्हातारपणी अवलंबूनही राहू नये. मुलाबाळांच्या शिक्षणा-लग्नासाठी पै-पै जमवत बसण्यापेक्षा आधी आपल्या म्हातारपणाची आणि आजारपणाची तरतूद करण्यास प्राधान्य द्यावे.

दूध तुटल्यानंतर किती दिवसांनी हा प्रकार चालू करावा?

एस's picture

2 Aug 2017 - 6:32 pm | एस

बास? इतकेच प्रश्न? धिस इज नॉट फेअर अजो. तीनशे करायचेयत ना? अजून विचारा.

arunjoshi123's picture

3 Aug 2017 - 11:31 am | arunjoshi123

बाकी तुमच्या दृष्टिकोनाचं कौतुक आहे.

कोणी "शाळा" चित्रपट पाहिलाय का? त्यात पण असा (प्रपोझ केले म्हणून) मारहाणीचा प्रसंग आहे. त्यातल्या हिरो मुलाच्या बाबांची भूमिका बरोबर वाटते.

बाय द वे, हेच धागलेखक दुसऱ्या लेखात काही मुलांचे लग्न जमत नाही (http://www.misalpav.com/node/40388) म्हणून चिंता करत आहेत आणि इकडे मात्र मुलींना सम्मतीने लग्न करण्याला विरोध करत आहेत. यातला विरोधाभास छान आहे :)

मला वाटत यांना प्रॉब्लेम हा आहे की "अशा मुली" त्यांना आवडणाऱ्या मुलांशी लग्न करतात आणि ज्या मुलांची लग्ने जमणे सध्या कठीण झाले आहे, अशा मुलांशी लग्न करत नाहीत :)

उपयोजक's picture

2 Aug 2017 - 11:37 am | उपयोजक

मला वाटत यांना प्रॉब्लेम हा आहे की "अशा मुली" त्यांना आवडणाऱ्या मुलांशी लग्न करतात आणि ज्या मुलांची लग्ने जमणे सध्या कठीण झाले आहे, अशा मुलांशी लग्न करत नाहीत

त्यांना आवडणार्‍या मग कामधंदा न करणार्‍या,भंपक,रिकामटेकडा असला तरी चालेल?

काका, मुळात आपल्याला काय चालेल हा प्रश्न कुठून उत्पन्न होतो? कोणावरही मालकी हक्क का गाजवावा? एका लिमिटनंतर आपण कोणाही समजावून सांगितल्याशिवाय काहीही करू शकत नाही. वरचा वीणा यांचा प्रतिसाद वाचनीय आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?

कोणावरही मालकी हक्क का गाजवावा?

इथे केवळ तुम्हाला हक्क म्हणायचं असावं. मुनुष्यांवरील मालकी हक्क हा कंसेप्ट काही नसतो.
=========================
पण कोणावरही हक्क का गाजवावा मंजे काय? का गाजवू नये? फक्त करारावर हस्ताक्षरे झाली तर त्यातील जी बंधने आहेत तितकेच हक्क असे आहे की काय? हक्क कसे आजवावेत आणि नाही याचं एक व्यवस्थित फ्रेमवर्क आहे ना? मग असा प्रश्न पडूच कसा शकतो?

त्यांना आवडणार्‍या मग कामधंदा न करणार्‍या,भंपक,रिकामटेकडा असला तरी चालेल?

तो तिचा प्रश्न आहे ना, त्यात बरं ती तुमची बहीण नाही. नाहीतर जीवच घेतला असतात.

सांगायचं बाई गं आवडतोय तर ठीक आहे, पण नोकरीधंदा नसेल तर तुझं तुला बघावं लागणार आहे. त्यादृष्टीने तुझ्या मनाची तयारी करुन घे. सासरी गेलीस की तुझा संसार तुला सांभाळायचा आहे, आम्ही नसणार आहोत तिथे. निर्णय ती घेत्ये तर त्याच्या बर्‍या वाईट परिणामांचा विचार करायला तरी लावा. बळंच मारहाण काय?

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 1:47 pm | arunjoshi123

नाहीतर जीवच घेतला असतात.

हे कशावरून? हे विधान थोडं बोल्ड नाही का? अन्य लोकांच्या लफडे / प्रकरणे / प्रेम इ इ करणार्‍या बहीनींच्या बदडण्याचे समर्थन करणारे (पण प्रत्यक्ष स्वतः न बदडणारे) लोक तिच केस स्वतःच्या बहीणीची निघाली तर प्राण घेतात यावर काही रिसर्च पेपर आहे का?

घेत नाहीत असं सांगणारा रीसर्च पेपर आणा आधी.

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 2:26 pm | arunjoshi123

याच अंगानं थोडं पुढे जात हे बदडणारे लोक पृथ्वीवरील संपूर्ण जीवसॄष्टी (किंवा असलेच तर अन्य ग्रहांवरील जीवन देखिल) नष्ट करतात असं देखिल म्हणायला वाव आहे म्हणायचा.

म्हणा की, आणि तुम्हाला हवा असतो म्हणून डेटा पण तयार ठेवा.

निर्णय ती घेत्ये तर त्याच्या बर्‍या वाईट परिणामांचा विचार करायला तरी लावा.

परिणाम सांगण्याइतका अनुभव आणि संभाषण कौशल्य प्रत्येकात नसतं.
असे तोंडी सांगीतलेले विचार कोणाला पटत नाहीत.
====================================================================
माझ्या १० वर्षाच्या मुलाला "मोबाईल खेळू नको" हे अनंत लोकशाहीय पद्धतींनी सांगून पाहिलं. अजून तरी त्यावर काहीच परिणाम झालेला नाही. आणि माझ्यामते त्याच्या मित्रांमधे त्यातल्या त्यात तो वडिलांचं ऐकण्यात खूप चांगला आहे (अगदी या मोबाईल बाबतीत.), बाकीची पोरं पाहिली तर ती थेट अ‍ॅडिक्टच आहेत. बापाला अजिबात जुमानत नाहीत. आता मोबाईलचे हार्मोन्स स्रवत आहेत, तरुणपणी तेव्हाचे स्रवतील. सांगीतल्यानं लोकांना (म्हणजे आपल्या माणसांना) कळतं? ते एकतात?

माझ्या १० वर्षाच्या मुलाला "मोबाईल खेळू नको" हे अनंत लोकशाहीय पद्धतींनी सांगून पाहिलं. अजून तरी त्यावर काहीच परिणाम झालेला नाही

दुसऱ्या एखाद्या जास्त इंटरेस्टिंग गोष्टीकडे/ प्रोजेक्ट्मध्ये त्याचे लक्ष वळवायचा प्रयत्न करा, मोबाईलला विसरून जाईल कदाचित. अमुक अमुक करू नको चा उपयोग सहसा होत नाही.

arunjoshi123's picture

2 Aug 2017 - 2:07 pm | arunjoshi123

पहा संभाषण नावाच्यागोष्टितल्या त्रुटी.
===================
अनंत लोकशाही पद्धती मधे अनंत गोष्टी आल्या. याही आल्या.

मग मोबाईल लपवा आणि स्वत: मोबाईल वापरू नका + त्याच्यासोबत दुसरा छंद/खेळ खेळा. हे पण ट्राय केलं का?

छे असं कसं आपल्याकडे फक्त हे करु नको ते करु नको सांगायची पद्धत असते. काय कर सांगायचं नाही. आताचं उदाहरण आहे, शाम्पूची अ‍ॅड चालू होती. ती मुलगी आईला काहीतरी विचारते. शेजारी बसलेले काका लगेच, "ऑ? आईला उलट उत्तर करते?" असं का म्हणून विचारायचं नाही, आंधळेपणाने करत राहायचं.

लपवणं आणि न वापरणं शक्य नाही आणि योग्य नाही.
================
दुसरे खेळ खेळले तरी त्याचा आंतरिक ओढा काउंसेलिंगने जात नाही असा स्वानुभव आहे.
================================
विषय असा आहे कि मनुष्य हा सारासार चांगला विचार करतो नि सद्वर्तन हि धारणा मिथ्या आहे. मी सिगरेट पितो. तो वाईट असल्याची खूप जाणिव मला आहे. माझ्या अनेक हितैषींनी मला रेग्यूलर ती सोड म्हणून खूप मनवलं आहे. पण आधिकारिक वाणीनं बोलणारा माझ्या आयुष्यात कोणीच नाही. उद्या आई किंवा बॉसने कानफटात ठेवायचा प्रघात असता तर मी सिगारेट फार तर फार चोरून ओढली असती आणि ते आत्तच्या परिस्थितीपेक्षा चांगलं असलं असतं. असो.

लपवणं आणि न वापरणं शक्य नाही आणि योग्य नाही.

हम्म, तेवढं शक्य झालं असत तर बरं झालं असतं. बघा एखाद्या दिवशी ट्राय करून :) आमच्या लहानपणी मोबाईल नव्हते हे भाग्यच म्हणायचे. आमच्या लहानपणी आई खूप वेळ पुस्तके वाचून दाखवायची तेव्हापासून पुस्तकांची आवड आहे. मोबाइलपेक्षा गोष्टींच्या पुस्तकांचे व्यसन कधीही चांगले. मला सुद्धा हे सगळीकडे मोबाईलवर बसणारी लहान मुले बघून प्रश्न पडतो, यांचे मन दुसऱ्या कशात का रमत नाही? तुम्ही जरूर ट्राय करा जेवढे जमेल तेवढे.

आधिकारिक वाणीनं बोलणारा

मी समजू शकतो. जसे की Phd करताना विशिष्ट प्रकारचे गाईडच जास्त काम करवून घेऊ शकतात तसा काहीसा प्रकार आहे. "स्वत:च स्वत:ला ऑर्डर कशी द्यायची" या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर किती बरे होईल! मग कोणी "वरच्या" लेव्हल वरची धक्का-स्टार्ट मारायला व्यक्ती लागणारच नाही..

आम्ही रोज गोष्टी वाचतो, फिरायला जातो, खेळतो. ते कसं करवून घ्यायचं ते मला माहित आहे. पण ते फॅड कसं उतरावायचं हा प्रश्न अनुत्तरित आहे.
==================
सध्याच्या प्रयोगांतर्गत मी इंसेटिव स्किम वापरतो - पाढे वाचले तर अर्धा तास, इ इ . पण आपण होऊन खेळू नये इतकं प्रबोधन असंभव दिसतंय. आमच्या पूज्यनीय पिताश्रींनी हा प्रश्न त्यांच्या काळात असता तर ४-५ दिवसांत सोडवला असता.
=====================
गधी पे दिल आये तो परी क्या चिज है ही म्हण उगाच नाही. तारुण्यातल्या भावना, इच्छा नियंत्रित करणं असंभव आहे. तर जी काही छुटपुट वारदातें होणार ती होणारच. मात्र त्याला ओपन सपोर्ट नको. थोडंसं भय हवं. १४ ला तारुण्याचे कोंब फुटून ३४ ला लग्न करणारी ही पहिली पिढी आहे. म्हणून लेनियंसि इज जस्टिफाईड. पण "समजवणूक" ही एकमेव सजा आहे हे पाल्याला कळले तर मज्जा आहे त्याची.

शब्दबम्बाळ's picture

2 Aug 2017 - 2:14 pm | शब्दबम्बाळ

गम्मत आहे नई, भारतात १८वर्षांची "पोर" देशाचा पंतप्रधान निवडू शकतात पण स्वतःचा जोडीदार शोधायला मात्र "शहाणी" नसतात!
त्यांनी लग्नाचं उदाहरण दिल होत या अर्थी मुलगी सज्ञान आहे हे गृहीत धरलं असावं अशी अपेक्षा आहे!
१० वर्षाचं उदाहरण कुठून काढलेत काय माहित!

उद्या, माझ्या 1 वर्षाच्या मुलाला चड्डीत शी/शु करू नकोस हे अनंत लोकशाही पद्धतीने समजावून सांगितलं तरी कळत नाही असे म्हणेल कोणीतरी!! :P

माझ्या 1 वर्षाच्या मुलाला चड्डीत शी/शु करू नकोस हे अनंत लोकशाही पद्धतीने समजावून सांगितलं तरी कळत नाही असे म्हणेल कोणीतरी!!

१० वर्षाच्या माझ्या मुलाला मोबाईल जास्त खेळू नये याची पूर्णतः जाणिव आहे असे बोलून माझे दोन शब्द संपवतो.

शब्दबम्बाळ's picture

2 Aug 2017 - 2:35 pm | शब्दबम्बाळ

अरे वा!
तुमच्या १० वर्षाच्या मुलाची जाणीव आपणास "पूर्णतः" आहे हे ऐकून छान वाटले! याला काही आधार वगैरे लागतच नसेल त्यामुळे अधिक विचारात नाही.
बर, आता तो तुम्हाला म्हणाला कि मला मी काय करतोय याची पूर्णतः याची जाणीव आहे आणि मला तरीही हेच करायचं आहे. तुम्ही काही सांगू नका! तर तुम्ही काय करणार?

आणि आता मूळ मुद्द्यावर येत "सज्ञान" मुलीने तिचा जोडीदार ठरवला तर तिला तसे करण्याचा अधिकार तुमच्या लेखी आहे कि नाही?