’हॅरी पॉटर’ म्हटलं कि सर्वात आधी आठवतात तीन नावं – अभ्यासात सर्वात हुशार असलेली हर्मायनी ग्रेंजर, थोडासा मस्तीखोर, घाबरट आणि एका उंदराच मालक असलेला रॉन विजली आणि द स्टार ऑफ द फिल्म अर्थात ’हॅरी पॉटर’ .... ही तीन पात्र ज्यांनी पडद्यावर रंगवली ती आता ३० च्या घरात आहेत.
हर्मायनी रंगवली ती ब्रिटिश अभिनेत्री एमा वोट्सन या ब्रिटिश अभिनेत्रिने. पहिल्या भागात काय cute दिसते ती. रॉन विजली उभा केला तो रुपर्ट ग्रीन्ट याने. सुरुवातीला अगदीच वेंधळा वाटत असला तरीही पहिल्या भागाच्या शेवटी बुद्धिबळाचा डाव खेळताना काय सुंदर अभिनय केलाय पठ्ठ्याने. आणि ’हॅरी पॉटर’ रंगवला तो निळ्या डोळ्याच्या डॅनियल रॅडक्लिफने . हि पात्र आज सगळ्यांना ठाऊक आहेत. या तिघांचही या चित्रपट श्रुन्खलेशिवाय स्वतःच असं एक नाव आणि वलय आहे, पण हे सर्व आता.......ज्यावेळी म्हणजेच २००० साली आणि फिलोसोफार स्टोन वर चित्रपट बनवण्याची तयारी वार्नर ब्रोझ. करत होते तेव्हा ही तीन महत्वाची पात्र शोधण कठीण झालं
होत. जेव्हा हि कथा सुरु होते तेव्हा ही तीनही पात्र जेमतेम १०-१२ वर्षांची आहेत, म्हणून त्याच वयातली मुल निवडायची होती. दिग्दर्शक म्हणून ख्रिस कोलंबस चिंतेत होता.अशावेळी हजारो मुलांच्या ऑडिशन मधून त्यावेळी कुणीच नसलेल्या एमा आणि रुपर्ट ला निवडलं. या दोघांनी यापूर्वी फक्त शाळेत नाटकात काम केलं होत. ही निवड झाली तेव्हा रुपर्ट ११ वर्षांचा होता आणि एमा १० वर्षांची. हर्मायनी आणि रॉनची निवड झाली असली तरीही महत्वाचं पात्र अजून सापडलं नव्हत . ’हॅरी पॉटरसाठी जवळपास सात महिने शोध चालू होता पण तो कसा संपला ही एक रंजक कथा आहे.
या चित्रपटा चे निर्माते डेव्हिड हेअमन आणि पटकथाकार स्टीव्ह क्लोव्ह लंडन मध्ये एका चित्रपटगृहात बसले होते. त्यांच्या सीट्सच्या मागे एक निळ्या डोळ्यांचा, चुणचुणीत असा मुलगा बसला होता. त्या मुलाबाबत डेव्हिड सांगतात, ‘ सगळ्यात पहिल्यांदा मला त्याचे मोठे निळे डोळे आवडले. माझ्यावर त्याच पाहिलं इम्प्रेशन तो खूप जिज्ञासू आणि ज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक आहे अस पडल होत. ‘ त्या मुलाच नाव होत डॅनियल रॅडक्लिफ ......... डॅनियलने याआधीच आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात BBC TELEVISION च्या डेव्हिड कोपर्फिल्ड (DEVID COPPERFIELD) मध्ये काम करून केली होती. तिथे सगळ्यात पहिल्यांदा हा मुलगा कुणाच्या नजरेत भरला तर तो मॅगी स्मिथ च्या.. या मॅगी स्मिथ म्हणजेच Prof. Minerva McGonagall. त्याही या सिरीज मध्ये काम करत होत्या. श्रुन्खलेसाठी त्यांची निवड आधीच झाली होती. पण त्यांना ठाऊक होत कि दिग्दर्शक ख्रिस कोलंबसना हॅरी पॉटर अजून मिळाला नाही. डॅनियल रॅडक्लिफला त्यांनीच सर्वात आधी हॅरी साठी सुचवलं. आपण निवडलेला मुलगा हाच मॅगी स्मिथने ज्या मुलाला सुचवल तो आहे हे कळाल्यावर ख्रिस कोलंबस भन्नाट खुश झाला होता. विशेष म्हणजे जेव्हा जे.के. रोलिन्ग ला हे कळालं तेव्हा तिने कोट केलं कि ख्रिसला डॅनिअलपेक्षा अजुन चांगला हॅरी पॉटर नक्कीच मिळाला नसता . पुढे मग डॅनियलच्या आईवडलांनी त्याला परवानगी दिली, तो निवडला गेला आणि पुढे काय घडल ते आपल्याला ठाऊकच आहे.....
क्रमशः
©अनिरुद्ध दिलिप प्रभू
ll श्रीजेकेरोलीन्गापर्णामास्तु ll
वाचने
4874
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
जरा मोठाले भाग येऊ द्या की
सुचनेचा आदर वगैरे आहेच....
In reply to जरा मोठाले भाग येऊ द्या की by उगा काहितरीच
हॉलिवूडसाठी ब्रिटन म्हणजे
मराठी प्रमाणेच ब्रिटिश एकटिंग स्कुल ची प्राचीन परंपरा
In reply to हॉलिवूडसाठी ब्रिटन म्हणजे by अभ्या..
The Harry Potter trio's first screen test
चला.. सुरुवात मस्त झाली..
हॅरी पॉटर चे डोळे
In reply to चला.. सुरुवात मस्त झाली.. by हर्मायनी
मस्त सुरवात !! येऊ द्या अजून.
तुमची (कशावरुन?) हर्मायनी...
In reply to मस्त सुरवात !! येऊ द्या अजून. by चिनार
तिथंच घोळ झाला ना..आमचं गोत्र
In reply to तुमची (कशावरुन?) हर्मायनी... by अनिरुद्ध प्रभू
क्लास्सिकच
In reply to तिथंच घोळ झाला ना..आमचं गोत्र by चिनार
रुपर्ट ग्रीन्ट / रॉन
सुंदर सुरूवात. मस्तच. पु.भा
खरं सांगायचं तर पहिल्या
क्युट म्हणावं असलं लेखन आहे
ओ राव
मस्त !!