Skip to main content

दिंडी

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 09/07/2017 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
अभिजात सुमारांची बहुश्रुत दिंडी लॅपटॉपी कीबोर्डाचे चटचट अहिर्निश टाळ निष्क्रिय मत-मतांतरांचे डब्ब दुतोंडी मृदंग वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण जितं मया च्या एकेकट्या भेसूर आरत्या तिथे सुदूर चंद्रभागेकाठी काळाभोर त्याच्या अट्टल दगडी मौनातल्या शयनी एकादशीत कल्पांतापर्यंत अकिम्बो
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1123
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

वैचारिक साठमारीचे गुगलपुष्ट निर्दय घोडरिंगण लैच आवडले. जबरा. -दिलीप बिरुटे