जगात सगळ्यात सुखी पिढी कुठली असेल तर ९० च्यां दशकात जन्माला आलेली, आमची पिढी...!!
ज्या काळात जन्माला आलो त्यात खरं तर नुकत्याच ब-याच नवनवीन गोष्टी आल्या होत्या ... मग टीवी असेल, कॉम्प्युटर असेल, इंटरनेट असेल.....पण हे सगळ काही बालपणी जास्त शिवलं नव्हतं आम्हाला. भर उन्हाळ्यात अख्खी दुपार खेळण्यात घालवणे, सूर-पारंब्या, विटी-दांडू, कबड्डी, असे नानाविध खेळण्यात गेलं. सचिन-सौरभ-राहुल-अजहर हे हिरो असेल तरीही क्रिकेट सुद्धा फार मोठ स्थान काही बळकावू शकलं नव्हतं. जुन्या पारंपारिक मौज-मजेच्या गोष्टी अनुभवलेले आणि तितक्याच प्रेमानं सगळ्या तंत्रज्ञानाला आपलसं करणारी आमची पहिली पिढी..अन उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या मनसोक्तपणे जगलेली शेवटची पिढी...अस्तु.!! अशा अनेक गोष्टींसारखं एका अजून गोष्टीने वेड लावलं ते आजतागायत कायम आहे..एक कादंबरी-चित्रपट शृंखला जिच्यासोबत आम्ही llkid to adult हा प्रवास केला.....या पिढीतल्या कोणालाही एवढा सांगितलं तरी पुरेस आहे.......
’हॅरी पॉटर’
ही शृंखला संपून आता जवळपास अर्ध तप संपत आलंय तरीही त्यांनी मनावर घातलेलं गारुड संपण्याचे नाव घेईल तर शप्पथ ...!! २००१ साली जगासमोर आलेली ती तीन cute मुल आता चांगली २८-३० वर्षांची झाली पण डोळ्यासमोरून जात नाहीत. ते सगळ जादुई जग, हॉगवार्टचा परीसर साद घालतो. आम्हाला ‘हॅरी पॉटर’ दिल्याबद्दल जे.के.रोलिंग ला खरतर किती धन्यवाद द्यावेत हा गहन प्रश्नच.... जवळपास २० वर्षांचा कालावधी ह्या पात्रांनी व्यतीत केला असला तरी अजूनही अनेक गोष्टींबद्दलच कुतूहल आजही तसाच आहे. तेच कमी होण्यासाठी काही प्रमाणात मदत आणि आमच्या परमामित्रांच्या आग्रहावरून पुनश्च: लिहिते होण्यासाठी हा संपूर्ण दोन दशकांचा प्रवास, मग कादंबरी असेल किंवा चित्रपट , किस्से, पडद्यामागच्या गंमती-जंमती या निमित्ताने ही लेखमाला.....नियमित अर्थात ठराविक वेळी post करण जमेल असे नसल्याने नियमितपणे अनियमितता सांभाळून ही लेखमाला मी सुरु करतोय.......
ll श्रीजेकेरोलीन्गापर्णामास्तु ll
©अनिरुद्ध दिलीप प्रभू
वाचने
8598
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
हरी पुत्तरचं काय येवढं कवतिक
येऊंद्या लवकर ..
वा वा! बिग फ्यान. येऊद्या!
+1
In reply to वा वा! बिग फ्यान. येऊद्या! by आदूबाळ
हॅरी पॉटरने जो मित्रपरिवार
हॅरी पाॅटर लेखमालेच्या
अर्रे वा मस्तच.. आम्हीपण
Voldemort: Origins of the Heir
In reply to अर्रे वा मस्तच.. आम्हीपण by सच्चिदानंद
वाचायला आवडेल....
हॅरी पॉटरचा इतका मोठा पंखा
वा!
पॉटर आवडतोच पण फनाटिक फॅन
वा! वा! फायनली..
नुकतंच फिलॉसॉफर्स स्टोन प्रकाशित होऊन २० वर्ष झाली..
In reply to वा! वा! फायनली.. by हर्मायनी
मि पण मोठा पंखा.. पण
अजून एक पण पिक्चर पाहिलेला नाहीये..
In reply to मि पण मोठा पंखा.. पण by पुंबा
+१
In reply to मि पण मोठा पंखा.. पण by पुंबा
त्यात खरं म्हटलं तर अनेक चुका
In reply to +१ by राघव
वानगीदाखल :-
In reply to त्यात खरं म्हटलं तर अनेक चुका by एमी
हम्म
In reply to वानगीदाखल :- by राघव
वर्मटेल कडेच होता म्हणेhttps:
In reply to हम्म by अभिदेश
वॉल्ड्मॉर्टचा वॉण्ड
In reply to वानगीदाखल :- by राघव
वॉल्ड्मॉर्ट रेझरेक्ट झाल्यावर
In reply to वॉल्ड्मॉर्टचा वॉण्ड by आदूबाळ
राघव
In reply to वॉल्ड्मॉर्ट रेझरेक्ट झाल्यावर by राघव
हो, तिथे आपल्या मुलासह उभ्या
In reply to राघव by अभिदेश
अरे हो..
In reply to हो, तिथे आपल्या मुलासह उभ्या by अभ्या..
हो, बरोबर आहे! प्रायॉरीचा
In reply to वॉल्ड्मॉर्ट रेझरेक्ट झाल्यावर by राघव
प्रकट भव
हरी पाटील... पण चालतंय...
In reply to प्रकट भव by इज्या
मी "हरी कुंभार" ऐकले होते
In reply to हरी पाटील... पण चालतंय... by मुक्त विहारि
तिला potter म्हणजे कुंभार हे समजावण्यात दिवस संपला
In reply to मी "हरी कुंभार" ऐकले होते by इज्या
इज्या
In reply to प्रकट भव by इज्या
पिडितो चा वापर
In reply to इज्या by अनिरुद्ध प्रभू
आजि विजयि भव
In reply to इज्या by अनिरुद्ध प्रभू
मला भयंकर ऊत्सुकता
मी काय म्हनतो....
अजुन वाट बघावी.....?
In reply to मी काय म्हनतो.... by अनिरुद्ध प्रभू
प्रभुजी, येऊ द्या भाग. वाट