Skip to main content

...असे आजोबा!

लेखक हृषीकेश पतकी यांनी शनिवार, 24/06/2017 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
काल उघडले कपाट तेव्हा पुन्हा भेटले मला आजोबा | असण्याहूनही नसण्यामध्ये नवे वाटले मला आजोबा ||१|| शुभ्र साजि-या वस्त्रांमधूनी होते लपले असे आजोबा | इंचघडीतून अलगद ज्यांनी आम्हा जपले असे आजोबा ||२|| पुस्तकातल्या श्लोकांमधला सुस्पष्ट असा तो ध्वनी आजोबा | पत्ररुपाने अक्षर होऊन अन् भिडणारे मनी आजोबा ||३|| कधी हास्याची झुळूक आणि कधी गोष्टींची लाट आजोबा | आकार आम्हाला देताना शिस्तीचा परिपाठ आजोबा ||४|| कधी दुपारी बहरुन यावा तो संवादिनीचा सूर आजोबा | पण सायंकाळी सात वाजता चिंतेचे काहूर आजोबा ||५|| कपाट केले बंद तरीही आठवणींचे ठसे आजोबा | विचार करता काव्य स्फुरावे होते आमचे असे आजोबा ||६|| जपून ठेवू सदैव ज्या, त्या अस्तित्त्वाच्या खुणा आजोबा | एका जन्मी कसे पुरावे, हवे आम्हाला पुन्हा आजोबा ||७||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4065
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कविता आवडली! Sandy

आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!

आवडली कविता.

आवडली कविता.