लेखनप्रकार
सचिन ए बिलियन ड्रीम्स ..हा फक्त सचिन चा चित्रपट नाही तर सचिन आणि क्रिकेट सोबत आपण जे क्षण घालवले त्याची उजळणी आहे.
क्रिकेट समजण्याआधी सचिन समजला होता, त्यामुळेच की काय सचिन बद्दल जरा जास्तच आकर्षण होते. आपल्या देशातील करोडो लोकांमध्ये २५ लाख लोकांचे नाव तरी सचिन असण्याला हाच कारणीभूत असावा असे मला वाटते. त्याने घातलेल्या जर्सीवरील १० नंबर पण इतका आकर्षित करायचा की मी खो खो खेळताना पण माझ्या जर्सीवर १० नंबर हवा असा आग्रह धरायचो. शाळेत असताना मॅच सुरु आहे म्हटल्यावर सुट्टीमध्ये शेजारील घरी जाऊन सचिन कितीवर खेळतोय याची पहिली चौकशी करायचो. सचिन मैदानावर आहे म्हटल्यावर कोणतीही काळजी नसायची आणि जसा तो आऊट झाला की वाटायचं संपलं सगळं..सचिन म्हणजे एक भरवसा होता इंडियन क्रिकेट चा जसा देवावर आपण भरवसा ठेवतो तसा म्हणूनच कदाचित त्याला क्रिकेट मधील देव मानत असतील.
लहानपणीच एक आवडता उद्योग म्हणजे वेगवेगळ्या क्रिकेटर्स चे पेपर मधील चित्रे कापून एका वहीत चिटकवून ठेवायची. पण या सर्वात जास्त मला आवडायचा सचिनचा एका हातात बॅट आणि एका हातात हेल्मेट घेऊन दोन्ही हात वर करून नजर आभाळाच्या दिशेने करून शतक पूर्ती नंतर देवाला अभिवादन करताना चा फोटो आणि माझ्या सारखच सर्वानाच त्याची हि स्टाईल नक्कीच आवडत असावी.
चित्रपटामध्ये सचिन सांगतो की देशासाठी वर्ल्ड कप जिंकणे हि त्याची इच्छा होती तर सचिन ला वर्ल्ड कप सोबत पाहणे हि त्याच्या चाहत्यांची इच्छा होती.
इंटर नॅशनल क्रिकेट मध्ये सर्वात जास्त रन्स असो किंवा शतक किंवा वन डे मध्ये २०० रन्स एक एक रेकॉर्ड बनवताना त्याला पाहिलंय आणि त्यावेळी केलेला जल्लोष या चित्रपटाच्या रूपाने पुन्हा आठवला.
सचिन मैदानात असताना स्टेडियम वरील लोकांनी "सचिन सचिन " या नावाचा केलेला घोष टीव्ही वर मॅच पाहणाऱ्याच्या पण अंगावर काटा आणतो आणि मनातल्या मनात आम्ही पण म्हणतो " सचिन सचिन "
लेखक - मीच
मिसळपाव
खरं आहे... हा चित्रपट पाहताना
In reply to खरं आहे... हा चित्रपट पाहताना by प्रसन्न३००१
आपलं बालपण पुन्हा आठवते
४ दिवसांपूर्वीच हा चित्रपट
In reply to ४ दिवसांपूर्वीच हा चित्रपट by श्रीगुरुजी
त्याचा नम्र स्वभाव आणि फालतू
छान लिहील आहे.
In reply to छान लिहील आहे. by जागु
धन्यवाद
तरीपण सचिनने स्वतःच्याच
सहमत
चित्रपटाचे प्रयोजन काय ?
जबरदस्त
जबरदस्त