(वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
11 Apr 2017 - 3:46 pm
गाभा: 

डिअर ऑल,

मिसळपाववर चपखल, जोरदार प्रतिसाद कसे द्यावेत व ट्रोलिंग करणार्‍यांना व अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्‍यांना कसे नामोहरम करावे या विषयावर पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Embarrassment असं साईटचं नांव असेल.

वेब डिझाईन, माझी ग्राफिक डिझायनर मुलगी करेल. ट्रोलिंग, कंपूबाजी करणार्‍यांना घाबरणार्‍यांचे गैरसमज दूर करुन मिपावरील त्यांचा वावर सर्वांग सुंदर करणारे प्रशिक्षण त्यांच्याप्रत पोहोचावे असा उद्देश आहे.

यात मिपा धुरीणांनी आतापर्यंत केलेले लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली जबरदस्त उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये प्रतिदिन) असेल त्यातून साईट अ‍ॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता एखाद्या प्रतिसादाला कसे जोरदार प्रत्त्युत्तर देता येईल ते विचारता येईल (त्यासाठी प्रत्येक वाक्याला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.

साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.

जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :

१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)

२) जवळजवळ सर्व डेटा सेन्श्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?

३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?

४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

11 Apr 2017 - 4:10 pm | चित्रगुप्त

तुमच्या या अभिनव सायटीसाठी हार्दिक शुभेच्छा.

अभ्या..'s picture

11 Apr 2017 - 4:24 pm | अभ्या..

सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता एखाद्या प्रतिसादाला कसे जोरदार प्रत्त्युत्तर देता येईल ते विचारता येईल त्यासाठी प्रत्येक वाक्याला शंभर रुपये शुल्क असेल,

आईशप्पथ गुर्जी, ही स्कीम इथं मिपावर राबवली ना तर फक्त तुमच्याकडून आलेल्या शुल्कावर आपण फेसबुक खरेदी करु. ;)

संजय क्षीरसागर's picture

11 Apr 2017 - 4:27 pm | संजय क्षीरसागर

मिसळपाववर चपखल, जोरदार प्रतिसाद कसे द्यावेत व ट्रोलिंग करणार्‍यांना व अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणार्‍यांना कसे नामोहरम करावे या विषयावर......इथे मोफत सेवा उपलब्ध आहे !

तुम्ही सशुल्क उत्तरं देणार, तर तुमच्या प्रश्नांना इतरांनी फुकट उत्तरं का द्यावीत? :P

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2017 - 8:05 pm | श्रीगुरुजी

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .

संजय पाटिल's picture

30 Apr 2017 - 1:47 pm | संजय पाटिल

मी पण ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .

सतिश गावडे's picture

11 Apr 2017 - 9:51 pm | सतिश गावडे

>> वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगी करेल.
तुमचा ग्राफिक डिझायनर मुलगी कशी काय करेल?

त्यांचा डिज़ायनर मुलगीच करणार ना? ती मुलगी अस्ती तर मुलगा केला असता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Apr 2017 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

बडे बडे लोगोंकी ऐसी छोटी छोटी गलतिया होती है.... (किंवा व्हाईस व्हर्सा) ;) :)

वरुण मोहिते's picture

11 Apr 2017 - 10:06 pm | वरुण मोहिते

टू एम्बरॅसमेंट....lolllllllll

कापूसकोन्ड्या's picture

13 Apr 2017 - 9:43 am | कापूसकोन्ड्या

साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये प्रतिदिन)

अरे बापरे

सचु कुळकर्णी's picture

28 Apr 2017 - 6:39 am | सचु कुळकर्णी

Step-By-Step to Embarrassment
ROFL

तुमची तर वेबसाईट तयार झाली का..?

का मतपर्तिवर्तनाची लागण तुम्हालाही झाली...

:D