(#मिपालेझीनेस - मी आज केलेला आराम - एप्रिल २०१७)
लेखनविषय (Tags)
नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला आराम " या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे , इतका प्रतिसाद मिळत आहे की लोकं आरामात डुंबुन गेल्याने गेले तीन महीने धागा काढायलाही विसरलीत !! आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन आराम सुरू केला आहे.
आराम सुरू केलेल्या आणि आरामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
हां तर तसेही नवीन फायनान्शीयल ईयर सुरु झाल्यावर आम्हाला कामाचा लोड नसतो . ऑफीसात येऊन मस्टर क्लिक करणे अन जुने पुराणे काही उरले सुरले बग क्लीयर करणे इतकेच काय ते काम ! त्यातही ह्या वेळी आमाच्या राशीला ट्रंप वक्री आल्याने सर्व कामे लांबणीवर पडलेली आहेत त्यामुळे आराम करायला बख्खळ वेळ आहे !
हां तर या उपक्रमाद्वारे दर महिन्याला एक नवीन मिपाकर आपली ' आरामगाथा' घेऊन आपल्याला भेटायला येत राहील. या महिन्यात आरामाचा अनुभव सांगत आहे
" मार्कस ऑरेलियस"
एकुणच सध्या दुर्गम काळ आलेला आहे , ट्रंप ह्या पापग्रहाची शांती कशी करावी हे कोठेही लिहिलेले नसल्याने वाट पहाणे इतकेच आपल्या हातात आहे . मागल्या महिन्यात मोबाईल हरवल्यावर जरा जास्तच आराम झाला , नंतर मग मिपाकरांनी सुचवल्या प्रमाणे सत्यनारायण घातला ( मनातल्या मनात हो , ते केळीची पानं अन ब्लाह ब्लाह कोण शोधत बसणार ? मानस पुजा हीच सर्वोत्तम पुजा !! ) आणि नवीन मोबाईल घेवुन सोशल नेटवर्कस वरील टवाळक्या परत सुरु झाला कामाचीही डीलीव्हरी गेल्याच महिन्यात झाली आहे ! आराम जिंदाबाद !!
आज ऑफीसात ३ वाजता आलो . पुल टेबल वर ४ गेम खेळलो , आता बर्या पैकी अंदाज जमायला लागला आहे म्हणजे तसे जिंकलो एकच गेम पण आराम मस्त झाला . आज शुक्रवार नसुनही सुबक ठेंगणी लाल रंगाचा आकर्षक ड्रेस घालुन आली होती अन त्यामुळे इच्छा नसतानाही डोळ्यांना फार व्यायाम झाला !
नंतर वडापाव अन चहा अन असले काहीतरी आरबट चरबट खात तासभर कलीग्सशी गफ्फा झाडल्या . ग्राऊंड फ्लोअर ला जाऊन सिगारेट पीत पीत कंपनीच्या पॉलीसीबद्दल क्रिबिंग केले.
रात्री ऊशीरा मिंटिंग असल्याने मोकळ्या वेळात मिपावर किसनरावांच्या जिलेब्या वाचल्या , टर्बोचार्जड लेखांवर पिंका टाकल्या ... स्कोअर सेटलिंग चा अभ्यास केला कोण कोणत्या टीम मध्ये आहे कोणाची कोणाशी ब्यॅटिंग चालु आहे हे समजुन घेण्याचा प्रयत्न केला .... शेवटी फारच कंटाळा आल्याने हा लेख पाडलहा :)
तुमच्याकडेही सांगण्यासारखे कांही असले तर आंम्हाला जरूर प्रतिसाद द्या. नाहीतर आराम चालु दे मस्त !
टीम #मिपालेझीनेस - ( नावे सुचवा रे आळशी कार्ट्यांन्नो )
प्रतिक्रिया
हा हा हा
हँ, आराम तर आम्ही नेहमीच करतो
हांगाश्शी ये बात! याच
..
ते कसं असतं की आपण व्यायाम
माझा आराम चारचौघात सांगता
.
ब्येस्ट काम केलंत
अहाहाहा,
याला म्हणतात धागा !
यमन आणि भैरवी
नेमका मोबाईल वाजला !
क्लायंट कम्युनिकेशन जलद आणि मोफत व्हायला
ओके
काल जंगी खरेदीचा दिवस होता.
भारी !
एक महत्वाची मीटींग कालच
सुबकठेंगणी
या वेळी
डॉकला लेन एंडपर्यंत
अर्थात !
शुक्रवार पासून आराम करतोय