✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गँगस्टर - 2

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 03/26/2017 - 21:20  ·  लेख
लेख
या युगांताला प्रखरतेची नांदी नाही. खोलीतल्या जाळ्यांसारखे मनातले विचारही धुरकट झालेत. घड्याळ वाजत राहते टकटक. जसं फटीतून बघितलेली त्या बाईची छाती. धकधक. बाथरुमचा नळ सताड चालू आहे. वर पंखा गरगर फिरतोय. भिंतीवर एक पाल आहे. आणि या सगळ्याला काहीच अर्थ नाही. फुललेला श्वास घेऊन मी त्या गंजक्या चाळीतून बाहेर पडलो. राहील थेटरमध्ये कसा आलो मला आठवत नाही. चालू असलेला कुठलातरी सिनेमा अखेर संपला. "चलना है क्या?" ही एक कोण बाई मला काहितरी विचारत होती. आणि त्यावेळी मी कुठल्यातरी बोळीतून स्टेशनवर जात होतो. "ए हिरो. आना" भिंतीला टेकून उभारलेली ती भरदार छातीची बाई आता रंगात आली होती. "ए चिकने, किसे ढुंढरेला. बात तो सुन" ती बाई आता मागून खिदळायला लागली. मी जागीच उभारलो. "नही मंगता" म्हणालो. मग ती जवळ येत म्हणाली, "कुछ पिराब्लेम तो नही ना?" स्टेशनवर एक लोकल धडधडत निघून गेली. कुर्ला जानेवाली धीमी लोकल दस मिनिट लेट है. यात्रियो कृपया ध्यान दे. ती भरदार छातीची बाई रस्त्यावर कोसळली होती. करीम मला मागे ओढत होता. "भाई, जाने दो भाई. रंडी है साली" माझ्या उजव्या हाताच्या तळव्याला सणक भरली होती. त्या बाईने थोडी हालचाल केली. मग डोके धरून तशीच रस्त्यावरंच बसून राहिली. सुलतानपुरा. शहरातल्या जुनाट आणि मोडकळीस आलेल्या इमारतींनी हा भाग खच्चून भरला होता. बघावं तिकडं धंदेवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. करीम आला म्हणून ती वाचली. नाहितर राजस्थानचा उष्ण वाळवंटी प्रदेश मैलोनमैल पसरलेला आहे. "मैने कल एक काम दिया था" मी संत्रा मागवत करीमला विचारलं. "उसीके वास्ते आपके पास आया था भाय" मी बाटली फोडून ग्लासमध्ये ओतली. राहिलेली त्याला दिली. "पाणी भाय?" "नै" फळकुटावर मांडी घालून बसलो. एक म्हातारा माणूस कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसून चहा पित होता. स्टो पेटला होता. भज्याच्या खमंग वासानं पोटात भूक भडकली. "मिल गयी आंटी, यहीच रहती है" पाचशेची नोट मिळाल्यासारखा तो डोळे मोठे करत म्हणाला. मी मात्र डोळे गच्च मिटून तो ग्लास रिता करत गेलो. क्रमश: (छोट्या भागांसाठी क्षमस्व. पण हे असंच आहे)

Book traversal links for गँगस्टर - 2

  • ‹ गँगस्टर
  • Up
  • गँगस्टर - 3 ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
5384 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

काय राव! मोजून ३० सेकंद लागले

किसन शिंदे
Sun, 03/26/2017 - 21:59 नवीन
काय राव! मोजून ३० सेकंद लागले वाचून संपवायला.
  • Log in or register to post comments

एक एक ओळ वाचत कथेत गुंतत जाव

बरखा
Mon, 03/27/2017 - 12:05 नवीन
एक एक ओळ वाचत कथेत गुंतत जाव आणि काही सेकंदातच क्रमशा: याव ?
  • Log in or register to post comments

विलक्षन

सुमीत
Mon, 03/27/2017 - 19:31 नवीन
विलक्षन लिहित आहत आहात, असे अर्ध्या वर सोडुन नका जाउ
  • Log in or register to post comments

पुभाप्र

अॅस्ट्रोनाट विनय
Mon, 03/27/2017 - 20:26 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

मस्तं चाललय ! पुभाप्र !!

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/27/2017 - 20:41 नवीन
मस्तं चाललय ! पुभाप्र !! १. काय राव! मोजून ३० सेकंद लागले वाचून संपवायला. २. एक एक ओळ वाचत कथेत गुंतत जाव आणि काही सेकंदातच क्रमशा: याव ? ३. विलक्षन लिहित आहत आहात, असे अर्ध्या वर सोडुन नका जाउ (छोट्या भागांसाठी क्षमस्व. पण हे असंच आहे) करा, करा, शशक स्पर्धा करा, डबल शशक स्पर्धा करा. मग, आता घ्या ही शशक सिरियल ! आता कंप्लेंट करून काय फायदा ?! =))
  • Log in or register to post comments

मग, आता घ्या ही शशक सिरियल !

तुषार काळभोर
Tue, 03/28/2017 - 08:50 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा