Skip to main content

माझी एक गोची होते

माझी एक गोची होते

Published on 13/02/2017 - 10:48 प्रकाशित मुखपृष्ठ
वृत्तबद्ध लिहिताना माझी एक गोची होते यमक जुळवू जावे तर अलगद काही निसटून जाते माझी कविता "जुळत" नाही टोटलच बघा लागत नाही (अन जुळलीच बेटी चुकून तर..) कमावलेली कृत्रिमता हट्टीपणे हटत नाही कवितेचे झटपट वर्ग कुठे कोणी घेतं का? असल्यास जरा सांगा मला प्रतिभा विकत मिळते का? (एक कोडं सुटत नाही ...) भावना इतक्या तरल कशा? शब्द इतके रुक्ष कसे ? मग त्याची कविता वाचता वाचता डोळ्यात पाणी येतेच कसे?
लेखनविषय:

याद्या 2711
प्रतिक्रिया 16
काव्यरस

खोल खोल रूतलेल तसंच सोडून दिलेलं पुन्हा कधीतरी सललं, पहिला पाऊस पडल्यावर जुन्या वाळक्या खोडातून नवं काहीतरी फुटलं, कितीही खंबीर होऊन तटस्थ, व्रतस्थ राहिलो तरी आत गलबललं, विसरलेला कप्पा आवरताना तासनतास खिळवणारं काहीतरी गवसलं, जाणिवेत जवळ नसणारं पण आठवणीत हसणारं एक कुणी असलं, मित्रांच्या संगतीत, निवांत रात्रीच्या रंगल्या गप्पात तिचं नाव निघालं, की… …कविता होते! नाहीतर... गोची होते! :) Sandy

In reply to by चांदणे संदीप

नाहीतर... गोची होते! :) हे नसतं तरी चाललं असतं.

In reply to by संजय क्षीरसागर

नाहीतर... गोची होते! :)
हे फक्त कवीसाठी आहे.... इतरासांठी नाही! :) Sandy

In reply to by सस्नेह

परत केव्हातरी लिहितो... हे आत्ता हायज्याकिंग मोडवर चाललंय... :प Sandy

In reply to by अभ्या..

इत्ता आवड्या हय, इत्ता आवड्या हय, इत्ता आवड्या हय..... की विडंबन पाडनेको ........(कवाआली टाळ्या देऊन) जी चाहता हय.

आवड्या. कविता आणि संदीपभौ ची कविता सुद्धा.