नमस्कार मंडळी!
दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी, म्हणजे २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी दिन साजरा होतो. मिपावरही कमी-अधिक प्रमाणात दर वर्षी काही उपक्रम केले जातात. गेल्या वर्षी आपण मराठी भाषा दिनानिमित्त बोलीभाषा सप्ताह साजरा केला होता आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. काही काही अगदी अपरिचित बोलींमधील लिखाणही प्रकाशित झाले होते. तसेच आंतरजालावर हा अभिनव उपक्रम असल्याने वृत्तपत्रातही त्याची दखल घेतली गेली होती.
प्रमाणभाषेबरोबरच बोलीभाषा जगल्या पाहिजेत, फुलल्या पाहिजेत. त्यासाठी पुढच्या पिढ्यांना बोलीभाषेची ओळख असली पाहिजे. बोलीभाषांचे जतन होण्यासाठी त्यांचे नमुने, डॉक्युमेंटेशन पुढच्या पिढ्यांना उपलब्ध असले पाहिजेत. या कार्याला मिपाचा हातभार म्हणून यापुढे दर वर्षी मिपावर जागतिक मराठी दिन हा बोलीभाषांतील/बोलीभाषा संबंधित लिखाण सादर करून साजरा करायचा, असे ठरले आहे. श्रीगणेश लेखमाला आणि दिवाळी अंक याप्रमाणे बोलीभाषा सप्ताह हीसुद्धा मिपाची ओळख असेल.
या वर्षी २१ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत मिपा सदस्यांचे बोलीभाषांमधील किंवा बोलीभाषांसंबंधी लिखाण, कविता, कथा, कादंबर्या, लघुकादंबर्या, दीर्घकथा, लेख मिपावरून बोलीभाषा सप्ताहांतर्गत प्रकाशित केले जातील. या सप्ताहासाठीचे आपले आपापल्या बोलीभाषातील किंवा बोलीभाषा संबंधित लिखाण प्रशांत, पैसा किंवा अजया या आयडींना व्यनिद्वारे पाठवावे, ही विनंती. लिखाण यापूर्वी कुठेही प्रकाशित झालेले नसावे. सप्ताहात जास्तीत जास्त लिखाणाचा समावेश करता यावा, म्हणून लिखाण पाठवण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी ही आहे.
चला तर, आपापल्या बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आपला खारीचा वाटा उचलू या. सर्वांना लिखाणासाठी शुभेच्छा!
धन्यवाद!
वाचने
9201
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळ्यांनी लिहा पटापट!
वा वा चांगला उपक्रम आहे.
जरूर लिहा!
In reply to वा वा चांगला उपक्रम आहे. by अॅस्ट्रोनाट विनय
लेख आणि कथा-कादंबरी यांना
In reply to वा वा चांगला उपक्रम आहे. by अॅस्ट्रोनाट विनय
+1000000000001
In reply to लेख आणि कथा-कादंबरी यांना by जव्हेरगंज
मेजवानीची वाट पाहत आहे.
उत्तम उपक्रम !
ते ते ठिकाणचे बाषा दिना कायं
!!
In reply to ते ते ठिकाणचे बाषा दिना कायं by सचिन७३८
यावर्षी बघू आणखी एखादी नवी
हो ना!
In reply to यावर्षी बघू आणखी एखादी नवी by सूड
माहितगार यांच्यासोबत एक दोन
In reply to हो ना! by पैसा
हम्म..
In reply to माहितगार यांच्यासोबत एक दोन by सूड
+१११
In reply to हम्म.. by पैसा
नागपूर पासून गोआ बेळगाव पर्यंत
अय्यो चौकसं
In reply to नागपूर पासून गोआ बेळगाव पर्यंत by चौकस२१२
तात्या, आख्खा लेख लिवा की!!
In reply to अय्यो चौकसं by सचिन७३८
किरकेट
लै बेस लिवलं बगा तुमी. आता
In reply to किरकेट by सचिन७३८
पेपरला छापून घालणारेंचे
In reply to लै बेस लिवलं बगा तुमी. आता by सूड
फारच छान लिहिलेय. काही
In reply to पेपरला छापून घालणारेंचे by सचिन७३८
इथे मिपाचे संपादक. खरंतर
In reply to फारच छान लिहिलेय. काही by एस
अजून मुदत हवी आहे का?
बोलीभाषेची मेजवानी केव्हा
:)
In reply to बोलीभाषेची मेजवानी केव्हा by अॅस्ट्रोनाट विनय
सेपरेट टॅब दिसत नाहीयेत.
In reply to :) by पैसा
होय
In reply to सेपरेट टॅब दिसत नाहीयेत. by बबन ताम्बे
बोलीभाषा आणि शशक साठी वेगळे
??
ही बघा
In reply to ?? by अॅस्ट्रोनाट विनय
दोनही उपक्रमांना वेगळे टॅब
नवे लेखन मध्ये जाउन वाचावं
हो बरोबर
In reply to नवे लेखन मध्ये जाउन वाचावं by अॅस्ट्रोनाट विनय