✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नोटाबंदी : एक अपरिपक्व निर्णय.

म
मार्मिक गोडसे यांनी
Fri, 01/06/2017 - 21:42  ·  लेख
लेख
बनावट नोटा , दहशतवाद आणि काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य उद्देश होता, तो कितपत यशस्वी झाला हे थोड्याच दिवसात कळेल. परंतू, नोटाबंदी हा ह्यावर कायमस्वरूपी इलाज असूच शकत नाही हे सरकारलाही माहीत असताना असा अचानक नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी का घेतला असावा? पंतप्रधानांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा देशात आणू हे आश्वासन दिले होते, सत्तेत येऊन दोन वर्ष झाली तरी एक फुटकी कवडीही आपण आणू शकलो नाही ह्याची सल त्यांना लागून होती. दरम्यान पंतप्रधानांनी मिपावरील माझा हा लेख वाचला असावा, हे काम सोपे नाही हेही त्याना कळून चुकले. लगेचच त्यांनी आपला मोर्चा देशातील काळ्या पैशाकडे वळवला. सरकारी यंत्रणा कमीतकमी वापरून लवकरात लवकर हा काळा पैसा कसा नष्ट करता येईल ह्याबद्दल त्यांनी काही अर्थचक्रमांचे सल्ले घेतले. अधिक मुल्याच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला त्यांना पटला. हा निर्णय घेताना गुप्तता पाळण्याची अट स्वतःवर लादून घेतली आणि ५०० व १००० च्या जुन्या नोटा रद्द करून २००० ची नवीन नोट चलनात आणून अडचणींच्या खाईत जाणारा 'बायपास' काढला. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर पुढील ५० दिवसात सरकारच्या अपरिपक्व निर्णयाचे दुष्परिणाम दिसू लागले. ५० दिवस सामान्य जनतेचे रोकड टंचाईमुळे हाल झाले. जि.म. बँकांना नोटाबदलीला बंदी व नवीन चलपुरवठा न केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली. मुळात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी ग्रामीण भागाचा विचार केलाच नाही. पंतप्रधानांच्या एका अपरिपक्व निर्णयामुळे ग्रामीण जनतेचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
50808 वाचन

💬 प्रतिसाद (312)

प्रतिक्रिया

मला हा निर्णय चुक की बरोबर ते

पिलीयन रायडर
Fri, 01/06/2017 - 21:56 नवीन
मला हा निर्णय चुक की बरोबर ते अजुनही समजलेले नाही. माझा कल "चुक" कडेच आहे. आधी मला आजवर जी मोदींची प्रतिमा होती, त्याप्रमाणे हा निर्णय अनेक लोकांच्या विरुद्ध जाऊन देशहितासाठी घेतलाय असं वाटत होतं. पण अजुन काळा पैसा असणार्‍यांना काही दणका बसलाय असं वाटत नाही. अर्थात मी नेट वर वाचुनच मत बनवतेय. मला प्रत्यक्षात काय चालु आहे ह्याची कल्पना नाही. पण एकंदरित रागरंग पाहुन असं वाटतंय खरं. ३१ तारखेच्या भाषणातुन मला बर्‍याच अपेक्षा होत्या. हा जो काही त्रास नोटाबंदीमुळे लोकांना होत आहे, त्यावर सरकार काही उपाय्योजना करेल असं वाटत होतं. प्रत्यक्षात मात्र एखादे अर्थसंकल्पाचे भाषण ऐकल्या सारखे वाटले. एरवी अशा घोषणा केल्या असत्या तर काही वाटलं नसतं. पण खास करुन तुमचा प्लान फसलाय, खुप सारे प्रश्न आहेत आणि तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहात, असे असताना योजना जाहिर करणे म्हणजे दिशाभुल करण्या सारखे वाटले. ही एक निव्वळ हिरोगिरी होती की काय अशी शंका बळावत चालली आहे. भिम अ‍ॅपसुद्धा ज्या गडबडीत लाँच झाले, त्यावरुन तर "कॅशलेस" हा हेतु कधीच नव्हता हे स्पष्ट आहे. तसं असतं तर ८ नोव्हेंबरलाच हे सगळं यायला हवं होतं. त्या तयारीनेच सरकारने उतरायला हवं होतं एकंदरित काळा पैसा बाहेर काढायचा म्हणुन हे नोटाबंदी प्रकरण केलेलं असलं तरी काळा पैसा नसलेल्या सर्वसाधारण जनतेला जे प्रॉब्लेम्स येऊ शकतील त्यांचा विचार केलेला नव्हताच फारसा असं आता मलाही वाटतंय. भारतीय जनता "अ‍ॅडजस्ट करलो" टाईप आहे म्हणुन भागलं. लोक उभी राहिली रांगेत वेड्यासारखी. पण १-२ महिने ठिक आहे. हे अजुनही चालु असेल तर मात्र हा प्लान फसलेला आहे. तरीही ह्या प्रकारातुन काही ठोस हाती लागले असेल तर मला समजेल अशा भाषेत कुणी पॉईंटर्स मध्ये सांगु शकेल का? अवांतर - खरंच गाईंना आधार कार्ड देणारे का हे सरकार?? की फेक न्युज होती ती?
  • Log in or register to post comments

तरीही ह्या प्रकारातुन काही ठोस हाती लागले असेल तर......

संजय क्षीरसागर
Sat, 01/07/2017 - 00:26 नवीन
१५.४० लाख कोटी रकमेच्या नोटांपैकी ५ लाख कोटी रकमेच्या नोटा, ब्लॅकमनी बँकेत भरता न आल्यानं, केवळ दहशतीमुळे, चलनातून बाद होतील असा सरकारचा अंदाज होता. ३०डिसेंबर पर्यंत १४.९७ लाख कोटी रुपये बॅकात भरले गेले आहेत, असा ब्लूमबर्गचा रिपोर्ट आहे. अरुण जेटलींना मेडीयानं हे दाखवून दिलं आणि यात तथ्य असेल तर नोटबंदीचा निर्णय फसलायं का विचारलं. त्यावर जेटलींनी, शरद पवारच काय ५६ इंच वाल्यांची सुद्धा छाती होणार नाही असं उत्तर दिलं.... `मला माहित नाही" !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

म्हणजे जेवढं चलन बाद केलं ते

पिलीयन रायडर
Sat, 01/07/2017 - 00:30 नवीन
म्हणजे जेवढं चलन बाद केलं ते सगळं जवळपास बँकेत परत आलं. मग काळा पैसा कुठे गेला? काळा पैसा तर आहेच ना लोकांकडे. म्हणजे सरकारच्या ह्या निर्णयावर सुद्धा लोकांनी पळवाट शोधुन काढली तर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मग काळा पैसा कुठे गेला?

संजय क्षीरसागर
Sat, 01/07/2017 - 00:39 नवीन
तो परत नव्या नोटात रुपांतरीत झाला ! काळा पैसा तर आहेच ना लोकांकडे. येस. तो कॅशसोडून इतर फॉर्ममधे आहे. म्हणजे सरकारच्या ह्या निर्णयावर सुद्धा लोकांनी पळवाट शोधुन काढली तर.. हे अजून मोदींना आणि जेटलींना कळत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

दोन अ‍ॅन्करींग पॉईंट्स

गॅरी ट्रुमन
Sat, 01/07/2017 - 10:01 नवीन
या विषयावर लेख आणि प्रतिसाद लिहिणार्‍याचे नाव बघितले की नक्की काय म्हटले जाणार याची कल्पना येतेच. त्याच त्याच चर्वितचर्वण झालेल्या मुद्द्यांवर काही लिहित नाही. तरीही या विषयावरील अनेक चर्चांमधील शेकडो प्रतिसादात न आलेले (किंवा माझ्या नजरेतून निसटलेल्या मुद्द्यांविषयी लिहित आहे): १. ५०० आणि १००० च्या नोटा केवळ बँकांमध्येच नाही तर पोस्ट ऑफिसांमध्येही भरता येत होत्या. पोस्ट ऑफिसातही सेव्हिंग्ज अकाऊंट, रिकरींग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट इत्यादी गोष्टी असतात याचा माझ्या पिढीतल्याही अनेकांना पत्ता नसतो तेव्हा माझ्याहून १०-१२ वर्षांनी लहान असलेल्यांना हे माहित नसेल याची कल्पना येते. या डिपॉझीटवरील व्याजाचे दर बँकांमधील व्याजाच्या दरापेक्षा काकणभर जास्तच असतात. या डिपॉझीटमध्ये नक्की किती पैसे गुंतवले जातात? इथे दिलेल्या बातमीप्रमाणे २०१५-१६ या वर्षात नोव्हेंबर पर्यंत २ लाख १५ हजार ८०२ कोटी रूपये इतके 'ग्रॉस सेव्हिंग' पोस्टात झाले होते तर नेट सेव्हिंग त्यापेक्षा बरेच कमी २१ हजार ४१ कोटी होते. ग्रॉस आणि नेटमधला फरक म्हणजे मी समजा १०० रूपये १० वेळा भरले आणि भरलेल्या १००० पैकी ९०० रूपये काढून घेतले तर ग्रॉस सेव्हिंग झाले १००० रूपये तर नेट सेव्हिंग झाले १००० वजा ९०० = १०० रूपये. ही बातमी गेल्या वर्षीची आहे. यावर्षी सुकन्या समृध्दी योजना ही नवी योजना पोस्टात सुरू झाली आहे. त्यामुळेही आणखी डिपॉझिट पोस्टात नक्कीच झाले आहे. ८ नोव्हेंबरनंतर पोस्टात डिपॉझिट झालेली रक्कम नक्की किती? मला माहित नाही. पण पोस्टात झालेल्या डिपॉझिटचे पुढे काय होते? पोस्टाने बँकिंग लायसेन्ससाठी अर्ज केला आहे. तो अजून मंजूर झालेला नाही. तेव्हा पोस्ट हे पैसे स्टेट बँक किंवा अन्य राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ठेवते. माझा प्रश्न: पोस्टात भरलेले पैसे आणि पोस्टाने बँकेत भरलेले पैसे हे डबल काऊंटिंग होत आहे का? होत आहेच किंवा होत नाहीच यापैकी मला काहीच म्हणायचे नाही तर केवळ शक्यता व्यक्त करत आहे. २. काळा पैसा नुसता कॅशमध्येच नसतो हे कोणीही सांगू शकेल.पण म्हणून कॅशमध्ये असलेल्या काळ्या पैशावर कारवाई करायची नाही याचे ते समर्थन होऊ शकत नाही. ३० सप्टेंबर पर्यंत आय.डी.एस अंतर्गत काळा पैसा जाहिर करायची मुदत दिली होती. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्याचवेळी मोदी म्हणत होते की ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर मी कठोर पावले उचलीन आणि त्याबद्दल मला दोष दिला तरी मला त्याची पर्वा नाही. इतका विरोध होत असूनही मोदी नोटबंदीच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर अजून कठोर पावले उचलू अशाप्रकारच्या बातम्याही पेरल्या गेल्या.तेव्हा आता आय.डी.एस सारखी गरीब कल्याण योजना आली आहे त्याला जास्त प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे. प्रत्यक्षात काय होते ते बघू. तेव्हा तो पैसा इतके दिवस काळा होता तो टॅक्सच्या नेटमध्ये आल्यामुळे फायदा होणार नाही का? एकूणच काय की या प्रकारावर बहुसंख्य लोक त्यांच्या राजकीय भूमिकेतून (मोदी समर्थक/विरोधक) टिका करत आहेत असे दिसत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी अधिक चांगल्या पध्दतीने करायला हवी होती यात काहीच वाद नाही.पण या निर्णयामुळे स्वर्ग भूतलावर अवतीर्ण झाला आहे असे म्हणणे आणि नरकपुरी माजली आहे हे म्हणणे या दोन्ही गोष्टी अप्रस्तुत आहेत हे इथे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

ट्रुमनजी, हे वागणं बरं नव्हं

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/07/2017 - 12:24 नवीन
ट्रुमनजी, हे वागणं बरं नव्हं ! एकदा आपलं ठरलं ना की "कालआजच परिक्षा संपली तरी रिझल्टपर्यंत वाट बघायचे कारण नाही... उमेदवार परिक्षेच्या अगोदर एक महिना फेल झालाय असा गदारोळ करायचा". मग वरच्यासारखे काहीच्या काही समतोल, विचारी काही मुद्दे आपण मांडायचे नाहीत आणि दुसर्‍यांनी मांडले तरी त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचे किंवा ते तसे नाहीच्च असे म्हणायचे, हे तुमच्या अजून कसे ध्यानात येत नाही ?! यापुढे फक्त बिनापुराव्याची मुद्दे भरकटवणारी विधाने, जोक आणि इनोदी गाणी हेच्च सबळ पुरावे समजायचे ठरलेय... बाकी सगळे फाऊल !!! काय समजलात ?! ;) :) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

ह्यालाच विक्टिम कार्ड का काय

संदीप डांगे
Sat, 01/07/2017 - 12:38 नवीन
ह्यालाच विक्टिम कार्ड का काय म्हणतात कायहो हातोळकरसाहेब? आणि ट्रोलभैरवांच्या मते जिथे तिथे गळे काढणे...? ;-) =)) बाकी, व्हॉट्स्प जोक चिकटवणारांना आता जोक्स बोचायला लागलेत... ही एक गंमत आहे निष्पक्षपणाची... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

म्हणत असतील बुआ, मला अजून

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 01/07/2017 - 13:08 नवीन
म्हणत असतील बुआ, मला अजून नक्की व्याख्या मिळाली नाही! मागे एकदोनवेळा विचारली होती पण काय उत्तर मिळालं नाही! मिळाली कि सांगेन तुम्हाला! बाकी ते जोक बोचणे वगैरे मला असेल तर....जोकमध्ये काय होते बरे जरा सांगाल का इथे? म्हणजे तुमच्याकडून तरी असल्या टेस्टलेस जोकची अपेक्षा नाहीये हो डांगेंजी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जोक्स ज्यांनी टाकलेत

संदीप डांगे
Sat, 01/07/2017 - 13:15 नवीन
जोक्स ज्यांनी टाकलेत त्यांच्यासाठी, तुम्ही टाकलेत का? बाकी इथे तुमच्या आवडीची काळजी घ्यावी, तुमचे मनोरंजन व्हावे अशी अपेक्षा ठेवून येता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

मी इथे कशासाठी येतो वगैरे

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 01/07/2017 - 13:59 नवीन
मी इथे कशासाठी येतो वगैरे थोडं वैयक्तिक होतंय आणि त्याच्याशी तुमचा काहीएक संबंध नसावा. तुम्ही टाकलेला एक जोक टेस्टलेस आहे असं माझं मत मी सांगितलं शिवाय त्यात या एका ठराविक विषय असलेल्या धाग्यावर टाकण्यासारखं काय होतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला त्या जोक मध्ये काय चांगला वाटलं हे सांगावं वाटत नसेल तर तसं सांगावं, उगाच त्या फालतू जोक (वैयक्तिक मत) ची भलामण करण्यासाठी वैयक्तिक कशाला व्हायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अरे बापरे, आता जोक पण समजावून

संदीप डांगे
Sat, 01/07/2017 - 14:23 नवीन
अरे बापरे, आता जोक पण समजावून सांगायला लागतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

काय करणार महोदय, सामान्य

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 01/07/2017 - 14:26 नवीन
काय करणार महोदय, सामान्य मिपाकर आम्ही! करत जावा कवा कवा मदत! एवढं काही बिघडणार नाही त्याने आपलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझं काय बिघडेल, नाही याची

संदीप डांगे
Sat, 01/07/2017 - 14:36 नवीन
माझं काय बिघडेल, नाही याची तुम्ही चिंता करणं हे आता वैयक्तिक होत नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

मदतीची याचना करताना लिहितात

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 01/07/2017 - 14:44 नवीन
मदतीची याचना करताना लिहितात बुवा तसलं! वैयक्तिक होत असेल तर आपली सपशेल माफी! "काय करणार महोदय, सामान्य मिपाकर आम्ही! करत जावा कवा कवा मदत! ते जोकचं तेवढं बघा काही मदत करता आली तर!" हे चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

या विषयावर लेख आणि प्रतिसाद

मार्मिक गोडसे
Sat, 01/07/2017 - 15:05 नवीन
या विषयावर लेख आणि प्रतिसाद लिहिणार्‍याचे नाव बघितले की नक्की काय म्हटले जाणार याची कल्पना येतेच. स्पष्ट बोला की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मग काळा पैसा कुठे गेला?

Nitin Palkar
Sat, 01/07/2017 - 23:55 नवीन
माझ्या घरात ५००/१००० च्या ज्या नोटा होत्या त्या मी १५ नोव्हेंबर पूर्वीच बँकेत भरून टाकल्या (तुम्ही टाकल्या असतीलच). कारण आपण (मी तरी) त्याचा हिशेब देऊ शकतो. पण सर्वचजण असा हिशेब देऊ शकत नाहीत. कारण त्याला अडीच लाखाची मर्यादा होती. हा साठवून ठेवलेला पैसा, ज्यांच्याकडे असेल त्यांनी कुठेतरी गुंतवायचा प्रयत्न नक्की केला असेल, तरी, ८ नोव्हेंबर ते ३० डिसेम्बर या दरम्यानच्या सर्व व्यवहारांची तपासणी होणे/करणे शक्य आहे. उरलेला काळा पैसा केवळ बाद झाला ना? स्विस बँकेतील पैशाबद्दल जे लोक गळे काढतायत ते हे विसरातायत की हा पैसा स्विस बँकेत गेला कधी? गेल्या अडीच वर्षात? आज आत्ता काळा पैसा उत्पन्न होऊ न देणे हे चुकीचं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मस्त प्रतिसाद आहेत तुमचे,

संदीप डांगे
Sun, 01/08/2017 - 00:08 नवीन
मस्त प्रतिसाद आहेत तुमचे, आवडत आहेत. ८ नोव्हेंबर ते ३० डिसेम्बर या दरम्यानच्या सर्व व्यवहारांची तपासणी होणे/करणे शक्य आहे. >> त्याला किती वेळ लागेल, किती खर्च येईल काही अंदाज? किती व्यवहार झालेत ह्याची काही प्राथमिक माहिती+अंदाज? कोणाकडे किती ब्लॅकमनी आहे ह्यासाठी नोटाबंदीच एक इलाज राहिला होता? आपले पंप्र तर म्हणाले की तुमच्या आजूबाजूलाच बघा, कितीतरी लोक बंगले गाड्या उडवणारे कर भरत नाहीत. जे तुम्हा-आम्हाला बघायला सांगतात तेच सरकारी अधिकार्‍यांना का सांगत नसावे आपले लाडके पंप्र? त्यासाठी नोटाबंदी का? उरलेला काळा पैसा केवळ बाद झाला ना? >> कधी? कसा? किती उरलेला, कुठे उरलेला? स्विस बँकेतील पैशाबद्दल जे लोक गळे काढतायत ते हे विसरातायत की हा पैसा स्विस बँकेत गेला कधी? गेल्या अडीच वर्षात? >> हे बाकी बोलले खास तुम्ही. जे लोक स्विस पैशाबद्दल सदानकदा गळे काढत होते त्यांनाच तो पैसा परत आणायला सत्तेवर बसवले बघा. आता त्यांनी तो अडीच वर्षात आणला की नाही असे विचारणे हे गळे काढणे म्हणणार असाल तर ह्या म्हणण्याला चाइल्डिश म्हणावे का? आज आत्ता काळा पैसा उत्पन्न होऊ न देणे हे चुकीचं आहे का? >> अजिबात नाही. कोण म्हणतोय की काळा पैसा उत्पन्न झालाच पाहिजे? असे म्हणणार्‍याला तर किसीभी चौराहे में खडा करके जो चाहे वो सजा दो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar

ही लिंक !

संजय क्षीरसागर
Sat, 01/07/2017 - 00:32 नवीन
"मला माहित नाही"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संक्षी, निष्कर्ष आधीच ठरवला

हतोळकरांचा प्रसाद
Sat, 01/07/2017 - 13:39 नवीन
संक्षी, निष्कर्ष आधीच ठरवला असला ना, बातम्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने वाचता येतात याचे तुमचा प्रतिसाद एक उदाहरण म्हणता येईल. ज्या "मला माहित नाही" वाक्याला तुम्ही ५६ इंच वगैरे विशेषणे लावून ऐतिहासिक वाक्य बनवायचा प्रयत्न करत आहात ते संभाषण खाली देत आहे आणि त्याचा विडिओ देखील. पत्रकार : सर, ३१ डिसेम्बर उलटून गेला आहे आणि आता असं ऐकायला मिळतंय कि जवळजवळ १५ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. जेटली : मला अजून आकडा माहित नाही,तुम्हाला माहित असेल तर सांगा! https://www.youtube.com/watch?v=1Rk4T-GA-Kc शिवाय तुम्ही दिलेल्या बातमीतच या पंधरा लाखांच्या रिपोर्टवर आरबीआयने काढलेल्या निवेदनाचाहि उल्लेख आहे ज्यात आरबीआयने स्पष्ट केले आहे कि जुन्या नोटांचे तपशील देशभरातील बँकांकडून अजूनही येत आहेत आणि त्याची मोजदाद अजून सुरूच आहे. शिवाय ती कधी संपेल हे अजून स्पष्ट नाही. हे नमूद करणे तुम्ही वरचा प्रतिसाद लिहिताना (जाणूनबुजून?) टाळले. हे असे का बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हल्ली अर्धसत्य (जे बहुदा

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/07/2017 - 14:10 नवीन
हल्ली अर्धसत्य (जे बहुदा पूर्ण असत्यापेक्षा जास्त भरकटवणारे आणि म्हणुनच जास्त धोकादायक असते) पसरवून लोकांची दिशाभूल करणार्‍या तथाकथित "तज्ज्ञांची" बरीच चलती आहे................. लेकीन, ये जनता चूप है, पर वह सब जानती है । ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

सत्यवचनी प्रतिसाद, संपूर्ण

संदीप डांगे
Sat, 01/07/2017 - 14:21 नवीन
सत्यवचनी प्रतिसाद, संपूर्ण सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जेटली : मला अजून आकडा माहित नाही,तुम्हाला माहित असेल तर सांगा!

संजय क्षीरसागर
Sun, 01/08/2017 - 01:09 नवीन
आकडा जर अपेक्षेपेक्षा कमी असता (समजा १० लाख कोटी) तर एव्हाना सरकार क्रेडीट घेऊन मोकळी झाली असती. कारण मोदी क्षुल्लक गोष्ट फुलवण्यात माहीर आहेत आणि ही तर मेजर स्टोरी होती. त्यांनी `मित्रों' करत सतरा ठिकाणी बोलून दाखवलं असतं की किती ग्रेट निर्णय घेतला. ५ लाख कोटी चलनातून बाद झाले! पण आकडा अपेक्षेपेक्षा बराच मोठा आहे त्यामुळे गोची झाली आहे. २५ डिसेंबरला खुद्द जेटली म्हणाले होते की बँकेत भरलेल्या पैश्याची निनांवेगीरी आता संपली आहे आणि अशा पैश्यामुळे बँकीग सिस्टम मजबूत होईल When this money comes into the system, the banking system becomes stronger and there are funds available for rural development, social welfare programmes," he said. बघा म्हणजे सरकारनी दोन्ही बाजूनी टिमकी वाजवून पाहिली. (म्हणजे जास्त पैसा जमा झाले असतील, तर काळा पैसा चलनात आला.) पण जेटलींना केवळ एका आठवड्यात आपल्या चुकीचा उलगडा झाला. १५ कोटी जमा झाले असतील तर नोटबंदी फेल गेली असा अर्थ निघतो. मग यू टर्न मारुन ते म्हणातायंत. `मला अजून आकडा माहित नाही, तुम्हाला माहित असेल तर सांगा! आता इतकी साधी गोष्ट जर कळायला `तज्ञ' असावं लागतं असं वाटत असेल तर हद्द झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

बरोबर आहे, अंदाजपंचे धागोदरशे

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 01/08/2017 - 10:00 नवीन
बरोबर आहे, अंदाजपंचे धागोदरशे करण्यासाठी काही तज्ज्ञ असावं लागत नाही. मोदींनी असं केलं असतं तसं केलं असतं वगैरे सगळं अंदाजपंचे! पैश्याची निनावेगिरी संपणे = १५ लाख कोटी (किंवा सर्वच्या सर्व पैसे) बँकेत परत येणे, हे भारी आहे. मी वैयक्तिकरित्या सरकारचा अधिकृत आकडा येण्याची नक्की वाट बघेन. बाकी वरच्या प्रतिसादाचा मुद्दा असं होता कि, बातमी तुम्ही मांडली कशी आणि ती आहे कशी! तुमच्या दृष्टिकोनातून आरबीआयचं निवेदन वगैरे खिजगिणतीतही नाही हे पाहून आश्चर्य वाटलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही प्रतिसाद काहीही न वाचताच द्यायचं ठरवलेलं दिसतंय !

संजय क्षीरसागर
Sun, 01/08/2017 - 10:56 नवीन
नीट वाचा म्हणजे मुद्दा कळेल. १. १० लाख कोटी जमा झाले असते तर ५ लाख कोटी चलनातून रद्द झाले असते आणि मोहीम यशस्वी झाल्याचा डांगोरा मोदींनी लगेच पीटला असता. आणि ते योग्य ही झालं असतं कारण एका बजेटच्या डेफिसिट इतकी रक्कम चलनातून बाद होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे सरकारचं दायित्व कमी होऊन नव्या नोटा १० लाख कोटींच्याच छापाव्या लागल्या असत्या. परिणामी महागाई कमी झाली असती. इन फॅक्ट डिमनीटायझेशनचा मूळ उद्देशच तो होता. म्हणजे ब्लॅक मनी चलनातून साफ होईल आणि खोट्या नोटाही बाद होतील. २. जास्त रक्कम जमा होतेयं म्हटल्यावर मोदींची गोची झाली. आणि त्यांनी शेवटी केलेल्या भाषणात, आता बेनामी संपत्ती विरोधात मोहिम उघडतो म्हणून पुन्हा ढुशी मारायचा प्रयत्न केला. बेनामी संपत्ती विरोधात कारवाई डिमनीटाझेशन व्यतिरिक्तही करता येत होती. ३. प्रकरण अंगलट येतंय म्हटल्यावर २५ डिसेंबरला जेटली म्हणाले, जितका जास्त पैसा बँकेत जमा होतोयं तितकी बँकींग सिस्टम स्ट्राँग होतेयं आणि निनांवी पैसा बँकेत येतोयं. हे एका अर्थानं बरोबर होतं पण याचा उघड अर्थ, अपेक्षेपेक्षा जास्त पैसा बँकेत येतोयं. आणि काळा पैसा मूळात बँकेत भरलाच जाणार नाही हा मोदींचा ओरिजीनल प्लान, त्यासाठी निर्माण केलेली दहशत , आणि सामान्यांची अपेक्षा याचा फज्जा उडाला. ४. ब्लूमर्गचा रिपोर्टवर मिडीयानं घेरल्यावर जेटलींना स्वतःची चूक कळली. आकडा १५ लाख कोटीच्या जवळपास आहे (निदान १० लाख कोटी पेक्षा बराच मोठा आहे) . आणि आपण उगीच काही तरी बोललो हे उमगल्यावर, ते `मला माहित नाही, तुम्हाला माहित असेल ते सांगा' अशी फिरवाफिरवी करतायंत. पण मोदी गप्प आहेत आणि त्यांनी होरा फिरवलायं (बेनामी संपत्ती), जेटली आकडा नक्की माहित नाही म्हणतायंत याचा अर्थ, काळा पैसा मूळात बँकेतच येणार नाही आणि तो चलनातून बाद होऊन फार मोठी बाजी मारली जाईल हा सर्जिकल स्ट्राईल बोंबलला आहे. ५. महागाई हटली नाही हे संसारात थोडं फार जरी लक्ष असेल तर कुणाही दत्तूला मान्य होईल. याचा अर्थ दुकानदारांची आणि व्यावसायीकांची होल्डींग कपॅसिटी मजबूत आहे आणि त्यांनीही डिमनीटायझेशनला भीक घातली नाही. आता तर महागाई घंटा कमी होत नाही. ६. कार्ड चार्जेस आणि नेट बँकींग चार्जेस या दोन गोष्टी इकॉनॉमी कॅशलेस करायला महत्त्वाच्या आहेत पण त्याबद्दल सरकार काहीही करत नाही. ७. अजूनही व्यावहार पूर्ववत होत नाहीत याचा अर्थ सरकारची अंमलबजावणी अत्यंत ढिसाळ आहे. आणि नक्की किती चलन पुरवायचं याबद्दल निर्णय होत नाही असा होतो. आता बहुदा तुम्हाला प्रकाश पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

आता तुम्ही मारलेला ज्योक बघा !

संजय क्षीरसागर
Sun, 01/08/2017 - 11:06 नवीन
१५ लाख कोटी (किंवा सर्वच्या सर्व पैसे) बँकेत परत येणे, हे भारी आहे. मी वैयक्तिकरित्या सरकारचा अधिकृत आकडा येण्याची नक्की वाट बघेन. सर्वच्या सर्व पैसे बँकेत आले तर मग सगळा प्रकार, झक मारली आणि मुंबई पाहिली असा होईल. त्याचा साधा अर्थ, फक्त जुन्या नोटा बदलून नव्या नोटा चलनात आल्या इतकाच होतो. मग या प्रकरणासाठी संपूर्ण देशाला वेठीला धरायची गरजच नव्हती. भरपूर वेळ देऊन लोकांनी यथावकाश १००० आणि ५०० च्या नोटा बँकेत भरल्या असत्या आणि सरकारनी आरामात नव्या नोटा छापून एटीममधून वितरीत केल्या असत्या. तुमच्या प्रतिसादावरुन तुम्हाला, डिनीटायझेशन म्हणजे काय, त्याचा उद्देश काय इतकी बेसिक माहिती सुद्धा नाही हे लक्षात आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमच्या प्रतिसादावरुन

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 01/08/2017 - 11:45 नवीन
तुमच्या प्रतिसादावरुन तुम्हाला, डिनीटायझेशन म्हणजे काय, त्याचा उद्देश काय इतकी बेसिक माहिती सुद्धा नाही हे लक्षात आलं.
हे बाकी बरोबर ओळखलं बघा तुम्ही! मी "तज्ज्ञ" नाहीच, हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही. "तज्ञ" असल्याच्या थाटात चुकीची आणि आकडेरहित माहिती ठासून सांगायला मला आवडणारही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संक्षी, इतर धाग्यांवर

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 01/08/2017 - 11:41 नवीन
संक्षी, इतर धाग्यांवर शंभरवेळा चर्वण झालेलेच मुद्दे तुम्ही सांगत आहात, काही नवीन नाही. तुम्हाला ब्लूमबर्गचा रिपोर्ट विश्वसनीय आणि ऑथॉरेटीव्ह वाटतो तर मला आरबीआयकडून आलेली माहिती. कार्ड चार्जेस (जे एका धाग्यात चावून चोथा झाले आहेत), महागाई, ब्लॅकमनी वगैरे सगळं हे फक्त येणारा काळ सांगेल. नोटबंदी संपल्याच्या दुसऱ्या दिवशी हे सगळे उद्देश सिद्ध होणार आहेत हे मोदींनी सांगितल्याचं मला तरी कुठे दिसलेलं नाही आणि ते समजण्यासाठी "तज्ज्ञ" असण्याचीही गरज नाही. कुठलेही अधिकृत आकडे नसताना योजना फेल झाली आहे हे एवढंच सिद्ध करण्याचा खटाटोप कशाला बुवा? बेनामी संपत्ती, कॅशलेस याला तुम्ही होरा बदलणे (कदाचित पूर्वग्रहदूषित असण्यामुळे) म्हणत आहात तर मला त्या फौलोअप कृती वाटतात. त्यामुळे तूर्तास तरी तुमच्या प्रतिसादाची पोचपावती (प्रकाश पडलेलाच नाही, ट्यूबलाईट थोडी डिम आहे),
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सगळ्या नोटा पुन्हा बँकेत जमा झाल्या तर तुम्हाला आनंद होणारे

संजय क्षीरसागर
Sun, 01/08/2017 - 13:02 नवीन
म्हणजे तुम्हाला डिमनीटायझेशन हा विषयच समजलेला नाही . तरीही तुम्ही बिनधास्त प्रतिसाद ठोकतांय हे कौतुकास्पदे! त्यामुळे इतर अनुषंगिक मुद्दे तर कळण्याची शक्यताच नाही. सो मी थांबतो . एंजॉय ! बघा वाट आकडा फुटण्याची .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

हो ते मी वर मान्य केलं आहेच

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 01/08/2017 - 13:21 नवीन
हो ते मी वर मान्य केलं आहेच की, तुम्हाला जुन्याच गोष्टी सांगण्यात इंटरेस्ट दिसतोय! बिनधास्त प्रतिसाद ठोकण्यापेक्षा बिनधास्त चुकीचे आणि तथ्यराहित प्रतिसाद ठोकून वर स्वतःला "तज्ञ" म्हणवणे जास्त कौतुकास्पद आहे. आकडा फुटण्याची तुम्हाला प्रतीक्षा नाहीच आहे कारण ते तुम्हाला महत्वाचं वाटत नाही (कल आधीच ठरला असल्याने), त्यामुळे तुमचे "अनुषंगिक" मुद्दे तुम्हालाच लखलाभ! बाकी, मी वाट बघेणंच आकड्यांची! चुकीचे निघाले तर सरकारवर टिका करायला आणि चांगले निघाले तर भलामण करायला मला अजिबात अवघडंत नाही. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सहमत

मराठी कथालेखक
Mon, 01/09/2017 - 12:37 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मला हा निर्णय चुक की बरोबर ते अजुनही समजलेले नाही.

Nitin Palkar
Sat, 01/07/2017 - 23:21 नवीन
सामान्य पापभिरू/सरकारभीरु माणूस सर्व कर भरतो(माझं मत). त्यांना सर्व अधिदाने बँकेद्वारे (Payments through bank) करायला लावली तर त्यात काय बिघडलं? सर्वांनी स्वतःच्या हक्कांकारता जागरूक व्हावं, आपल्याला मिळणारे पैसे आपल्याच खात्यात जमा होतायत की नाही हे काय वाईट आहे? तुम्ही स्वतः साक्षर व्हा, स्वतःचे बँक खाते उघडा, स्वतःचे व्यवाहार बँक खात्या मार्फत करा, हे सांगणं चुकीचं आहे का? "जनसामान्यांना सज्ञान करू नका, जर ते सज्ञान झाले तर तुमच्या मांडीला मांडी लावून बसतील" अशी जी मनोभूमिका होती ती बदलण्याचा प्रयत्न करणे चुकीचा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कॅशलेस व्यवहार

राघवेंद्र
Fri, 01/06/2017 - 22:21 नवीन
मला तरी पुणे - सोलापूर मध्ये कॅशलेस व्यवहार करता आले. सोलापूरच्या कामत हॉटेल प्रसिद्ध असूनही कार्ड नाही घेतले. सामान्य लोक नोटबंदी खुष आहेत कारण त्यांना माहिती कोणाकडे किती काळा पैसा आणि आता कसा प्रॉब्लेम झाला. सामान्य लोक नव्या गोष्टी शिकत आहेत.
  • Log in or register to post comments

कुठलीही नवी माहिती किंवा

हतोळकरांचा प्रसाद
Fri, 01/06/2017 - 22:37 नवीन
कुठलीही नवी माहिती किंवा प्रश्न नसलेला व तेच तेच इतर धाग्यांवर चर्चिलेले मुद्दे असणारा लेख आहे! तरीही काही नवीन अँगलने चर्चा होईल अशी अपेक्षा धरून रुमाल टाकून ठेवतो. अवांतर : भेंड्या खेळण्यासाठी किंवा जिलेबी या सदरात टाकायला एखादा धागा ठरवण्यासाठी साधारणपणे काय निकष लावले जात असतील बरे?
  • Log in or register to post comments

नेता - मित्रों मेरे गुजरात मे

संदीप डांगे
Fri, 01/06/2017 - 23:36 नवीन
नेता - मित्रों मेरे गुजरात मे गाय तो गाय; बैल भी दूध देता है अधिकारी पीछे से -सर बैल दुध नही देता है नेता- मित्रों गाय घास खाती है कि नही खाती है. खाती है कि नही खाती है ? जनता - खाती है नेता- गाय घास खाती है तो दुध देती है; तो बैल भी घास खाता है. तो उसे भी दुघ देना चाहिये कि नही देना चाहिये ? जनता- देना च़ाहिये नेता- दोनो हाथ उठाकर बताइए देना चाहिये की नही? जनता- देना ही चाहिए नेता- मित्रों जब सवासौ कराेड जनता का आशिर्वाद मेरे साथ है तब बैल काे दूध देने से दुनिया की काेई ताकत नही राेक सकती !
  • Log in or register to post comments

जोकच्या भेंड्या खेळायच्या

हतोळकरांचा प्रसाद
Fri, 01/06/2017 - 23:39 नवीन
जोकच्या भेंड्या खेळायच्या म्हणता कि काय? काय आलंय अक्षर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मित्रों मेरे गुजरात मे गाय तो गाय; बैल भी दूध देता है

Nitin Palkar
Sat, 01/07/2017 - 23:28 नवीन
Childish! कावीळ झालेल्याला सर्व जग पिवळ दिसतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एक सांगतो बघा ....

गामा पैलवान
Sun, 01/08/2017 - 13:51 नवीन
संदीप डांगे, तुम्हाला एक फुकट सल्ला देतोय. त्याचं काय आहे की तुम्ही चुकूनसुद्धा गुजरातचा आसपास फिरकू नका. अचानक पान्हा फुटला तर. नकोच ते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

गा मा स्वअनुभवाच्या आधारे

संदीप डांगे
Mon, 01/09/2017 - 13:09 नवीन
गा मा स्वअनुभवाच्या आधारे सल्ला देत आहात वाटतं... :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तो मी नव्हेच!

गामा पैलवान
Tue, 01/10/2017 - 02:45 नवीन
संदीप डांगे, मी नाही हो, तुम्हीच इथे स्वानुभवकथन करताय : http://www.misalpav.com/comment/911444#comment-911444 आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

+१

साहेब..
Wed, 01/11/2017 - 08:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हा हा... गोबेल्सचे तंत्र

मराठी कथालेखक
Mon, 01/09/2017 - 12:42 नवीन
हा हा... गोबेल्सचे तंत्र वापरुन सारं काही सिद्ध होवू शकतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नोटबंदीचे गाणे!

संदीप डांगे
Sat, 01/07/2017 - 00:22 नवीन
  • Log in or register to post comments

चावून चावून चोथा झालेला विशय

ओम शतानन्द
Sat, 01/07/2017 - 06:54 नवीन
चावून चावून चोथा झालेला विशय
  • Log in or register to post comments

मोदी फक्त दिखाऊपणा व हवा करण्यात मग्न आहेत

योगेश कोकरे
Sat, 01/07/2017 - 08:39 नवीन
मोदींनी हा निर्णय फारसा विचार करून घेतला असेल असा मला वाटत नाही .एकंदर सध्याच्या त्यांच्या देहबोलीवरून हा निर्णय पूर्णतः फसलेला आहे असे दिसत आहे. त्यांनी हा निर्णय घेताना त्यांना आपल्या देशाचा आवाका लक्षात आलेला दिसत नाही . ज्यांचा कला पैसे होता त्यांनी नातेवाईक, मित्र, सोने या मार्फत तो पंधरा करून घेतलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ३१ सप्टेंबर पर्यंत काळा पैसे जमा करण्याचा आदेश होता तो पर्यंत बऱ्याच लोकांनी आपला काळा पैसे जमिनी खरेदी करणे ,शेतीमध्ये बागायती मोठ्याप्रमाणात लागवड केली आहे , लहान मोट्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे. म्हणजे ८ नोव्हेंबर ला कलेपैसे वाले रडायला लागले ,रांगेत मोठी गर्दी केली ,त्यांची खूप वाट लागली असे बोलणे मूर्खपणाचे ठरेल. आणि जे लोक सापडले ते एकंदर देशाचा विचार केला तर मूठभर म्हणणे पण ज्यास्त होईल इतके आहेत . आणि मोदींचे काही मुखवटे या काळात लक्षात आले. जस कि ते लोकांच्यासमोर भावनिक होणे हि फक्त आणि फक्त धूळफेक होती . कारण भावनिक होताना तुमचे एकंदर हावभाव असे वाटत होते कि जाणून बुजून तसे भाव आणले जात होते ,शिवाय लोकांनां स्वतःहून सांगणे कि मला तुम्ही लोक टाळ्या वाजवून साथ द्या ,शिवाय असे म्हणणे कि ८ नोव्हेंबर च्या आधी ५० , १०० ला काही किम्मत नव्हती .त्यांचे लोकसभेत व राज्यसभेत गप्प बसने .त्यांना जर उत्तर द्यायचे होते तर लोकसभेत द्यायला हवा होता. मोदींच्या भाषणात फक्त आणि फक्त जुमलेच येत आहेत. आणि जे लोकांचे नुकसान झाले आहे ,ऑटोमोबाईल कंपन्यांचे विक्री घटली आहे', किरकोळ विक्रेत्यांचे उत्पन्न घटले आहे. जरी लोक साथ देत असले तरी हे नुकसान विसरून चालणार नाही . आणि भाषणबाजी करणे हा काही त्यावर उपाय नाही . एकंदर काय तुम्ही कितीही म्हणालात कि" मला तुम्ही म्हणाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे" आणि आमची कितीही इच्छा असेल कि "तुम्हाला पोकळ बांबू चे फटके madison square मध्ये द्यावेत" तरी ते प्रॅक्टिकली शक्य नाही..........
  • Log in or register to post comments

सहमत

मराठी कथालेखक
Mon, 01/09/2017 - 12:45 नवीन
चांगला प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे

डिसेम्बर महिना व वाहनविक्री ..

चौकटराजा
Wed, 01/11/2017 - 13:54 नवीन
डिसेंबर महिन्यात वाहनविक्री वर्षात सर्वात कमी असते. मग कोणतीही कंपनी असो. हा अलिखित नियम आहे. त्याचा नोटाबंदीशी काहीही संबंध नाही. लोकाना चेकद्वारे खरेदी करायला कोणी बन्दी केली होती ? डीलरने ..... ? खरे कारण नव्या सालचे रजिस्ट्रेशन आर सी वर आले की गाडी विकताना बरी किंमत येते हे आहे. हे २२ वर्षाचे निरिक्षण जवळूनचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे

सहमत.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/11/2017 - 14:42 नवीन
सहमत. याशिवाय... डिमॉनेटायझेशनमुळे, नकदीने (आणि बहुदा काळ्या पैश्याने) होणारी खरेदी, उदा... (अ) लक्झरी गाड्या, (आ) लक्झरी सदनिका किंवा गुंतवणूक म्हणुन घेतलेल्या अतिरिक्त सदनिका, (इ) गुंतवणूक म्हणुन विकत घेतलेली जमीन, (ई) गुंतवणूक म्हणुन विकत घेतलेले सोने, (उ) भरमसाठ किमतीच्या आणि/किंवा चैनिच्या वस्तू, इत्यादींची विक्री कमी होणार हे नक्की होतेच. अश्या विक्रीने होणार्‍या जीडीपीतील वाढीला वाढ न म्हणता सूज म्हणतात. कारण त्यामुळे फक्त काळ्या संपत्तीचे व्यवहार वाढतात, पण त्याचा नोकर्‍या वाढण्यावर किंवा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात लक्षणिय फायदा होण्यावर काहीच सकारात्मक फरक पडत नाही... किंबहुना अश्या व्यवहारांत भ्रष्टाचाराला चालना मिळत असल्याने देशावर नकारात्मकच परिणाम होतात. गेली काही वर्षे जीडीपीचा दर सतत वर असूनही अनेक रेटिंग एजन्सीज भारताच्या पतीचा दर त्या प्रमाणात वाढवत नव्हत्या त्यामागे हे महत्वाचे कारण होते. त्याविरुद्ध, आता बँकात जास्त पैसा खेळू लागल्याने सरकारी प्रकल्प, उद्योगधंदे आणि व्यवसाय इत्यादींना तो सुलभ दराने उपलब्ध होऊ लागला आहे. यामुळे नवीन नोकर्‍या निर्माण होतील व जास्त पैसा खेळता राहील. त्यातच सर्वसामान्य माणसांना मिळणार्‍या कमी दराच्या सुलभ कर्जाची भर पडली आहे/पडत राहणार आहे. अर्थातच, छोट्या/मध्यम आकाराच्या गाड्या, कमी/मध्यम किमतीची घरे, सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातल्या वस्तू, इत्यादींची विक्री वाढेल. लक्झरी गाड्या/सदनिका/वस्तू यांच्यापेक्षा नवीन विक्रीची "दर नग किंमत" कमी असली तरी एकूण नगांची संख्या अनेक पटींनी जास्त असेल. याचा (किंमत X नग) परिणाम म्हणून, येत्या ३ ते ४ तिमाहींत, जीडीपीत "वाढ" (सूज नव्हे !) होण्यात होईल. यामध्ये अजून एक महत्वाचे परिणाम विसरले जात आहे. असंघटीत असलेले व्यवसाय आणि छोटेमोठे उद्योग यांच्या उत्पादन/सेवेचा अंदाज लावणे शक्य नसल्याने जीडीपी ठरवताना एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होते किंवा त्यांच्या उत्पादन/सेवेची अंदाजपंचे कमीत कमी किंमत धरली जात असे. आता, डिजिटल व्यवहारांमुळे त्यांच्या उत्पादन/सेवेची खरी किंमत जमेस धरणे जास्त सुलभ होईल. वर म्हटल्याप्रमाणेच, अश्या प्रत्येक व्यवसाय/उद्योगाचे उत्पन्न तुलनेने कमी (वार्षिक काही लाख) असले तरी भारतभरचे असे सर्व व्यवसाय दशलक्षांच्या संखेत आहेत... जीडीपीतले त्यांचे योगदान लक्षणिय असणार आहे. मुख्य म्हणजे, यापुढची नवीन वाढ सर्वसामान्य लोकांच्या हाती जास्त पैसा खेळू लागल्याने होणार आहे... श्रीमंत जास्त श्रीमंत झाल्यामुळे नाही. अर्थातच, ही वाढ लोकाभिमूख आणि म्हणुनच निरोगी वाढ असेल. किंबहुना, अश्या वाढीचा दर पूर्वीच्या सूजेपेक्षा कमी असला तरी तो देशाच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचाच राहील. आणि त्यामुळे भारताची पत रेटिंग एजन्सींनी पूर्वीपेक्षा जास्त वाढवली तर आश्चर्य वाटायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मस्तच

गॅरी ट्रुमन
Wed, 01/11/2017 - 15:26 नवीन
खरे कारण नव्या सालचे रजिस्ट्रेशन आर सी वर आले की गाडी विकताना बरी किंमत येते हे आहे. हे २२ वर्षाचे निरिक्षण जवळूनचे आहे.
मस्तच. हे कारण नक्कीच समजण्यासारखे आहे. फ्रिकॉनॉमिक्समधील आकड्यांच्या विश्लेषणाप्रमाणे हे एक उत्तम उदाहरण होऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

एक बातमी

गॅरी ट्रुमन
Sat, 01/07/2017 - 11:51 नवीन
ही बातमी चुकीच्या वेळी आली की हा लेख चुकीच्या वेळी लिहिला आहे हे समजेना झाले आहे :)
  • Log in or register to post comments

दहशतवादी हिंसाचार ६०% आणि

मार्मिक गोडसे
Sat, 01/07/2017 - 12:35 नवीन
दहशतवादी हिंसाचार ६०% आणि हवाला व्यवहार ५०% नी कमी झाला असं बातमी सांगते. ह्याचा अर्थ नवीन बनावट नोटा बाजारात आल्या असाव्यात आणि नवीन ५०० व २००० च्या नोटांनी हवाला व्यवहार सुरळीत चालू झाला असावा आणि तोही नोटाबंदी चालू असताना. नोटाबंदी हा यावर जालीम उपाय होता ना? मग का फक्त ५०% च्या आसपास यश मिळाले?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा