✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

क्रिकेट - २

श
श्रीगुरुजी यांनी
गुरुवार, 01/05/2017 - 14:11  ·  लेख
लेख
मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
112138 वाचन

💬 प्रतिसाद (432)

प्रतिक्रिया

दिवसाखेर इंग्लंड ७७/०.

श्रीगुरुजी
Sun, 09/05/2021 - 23:52 नवीन
दिवसाखेर इंग्लंड ७७/०. विजयासाठी उद्या ९० षटकांत २९१ धावा हव्या.
  • Log in or register to post comments

ठाकूर

गुल्लू दादा
Mon, 09/06/2021 - 16:35 नवीन
जे काम भल्या-भल्यांना जमत नाही ते काम ठाकूर अंकल करून जातात.
  • Log in or register to post comments

इंग्लंड १४९/६. अजून ५३ षटके

श्रीगुरुजी
Mon, 09/06/2021 - 18:56 नवीन
इंग्लंड १४९/६. अजून ५३ षटके शिल्लक आहेत.
  • Log in or register to post comments

ठाकूर

गुल्लू दादा
Mon, 09/06/2021 - 19:54 नवीन
'जो' ला 'रुटा'तून उपटले आहे.
  • Log in or register to post comments

१९३/८.

श्रीगुरुजी
Mon, 09/06/2021 - 20:14 नवीन
१९३/८. चहापान. अजून ३७.५ षटके शिल्लक आहेत.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

गुल्लू दादा
Mon, 09/06/2021 - 21:09 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

खरंच अभिनंदन

गामा पैलवान
Mon, 09/06/2021 - 21:17 नवीन
गेल्या कसोटीतल्या सर्वबाद ७८ नंतर व चालू कसोटीतल्या १०० धावांच्या पिछाडीनंतर जी विजयी मजल मारलीये त्याबद्दल कोहली व कोहलीसेनेचे मनापासून अभिनंदन. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

इंग्लिश हवेने लांबवलेली १५७ ची भेट

गामा पैलवान
Tue, 09/07/2021 - 19:50 नवीन
लोकहो, नॉटिंग(ह)म येथल्या पहिल्या कसोटीत भारतास शेवटच्या दिवशी जिंकावयास केवळ १५७ धावा हव्या होत्या व ९ गाडी बाकी होते. इंग्लिश पावसाने एक चेंडूही टाकू दिला नाही व भारताचा विजय हिरावला गेला. मात्र लंडनच्या चौथ्या कसोटीत नेमक्या तितक्याच म्हणजे १५७ धावांनी इंग्लंडचा पराभव झाला. जणू इंग्लिश हवेने भारतीय संघावर प्रसन्न होऊन एकदा नाकारलेली भेट परत दिली. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

चिनी विषाणू संसर्गाच्या

श्रीगुरुजी
Fri, 09/10/2021 - 18:13 नवीन
चिनी विषाणू संसर्गाच्या भीतिने आजपासून सुरू होणारा ५ वा कसोटी सामना रद्द झाला आहे.
  • Log in or register to post comments

आय पी एल साठी शेवटच्या

श्री
Sat, 09/11/2021 - 09:39 नवीन
आय पी एल साठी शेवटच्या कसोटीचा बळी दिला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

असंच दिसतंय. चिनी विषाणूचा

श्रीगुरुजी
Sat, 09/11/2021 - 09:48 नवीन
असंच दिसतंय. चिनी विषाणूचा संसर्ग नको म्हणून ५ वा कसोटी सामना रद्द केला. पण १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत हा धोका दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री

आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना

श्रीगुरुजी
Wed, 10/13/2021 - 23:22 नवीन
आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना कलकत्ता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शुक्रवारी १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७:३० वाजता खेळला जाईल.
  • Log in or register to post comments

शेवटी चेन्नई जिंकले.

श्रीगुरुजी
Sat, 10/16/2021 - 17:36 नवीन
शेवटी चेन्नई जिंकले. कलकत्त्याने अत्यंत वाईट गोलंदाजी केली व फलंदाजी करताना दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतक करून भक्कम सुरूवात देऊनही पुढचे सगळे फाफलले. नितीश राणा, कार्तिक, मॉर्गन, शाकिब, त्रिपाठी हे सर्वजण पूर्ण अपयशी झाले.
  • Log in or register to post comments

कालपासून ट-२० विश्वचषक

श्रीगुरुजी
Sun, 10/24/2021 - 22:14 नवीन
कालपासून ट-२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. काल ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा व इंग्लंडने वेस्ट इंडीजचा पराभव केला. आज श्रीलंकेने बांगलादेशाचा पराभव केला. आता भारत-पाकिस्तान सामना सुरू आहे. भारत पराभवाच्या मार्गावर आहे.
  • Log in or register to post comments

भारत १५१/७ (२०)

श्रीगुरुजी
Sun, 10/24/2021 - 23:21 नवीन
भारत १५१/७ (२०) पाकडे १५२/० (१७.५) अत्यंत वाईट पद्धतीने हरलो. अतिशय सुमार गोलंदाजी.
  • Log in or register to post comments

अबब!हरलो ,मी पाहत नव्हते

Bhakti
Mon, 10/25/2021 - 06:37 नवीन
अबब!हरलो ,मी पाहत नव्हते सामना .पण फारच उदो उदो चालला होता टीमचा !अति आत्मविश्वास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ह्या...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 10/25/2021 - 12:57 नवीन
लैच बेक्कार हरलो राव आणि ते सुध्दा पाकड्यां कडून. इतके भिकारचोट हरु असे वाटले नव्हते. काय ती बॉलिंग आणि काय ती बॅटींग अरारा, बघवत नव्हती मॅच, रोहित, हर्दिक, राहुल, जडेजा, शमी आणि भुवनेश्वर सरळ बाहेर बसवले पाहिजेत. इतके वाईट तर गल्ली क्रिकेट मधे सुध्दा कोणी हरत नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जगात जे एकमेकाचे कट्टर वैरी आहेत

Rajesh188
Mon, 10/25/2021 - 13:22 नवीन
असे देश . इस्त्रायल -. फिलिस्तान,अरब देश एकमेकाच्या देशात सांस्कृतिक देवाण घेवाण,फक्त ह्याच देशात खेळाच्या स्पर्धा आयोजित केलेले कधी ऐकलं आहे का. जागतिक स्पर्धा सोडून फक्त दोन च देशात जे एकमेकाचे पक्के वैरी आहेत. खेळाच्या स्पर्धा होतात का? फक्त भारत ,पाकिस्तान हे दोन च देश असले उद्योग करतात. भारतीय खेळाडू पाकिस्तान च्या खेळाडू बरोबर लग्न करते . मग सामान्य लोकांनी काय घोड मारले आहे परवाच वाचले रेखा आणि इम्रान खान ची मैत्री होती. मग सामान्य लोकांनीच एकमेकाची डोकी फोडायची का?
  • Log in or register to post comments

आता समजले खरा प्रॉब्लेम कुठे आहे ते...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 10/25/2021 - 13:29 नवीन
भारतीय खेळाडू पाकिस्तान च्या खेळाडू बरोबर लग्न करते . मग सामान्य लोकांनी काय घोड मारले आहे... सामान्य लोकांनीही जमले तर करावे की लग्न.... एखाद्या सामान्य पाकिस्तानी लोकीणी बरोबर, (अर्थात त्या करता सामान्य लोकांची मिपावरची मौक्तिके तिच्या वाचनात नाही आली पाहिजेत. नाहीतर ती लग्न करायचे सोडून गळफास घेणे पसंत करेल) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

हॅ

सुरिया
Mon, 10/25/2021 - 14:00 नवीन
सामान्य लोकांची मिपावरची मौक्तिके तिच्या वाचनात नाही आली पाहिजेत. नाहीतर ती लग्न करायचे सोडून गळफास घेणे पसंत करेल गळफास कशाला घेईल. उलट इंप्रेस होईल. इतका एक्सलन्स त्यानातरी कुठे साधलाय. कदाचित पुढेमागे जावाईबापू म्हणून तिकल्ल्या फारिन मिनिस्ट्रीचे प्रवक्ते म्हणून वर्णी लागू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

सामान्य लोकांनी एकमेकांची

रात्रीचे चांदणे
Mon, 10/25/2021 - 13:31 नवीन
सामान्य लोकांनी एकमेकांची डोकी फोडायला पाहिजे कोण म्हणतंय? पण भारत पाकिस्तान match असताना भारत हारायला पाहिजे असं मनात तरी कसं काय येतंय? चालू असलेली worldt20 ही जागतिक स्पर्धा नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

पाकड्यांनी न्यूझीलंडला हरवून

श्रीगुरुजी
Tue, 10/26/2021 - 23:11 नवीन
पाकड्यांनी न्यूझीलंडला हरवून सलग दुसरा विजय मिळविला व आपला उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास नक्की केलाय. या गटातून उपांत्य फेरीत जाणारा दुसरा संघ हा भारत-न्यूझीलंड सामन्यातील विजेता असेल. दुसरीकडे सलग दोन पराभवानंतर विंडीज उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
  • Log in or register to post comments

इंग्लंड व पाकड्यांचा उपांत्य

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/28/2021 - 08:33 नवीन
इंग्लंड व पाकड्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास नक्की झालाय. विंडीज, स्कॉटलंड व बांगडे उपांत्य फेरीत येणार नाहीत हे जवळपास नक्की झालंय. भारत-न्यूझीलंड सामन्यातील विजेता उपांत्य फेरीत जाणारा अजून एक संघ असेल.
  • Log in or register to post comments

प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना

श्रीगुरुजी
Sun, 11/07/2021 - 21:48 नवीन
प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना खेळण्याआधीच भारत उपांत्य फेरीत जाणार नाही हे नक्की झालंय. अत्यंत व्यग्र वेळापत्रक व त्यामुळे झालेली दमछाक, संघात चुकीच्या खेळाडूंची निवड, अतिशय वाईट फलंदाजी व गोलंदाजी, आयपीएलचा अतिरेक यामुळे वाईट कामगिरी होणे अपेक्षितच होते. आयपीएल स्पर्धेला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यासाठी रणजी करंडक स्पर्धा व इंग्लंडबरोबरील ५ वा कसोटी सामना रद्द करण्यात आला. यापुढे आयपीएल मुळे भारतात अनेक आयपीएल हिरो तयार होतील, परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांचा निभाव लागणे अवघड आहे. येणाऱ्या वर्षापासून आयपीएल स्पर्धेत ८ ऐवजी १० संघ असणार आहेत. त्यामुळे एकूण सामन्यांची संख्या ६० वरून ९४ वर जाईल. कदाचित स्पर्धेचा कालावधी सुद्धा एक दीड महिन्याने वाढेल व त्यासाठी रणजी करंडकासारखी स्थानिक स्पर्धा, कसोटी सामने यांचा बळी दिला जाईल. यामुळे तंत्रशुद्ध फलंदाजी, गोलंदाजीचे प्रयोग, क्लासिक क्रिकेट भारतातून कायमस्वरूपी हद्दपार होईल अशी भीति वाटत आहे.
  • Log in or register to post comments

७ व्या ट-२० विश्वचषक

श्रीगुरुजी
Sun, 11/14/2021 - 23:14 नवीन
७ व्या ट-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला अगदी सहज हरवून विजेतेपद पटकावले.
  • Log in or register to post comments

इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/02/2022 - 21:55 नवीन
इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिका सुरू झालीये. आज सुरू झालेल्या लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी सर्वबाद १३२ अशी न्यूझीलंडची वाईट अवस्था झाली. ३९ वर्षे ३०७ दिवस वयाच्या मध्यमगती गोलंदाज जेम्स अँडरसनने उत्कृष्ट गोलंदाजी करून ४ फलंदाज बाद केले.
  • Log in or register to post comments

इंग्लंड दिवसाखेर ११६/७

श्रीगुरुजी
गुरुवार, 06/02/2022 - 23:03 नवीन
इंग्लंड दिवसाखेर ११६/७
  • Log in or register to post comments

नवीन धागा काढा...

सुजित जाधव
Fri, 06/03/2022 - 09:38 नवीन
नवीन धागा काढा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

इंग्लंड-न्यूझीलंड लॉर्ड्स

श्रीगुरुजी
Fri, 06/03/2022 - 19:52 नवीन
इंग्लंड-न्यूझीलंड लॉर्ड्स येथे पहिला कसोटी सामना दुसरा दिवस - न्यूझीलंड पहिला डाव १३२/१० इंग्लंड पहिला डाव १४१/१० न्यूझीलंड दुसरा डाव १११/४
  • Log in or register to post comments

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

सुजित जाधव
Sat, 06/11/2022 - 19:19 नवीन
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका: खराब गोलंदाजीमुळे पहिलाच सामना आपण हरलो. आवेश खानचा अपवाद वगळता प्रत्येक गोलंदाजाने १०+ च्या गतीने धावा दिल्या..हर्षल पटेल डेथ ओव्हर मध्ये विकेट घेतो पण धावा जास्त देतो त्याच्यापेक्षा प्रसिद्ध कृष्णा चांगला पर्याय वाटतो मला.. हार्दिक पंड्या आणि ईशान किशन यांची फलंदाजी आवडली.. डेव्हिड मिलर तुफान फॉर्म मध्ये दिसतोय..
  • Log in or register to post comments

Van Der Dussen चा श्रेयस

श्रीगुरुजी
Sat, 06/11/2022 - 21:30 नवीन
Van Der Dussen चा श्रेयस अय्यरने सोडलेला झेल, १६ व्या व १७ व्या षटकात दिलेल्या प्रत्येकी २२ धावा या गोष्टी फारच महागात गेल्या. तसाही हा आपला पूर्ण संघ नाही. बुमराह, शमी, राहुल, कोहली, रोहीत हे या संघात नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

दुसरा सामना पण हरलो...

सुजित जाधव
Mon, 06/13/2022 - 21:27 नवीन
दुसरा सामना पण हरलो... मला जरा फलंदाजी क्रम व्यवस्थित वाटत नाहीये.. श्रेयस अय्यर तिसऱ्या चार नंबर हार्दिक पांड्या आणि मग पंत, कार्तिक, अक्षर यांना खेळवायला हवं.. कारण पंत टी-२० मध्ये टिकून राहण्यापेक्षा आक्रमक खेळ जास्त करतो...आणि पांड्या ने आयपीएल मध्ये चार नंबर वर चांगली फलंदाजी करून दाखवली आहे.. आणि कार्तिक ला फक्त फिनिशर म्हणून संघात ठेवणे हे पण पटत नाहीये ..कारण काल तेराव्या षटकात ४ बाद ९० अशी धावसंख्या असताना अनुभवी कार्तिकला पाठीमागे ठेवून अक्षर पटेलला पाठवले.. २०२१ च्या आयपीएल आधी कार्तिक हा ३,४ किंवा ५ नंबर ला खेळायचा हे विसरतो आहे आपण...
  • Log in or register to post comments

कार्तिकला ४ थ्या व पंड्याला ५

श्रीगुरुजी
Mon, 06/13/2022 - 22:12 नवीन
कार्तिकला ४ थ्या व पंड्याला ५ व्या क्रमांकावर पाठवायला हवे. ऋतुराज गायकवाडला विश्रांती द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट

सुजित जाधव
Fri, 06/17/2022 - 21:56 नवीन
पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वाधिक धावांचा त्यांचाच विक्रम मोडून इंग्लंड संघाने आज नेदरलँड बरोबर खेळताना ४ बाद ४९८ धावा बनवल्या...यादरम्यान त्यांनी एकूण २६ षटकार आणि ३६ चौकरांची बरसात केली...इंग्लंड च्या तीन फलंदाजांनी शतक ठोकले... जॉस बटलर ने अवघ्या ७० चेंडूत १६२ धावांची आतिषबाजी खेळी केली..ज्यात त्याने १४ षटकार आणि ७ चौकार लगावले..सलामीवीर फिलिप सॉल्ट(१२२) आणि डेव्हिड मलान (१२५) यांनीही शतके लगावली...
  • Log in or register to post comments

हा सामना अधिकृत होता का? कारण

श्रीगुरुजी
Fri, 06/17/2022 - 22:08 नवीन
हा सामना अधिकृत होता का? कारण नेदरलँड्स संघाला मान्यता नाही असा माझा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

इतकं काही माहीत नाही...पण

सुजित जाधव
Sat, 06/18/2022 - 22:20 नवीन
इतकं काही माहीत नाही...पण आयसीसी ने त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम हॅण्डल वरून विक्रमाची नोंद घेतली आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारत-आफ्रिका ५ वा ट-२० सामना

श्रीगुरुजी
Sun, 06/19/2022 - 22:45 नवीन
भारत-आफ्रिका ५ वा ट-२० सामना पावसाने रद्द झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २८/२ (३.३) अश्या धावा केल्यानंतर जोरदार पावसामुळे सामना रद्द झाला. मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजने बांगड्यांचा ७ फलंदाज राखून पराभव झाला. बांगडे १०३/१० व २४५/१० विंडीज २६५ व ८८/३ लंका- ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलिया २९१/६ (५०) लंका २९२/४ (४८.३) मालिका श्रीलंकेने ३-० अशी एकतर्फी जिंकली.
  • Log in or register to post comments

मागील मालिकेत न झालेला ५ वा

श्रीगुरुजी
Sun, 07/03/2022 - 19:41 नवीन
मागील मालिकेत न झालेला ५ वा कसोटी सामना - भारत ४१६ व ४/१ इंग्लंड २८४
  • Log in or register to post comments

तिसऱ्या दिवसाखेर भारत १२५/३.

श्रीगुरुजी
Sun, 07/03/2022 - 23:53 नवीन
तिसऱ्या दिवसाखेर भारत १२५/३. भारताकडे २५७ धावांचे आधिक्य.
  • Log in or register to post comments

भारत ४१६ व २४५

श्रीगुरुजी
Mon, 07/04/2022 - 23:10 नवीन
भारत ४१६ व २४५ इंग्लंड २८४ व २५९/३ सामना जिंकायला इंग्लंडला अजून १२४ धावा हव्या. भारताच्या हातून सामना निसटला आहे. उद्या एखादा चमत्कारच सामना वाचवू शकतो.
  • Log in or register to post comments

अत्यंत वाईट फलंदाजी, गोलंदाजी

श्रीगुरुजी
Tue, 07/05/2022 - 23:44 नवीन
अत्यंत वाईट फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यामुळे भारत सामना हरला.
  • Log in or register to post comments

पुजारा गेला आणि ....

गामा पैलवान
Wed, 07/06/2022 - 02:26 नवीन
पुजारा गेला आणि फलंदाजी ढेपाळली. किमान ४५० चं लक्ष्य ठेवायला हवं होतं. तरीपण कितपत उपयोग झाला असता याची शंकाच आहे. मात्र पूर्ण प्रयत्न केल्याचं समाधान तरी लाभलं असतं. असो. तूर्तास, या दिमाखदार विजयाबद्दल इंग्लंडचं अभिनंदन. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत वि.

श्रीगुरुजी
Sun, 08/07/2022 - 22:47 नवीन
राष्ट्रकुल स्पर्धेत भारत वि. ऑस्ट्रेलिया महिलांचा अंतिम फेरीतील ट-२० सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलिया महिला १३८/५ (१७)
  • Log in or register to post comments

ऑस्ट्रेलियन महिला १६१/८ (२०)

श्रीगुरुजी
Sun, 08/07/2022 - 23:02 नवीन
ऑस्ट्रेलियन महिला १६१/८ (२०)
  • Log in or register to post comments

हाणा जोरदार म्हणावं

गामा पैलवान
Sun, 08/07/2022 - 23:11 नवीन
मानधना, मार दनादना ! आज आपल्याला मानधनाचं शतक पाहिजे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मंधाना आणि शेफाली वर्मा

श्रीगुरुजी
Sun, 08/07/2022 - 23:25 नवीन
मंधाना आणि शेफाली वर्मा गेल्या. भारत २२/२ (३.३).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

भारत ७८/२ (१०.२)

श्रीगुरुजी
Sun, 08/07/2022 - 23:50 नवीन
भारत ७८/२ (१०.२)
  • Log in or register to post comments

भारत हरला. सर्वबाद १५२.

श्रीगुरुजी
Mon, 08/08/2022 - 00:53 नवीन
भारत हरला. सर्वबाद १५२. ११८/२ (१४.२) अश्या अत्यंत भक्कम स्थितीतून आत्मघाती फलंदाजीमुळे पराभव.
  • Log in or register to post comments

आशिया चषक (ट-२०) स्पर्धा

श्रीगुरुजी
Sun, 08/28/2022 - 22:25 नवीन
आशिया चषक (ट-२०) स्पर्धा कालपासून दुबईत सुरू झाली. कालच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा दारूण पराभव केला. आज भारत-पाकिस्तान सामना सुरू आहे. पाकिस्तान १४७/१० (२०), भारत ५०/२ (८).
  • Log in or register to post comments

अत्यंत चुरशीचा सामना भारताने

श्रीगुरुजी
Sun, 08/28/2022 - 23:53 नवीन
अत्यंत चुरशीचा सामना भारताने जिंकला. पाकिस्तान १४७/१० (१९.५) भारत १४८/५ (१९.४)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा