(किंचीत अनुवाद. कवी--गुलझार)
स्मृति माझ्या आहेत तुझ्याजवळी
श्रावणातले ओलेते दिवस मात्र
अन एकच माझे ते प्रेमपत्र
लिपटलेली ती काळोखी रात्र
जा विसरून त्या स्मृति या क्षणी
अन परतवून टाक त्या आठवणी
ग्रिष्मातली पानांची पडझड
पडत्या पानांची ती सळसळ
वहात्या झऱ्याची ती खळखळ
कानी माझ्या अजूनी वाजती
स्मृति माझ्या आहेत तुझ्याजवळी
जा विसरून त्या स्मृति या क्षणी
अन परतवून टाक त्या आठवणी
पडझडणाऱ्या त्या पानांची
गदगदणारी ती फांदी
अजूनही करते गदगद
मोडून टाक ती आधी
स्मृति माझ्या आहेत तुझ्याजवळी
जा विसरून त्या स्मृति या क्षणी
अन परतवून टाक त्या आठवणी
पडक्या एका छ्ताखाली
भिजत होतो आपण दोघे
अर्धे शुष्क अन अर्धे भिजलेले
शुष्क झालो आपण दोघे परि
मन माझे होते तसेच भिजलेले
सकवू नको ते याउप्परी
स्मृति माझ्या आहेत तुझ्याजवळी
जा विसरून त्या स्मृति या क्षणी
अन परतवून टाक त्या आठवणी
त्या पौर्णिमेच्या चांदण्या रात्री
अन गालावरची तुझी ती खळी
ती अळीमिळी आणि गुपचीळी
अन खोटी खोटी दांभिक बोलणी
स्मृति माझ्या आहेत तुझ्याजवळी
जा विसरून त्या स्मृति या क्षणी
अन परतवून टाक त्या आठवणी
दे मज एकच सम्मति
करण्या दफन ह्या स्मृतिचे
घेईन मग मी चीरशांती
ह्या दफनामधे कायमचे
श्रीकृष्ण सामंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3653
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेरा कुछ सामान ?
आभार
वा
छान...
जसे पहावे तसे दिसते
In reply to छान... by फटू
काव्य
"चोप्रा " नऊवारी "ढोप्रा" पर्यंत नेसून "यम टीव्ही" जीन आली तरी
In reply to काव्य by गणा मास्तर
जल्ला क
खरां लिवलां की जल्ला भारी वाटतां.
In reply to जल्ला क by ब्रिटिश
हम्म!
आभार
In reply to हम्म! by विसोबा खेचर
सामान हा
गुलाबाचा जुलाब