✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी का आहे ?

क
कपिलमुनी यांनी
गुरुवार, 11/24/2016 - 20:48  ·  लेख
लेख
गाभा: माझ्या एका मित्राला तू महाराष्ट्राच्या राजकारणात का जात नाही असे विचारले असता , त्याने ही इंडस्ट्री " of the maraathaa , by the maraathaa, for the maraathaa" आहे असे धक्कादायक उत्तर दिले . त्याच्याशी बराच वाद घातल्यानंतर त्याचे काही मुद्दे खालील होते जे मला मान्य करावे , उदा . १) महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुतेक आमदार मराठा आहेत . २) मंत्रीमंडळात मधली characters ची नावेही एकाच विशिष्ट वर्गाची असतात . तसेच बोलली जाणारी भाषाही एका विशिष्ट वर्गाची असते , पुणे किंवा पार्ले येथील भाषा क्वचित असते . फडणवीसांसारख्या ब्राह्मण नेत्याला मिळालेले यश हेच सांगत नाही काय ? की राजकारणातील मराठा आपण संपूर्ण महाराष्ट्राला represent करतो ह्या भ्रमात आहेत ? popcorn
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
13441 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

मूक नव्हे हो

nanaba
Fri, 11/25/2016 - 16:07 नवीन
मुक मोर्चा! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

शुद्धलेखन एका विशिष्ट वर्गाची

अनुप ढेरे
Fri, 11/25/2016 - 16:11 नवीन
शुद्धलेखन एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba

असं म्हणतातः वादविवादात

संदीप डांगे
Fri, 11/25/2016 - 16:13 नवीन
असं म्हणतातः वादविवादात जेव्हा तुमच्याकडे मुद्दे नसतात तेव्हा तुम्ही दुसर्‍यांच्या शुद्धलेखनातल्या चुका काढता. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

विशुमित, तुम्ही जात आधारित

मोदक
Fri, 11/25/2016 - 19:39 नवीन
विशुमित, तुम्ही जात आधारित नवीन आरक्षणाचे समर्थन करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

वरील प्रतिसादात मी नमूद केलंच

विशुमित
Sat, 11/26/2016 - 09:56 नवीन
वरील प्रतिसादात मी नमूद केलंच आहे. मिळत असेल तर मी म्हणतो का सोडावे ? जो तुमचे शब्द आहेत "नवीन आरक्षणाचे" हे पडद्या मागून केलेले विधान आहे असे मला वाटते. मुळात तुमचा आहे त्याच आरक्षणाला विरोध आहे त्यात हे नवीन नको असा स्टॅन्ड दिसतोय. कायदेशीर मार्गाने ज्याला मिळत असेल तर मिळू द्यात की. जे सर्वज्ञ आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

>>>नवीन आरक्षणाचे हे पडद्या

मोदक
Sat, 11/26/2016 - 10:13 नवीन
>>>नवीन आरक्षणाचे हे पडद्या मागून केलेले विधान आहे असे मला वाटते. म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? >>>मुळात तुमचा आहे त्याच आरक्षणाला विरोध आहे त्यात हे नवीन नको असा स्टॅन्ड दिसतोय. आणखी थोडा प्रयत्न करा, जमेल हळूहळू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

घराणे शाही मध्ये बदलत गेली

माहितगार
Fri, 11/25/2016 - 12:18 नवीन
घराणे शाही मध्ये बदलत गेली आहे. ते ही मूठभर आहेत.
मराठी विकिपीडियावरील हे दोन लेख (तसे पहाता अद्याप अपूर्ण आहेत तरीही) पहाल तर राजकारणात घराणेशाही खरेच मूठभरच आहे ? * लोकशाही राजकारणातील घराणेशाही * स्थानिक राजकारणातील घराणेशाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

>>७) गावांमध्ये जैन-मारवाडी

सतिश गावडे
Fri, 11/25/2016 - 12:33 नवीन
>>७) गावांमध्ये जैन-मारवाडी व्यापारी समाजाला भक्कम संरक्षण देण्याची कुवत. माझा असा समज आहे की समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था आहे. त्यामुळे समाजातील एका गटामध्ये दुसरे गटाला "भक्कम संरक्षण देण्याची कुवत" आहे असं म्हणणं म्हणजे अशी समांतर "संरक्षण व्यवस्था" अस्तित्वात असल्याची कबुली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

बरोबर आहे तुमचं गावडे सर पण

विशुमित
Fri, 11/25/2016 - 13:10 नवीन
बरोबर आहे तुमचं गावडे सर पण ही अघोषित संरक्षण व्यवस्था असतेच. पुण्यात नगरसेवकांच्या संमतीशिवाय वडापावचा गाडा टाकून दाखवा, ते पण पोलीस संरक्षण घेऊन. ते असं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

निरागस प्रतिसाद ...

ओल्ड मोन्क
Fri, 11/25/2016 - 16:28 नवीन
असं नसत हो साहेब.धंदा करणाऱ्याचे बरेच नवरे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

माझा असा समज आहे की समाजात

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Fri, 11/25/2016 - 12:42 नवीन
माझा असा समज आहे की समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्था आहे.>>>>>>>> या व्यवस्था कचाकड्यांच्या बाहुल्या आहेत,प्रत्यक्षात बळी तो कानपिळी हाच न्याय लागू आहे.
  • Log in or register to post comments

भ्रष्ट राजकारण ही द्विरुक्ती

मराठी_माणूस
Fri, 11/25/2016 - 15:36 नवीन
भ्रष्ट राजकारण ही द्विरुक्ती आहे असे म्हणतात.
  • Log in or register to post comments

नाही हो, आम्ही जे राजकारण

संदीप डांगे
Fri, 11/25/2016 - 16:11 नवीन
नाही हो, आम्ही जे राजकारण करतो ते कल्याणकारी, इतर करतात ते भ्रष्ट राजकारण अशी व्याख्या आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मला कुठलाही धर्म नको ...

'पिंक' पॅंथर्न
Sat, 11/26/2016 - 02:19 नवीन
मला कुठलाही धर्म नको ... मला त्या धर्माच्या अनुषघांने... कुठलीही जात नको... मराठा..ब्राम्हण.. माळी .. सुतार... लोहार..सोनार... कुंभार... साळी.. कोष्टी.. महार .... मांग... सुन्नी.. शिया.. वहबी... ( जिहादी नविन जात) कॅथॅलीक .. प्रोटेस्टंट.... मला माणुस म्हणुन जगायचं जनावर .... जसं सिंह , वाघ हरणा ची शिकार करतात आणि हरण गवत खाते.. मला कुणाची शिकार नाही प्लिज!?
  • Log in or register to post comments

पॉपकॉर्न धागा

कपिलमुनी
Sat, 11/26/2016 - 08:17 नवीन
पॉपकॉर्न धागा आहे , टेंशन न घेता पॉपकॉर्न खावा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न

हो !!! सर्वसाधारणपणे मराठा आणि त्यांना संलग्न जातींची मक्तेदारी

अन्कुश शिन्दे
Sat, 11/26/2016 - 18:11 नवीन
विशुमती यांच्या मतांशी सहमत !!! हो !!! सर्वसाधारणपणे मराठा आणि त्यांना संलग्न जातींची मक्तेदारी आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित झालेल्या लेखात त्याचा उल्लेख हि आढळतो. तुमच्या माहितीसाठी तो लेख ... सामान्य माणसाचा अाधारवड वसंतदादा पाटीलजन्मशताब्दी विशेष ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आज (ता. १३) पासून ते सुरू होत आहे. शिक्षणाचे दरवाजे सामान्यांना खुले करून देणारा नेता, जलसंधारणाची चळवळ हाती घेणारा 'पाणीदार नेता', प्रसंगी पक्षश्रेष्ठींशी ही पंगा घेणारा; परंतु तत्त्वाशी तडजोड न करणारा स्वाभिमानी नेता अशी दादांची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा हा लेख.यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं असतं, तर राजीनामा दिला असता; परंतु त्यांनी न सांगता आपलं सरकार पाडल्यामुळं वसंतदादांच्या मनात शरद पवारांपेक्षाही यशवंतरावांबद्दल राग होता. तरीही एका मिरवणुकी दरम्यान या दोघांचे टीपलेले हे छायाचित्र.कदाचित ही गोष्ट सर्वश्रुत नसेल. आदरणीय वसंतदादा व माझे घनिष्ट स्नेहसंबंध होते. काही लोकांना मात्र याची माहिती आहे. ते वयानं व प्रतिष्ठेनं खूप उंचीवर. मी मात्र एक लहान सामाजिक कार्यकर्ता. एवढं अंतर असलेलं नातं बरंच एकेरी असतं. ते मनापासून माझ्यावर प्रेम करायचे, असं फारतर म्हणता येईल. १९७८ साली दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विधानसभेत ते माझे भाषण ऐकत. नंतर दोन कौतुकाचे बोल ऐकवायचे. मला आंदोलनाची खोलवर माहिती झाली होती. काही अंशी सिद्धी प्राप्त झाली होती. संसदीय राजकारण मात्र मी नवखा होतो, म्हणून मी माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे 'विधानसभा कामकाज' या विषयाची शिकवणी लावली होती. शंकरराव आमदार निवासात राहत. ही गोष्ट अप्रूप होती. त्यांनी 'बिल्डर लॉबी'शी सख्य न ठेवल्यानं त्यांना कोणी फ्लॅट देऊ केला नव्हता. त्याच खोलीत कुसुमताई राहत. संध्याकाळी आमदार निवासाच्या खोलीत त्यांचा स्वयंपाक चालू व माझी शिकवणी त्याच खोलीत चालू. शिकवणीचा परिणाम म्हणून माझी भाषणं जुन्या आमदारांसारखी होत. त्याचं दादांना आश्चर्य वाटे. कालांतरानं दादांचं सरकार पाडून, शरद पवार यांना मुख्यमंत्री करून पुलोद सरकार सत्तेवर आणण्याचा डाव रचण्यात आला. गोविंदराव आदिक, सुशीलकुमार शिंदे, प्रतापराव भोसले, सुंदरराव सोळुंके यांना सोबत घेऊन शरद पवार नवीन पक्ष स्थापन करणार आहेत आणि जनता पक्षाबरोबर गठबंधन करायचं त्यांचं धोरण आहे. ही बाब फार उशीरा दादांच्या लक्षात आली. जेव्हा ही बातमी गुप्तचर यंत्रणोकडून त्यांना कळली, तेव्हा त्यांनी शरद पवारांना बोलावलं. विचारणा केली. तेव्हा पवार म्हणाले, 'बातमी पूर्णत: खोटी आहे. मी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन पक्षाबद्दलची व माझे नेते म्हणून आपल्यावरील निष्ठा जाहीर करतो.' पवारांच्या तीव्र प्रतिक्रियेमुळं दादांचा संशय फिटला. या प्रसंगानंतर केवळ १५ मिनिटानंतर वर उल्लेख केलेल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. दादांचा विधानसभेत पराभव झाला. त्यांच्या मनाला ही गोष्ट फार लागली. त्या वर्षात शरद पवारांचे सरकार पाडण्यासाठी ते सतत चाचपणी करत होते. ते म्हणत, 'हा अपमान मी सहन करु शकत नाही. साहेबांनी (यशवंतराव चव्हाण) मला राजीनामा देण्यास सांगायचं होतं. मी तात्काळ राजीनामा दिला असता. मी साहेबांचा आदेश मानला नसता, तर हे डावपेच करणं त्यांना शोभलं असतं. विधानसभेत अधिवेशन चालू असताना आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचा सभागृहात पराभव करावा हा अपमान आहे. चालत्या गाडीतून स्वकीयांनी मला बाहेर फेकून दिल्याची माझी भावना आहे' त्यांचा राग पवारांपेक्षा साहेबांवर होता. आमचा १६ आमदारांचा समविचारी गट होता. आम्ही कोणत्याही पूर्वाश्रमीच्या पक्षातून आलेलो नव्हतो. दादांनी शरद पवारांचं सरकार पाडण्याची माझ्याकडं चाचपणी केली. दादांचं बोलणं ऐकून माझ्या मनात विचार आला. महाभारतात भर दरबारात द्रौपदीचं केलेलं वस्त्रहरण आठवलं. तिच्या मनात जशी वेदना असेल, तीच अवस्था दादांच्या मनाची झाली असावी. दादांच्याकडं शिक्षण, प्रशासकीय कौशल्य या गोष्टी काही प्रमाणात कमी असतील. तथापि हे वैगुण्य भरून काढण्यासाठी त्यांनी पर्यायी मार्ग शोधले. अंध माणूस आपले कान कार्यक्षम करतो आणि आपल्या वैगुण्याची भरपाई करतो. त्याप्रकाराची त्यांची मानसिकता होती. दादांनी बौद्धिक व मानसिक शक्ती माणुसकी अन् जिव्हाळा या गुणांमध्ये विकास केला. त्यांच्या स्मरणात सामान्य माणसं, त्यांचं कुटुंब व त्यांच्या गावचे विशिष्ट संदर्भ पक्के ठसलेले असत. त्यामुळं प्रशासनातील अधिकारी दादांना खूप मानत. त्यांच्यासाठी कमालीची धडपड करत. त्यांनी माणुसकीला कधी कमीपणा येऊ दिला नाही. एकेकाळी बॅ. रामराव आदिक हे दादांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. फाईलमधील मजकूर त्यांच्या स्मरणात राहत असे. त्यामुळं फाईलमध्ये दडलेले अर्थ त्यांना कळत होते. एखादा माणूस भेटला, तरी त्याला ते फाईलच्या संदर्भातच पाहत होते. या उलट दादा फाईलऐवजी माणसाला बघत. त्यामुळं ते महाराष्ट्रात लोकप्रिय माणूसलोभी नेते होते. सन १९८0 मध्ये मी दैनंदीन राजकारणातून काही प्रमाणात बाजूला झालो. नगर जिल्हयातील माझ्या जन्मगावी ग्रामीण विकास केंद्र सुरू केलं. अधूनमधून माझी व दादांची भेट होई. त्यावेळी मी ऑस्ट्रेलियातील सानंद जातीचे बोकड आणून संकरीत शेळीचा प्रकल्प, सुबाभुळ लागवाडीचा प्रसार, मत्स्यशेती, लिंबोळी पेंड निर्मिती व फवारा जलसिंचन वगैरे प्रकल्प त्या छोट्या खेड्यात चालू केले होते. दादांच्या भेटीमध्ये कितीही अंतर पडलं, तरी दादा अगदी बारकाईनं ग्रामीण विकासाच्या प्रकल्पांची चौकशी करीत. दिल्लीत दादा काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस झाले होते. राजीव गांधींना राजकारणात तयार करण्याची उस्तादासारखी जबाबदारी इंदिरा गांधी यांनी त्यांच्यावर टाकली होती. आमच्या नात्यात एक त्याकाळात अलिखित नियम होता. दिल्लीत आल्यानंतर मी दादांची भेट घेतलीच पाहिजे. राष्ट्रीय पातळीवरील एका सेमिनारसाठी मी दिल्लीला गेलो होतो. घाईत दादांची भेट झाली. त्यांनी विचारलं, 'महाराष्ट्रात काय चाललं आहे.' वेळ कमी असल्यानं मी चटकन उत्तर दिलं. 'तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब भोसले यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्याचं वारं वाहायला लागलं आहे. त्यांच्या जागी तुम्हाला मुख्यमंत्री करण्याचा पक्षश्रेष्ठी विचार करीत आहेत, असं बोललं जात आहे,' त्यावर ते म्हणाले, 'तुझा काय सल्ला आहे?' मी म्हणालो, 'दादा मी फार लहान आहे. निर्णय घेताना तुम्हाला माझ्या सल्ल्याची गरज नाही. तुम्हीच मला सांगा, तुम्ही यावर काय निर्णय घेणार आहात.?' दादा म्हणाले, 'हे खरे आहे, की तुला विचारुन मी सल्ला घेणार नाही; पण तुझं विश्लेषण ऐकण्यात मला आनंद मिळतो. तुझी स्पष्ट प्रतिक्रिया सांग.' मी म्हणालो, 'दादा बहुमतवाल्या पक्षांचं सरकार असतं; परंतु मुख्यमंत्री मात्र त्या पक्षाच्या अंतर्गत आमदारांच्या मोठय़ा गटाचा असतो. पक्षांतर्गत अल्प गटाचा मुख्यमंत्री झाला, तर पक्षातील सहकारी त्याची फजिती किंवा बदनामी कशी होईल हे पाहतात. तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी एका व्यक्तीची इच्छा अजमावली पाहिजे. ही विधानसभा बॅ.अंतुले यांनी तिकीट वाटप करून निवडून आणलेल्या आमदारांच्या मोठय़ा गटांची आहे. त्यांनी हिरवा कंदील दाखविला, तरच तुम्ही मुख्यमंत्रीपद स्वीकारावं, असं मला नम्रपणं सांगावंसं वाटतं.' त्यावर ते म्हणाले, 'तुझं म्हणणं काही अंशी बरोबर आहे; परंतु तुला माहीत नसलेले काही घटक आता मी तुला सांगणार आहे. तू राजकारणाचा कायम विद्यार्थी असल्याची तुझी भूमिका आहे. म्हणून तुला या घटकांचा पुढं विश्लेषण करण्यासाठी उपयोग होईल. मी जे तुला सांगणार आहे, ते तुला कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही. ते माझ्या अनुभवातून आलेल्या निरीक्षणाचं सार आहे. आमच्यात (मराठा समाजात) सत्तापदावर नसणं हीच सर्वांत मोठी बदनामी मानली जाते. त्याचबरोबर माझ्यापुढं अशी द्विधा अवस्था आहे, की बॅ. अंतुले यांच्याकडून माझी बदनामी होण्याचाही धोका आहे. तेव्हा कोणती तरी एक बदनामी मला स्वीकारावी लागेल.' यावर मी हसत म्हणालो, ''दादा, तुमचा निर्णय मला कळला.'' मी उठलो. आठ दिवसानंतर दादांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दादा शेवटच्याकाळात मंत्रालयाच्या समोरील छोट्या बंगल्यात राहत. ते माणूसलोभी असल्यामुळं जुनी परिचित आवडत्या माणसांची भेट हा त्यांच्या अनंदाचा विषय असे. एकदा दादा मुक्कामी आहेत असे कळल्यावर मी रात्री नऊ वाजता त्यांना भेटायला गेलो. बाहेर निरोप मिळाला, की आता भेट शक्य नाही. दादा आत होते. मालिश चालू होती. दादांनी आतून माझा आवाज ऐकला आणि मला आत बोलावून घेतले. प्रत्येक भेटीत मी प्रथम त्यांच्या मधुमेहाची चौकशी करत असे. डॉक्टर असल्यामुळं माझा तेवढा एकच मुद्या वरचढ होता. मधुमेहाच्या चौकशीनंतर मी दादांना प्रश्न विचारला, 'दादा तुमच्या मनात शरद पवारांच्या विषयी अत्यंत नकारात्मक भावना असूनही तुमच्या अनुयायांनी शरद पवारांबरोबर राजकीय हातमिळवणी करावी, असं तुम्ही जाहीर सांगितलं, ही विसंगती नव्हे काय ?' दादा म्हणाले, ''डॉक्टर, राजकारणात प्रमाणाबाहेर फूट असेल, तर प्रशासन यंत्रणा व नोकरशाही कोणत्याही राजकीय नेतृत्वाला जुमानत नाहीत. राजकीय नेत्यांबद्दल त्यांच्या मनात बौद्धिकदृष्ट्या अनादराची भावना जोपासली जाते. राजकारणी खालची जमात आहे, अशी भावना रुजते. म्हणून राजकारणात विरोधी पक्षाशी सौहार्दानं वागणं व आपल्या पक्षात फूट होणार नाही हे पाहणं जरुरीचं आहे. लोकशाही व्यवस्थेत राजकीय नेतृत्व प्रशासनापेक्षा श्रेष्ठ असलं पाहिजे आणि त्यांनी स्वत:ची प्रतिष्ठा वाढवली पाहिजे. याबाबत माझा आग्रह आहे. माझा म्हणून त्यांचा जो गट मानला जातो. त्यात सर्वांची एकजूट करणारा कोण आहे ? तसा माणूस फक्त सुधाकर (नाईक) आहे. तो सर्वांना एकत्र राखू शकेल; पण तो मराठा नसल्यानं आमचे लोक त्याला मानत नाहीत. तर प्रशासन मुजोर बनू नये, यासाठी सर्व राजकीय कार्यकर्त्यांचा एकमेकांना आदर करीत त्यांच्या भूमिकेतून मला पुढं गेलं पाहिजे, नाहीतर प्रशासन महाराष्ट्र खाऊन टाकेल.'' त्यांच्या विचारामागं किती सखोल चिंतन होतं, याचं दर्शन झालं. राजकारणात स्पर्धा असते; परंतु मोठी माणसे मोठी असतात. इतकी किमान बुद्धी राजकारणातील प्रत्येकाजवळ असायला हवी. म्हणून दादांनी आपल्या गटाला शरद पवारांशी भांडू नका असं सांगितलं. काही असो दादा इतकी माणुसकी असलेला दुसरा मुख्यमंत्री होणे नाही ! अनुभवातून संपादन केलेलं राजकीय शहाणपण बहुतांश राजकीय नेत्यांजवळ असेल तर लोकशाहीप्रणाली लोकमानसात घट्टपणो रुजते. वसंतदादा सामान्य माणसासाठी आधारवड होते. -लेखक डॉ. कुमार सप्तर्षी
  • Log in or register to post comments

सर

पगला गजोधर
Sat, 11/26/2016 - 23:31 नवीन
सर
सर्वसाधारणपणे मराठा आणि त्यांना संलग्न जातींची मक्तेदारी आहे.
त्यांना संलग्न जातींची, म्हणजे नक्की काय ? जरा समजावून सांगा नं प्लिज; या संलग्न जातीत रोटी बेटी व्यवहार होतात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्कुश शिन्दे

पुरवणी प्रश्न

पगला गजोधर
Sat, 11/26/2016 - 23:34 नवीन
तुमच्यामते, (लेखात उल्लेखलेले)सुधाकरराव नाईक, संलग्न जातीत येतात काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्कुश शिन्दे

हम्म.

आदूबाळ
Tue, 11/29/2016 - 18:31 नवीन
हम्म.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्कुश शिन्दे

मला मराठा जातीत जन्मल्याचा

Ram ram
Sun, 11/27/2016 - 06:26 नवीन
मला मराठा जातीत जन्मल्याचा बिल्कुल अभिमान नाही. जात हि अपघाताने मिळालेली आहे. जातीचा, धर्माचा गर्व करणे मुर्खपणाच आहे. पण इतर जात लावणारे बरेच सहकारी मराठा जातीचा द्वेष करतात हे पदोपदी दिसून येते. कोणतीही जात असो आरक्षण मागणारे ( जातीच्या आधारावर) भिकारीच असतात. ज्यांचे उत्पन्न कमी त्याने एकच मुल जन्माला घालावे किंवा घालूच नये. नाहीतर प्रामाणिकपणे कामधंदा करून उत्पन्न वाढवावे.
  • Log in or register to post comments

मराठा प्रश्नावर उपाय: सदानंद

पुंबा
Sun, 11/27/2016 - 18:08 नवीन
मराठा प्रश्नावर उपाय: सदानंद मोरे
  • Log in or register to post comments

आयला विडंबनाचे रूपांतर पूर्ण

आनन्दा
Tue, 11/29/2016 - 09:12 नवीन
आयला विडंबनाचे रूपांतर पूर्ण धाग्यातच झाले की राव.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा