पण 2000 च्या नोटेचे गुपित हवेच कशाला? मी तर 2000 आणि 5000 ची नोट आणली असती.
"2000 ची नोट येणे = 1000 500 बंद होणार याची बातमी फुटणे" असे कसे व का होईल? नवीन नोट येण्याचा जुन्या नोटा बंद होण्याशी काय संबंध? (कारण तसाही आता तो लागत नाहीये, तो वेगळा विषय, डेमो मध्ये एक चलन रद्द केल्यावर नवीन अधिक मूल्य असलेले चलन आणत नसतात, )
जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत.
जुन्या नोटांच्या बदली (खास करुन १००० च्या नोटा) नवीन नोटा आणायच्या असतील तर जुन्या नोटा रद्द् करण्यापुर्वी नवीन नोटा आणता येत नाहि. त्या म्युच्युअली एक्स्क्लुसीव्ह असाव्या अशी अपेक्षा आहे बहुतेक. जुन्या चलनात असताना एक जरी नवीन नोट आलि तरी ति चलनवढीत मोडते. आणि चलनवाढ तर अपेक्षीत नाहि या केस मधे.
हाताळणीतले परिश्रम आणि म्हणूनंच चुका वाढतील. नव्या नोटेच्या जागी जुनी नोट जाणे. जुन्या नोटा रद्द केल्या की त्या वेगळ्या काढणे. इत्यादि कामाचा जास्तीचा ताण पडेल.
सध्या जुन्या नोटा नागरिक बँकेस आणून देत आहेत. मिश्रण झालं असतं तर बँकेला वर्गीकरणाचा ताप निस्तरत बसावं लागलं असतं.
आ.न.,
-ग.पै.
२००० हजारच्या नव्या नोटा आणि १००० ५०० च्या जुन्या नोटा यांच्यात नेमकं कसं मिश्रण होईल?
वर अर्धवटरावांनी चलनफुगवट्याचा मुद्दा मांडलाय. त्याबद्दल आपले मत?
डायरेक्ट लेख लिहायला सांगतात लोकं. बरं लिहले काही अनुभव ते नाही पटले तर परत देशद्रोही होण्याची भीती . डायरेक्ट भाजप तुम्हाला आवडत नाही असे पण आरोप .परत पाकिस्तान ला रातोरात पाठवतील काय हि पण भीती . असो :)
योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे हे आपले विधान आहे . यावर परत एकदा विचारतो कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ? लेख नको . आपले मत मांडा . खुश ?
प्रामाणिक लोक आहोत . हे डिजिटल पेमेंट वैग्रे कधीपासून करतोय . देशात परदेशात . पण ज्यांना त्रास झाला त्यांचा काय ह्या प्रश्नाचं उत्तर दिलात तर जरूर लेख लिहू . कित्येकदा बँकेला निर्णय बदलावे लागले ते का ह्याच उत्तर दिलात तर जरूर लिहू . सगळ्यांनी समर्थन केला ते वर्ल्ड इकॉनॉमिस्ट बेस्ट जे काही बोले किंवा शंका विचारल्या ते पागल अमर्त्य सेन ह्यांच्यापासून . असे का? याचे उत्तर दिलेत तरी जरूर लेख लिहू . मला काडीमात्र त्रास झाला नाही पण काही विचारलं की विरोधी ठरवलं हे का याचं उत्तर द्या मी लिहतो लेख . ज्यांना त्रास झाला त्यांचा काय हे पण लिहा एक वेगळी बाजू पहिले तुम्ही लिहा मी लिहतो कि मग
त्रास समाजातील प्रत्येक वर्गालाच होत आहे हे कुणीही अमान्य करत नाही आहे . मी हि रांगेत उभारूनच पैसे भरले / काढले. प्रत्येक वर्गाचा त्रास कमी करण्यासाठीच त वेगवेगळ्या उपाययोजना सरकार अथवा आरबीआय कडून चालू आहेत. उदा . लग्नासाठी पैसे काढता येतील वगैरे. तसेच रोज याचा आढावा घेऊन त्यानुसार उपाय योजले जात आहेत. तसेच आपण प्रश्न विचारले म्हणून आपण विरोधी/ पाकप्रेमी वगैरे ठरत नाही. असे कोणीही म्हणत नसून गैरसमज करून घेऊ नयेत . ज्यांना त्रास झ्हाला त्यांच्या भावनेशी आम्ही प्रामाणिक आहोत. जय हिंद :)
चला आता कशी तरतूद पाहिजे होती ( एकदम फुलप्रूफ कोणालाही त्रास वगैरे न होता हं .. ) यावर फर्मास मत मांडा पाहू .
औकात नाही हो. असो लग्नासाठी पैसे मला करायचेत १० लाख खर्च .कारण तितका आहेर मिळाला असं कोणी बोललं तरी देशासाठी गप्प बसायचं का? ग्रामीण भारतात हाल झाले हे पाहून गप्प बसायचं का?? सगळ्यात देशभक्ती का दाखवता आहेत हो . देश चालवायचा आहे भक्ती नाही आमच्या नातेवाईकांमध्ये कित्येक जण सैन्यात आहेत .पण परत एकदा काही विचारणं गुन्हा आहे का ??१०० च्या नोटा तरी अधिक प्रिंट करू शकले असते .किंवा अगदीच गुप्त ठेवायचं होतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर आधीच कॅशलेस व्यवहार बेस्ट ह्याच्या जाहिराती करायच्या होत्या .कोणाला असतं? हे कॅशलेस बेस्ट हा प्रकार ११ नोव्हेम्बर नंतर चालू झाला जेव्हा समजलं ८ तारखेनंतर कि प्रॉब्लेम होणारे . इतक्या जाहिराती देता पेप्रात सगळे पक्ष. द्या कि जाहिरात कॅशलेस करा आता का सुचलं?प्रॉब्लेम झाला म्हणून सुचलं . जाहिरात बाजी च्या बाबतीत काँग्रेस काय भाजप काय कोणीच त्यांचा हात धरू शकत नाही .
प्रतिसाद नीट वाचुन समजून मग प्रतिवाद करावा नाहीतर परत परत परत तेच मुद्दे उगाळले जातात.बाकी किमान केशलेस च्या जाहिराती आधी देता आल्या असत्या हि सुचना बरोबर आहे. असे काहीतरी नवीन मुद्दे येउद्यात
काय चाललंय काही समजत नाही. ३ वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी (इंडियन एक्स्पेस, हिंदुस्तान टाईम्स आणि इंडिया टुडे) जयललिता गेल्याची बातमी पावणेसहाच्या सुमाराला संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. अद्रमुक पक्षाच्या कार्यालयावरील झेंडे अर्धे उतरविण्यात आले होते. काही मिनिटानंतर रूग्णालयाने जाहीर केले तिच्यावर अजून उपचार सुरू आहेत. रूग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ सुरू आहे. जयललिताऐवजी तात्पुरता मुख्यमंत्री म्हणून पनीरसेल्वम जबाबदारी घेणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये जयललिता ४ महिने तुरूंगात असताना व नंतर ३-४ वर्षांपूर्वी ती ८ महिने तुरूंगात असताना हाच माणूस तिच्या जागी होता.
मात्र तिच्या पश्चात अद्रमुक एकसंध राहील का याची खात्री नाही. सध्या तामिळनाडू विधानसभेत २३४ पैकी १२० च्या आसपास अद्रमुकचे आमदार आहेत तर द्रमुक व काँग्रेसची एकत्रित संख्या १०० च्या आसपास आहे. जयललिताच्या पश्चात अद्रमुक मध्ये फूट पडून काही आमदार द्रमुकमध्ये जाऊन पुन्हा एकदा करूणानिधी वयाच्या ९२ व्या वर्षी मुख्यमंत्री होऊ शकतात. १९८७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन जवळपास वर्षभर अमेरिकेत उपचार घेत होते व तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात जानकी रामचंद्रन (एम जी आर ची पत्नी), जयललिता व शिवाजी गणेशन (अभिनेत्री रेखाचे वडील) अशा ३ तुकड्यात पक्ष विभागला गेल्याने तत्कालीने केंद्र सरकारने विधानसभा बरखास्त करून १ वर्षानंतर निवडणुक घेतल्यावर द्रमुकला पूर्ण बहुमत मिळून करूणानिधी मुख्यमंत्री झाले होते. सद्यपरिस्थितीत विधानसभा भंग करणे खूप अवघड आहे. त्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता आहे.
१९८७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन जवळपास वर्षभर अमेरिकेत उपचार घेत होते व तिथेच त्यांचे निधन झाले.
किंचित दुरूस्ती. एम.जी.रामचंद्रन यांचे निधन अमेरिकेत नाही तर मद्रासमध्ये त्यांच्या निवासस्थानीच झाले होते. ते १९८४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते.पक्षाने ही निवडणुक त्यांच्या अनुपस्थितीत लढवली होती.ते परत आल्यावर फेब्रुवारी १९८५ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
अमेरिकेत निधन झाले होते ते हेमवतीनंदन बहुगुणांचे. पण त्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नव्हते.
१८ टक्के जास्त मत आहेत .परवा निकाल जाहीर होईल . बाकी टाइम मॅगझीन वर बरेच भारतीय नेते पण आलेले आहेत सहज एक आठवण म्हणून . बाकी
जयललिता असो पनीरसेल्वम बोथ करप्ट. पनीरसेल्वम ला कैच अधिकार नव्हते आता काय होणार ते पाहणं रोचक आहे .
उलटं आहे. अद्रमुक मधील निर्नायकी अवस्थेमुळे द्रमुक व काँग्रेस पुन्हा एकदा उचल घेण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत द्रमुक व काँग्रेसला नवसंजीवनी मिळू नये यासाठी भाजप प्रयत्न करणार. भाजप रजनीकांतला पुढे आणण्याच्या प्रयत्नात असल्याच्या अफवा आहेत.
बाकी आता हे या धाग्यात टाकावं का ठाऊक नाही पण
२०१७ निसान जीटीआर भारतात लाँच झालेली आहे. रस्त्यावर चालण्यासाठी मान्यता असलेल्या अतिशय वेगवान वाहनांपैकी एक असलेली जीटीआर तुम्हाला १.९९ कोटी किमतीला मिळू शकते. याची इंजिन बनवणारे फक्त ६ लोक जगात आहेत, अर्थात निसान कडे, आणि प्रत्येक गाडीच्या इंजिनावर ते बनवणार्या व्यक्तीचं, जिला निसान ताकुमी (म्हणजेच कारागीर/कलाकार) म्हणते, नाव कोरलेलं असतं.
०-१०० २.९ सेकंद
३.८ लिटर व्ही सिक्स विघ ५६२ बीएचपी आणि ६३५ एनएम टॉर्क ऑल व्हील ड्राईव्ह सिक्स स्पीड ट्रान्स्मिशन
इट्स लव्हिंगली कॉल्ड अॅज 'गॉडज़िला'
जिप्सी आवडीची आहे. पण तिच्यातल्या त्रूटी दूर करण्याचं मारुतीने कधीच मनावर घेतलं नाही. व्यावसायिक निर्णय असावा परंतु कॉमन रेल डीझेल इंजिन, सुधारित ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, सस्पेन्शन, इत्यादी अनेक गोष्टी अनिवार्य होत्या. जिप्सी वॉज वे बिहाइंड टाइम.
वमो,
बाईसाहेब जन्माने तमिळ अय्यंगार ब्राह्मण होत्या. इति विकी.
मग पुरण्याचं कारण लक्षात येत नाहीये. शिवाय त्यांच्या (दिवंगत) भावाच्या कुटुंबियांना जवळपास फिरकू दिलं गेलं नाहीये (ऐकीव माहिती).
आ.न.,
-गा.पै.
श्रीगुरुजी,
जर मृतदेह जाळणे हे कुण्या धर्माशी संबंधित असेल तर दफन करणे हेही कुण्या धार्मिक पंथाशी निगडीतच आहे. माझ्या मते जयललिता लपूनछपून ख्रिस्ती बनल्या असाव्यात. पेरियार, रामचंद्रन वगैरे स्वत:ला द्रविडवादी नास्तिक म्हणवून घेणारे सर्वच छुपे बाटगे असावेत. जयललितांनी कांची कामकोटीच्या पीठाधीशांना जी वागणूक दिली त्यावरून या संशयास पुष्टी मिळते.
आ.न.,
-गा.पै.
तोंडी तलाक घटनाबाह्यः उच्च्य न्यायालयाचा निर्वाळा
हे न्यायाधीश बहुधा भगवे असावेत. मुस्लिमांवर हिंदू संस्कृती लादण्याच्या या निर्णयाचा निषेध! मोदी राजवटीत अल्पसंख्याकांच्या हक्कांमध्ये ढवळाढवळ होत आहे याचा अजून एक पुरावा. आता दाभोळकर बंधु-भगिनी, तिस्टा सेटलवाड, सूझन अरूंधती रॉय, भाई वैद्य, कुमार सप्तर्षी, बाबा आढाव इ. मानवतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, उदारमतवादी, विवेकवादी, निधर्मी आणि पुरोगामी विचारवंतांनी या जातीय व भगव्या निर्णयाविरूद्ध आंदोलन करून हा निर्णय हाणून पाडला पाहिजे. पुरस्कारपरतीची मोहीम नव्याने सुरू व्हायला हवी. काश आज राजीव गांधी असते तर हा निर्णय फाट्यावर मारून त्यांनी तलाक कायम रहावा यासाठी नव्याने कायदा करून अल्पसंख्याकांना दिलासा दिला असता.
आता हमीद दाभोळकर यांनी "ट्रिपल तलाक" मागचा भावार्थ आपण समजून घेतला पाहिजे असे म्हटले आणि सर्व बुबुडाविपुमाधविंनी त्याला आपल्या सहमतीचे शेपूट जोडले तरी आश्चर्य वाटायला नको.
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी सी.बी.आयने माजी हवाईदलप्रमुख एस.पी.त्यागी यांना अटक केली आहे.
http://timesofindia.indiatimes.com/india/Former-Air-Force-chief-SP-Tyagi-arrested-in-AgustaWestland-chopper-deal-case/articleshow/55895052.cms
वरील माझ्या एका प्रतिसादाला अनुसरून हा प्रतिसाद..प्रतिसाद पूर्वी वाचलेल्या माहितीवर आधारित आहे, काही दुवे सापडत नाहीत त्यामुळे काही माहिती चुकीची असू शकते.
UPA च्या शेवटच्या काळात कोळश्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला, तसेच बहुतांश नवीन विद्युत निर्मिती केंद्र वर्षानुवर्ष रखडलेली होती, कोल इंडिया कडून कोळश्याच अपेक्षेप्रमाणे उत्पादन होत नवते त्यामुळे महाग कोळसा आयात करावा लागत होता तसेच powar transmission ची व्यवस्था जुनाट झालेली आणि नवीन प्रोजेक्ट अडकून पडलेले. ह्या तसेच इतर कारणामुळे वीज तुटवडा निर्माण झालेला. काळाची पावुले समजून UPA ने महत्वकांक्षी योजण्या आखल्या खऱ्या पण अमलबजावणी काही झाली नाही. वीज शेत्रातील बदलास खरी सुरुवात पियुष गोयल यांच्या काळात झाली. त्यांनी राबवलेले अनेक निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरलेत.
१. सर्वप्रथम कोळसा खाणींचा फेर लिलाव करून सुसूत्रता आणण्यात आली, कोल इंडिया उत्पादन ८% ने वाढले एका वर्षात जे नेहमी १-३ % होत होते, यामुळे वीज निर्मिर्ती केंद्रांना स्वस्तात देशी कोळसा मिळू लागला तसेच कोळश्याची आयात ८% घटली.
Coal India steams ahead under Modi
२. दुसरी महत्वाची योजना म्हणजे UDAY ज्या मध्ये कर्जाच्या खायीत गेलेल्या राज्य वीज महामंडळांना १० कि 5 वर्षामध्ये systematically reform करून त्यांच्यावरील कर्जाचा भार कमी करायचा. हि जर योजना यशस्वी झाली तर जवळजवळ १ लाख कोटीच सेविंग अपेक्षित आहे वीज क्षेत्रात. अधिक माहिती जालावर आहे.
३. power generation तसेच transmission च्या रखडलेल्या प्रोजेक्ट ना मंजुरी देण्यात आली, गेल्या २ वर्षात power transmision मध्ये ७१% वाढ झाली स्पेसिफिक दक्षिणेच्या राज्यामध्ये.
५. आतापर्यंत वीज न पोहचलेल्या खेड्यात वीज नेण्याचे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणात infrastructure development चालू आहे.
६. led बल्ब ची योजना सुधा छान होती.
Performance Check On Power Sector On Two Year’s Of Modi GovtEnergised Focus On Power Sector Augurs Well For India
७. सौर उर्जेला मोठ्या प्रमाणात प्रोसाहन देण्यात आल आहे, येत्या ५ वर्षात ३०००० MW चे प्रकल्प होऊ घातले आहेत. वर एका प्रतिसादात अदानी च्या कंपनीने सर्वात मोठा solar प्लांट सुरु केल्याची माहिती आहे.
report
८. अणु उर्जेत हि भरारी चालू आहे, भरपूर देशाशी मोदिनी करार केले आहेत, तमिळनाडूतील अणु उर्जा प्रकल्प योग्य दिशेने चालू आहे, andra प्रदेशात नवीन मेगा अणु उर्जा प्रकल्प होऊ घातला आहे, जैतापूर च नक्की काय झाल हे माहित नाही बहुदा तिथेही फ्रेच कंपनी प्लांट सुरु करेल असे दिसतंय.
९. मोठे जल विद्युत प्रकल्प हि नॉर्थ इस्ट आणि हिमाचल प्रदेश चालू आहेत ते हि काही वर्षात कार्यान्वित होतील
वीज क्षेत्रात भरपूर आव्हाने आहेत अजून हि आपण खूप मागे आहोत, ह्या negative गोष्टींचा किंवा आव्हानांचा आढावा घेतला नाहीये प्रतिसादात. जेव्हडी माहिती वाचली होती आणि समजली होती तेवडी दिली आहे जालावर याबाबतची खूप माहिती उपलब्द आहे.
प्रसिद्धी पासून दूर राहणाऱ्या परंतु उत्तम काम केलेल्या पियुष गोयल याच्याबद्दल नक्कीच आदर आहे.
जाता जाता खालील लेखात भारतीय वीज क्षेत्राचा इतिहास आणि भविष्याचा थोडक्यात आढावा
Three reasons for the Indian power sector to change for good
प्रतिक्रिया
..
पण 2000 च्या नोटेचे गुपित
जस्ट विचार करा ...
ओके, महत्त्वाचा मुद्दा.
---------जस्ट विचार करा की मी
मिश्रणजन्य परिश्रम
२००० हजारच्या नव्या नोटा आणि
मत वैग्रे मागू नका
=)) =)) =)) वेल्कम टू द
परत तेच तेच फालतू उपहास
आम्ही खुशीतच आहोत
परत परत तेच ते
चला आता कशी तरतूद पाहिजे होती
कितीदा सांगू रिझर्व बंकेला सल्ला द्यायची
मी आज गावी आहे. कुठे कुणाला
आणि भाजपचा तर नाहीच नाही
..
७३ दिवसांपासून रुग्णालयात
जयललिता लवकरच बर्या होवोत.
जयललितांचे निधन
Hospital has denied this news
अर्धा उतरावलेला झेंडा परत
काय चाललंय काही समजत नाही. ३
किंचित दुरूस्ती
टाईम मासिकाच्या ऑनलाईन
संपादकीय मतांनी शेवटी ट्रम्प
येस्स
पण आता पर्यंत
जयललिता
अम्मा नो मोअर. तामिळनाडूवर
मोदींचा खेद ....?
असतील; पण आता ते काय हसत
उलटं आहे. अद्रमुक मधील
बाकी आता हे या धाग्यात टाकावं
निसान सनी चालवली आहे खूप लॉन्ग ड्राइव्ह ला
जिप्सी आवडीची आहे. पण
दहन की दफन?
लिंगायत ब्राम्हण पुरतात
लिंगायत?
http://indianexpress.com
लपूनछपून पंथांतर
मुंबई ते पुणे प्रवास फक्त ९
धन्यवाद
तोंडी तलाक घटनाबाह्यः उच्च्य
हमीद दाभोळकर
अत्यंत फालतू निर्णय
अग्गोबाई .... !
ही चित्रफीत ऐकून आणि बघून
ऑगस्टा वेस्टलँड
वरील माझ्या एका प्रतिसादाला
Pagination