Skip to main content

ताज्या घडामोडी - ३

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 31/10/2016 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
ताज्या घडामोडी - १ ताज्या घडामोडी - २ मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

वाचने 66983
प्रतिक्रिया 314

प्रतिक्रिया

पण योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे .हे जर कोणी मान्य करणार असेल तर चर्चा करू ग्राउंड रिऍलिटी वर .. आकड्यांवर नाही . मी सांगतो उदाहरणं

In reply to by वरुण मोहिते

निर्णयाच्या अंमलबजावणीत त्रुटी आहेत हे कोणीच नाकारत नाही. परंतु त्यांनी तर निष्कर्ष काढलाय की निर्णयाचे मूळ उद्धेशच म्हणजे पर्यायाने निर्णयच फसलाय.

In reply to by वरुण मोहिते

साहेब इतके धागे झ्हाले आणि अनेकांनी तटस्थ पणे विचारले देखील आहे कि कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ? यावर अनेक ज्ञानी लोक वेगळा धागा देखील काढणार होते परंतु 'नियोजनात चूक झ्हाली' एवढे म्हणण्याखेरीज कोणीही काहीही केले नाही . ग्राउंड रियालिटी वर येऊन आपण आता आपले विचार मांडा

In reply to by सुज्ञ

त्यांनी काढला होता की रोख २० लाख रूपये घेऊन जाणार्‍या ट्रकवाल्याचा धागा. अजून काय पाहिजे?

In reply to by वरुण मोहिते

मोहिते साहेब.. कळकळीची विनंती.. असा एक धागा प्लीज काढा. मला अंमलबजावणी मधले काहीही माहिती नाही किमान पैसे फॅक्टरीतून निघून बँकेत आणि ATM मध्ये कसे पोचतात ते तरी कळेल.

इतका मी हुशार नाही :) बाकी ३००-५०० प्रतिसादावर काय मत देणार . असो ग्राउंड रिऍलिटी माझ्या कंपनीत ३५ लोक कामाला आहेत .ज्या व्यवसायात घरच्या मी नाही हे पहिलेच नमूद करतो . त्यातले १०-१२ भैय्ये आहेत त्यांना ना सुट्टे मिळत होते ना बँकेतून पाठवता येत होते कारण बँकेत गेले की २ तास गेले .हे म्हणतोय ते रबाळे नवी मुंबई चं उदाहरण आहे. भिवंडी मध्ये हॅन्डलूम बिसिनेस बंद आहे जवळ जवळ १७ दिवस माझ्या मित्राची कंपनी आहे ..ट्रान्सपोर्ट वाल्यांचे हाल आहेत . अशी अनेक उदाहरणं आहेत . करायचं होता ना मग पहिले तरतूद करायची . ज्यांना त्रास झाला ती प्रामाणिक लोक आहेत . त्यांना देशभक्तीचे गोडवे सांगायचे . अजूनपर्यंत अप्रामाणिक लोकांना काही त्रास झाला नाहीये .आजही ५०० च्या नोटा द्या बदलून मिळत आहेत कमिशन घेऊन . जगात कुठली बँक नसेल जिने २० दिवसात इतके नियम बदल केले. आजही आपल्याला त्रास होणार नाही आहे कारण हे आपण कार्ड पेमेंट वैग्रे कित्येक वर्षांपासून करत आहोत . पण ज्यांना त्रास होतोय त्यांचं काय ???

In reply to by वरुण मोहिते

मालक "कशी करायला हवी तरतूद" या टायटल खाली आपण कुणाला काहि होत असलेले काही त्रास सांगितले परत. वरील प्रतिसादात आपण म्हणत आहात " पण योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे" तर आम्ही विचारतो कि नक्की कशी तरतूद / नियोजन करायला हवे होते सरकार ने किंवा अजूनही करू शकतो ? यावर आपले विचार सांगा. निव्वळ नियोजन चुकले इतके बोलून थांबू नका

इतका मी हुशार नाहीये रिझर्व बँकेला सल्ले द्यायला .

तृणमूल कॉन्ग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मु़ख्यमंत्री यांनी लष्कराच्या नियमित सरावावरुन राजकारण करुन आपल्या बालीशपणाचा पुन्हा एकदा परिचय दिला. टोल नाक्यांवर येणारी-जाणारी वाहने मोजण्याचे नेहमीच्या कामासाठी कायदेशीर प्रक्रियेतून पोलिसांना सूचना करुन लष्कराने आपले काम सुरु केले. पण हा केंद्राकडून लोकशाहीवर घाला घालण्यात येत आहे असा आक्रोश करुन ममतादिदींनी नौटंकीबाजी करत रात्रभर मुख्यमंत्री कार्यालयात थांबण्याचा निर्णय घेतला. लष्कराने आपली कागदपत्रे प्रसिद्ध करुन ममता बॅनर्जी यांची नौटंकी उघडकीस आणली. पश्चिम बंगालची जनता यातून लवकर काय तो बोध घेवो.

In reply to by संदीप डांगे

खरंच काहींच्या काही तमाशा या बाईंचा! कमीतकमी सैन्याने कागदपत्रे पाठवली आहेत याचं भान ठेवलं असतं तरी असा सेल्फगोल करावा लागला नसता! बाकी खालील विडिओ हसूच आले. https://www.youtube.com/watch?v=6CiXDmlc65A

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ही बाई अत्यंत छपरी बाई आहे. ती केजरीवालांप्रमाणेच कायम कांगावा आणि नाटके करत असते. तिला म्हणे पंतप्रधान व्हायचंय म्हणून आता हिंदी शिकते आहे म्हणे. कदाचित मोदी अत्यंत वाईट असतील, ते लोकांना आवडत नसतील . . . परंतु त्यांना पर्याय म्हणून जे स्वतःला पुढे करताहेत (ममता, केजरीवाल, राहुल, मुलायम, मायावती इ. गणंग) त्यांच्याकडे पाहिलं की मोदी या सर्वांपेक्षा शतपटीने चांगले आहेत हे लक्षात येतं.

In reply to by श्रीगुरुजी

या बाईंकडे लक्ष देऊच नये . वाजपेयींच्या काळापासून ते आतापर्यंत हे असच वागणं आहे . मोठ्या महत्वाकांक्षा जागृत झाल्या आहेत त्यांच्या . पण बंगाल पुढे कोण विचारणार नाही . बंगाल ला कळेल तो सुदिन .

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पूर्वी असले कोणीतरी काहीतरी बरळले की राग यायचा. पण आता तसे काही होत नाही तर हे लोक असे काहीतरी बरळू लागले की बरेच वाटते. आपल्या एकाहून एक मर्कटलीलांमुळे विरोधकांनी आपला खरा चेहरा आपण होऊन जनतेपुढे आणला आहे.अशा लोकांमुळे २०१९ मध्ये मोदींना निवडणुक अन्यथा गेली असती त्यापेक्षा अधिक सोपी जाणार ही शक्यता जास्त. त्यामुळे केजरीवाल, ममता, राहुल गांधी इत्यादींनो किप इट अप. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत :)

In reply to by गॅरी ट्रुमन

:)

विधान : योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे. लोकांना प्रचंड त्रास होत आहे . लोक मरत आहेत वगैरे . साधा प्रश्न : कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ? उत्तर : आमाला ठावं नाय तर लोकहो असा आणि एवढाच नोटबंदी विरोधाचा प्रवास आहे . फक्त विरोध करत राहणे अवांतर : बोटं दाखवणं खूप सोपं असतं इतकं समजल्यास हा हि नोटबंदी चा एक फायदा म्हणावा काय ?

In reply to by सुज्ञ

मीनाक्षी लेखीना विचारायला पाहिजे होतं तुम्ही हे, त्यांचाही नोटबंदीला विरोध होता, हेच मुद्दे होते, त्यांच्या पार्टीने 'बोट दाखवणं सोपं असतं, आपण करायला गेलो की काय करायला पाहिजे' हा विचार नोटबंदीआधी केला असावा. अवांतर: तक्रारकर्त्याने उपाय सांगता आले नाहीत तर तक्रारच करू नये हे नोटबंदीनिमित्त समजले हा फायदा(?)

In reply to by संदीप डांगे

मीनाक्षी लेखीना विचारायला पाहिजे होतं तुम्ही हे, त्यांचाही नोटबंदीला विरोध होता, हेच मुद्दे होते,
२०१४ चा निर्णय काय होता व त्याला लेखींनी का विरोध केला होता याविषयी जरा सविस्तर सांगता का? तसेच २०१४ चा निर्णय २ २०१६ चा निर्णय यातील साम्य देखील सांगता का?

मीनाक्षी लेखी? असो . अवांतरातील : तक्रारकर्त्याने तक्रार जरूर मांडावी आणि त्या तक्रारी दूर करण्यासाठीच उपाय योजले जात आहेत . तक्रारदाऱ्याना वाऱ्यावर सोडलेलं नाही. आपण आता भाजपविरोधी आहेत हा चष्मा मान्य केल्यामुळे सगळेच आपल्याला आपल्या चष्म्यातून दिसेल तसेच आहे या गोड समजुतीवर खुश रहा :)

In reply to by सुज्ञ

मी भाजपविरोधी असल्याचं मान्य केलंय ह्या आपल्या गॉड समजुतीत खुश राहा!!! कित्ती घाई... :) लेखी म्याडम म्हैत नै? गुगल करा आणि प्रेस कॉन्फरन्स बघा नोटबंदीवरची, 2014. अजून कोणीही नोटबंदी/भाजप समर्थकांनी त्या मुद्द्याचा प्रतिवाद केलेला नाही, चार वेळा टाकूनही. अवघड जागेचं दुखणं असावं... टाळाटाळ केलीय फक्त. तुम्हाला जमतंय का पहा. तक्रादारांना वाऱ्यावर सोडलं नाही???? असो. वरातीमागून घोडे येत असतील.

In reply to by संदीप डांगे

त्यावेळच्या नोटाबंदीची आणि आताच्या नोटाबंदीची तुलना करणे म्हणजे सफरचंदे आणि संत्र्यांची तुलना करण्यासारखे आहे. ज्या मोदींनी जीएसटीला विरोध केला होता तेच मोदी आता जीएसटीला पाठिंबा देत आहेत या फुसक्या आरोपात जितका दम आहे तितकाच दम या दोन वेगवेगळ्या नोटाबंदी निर्णयांच्या तुलनेमध्ये आहे.

In reply to by श्रीगुरुजी

नोटाबंदीची आणि आताच्या नोटाबंदीची तुलना करणे म्हणजे सफरचंदे आणि संत्र्यांची तुलना करण्यासारखे आहे
कृपया स्पष्टीकरण द्या अडीच वर्षात सफरचंदाचं संत्र कसं झालं? :)

In reply to by संदीप डांगे

जर २०१४ चा निर्णय सफरचंद असेल तर २०१६ चा निर्णय संत्रे आहे. जर २०१४ चा निर्णय संत्रे असेल तर २०१६ चा निर्णय सफरचंद आहे. तुम्हाला २०१४ मध्ये लेखी यांनी काय म्हटले आहे याची पुरेपूर माहिती दिसते. २०१६ चा निर्णयही ताजा आहे. दोन्ही निर्णयांची तुलना केल्यास ती तुलना चुकीची आहे हे लक्षात येईल.

कधी येतोय धागा ? असे झ्हाले असते उत्तम व अत्त्युत्कृष्ट नोटबंदी चे नियोजन . या टायटल खाली ? हो जर धागा लिहीत असाल तर एकच फक्त काळजी घ्या. हा निर्णय या आधी कुणालाही समजू नये अशा दृष्टीने नियोजन हवे हो . नाहीतर लिहाल " सर्व मशीन मध्ये २००० च्या नोटा आधीच भरायला हव्या होत्या आणि ब्रांच मॅनेजर ना तसे कळवायला हवे होते वगैरे "

In reply to by सुज्ञ

जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत. ह्यामुळे मी 8 नोव्हेंबर ला 1000, 500 अचानक बंद करणार हे कसे कळेल?

In reply to by संदीप डांगे

संदीप डांगे, माझ्या मते जुन्या आणि नव्या नोटांचं मिश्रण न केलेलं बरं पडेल. जुन्या व नव्या एकाच वेळेस भरल्या गेल्या तर बँकेची डोकेदुखी आणि म्हणूनंच चुकांचं प्रमाण बरंच वाढेल. गोंधळ नियंत्रणात ठेवण्यासाठी जुन्या नोटा रद्द केल्यानंतर मगंच नव्या चलनात आणाव्यात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कोणत्या प्रकारच्या चुका? बँकांना नव्या जुन्याचं काय करायचं, त्यांना तर 8 तारखेला कळेल कि जुन्या जाणारेत ते. 500 नको तर फक्त 2 हजाराची नोट कालिब्रेट करू. पुढे लागणारा महिनाभराचा वेळ व लोकांची डोकेदुखी थांबेल.

In reply to by संदीप डांगे

कि २००० ची नोट व्हाट्सप वर इतकी गुप्तता बाळगून पण फिरत आहे .. नोटबंदी आधी १० दिवस त्यात चिप आहे वगैरे बातम्या .. त्यावेळेस सर्वाना खरंच खोटी वाटलेली हो डांगे .. चिप ची बातमी खोटीच वाटत होती पण असली नोट येणार हे ही वाटत न्हवते .. पण तशीच नोट आली . चीप वगैरे व्हाट्सअप कलाकारांची कमाल .. पण पण . .. आता ही बातमी त्या नोट छपाई कंत्राटदाराने व्हाट्सअँप वर पसरवली का आरबीआय गव्हर्नर नी ( जुना केजरीवाली रोग :कोण गुजराती आहेत शोधा आणि त्यांचे मोदींशी कनेक्शन बांधा . त्याआधी गुजराती मारवाडी वगैरे भामटेच असतात आणि त्यांचा धंदा लोकांना फ़सवूनच होतो हा ठाकरीय न्यूनगंड मनाशी बाळगा .. तर ते एक असो . ::) याचा शोध घ्या पण मग आता इतकी गुप्तता बाळगून जर व्हाट्सपप वर त्या नोटेचे स्पेसिमेन आले तर तुम्हीच जस्ट विचार करा .. ३० सप्टेंबर ला २००० आणि ५०० च्या नवीन नोटा ( २ महिने आधी ??? ) भरल्या असत्या तर काय झ्हाले असते ?

In reply to by सुज्ञ

जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत. यावरील हि प्रतिक्रिया

In reply to by सुज्ञ

पण 2000 च्या नोटेचे गुपित हवेच कशाला? मी तर 2000 आणि 5000 ची नोट आणली असती. "2000 ची नोट येणे = 1000 500 बंद होणार याची बातमी फुटणे" असे कसे व का होईल? नवीन नोट येण्याचा जुन्या नोटा बंद होण्याशी काय संबंध? (कारण तसाही आता तो लागत नाहीये, तो वेगळा विषय, डेमो मध्ये एक चलन रद्द केल्यावर नवीन अधिक मूल्य असलेले चलन आणत नसतात, )

In reply to by संदीप डांगे

जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत.
जुन्या नोटांच्या बदली (खास करुन १००० च्या नोटा) नवीन नोटा आणायच्या असतील तर जुन्या नोटा रद्द् करण्यापुर्वी नवीन नोटा आणता येत नाहि. त्या म्युच्युअली एक्स्क्लुसीव्ह असाव्या अशी अपेक्षा आहे बहुतेक. जुन्या चलनात असताना एक जरी नवीन नोट आलि तरी ति चलनवढीत मोडते. आणि चलनवाढ तर अपेक्षीत नाहि या केस मधे.

---------जस्ट विचार करा की मी 2000 व 500 च्या नवीन नोटा भरल्यात एटीएम मध्ये 30 सप्टेंबर ला, आणि मिळू लागल्या आहेत.

संदीप डांगे,
कोणत्या प्रकारच्या चुका?
हाताळणीतले परिश्रम आणि म्हणूनंच चुका वाढतील. नव्या नोटेच्या जागी जुनी नोट जाणे. जुन्या नोटा रद्द केल्या की त्या वेगळ्या काढणे. इत्यादि कामाचा जास्तीचा ताण पडेल. सध्या जुन्या नोटा नागरिक बँकेस आणून देत आहेत. मिश्रण झालं असतं तर बँकेला वर्गीकरणाचा ताप निस्तरत बसावं लागलं असतं. आ.न., -ग.पै.

In reply to by गामा पैलवान

२००० हजारच्या नव्या नोटा आणि १००० ५०० च्या जुन्या नोटा यांच्यात नेमकं कसं मिश्रण होईल? वर अर्धवटरावांनी चलनफुगवट्याचा मुद्दा मांडलाय. त्याबद्दल आपले मत?

डायरेक्ट लेख लिहायला सांगतात लोकं. बरं लिहले काही अनुभव ते नाही पटले तर परत देशद्रोही होण्याची भीती . डायरेक्ट भाजप तुम्हाला आवडत नाही असे पण आरोप .परत पाकिस्तान ला रातोरात पाठवतील काय हि पण भीती . असो :)

In reply to by वरुण मोहिते

योजना राबवणं त्यासाठी आवश्यक तरतूद करणं हे निश्चित चुकलेलं आहे हे आपले विधान आहे . यावर परत एकदा विचारतो कशी तरतूद करायला हवी होती किंवा अजून काय नियोजन पाहिजे ? लेख नको . आपले मत मांडा . खुश ?

प्रामाणिक लोक आहोत . हे डिजिटल पेमेंट वैग्रे कधीपासून करतोय . देशात परदेशात . पण ज्यांना त्रास झाला त्यांचा काय ह्या प्रश्नाचं उत्तर दिलात तर जरूर लेख लिहू . कित्येकदा बँकेला निर्णय बदलावे लागले ते का ह्याच उत्तर दिलात तर जरूर लिहू . सगळ्यांनी समर्थन केला ते वर्ल्ड इकॉनॉमिस्ट बेस्ट जे काही बोले किंवा शंका विचारल्या ते पागल अमर्त्य सेन ह्यांच्यापासून . असे का? याचे उत्तर दिलेत तरी जरूर लेख लिहू . मला काडीमात्र त्रास झाला नाही पण काही विचारलं की विरोधी ठरवलं हे का याचं उत्तर द्या मी लिहतो लेख . ज्यांना त्रास झाला त्यांचा काय हे पण लिहा एक वेगळी बाजू पहिले तुम्ही लिहा मी लिहतो कि मग

In reply to by वरुण मोहिते

त्रास समाजातील प्रत्येक वर्गालाच होत आहे हे कुणीही अमान्य करत नाही आहे . मी हि रांगेत उभारूनच पैसे भरले / काढले. प्रत्येक वर्गाचा त्रास कमी करण्यासाठीच त वेगवेगळ्या उपाययोजना सरकार अथवा आरबीआय कडून चालू आहेत. उदा . लग्नासाठी पैसे काढता येतील वगैरे. तसेच रोज याचा आढावा घेऊन त्यानुसार उपाय योजले जात आहेत. तसेच आपण प्रश्न विचारले म्हणून आपण विरोधी/ पाकप्रेमी वगैरे ठरत नाही. असे कोणीही म्हणत नसून गैरसमज करून घेऊ नयेत . ज्यांना त्रास झ्हाला त्यांच्या भावनेशी आम्ही प्रामाणिक आहोत. जय हिंद :) चला आता कशी तरतूद पाहिजे होती ( एकदम फुलप्रूफ कोणालाही त्रास वगैरे न होता हं .. ) यावर फर्मास मत मांडा पाहू .

चला आता कशी तरतूद पाहिजे होती ( एकदम फुलप्रूफ कोणालाही त्रास वगैरे न होता हं .. ) यावर फर्मास मत मांडा पाहू .
आत्ताची नोटबंदी १०० % फुलप्रूफ आहे का? दिर्घकालीन परिणामकारक आहे का?

औकात नाही हो. असो लग्नासाठी पैसे मला करायचेत १० लाख खर्च .कारण तितका आहेर मिळाला असं कोणी बोललं तरी देशासाठी गप्प बसायचं का? ग्रामीण भारतात हाल झाले हे पाहून गप्प बसायचं का?? सगळ्यात देशभक्ती का दाखवता आहेत हो . देश चालवायचा आहे भक्ती नाही आमच्या नातेवाईकांमध्ये कित्येक जण सैन्यात आहेत .पण परत एकदा काही विचारणं गुन्हा आहे का ??१०० च्या नोटा तरी अधिक प्रिंट करू शकले असते .किंवा अगदीच गुप्त ठेवायचं होतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे तर आधीच कॅशलेस व्यवहार बेस्ट ह्याच्या जाहिराती करायच्या होत्या .कोणाला असतं? हे कॅशलेस बेस्ट हा प्रकार ११ नोव्हेम्बर नंतर चालू झाला जेव्हा समजलं ८ तारखेनंतर कि प्रॉब्लेम होणारे . इतक्या जाहिराती देता पेप्रात सगळे पक्ष. द्या कि जाहिरात कॅशलेस करा आता का सुचलं?प्रॉब्लेम झाला म्हणून सुचलं . जाहिरात बाजी च्या बाबतीत काँग्रेस काय भाजप काय कोणीच त्यांचा हात धरू शकत नाही .

In reply to by वरुण मोहिते

मी आज गावी आहे. कुठे कुणाला काही त्रास झालेला कोण बोलत नाही. आणि हो ३०० लोकवस्तीच छोटस गाव आहे आणि जवळची बँक २२ कि मी लांब आहे.

अश्या मुळेच २००४ ला सत्ता गेली . अटल बिहारींसारखी मोठी लोकं असताना . जाहिरातबाजी . आम्ही करू ते बेस्ट .

प्रतिसाद नीट वाचुन समजून मग प्रतिवाद करावा नाहीतर परत परत परत तेच मुद्दे उगाळले जातात.बाकी किमान केशलेस च्या जाहिराती आधी देता आल्या असत्या हि सुचना बरोबर आहे. असे काहीतरी नवीन मुद्दे येउद्यात

७३ दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या जयललिताला cardiac arrest and respiratory system failure मुळे पुन्हा एकदा ICU मध्ये हलविले आहे.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ६८ व्या वर्षी निधन चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. त्यांना श्रध्दांजली.

काय चाललंय काही समजत नाही. ३ वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी (इंडियन एक्स्पेस, हिंदुस्तान टाईम्स आणि इंडिया टुडे) जयललिता गेल्याची बातमी पावणेसहाच्या सुमाराला संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. अद्रमुक पक्षाच्या कार्यालयावरील झेंडे अर्धे उतरविण्यात आले होते. काही मिनिटानंतर रूग्णालयाने जाहीर केले तिच्यावर अजून उपचार सुरू आहेत. रूग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ सुरू आहे. जयललिताऐवजी तात्पुरता मुख्यमंत्री म्हणून पनीरसेल्वम जबाबदारी घेणार आहे. यापूर्वी २००१ मध्ये जयललिता ४ महिने तुरूंगात असताना व नंतर ३-४ वर्षांपूर्वी ती ८ महिने तुरूंगात असताना हाच माणूस तिच्या जागी होता. मात्र तिच्या पश्चात अद्रमुक एकसंध राहील का याची खात्री नाही. सध्या तामिळनाडू विधानसभेत २३४ पैकी १२० च्या आसपास अद्रमुकचे आमदार आहेत तर द्रमुक व काँग्रेसची एकत्रित संख्या १०० च्या आसपास आहे. जयललिताच्या पश्चात अद्रमुक मध्ये फूट पडून काही आमदार द्रमुकमध्ये जाऊन पुन्हा एकदा करूणानिधी वयाच्या ९२ व्या वर्षी मुख्यमंत्री होऊ शकतात. १९८७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन जवळपास वर्षभर अमेरिकेत उपचार घेत होते व तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात जानकी रामचंद्रन (एम जी आर ची पत्नी), जयललिता व शिवाजी गणेशन (अभिनेत्री रेखाचे वडील) अशा ३ तुकड्यात पक्ष विभागला गेल्याने तत्कालीने केंद्र सरकारने विधानसभा बरखास्त करून १ वर्षानंतर निवडणुक घेतल्यावर द्रमुकला पूर्ण बहुमत मिळून करूणानिधी मुख्यमंत्री झाले होते. सद्यपरिस्थितीत विधानसभा भंग करणे खूप अवघड आहे. त्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता आहे.

In reply to by श्रीगुरुजी

१९८७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन जवळपास वर्षभर अमेरिकेत उपचार घेत होते व तिथेच त्यांचे निधन झाले.
किंचित दुरूस्ती. एम.जी.रामचंद्रन यांचे निधन अमेरिकेत नाही तर मद्रासमध्ये त्यांच्या निवासस्थानीच झाले होते. ते १९८४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमेरिकेला उपचारांसाठी गेले होते.पक्षाने ही निवडणुक त्यांच्या अनुपस्थितीत लढवली होती.ते परत आल्यावर फेब्रुवारी १९८५ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. अमेरिकेत निधन झाले होते ते हेमवतीनंदन बहुगुणांचे. पण त्यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नव्हते.

१८ टक्के जास्त मत आहेत .परवा निकाल जाहीर होईल . बाकी टाइम मॅगझीन वर बरेच भारतीय नेते पण आलेले आहेत सहज एक आठवण म्हणून . बाकी जयललिता असो पनीरसेल्वम बोथ करप्ट. पनीरसेल्वम ला कैच अधिकार नव्हते आता काय होणार ते पाहणं रोचक आहे .

जयललिता ह्यांचे निधन. निदान आत्तातरी बातमी अशीच आलीये.

In reply to by गामा पैलवान

उलटं आहे. अद्रमुक मधील निर्नायकी अवस्थेमुळे द्रमुक व काँग्रेस पुन्हा एकदा उचल घेण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत द्रमुक व काँग्रेसला नवसंजीवनी मिळू नये यासाठी भाजप प्रयत्न करणार. भाजप रजनीकांतला पुढे आणण्याच्या प्रयत्नात असल्याच्या अफवा आहेत.

बाकी आता हे या धाग्यात टाकावं का ठाऊक नाही पण २०१७ निसान जीटीआर भारतात लाँच झालेली आहे. रस्त्यावर चालण्यासाठी मान्यता असलेल्या अतिशय वेगवान वाहनांपैकी एक असलेली जीटीआर तुम्हाला १.९९ कोटी किमतीला मिळू शकते. याची इंजिन बनवणारे फक्त ६ लोक जगात आहेत, अर्थात निसान कडे, आणि प्रत्येक गाडीच्या इंजिनावर ते बनवणार्‍या व्यक्तीचं, जिला निसान ताकुमी (म्हणजेच कारागीर/कलाकार) म्हणते, नाव कोरलेलं असतं. ०-१०० २.९ सेकंद ३.८ लिटर व्ही सिक्स विघ ५६२ बीएचपी आणि ६३५ एनएम टॉर्क ऑल व्हील ड्राईव्ह सिक्स स्पीड ट्रान्स्मिशन इट्स लव्हिंगली कॉल्ड अ‍ॅज 'गॉडज़िला'

मस्त गाडी. बाकी निसान च्या गाड्यांच्या अनुभव नाही . जाता जाता भारतीय लष्कराच्या जिप्सी बदलून आता टाटा सफारी मिळणार असं आजच एक डील फायनल झालं आहे .

In reply to by वरुण मोहिते

जिप्सी आवडीची आहे. पण तिच्यातल्या त्रूटी दूर करण्याचं मारुतीने कधीच मनावर घेतलं नाही. व्यावसायिक निर्णय असावा परंतु कॉमन रेल डीझेल इंजिन, सुधारित ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, सस्पेन्शन, इत्यादी अनेक गोष्टी अनिवार्य होत्या. जिप्सी वॉज वे बिहाइंड टाइम.

आयला! जयललिता यांच्या पार्थिवाचं दहन न करता दफन केलं. ख्रिस्ती होत्या काय? -गा.पै.

In reply to by वरुण मोहिते

वमो, बाईसाहेब जन्माने तमिळ अय्यंगार ब्राह्मण होत्या. इति विकी. मग पुरण्याचं कारण लक्षात येत नाहीये. शिवाय त्यांच्या (दिवंगत) भावाच्या कुटुंबियांना जवळपास फिरकू दिलं गेलं नाहीये (ऐकीव माहिती). आ.न., -गा.पै.