शेती कामासाठी मजूर हवे आहेत....
प्रिय मिपाकरांनो,
होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो.
पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत.
सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य.
१. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल.
२. राहण्याची सोय केल्या जाईल.
३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल.
४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल.
५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल.
६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे. पालकांच्या मृत्यु पश्चात पाल्यांना शेतमजूर म्हणून प्राधान्य.
शक्यतो कुटुंबा सकट शेत-मजूर मिळाल्यास फार उत्तम.
कळावे, आपला लोभ आहेच.
आपलाच,
(गरीब शेतकरी) मुवि
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आभार.
मुवि तुम्ही कायमच आम्हाला आपले स्वतःचे समजले आहेत म्हणून बोलतोय
*काही स्वानुभव आहेत शेतीचे,
अभिनंदन
सध्या...