Skip to main content

हात दाखवून अवलक्षण

लेखक नाखु यांनी सोमवार, 24/10/2016 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
करण जोहरच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने उठलेल्या वादामुळे झालेली परिस्थीती आणि त्याच्या प्रदर्शनाला होणारा मनसेचा तीव्र विरोध याच्यावर तोडगा काढण्यात आला. पण या सगळ्या प्रकाराने खालील प्र्श्न उदभवले आणि त्यावरच मिपाकरांची नक्की काय मते आहेत म्हणून हा काथ्याकुट.
  • सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
  • निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
  • महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
  • मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
  • आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
  • या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
विधायक कामाबाबत चर्चा/विरोध याची सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वानवा असताना हा विनाकारण शेपटीला आग लावून फिरण्याचा प्रकार आणि बळजुबरीने सैनीकांना यात ओढण्याचा प्रयत्न पाहून मला व्य्क्तीशः राज ठाकरे यांच्याबद्दल कीव +घृणा च वाटली. (एके काळी मनसे स्थापनेवेळी मी खंदा समर्थक होतो त्या पार्श्वभूमीवर जास्तीच राग आला) कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे. काही माजी सैनीक अधिकार्यांनी याचा धिक्कार आणि निषेधही केला आहे. मिपाकरांना काय वाटते?

वाचने 65668
प्रतिक्रिया 306

प्रतिक्रिया

इसकाळ वरील हे दोन्ही विचार पटले -- सैनिक कल्याण निधीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमागील भारतीय नागरिकांच्या भावनेबद्दल लष्कराच्या मनात जराही शंका नाही; मात्र, ही रक्कम राज ठाकरेंच्या खंडणीचा भाग असू शकत नाही. - मनमोहन बहादूर, एअर व्हाइस मार्शल (निवृत्त) उत्तर कमांडचे माजी लेप्टनंट जनरल बी. एस.जैस्वाल यांनी म्हटले की, सैनिक कल्याण निधी कोणाला भीक मागत नाही. जर एखादा चित्रपट निर्माता सैनिक कल्याण निधीला योगदान देत असेल, तर त्याने अन्य भारतीय नागरिकांप्रमाणे मदत करावी. मात्र, यापद्धतीने जमा केलेला पैसा सैनिक कधीही स्वीकारणार नाही. सैनिक कल्याण निधीसाठी देण्यात येणारी रक्कम ही स्वेच्छेने देण्यात आली असल्यासच स्वीकारली जाते. खंडणी वा बळजबरी करून देण्यास भाग पाडलेला निधी हा सैनिक कल्याण निधीसाठी स्वीकारला जात नाही,‘

समाज शेकडो विकृतींनी भरलेला आहेच. ही त्यातलीच एक मनोवृत्ती. आपल्याला राग आला की आपण एक सकारात्मक गोष्ट करावी, जेणेकरून आपल्याला थोडे समाधान मिळेल. या संस्थळावर जाऊन आपण सारेजण एक हजार किंवा त्या पटीत रक्कम देऊ शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक हजार कोटी रुपये तिथेही पडून आहेत, आणि दरवर्षी जमतात त्यातले निम्मेही खर्च् केले जात नाहीत.

मुद्दा क्र. १ व २ यावरच काथ्याकूट बास आहे! अशा वेळेस न्यायालय स्वत:हून मध्ये का पडू शकत नाही हाही मला पडलेला एक प्रश्न आहे. Sandy

हि सेटलमेंट म्हणजे राजकीय अपरिहार्यता वाटली, फडणवीस आणि राज ठाकरे यांची. ऐन दिवाळीत महाराष्ट्रात अशांतता हि गृहविभागाच्या दृष्टीने चान्गली गोष्ट नव्हती आणि आंदोलनात सहभागी लोकांची ऐन दिवाळीत अटक हि मनसेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नव्हती. तेव्हा हा मधला मार्ग काढला गेला असावा. बाकी "कुणी काहीही करावे आणि सैनिक कल्याण निधीस पसे दिले तर त्यांचे अपराध/ चुका माफ केल्या जातील हे गृहितकच मोठे लाजिरवाणे आहे" हे सार कशावरून ते कळले नाही. कारण मनसेने पैसे द्या आणि काहीही करा असे म्हटलेले नाही. त्यांची पत्रकार परिषद आणि मराठी वाहिन्यांवरून मला वाटतं ह्या खालील अटी मनसेने ठेवल्या होत्या - त्याही चित्रपट प्रदर्शितच न होऊ देण्याची भूमिका मागे घेण्यासाठी. १. चित्रपट निर्माता संघाने यापुढे पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेऊ नये असा निर्णय लिखित स्वरूपात द्यावा. २. करण जोहर ने आपल्या सिनेमाच्या सुरुवातीला जवानांना श्रद्धांजली वाहणारा फलक दाखवावा. ३. चित्रपट "चालो अथवा न चालो", करण जोहरने सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रुपये द्यावेत. ४. मनसे चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याची भूमिका मागे घेत आहे, चित्रपटावरील बहिष्कार कायम आहे आणि लोकांनाही तसे आवाहन आहे. यावरून पैसे द्याआणि पाक कलाकरांना आणा असा अर्थ निघू शकत नाही. बाकी शेपटाला कशाकशाचे आणि कसले कसले बोळे लावून आग लावत फिरणाऱ्या इतर कोणाचीही जनतेला घृणा वाटत नाही हे काही नवल नाही. बाकी मनसेने ह्या प्रकरणात काय केले असते तर ते सर्वग्राह्य झाले असते ते वाचायला आवडेल. बाकी आज ऐकलेल्या दोन बातम्यांनी मन विषण्ण झाले. आपले बीएसएफचे अजून एक जवान गुरनामसिंग शहीद झाले आणि इकडे श्याम बेनेगल यांनी फवाद खान याला घेऊन चित्रपट काढायचा ठरवल्याचे बातमी ऐकिवात आली. छान आहे!

सरकारने यापुढे मांडवली किंग म्हणुन नावलौकिक कमवावा. या क्षेत्रात त्यांना बर्‍याच संधी आहेत आणि सरकारचे अश्या प्रकरणांना हाताळण्याचे कौशल्य देखील वादातीत दिसते. पाकिस्तानी कलाकारांनी चित्रपटांमध्ये काम करु नये अशी इच्छा एखाद्या पक्षाची मनसा असण्यात काहिच गैर नाही. सर्वसामान्य जनतेची अशी भावना किंवा इच्छा होणे देखील समजु शकते. सर्वसामान्यांच्या भावनांना आवाहन घालत स्वतःची इमेज सुधारण्याचा एखाद्या पक्षाचा प्रयत्न देखील समजुन येतो, पण ... पण जर: १. पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशन चा दर्जा अजुनही काढुन घेतला गेलेला नसेल २. पाकिस्तानी नागरिकांना (भारतीय संविधानानुसार बनवलेल्या) कायद्याने भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी नसेल ३. चित्रपट वगळता इतर क्षेत्रांत हे साटेलोटे चालुच असेल तर मग २-४ भारतीय चित्रपटांत काम करुन पाकिस्तानी अभिनेत्यांनी असे काय घोडे मारले आहे? बर मारलेच असेल तर सरकार काय झोपा काढते आहे काय? बर झोपा काढत असेल तर त्याची झळ सामान्य (पक्षी करण जोहर इत्यादी) नागरिकांनी का सोसावी? जर सरकारने या सव्रांवर बंदी घालणारा कुठलाही कायदा आणला नसेल, जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर सरकारची ही नैतिक आणी कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी अश्या चित्रपटांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि एखाद्या पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा. मनसेबरोबर मांडवली करायला लावुन फडणावीसांनी असे चित्र निर्माण केले आहे की जणू: १. मनसे म्हणजे प्रतिसरकार आहे २. राज ठाकरे हे सर्वोच्च पातळीवरचे देशभक्त आहेत (तसे ते नाहित असे काही मी म्हणत नाही.) ३. सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी आहे ४. यापुढे व्यवसाय / धंदा करण्यापुर्वी फक्त कायदा पाळणे महत्वाचे नसुन सर्व राजकीय पक्षांची महत्वाकांक्षा आणि त्यांची व्हिजन पाळणेही महत्वाचे आहे. ५. सरकार इतके नाकर्ते आहे की एका नगण्य अस्तित्व असलेल्या राजकीय पक्षासमोर देखील त्याला मान तुकवावी लागते. ६. कायदा आणि सुवव्यवस्था इतकी विस्कळीत आहे की हम करे सो कायदा म्हणणार्‍या विचारशक्तीच्या खळळ खट्ञाक परंपरेला आभान देउ शकत नाही. हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्‍ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती. पण तसे केल्याने विरोधकांनी सरकारच्या "देशभक्तीवर" ताशेरे ओढवले असते. याला भिन बहुधा सरकारने असले उरफाटे निर्णय घेतले असावेत,

In reply to by मृत्युन्जय

अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे:
३. चित्रपट वगळता इतर क्षेत्रांत हे साटेलोटे चालुच असेल तर मग २-४ भारतीय चित्रपटांत काम करुन पाकिस्तानी अभिनेत्यांनी असे काय घोडे मारले आहे? बर मारलेच असेल तर सरकार काय झोपा काढते आहे काय? बर झोपा काढत असेल तर त्याची झळ सामान्य (पक्षी करण जोहर इत्यादी) नागरिकांनी का सोसावी? जर सरकारने या सव्रांवर बंदी घालणारा कुठलाही कायदा आणला नसेल, जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर सरकारची ही नैतिक आणी कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी अश्या चित्रपटांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि एखाद्या पक्षाच्या मनमानी कारभाराला आळा घालावा.
पाकीस्तान बरोबर मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे व्यवहार राजरोसपणे सुरू असतील. मालाची आयात-निर्यात सुरळीत सुरू असेल. सीमेवर बससेवा निर्धोक सुरू असेल. लोकांचे येणे-जाणे इकडून तिकडे नेहमीसारखे सुरू असेल तर फक्त चित्रपट उद्योगाला मार का?? Sandy

In reply to by चांदणे संदीप

राज ठाकरे काही मूर्ख नाहीत. चित्रपट हा time sensitive धंदा आहे. योग्य वेळी चित्रपट रिलीस नाही झाला काही दिवस जरी लेट झाला तरी गल्ला ५०% कमी होऊ शकतो. त्यामुळे मूठभर गुंड घेऊन खूप त्रास निर्माण करता येतो.

In reply to by मृत्युन्जय

आणि हि असली मांडवली मुख्यमंत्र्यांनी दोन्ही 'पार्टींना' आपल्या बंगल्यावर बोलावून करावी हे पाहून भयानक चीड आली! महाराष्ट्रात काय राजेशाही आहे कि हुकूमशाही? म्हणजे मनात आलं कि एखादी गोष्ट स्वतःच चुकीची ठरवून, त्यावर 'निवाडा' करण्यासाठी लोकांना बोलवून दंडाची रक्कम आणि शिक्षेचे स्वरूप स्वतःच ठरवून परत, हि आमच्या रयतेची इच्छा होती म्हणूनच कारवाई केली असे म्हणणे?! असल्या प्रवृत्तींना 'सरकारमान्यता' मिळून गेली या प्रसंगातुन... आता असले कुठलेही राजकीय अस्तित्वासाठी झगडणारे पक्ष आपल्या 'मना'नुसार लोकांना वेठीला धरणार आणि सरकार समंजसपणे मध्यस्ती करून मांडवली घडवून आणणार!(अर्थात स्वतःचा फायदा दिसत असेल तरच!) "या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.">> आयते कोलीत म्हणजे काय? हा जो काही कारनामा केला गेला आहे, तो काही अनावधानाने केला आहे असे आपल्याला वाटते का? स्पष्ट राजकीय खेळी आहे हि... आपल्याला आठवत असेल पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या तेव्हा सरकारने पोलीस बंदोबस्तात तो कार्यक्रम पार पडला होता. कारण त्यावेळी कणखर सरकार हि प्रतिमा दाखवून द्यायची होती! आता, निवडणूक जवळच आहेत आणि शिवसेनेला धडा देखील शिकवायचा आहे. मग शिवसेनेची मते खाणारा पक्ष कोणता तर मनसे! त्याला जरा बळकटी देणे पण गरजेचे आहे... पण हे सगळे जनकल्याणार्थ असेही दिसले पाहिजे, मग सैन्यदल आठवते! सैन्याला समर्थन म्हणजेच राष्ट्रवाद हि जी प्रतिमा आजकाल बनवायची चालली आहे ती देशाला घातक आहे असे वाटते! त्या विरोधात जास्त काही बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोह असे काहीसे चित्र तयार होऊ लागले आहे...

In reply to by शब्दबम्बाळ

आणि हि असली मांडवली मुख्यमंत्र्यांनी दोन्ही 'पार्टींना' आपल्या बंगल्यावर बोलावून करावी हे पाहून भयानक चीड आली!
राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते. जर बोलणी करून हिंसक आंदोलन रद्द करता येत असेल तर त्यात काय चुकीचे आहे. जर बोलणी करूनसुद्धा समोरचा ऐकत नसेल तर शेवटी पोलिस वापरावेच लागले असते.
आपल्याला आठवत असेल पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या कार्यक्रमात गोंधळ करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या तेव्हा सरकारने पोलीस बंदोबस्तात तो कार्यक्रम पार पडला होता. कारण त्यावेळी कणखर सरकार हि प्रतिमा दाखवून द्यायची होती!
दोन्ही गोष्टीत प्रचंड फरक आहे. पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता. सामान्य जनतेत याविषयी विरोधाची भावना नव्हती. याउलट सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी भावना आहे व काहीही करून, कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला अद्दल घडवा ही जनतेची मागणी आहे. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम हा फक्त एकदाच व एकाच ठिकाणी होणार होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला पोलिस संरक्षण देणे फारच सोपे होते. याउलट हा चित्रपट राज्यात शेकडो चित्रपटगृहातून अनेक दिवस दाखविला जाणार होता. इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते.

In reply to by श्रीगुरुजी

याउलट सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानविरोधी भावना आहे व काहीही करून, कोणत्याही मार्गाने पाकिस्तानला अद्दल घडवा ही जनतेची मागणी आहे.
जनतेला चित्रपट न बघण्याचा अहींसक मार्ग उपलब्ध आहे. चित्रपट न बघणे हा गुन्हा होउ शकत नाही.कोणाला काहीही करायची गरज नाही. सुंठी वाचुन खोकला जाईल.

In reply to by श्रीगुरुजी

> राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने राज्यात शांतता राखणे हे मुख्यमंत्र्यांना करावेच लागते. उद्या मुख्यमंत्र्यांनी tutu घालून चौपाटीवर नाच करून शांतता आणता येईल तर करावी काय ? कायद्याची कसोटी तेंव्हाच असते जेंव्हा कायद्याची अंबलबजावणी करणे कठीण असते. खंडणी देऊन कसली शांतता ? मग द्यावे काश्मीर पाकिस्तानला आणि घ्यावी विकत शांतता ! > पुरंदरेंच्या महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध फक्त मूठभरांचाच होता. विरोध १ माणसाचा असेल किंवा १०० कोटी जनतेचा काहीही फरक पडत नाही. रिपब्लिक ह्याचा अर्थच मुळांत कायद्याचे राज्य असा असतो. कायदा लागू करण्याचे काम मुख मंत्र्यांचे आहे. "बाई संध्याकाळी वाड्यावर या मदत केली जाईल " हे निळू फुलेंचे (चित्रपट मधील) काम आहे. लोकांची भावना असेल पाकिस्तान विरोधी तर लोक पाहणार नाहीत चित्रपट. आणि एक आमदार असणाऱ्या राज ठाकरेला मूठभर नाही तर काय म्हणायचे ? > इतके दिवस इतक्या सर्व ठिकाणी पोलिस संरक्षण देणे हे अत्यंत अवघड होते. तर उद्या हिजाब ना घालता येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या तोंडावर ऍसिड फेकू अशी कुना मुस्लिम संघटनेने धमकी दिल्यास मुख्यमंत्री वाटाघाटी करून "मुलींनी फक्त केस झाकावेत" हा तोडगा काढणार आहेत का ? पक्ष भक्ती आणि व्यक्ती पूजा सुविचारी माणसाला सुद्धा कशी लाचार बनवू शकते हे तुमचे उत्तर दाखवून देते.

हे असले मांडवली धंदे करण्यापेक्षा सरकारने चित्रपटांना चोख सुरक्षा द्यायला हवी होती, या विरोधात जाउन हिंसात्मक निदर्शने करणार्‍ञांवर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, योग्य वेळीस अशातता माजवण्यार्या घटकांना कायदेशीर आणी सनदशीर मार्गाने योग्य समज द्यायला हवी होती.>>> -- सहमत..

या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते. - यातील करण जोहरची भूमिका पूर्णतः कायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून अयोग्य होती. - राज ठाकरेची भूमिका पूर्णत: बेकायदेशीर असली तरी ती लोकभावनेच्या दृष्टीकोनातून योग्य होती. - फडणविसांना कायदेशीर भूमिकेच्या बाजूने उभे राहणे बंधनकारक होते आणि त्याचवेळी लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करूनही चालले नसते. राज्य सरकारला कोणत्याही तर्‍हेने हिंसाचार, तोडफोड होऊन न देता कायद्याच्या बाजूने उभे राहण्याची व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याची दुहेरी कसरत करायची होती. समजा राज्य सरकार पूर्ण गप्प राहून या वादात पडलेच नसते तर तोडफोड वगैरे होऊन प्रचंड नुकसान होऊन अशांतता निर्माण झाली असती व बेकायदेशीर मार्गाचा विजय झाला असता व त्यामुळे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागली असती. समजा राज्य सरकारने लोकभावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करून चित्रपटाला पूर्ण संरक्षण दिले असते तरीसुद्धा तोडफोड, लाठीमार होऊनही चित्रपट चालू राहिलाच असता व अशा परिस्थितीत आपण लोकभावनेकडे दुर्लक्ष करून विजय मिळविला व भविष्यात सुद्धा याच मार्गाने पाकड्यांना घेऊन चित्रपट निर्माण करून सरकारच्या संरक्षणाखाली चित्रपट प्रदर्शित करू शकतो अशी विजयी भावना करण जोहरच्या मनात निर्माण होऊन त्याने आपल्यात भूमिकेत कोणताही बदल केला नसता. अशा परिस्थितीतही लोकभावनेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका राज्य सरकारवर आला असता. त्यामुळे कायदेशीर बाजूने उभे राहणे व त्याचवेळी लोकभावनेचा आदर करण्याच्या भूमिकेच्या बाजूने उभे राहणे हे राज्य सरकारसाठी आवश्यक होते. या दोन्ही गोष्टी या विशिष्ट प्रकरणात पूर्णतः परस्परविरोधी असल्याने राज्य सरकारची पंचाईत झाली होती. इतर कोणत्याही सूज्ञ सरकारने जे केले असते तेच फडणविसांनी केले. अशांतता व हिंसाचार टाळण्यासाठी त्यांनी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला व त्यात यश आले. मनसेने चित्रपटाविरूद्ध आंदोलन न करण्याचे मान्य केल्यामुळे कायदा हातात घेण्याचा प्रश्न निकालात निघाला. त्याचवेळी भविष्यात पाकड्यांना काम ने देण्याचे जाहीर केल्यामुळे लोकभावनेचाही आदर राखला गेला. त्याचबरोबर सैनिक कल्याण निधीला ५ कोटी रूपये देणगी देण्याचे जाहीर करून करण जोहरने सैनिकांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. अर्थात तो खरोखरच ५ कोटी देईल का, भविष्यात पाकड्यांना न घेण्याचा निर्णय खरोखरच पाळेल का हे आज तरी सांगता येणे अवघड आहे. या ५ कोटीला खंडणी म्हणणे पटत नाही कारण हे पैसे सैनिकांना जाणार असून राज ठाकरेच्या खिशात जाणार नाहीत. या चर्चेत काही डील झाले का, राजला टेबलाखालून काही मिळाले का, फडणविस मनसेपुढे झुकले का इ. गोष्टी अजून तरी माहित नाहीत व जोपर्यंत त्याविषयी काही ठोस माहिती मिळत नाही तोपर्यंत त्याबद्दल स्पेक्युलेशन करणे योग्य नाही. माझ्या दृष्टीने दृष्टीने फडणविसांनी एका वादग्रस्त व अशांतता निर्माण करू शकणार्‍या या स्फोटक विषयावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी योग्य प्रयत्न केले व त्यात ते यशस्वी झाले. माझ्या दॄष्टीने हा विन-विन तोडगा होता.

In reply to by गामा पैलवान

मृत्युंजय साहेबांनी केलेला प्रतिवाद पुरेसा आहे, मी केल्यास पुनरुक्ती होईल , वेळेचा अपव्यही!

In reply to by श्रीगुरुजी

सरकारने सनदशीर आणी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा निकाल लावणे अपेक्षित होते. हा विन विन तोडगा नाही. ही तर चक्क मांडवली आहे. एका नगण्य अस्तित्व असलेल्या पक्षाविरुद्ध कायद्याचा आणि पोलिस यंत्रणेचा वापर करुन जर निर्दोष चित्रपटनिर्मात्याला संरक्षण पुरवता येत नसेल तर ते सरकारचे नाकर्तेपण आहे, सूज्ञपणा नाही. सरकारचे काम काय्दा आणि सुव्यवस्था राखणे आहे. कायद्याच्या विरोधात जाउन अहिंसक मार्गांचा अवलंब करणार्‍यांना लोकभावनेच्या गोंडस नावाखाली पाठिशी घालणे हे नाही. ही गोष्ट (पाकिस्तानी कलाकारांना काम देणे) जर बेकायदेशीर असले असते तर मी चित्रपट प्रदर्शनालाचा विरोध केला असता. आणी जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर त्याला नाहक या मनस्तापाला तोड द्यावे लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे. कुठलाही सोम्यागोम्या पक्ष, संघटना अथवा व्यक्ती अश्याप्रकारे व्यावसायिकांना आणि सरकारला धारेवर धरु शकत नाही. लोक्भावना महत्वाची आहेच पण ती कधीही कायद्यापेक्षा वरचढ होउ शकत नाही. होत असेल तर कायदे बदलणे सरकारच्या हातात आहे आणि मग लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करणे हे देखील. बलात्कार्‍याला भर चौकात गुप्तांग तोडुन मग फाशी द्यावी ही लोकभावना झाली पण जर ते कायद्याच्या विरोधात असेल तर तसे न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बलात्कार्‍याला कायद्यानुसार शिक्षा जरुर द्यावी पण उद्या लोकभावनेचा आदर म्हणुन मांडवली करुन "गुप्तांग न कापता " केवळ भर चौकात बांधुन १०० फटक्यांची शिक्षा आणि मग भर चौकात फाशी ही मांडवली सरकारने करणे अपेक्षित नाही मग ती भलेही सो कॉल्ड विन विन सिच्युएशन का असेना. एकीकडे सरकार पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार. फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार मग एखाद्या चित्रपट निर्मात्याने पाकड्यांना घेउन चित्रपट काढला की त्याला वेठीस धरणार. हे कसे जमावे. चित्रपट बनवायला ३-४ महिन्यांचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा सुद्धा. मग अश्यावेळेस एकाएकी (युद्ध पुकारलेले नसताना आणी असे करणे बेकायदेशीर नसताना) केवळा कुणीतरी माणुस किंवा व्य्क्तीसमूह अशी मागणी करतो म्हणून एकाएकी चित्रपट बॅन करण्याला माझा विरोध आहे. शिवाय जर हा निर्णय लोकभावनेचा आदर ठेउन घेतला असेल तर सर्वोत्तम मार्ग होता की चित्रपट प्रदर्शित होउ देणे. जर जनभावना इतकीच विरोधात होती तर चित्रपट साफ कोसळलाच असता की. लोकभावना दिसलीच असती. प्रत्यक्षात मात्र ही भावनाप्रधान जनता मोठ्या प्रमाणावर चित्रपट पहायला उत्सुक असेल. मनसे ज्या लोकभावनेच्य आधारावर हे राजकारण करते आहे ती जनता पाकिस्तानी कलाकार चित्रपटात आहे म्हणुन पेटुन उठुन कदाचित चित्रपटाचा द्वेष करेल पण तरीही चित्रपट पाहिलच. मग कसली आलीय डोंबलाची भावना. कित्येकांना या सगळ्या प्रकरणाशी काडीचे घेणेदेणे नसेल. खास पब्लिसिटी केलेले ऐश्वर्या रणबीर ची गरमा गरम चुंबनालिंगनादी दृष्ञे पाहण्यासाठी चित्रपटात गर्दी देखील होइल आणि मग चित्रपट संपल्यावर या भावनाशील लोकांपैकीच काही लोक "फवाद कित्ती क्युट दिसतो ना?" म्हणून उसासे पण सोडतील. त्यामुळे लोकभावनेच्या गोंडस आवरणाखाली नाकर्तेपणा लपवण्याचा जो प्रकार चालला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे. खरे सांगायचे तर स्वतः प्रमोट करत असलेल्या नॅशनलिजमच्या बुरख्याआडुन केल्या गेलेल्या या शरसंधानाला तोंड कसे द्यावे हे भाजपाला कळत नाही आहे. करण जोहरला संरक्षण द्यावे तर नॅशनलिजम आडवा येतो आणि न देणे " सरकार " साठी शक्य नाही. त्यातुन हा बनियाचा मध्यममार्ग निघाला. पण हा राजधर्म होउ शकत नाही.

In reply to by मृत्युन्जय

प्लसच वन, शिवाय लोकभावना लोकभावना करणाऱ्यांना आत्ता बोलूनही उपयोग नाहीये मृत्युंजय भाऊ, हातच्या काकणाला आरसा कश्याला ह्या नियमाने, करण जोहरचा जो सिनेमा (नावही आठवत नाही) रीलीज होणार आहे, त्याचे कलेक्शन फिगर पाहून ही लोकभावना होती का लोकभावनेच्या गोंडस नावाखाली मांडवली होती हे चित्र स्पष्ट होईलच, तोवर तुमच्या प्रतिसादाला मम् म्हणतो आम्ही बापडे

In reply to by मृत्युन्जय

सरकारने सनदशीर आणी कायदेशीर मार्गाने या प्रकरणाचा निकाल लावणे अपेक्षित होते. हा विन विन तोडगा नाही. ही तर चक्क मांडवली आहे. एका नगण्य अस्तित्व असलेल्या पक्षाविरुद्ध कायद्याचा आणि पोलिस यंत्रणेचा वापर करुन जर निर्दोष चित्रपटनिर्मात्याला संरक्षण पुरवता येत नसेल तर ते सरकारचे नाकर्तेपण आहे, सूज्ञपणा नाही.
सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे. जर कायद्याच्या बडग्याची सक्ती करण्यापेक्षा चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटत असेल तर सर्वप्रथम चर्चेचाच मार्ग स्वीकारावा लागतो व फडणविसांनी तेच केले आहे. या प्रकरणातील दोन्ही बाजूंनी काही गोष्टी मान्य केल्या आहेत ज्या संपूर्णपणे कायदेशीर आहेत. मनसेच्या आंदोलनाविरूद्ध निश्चितच पोलिस यंत्रणेचा वापर करता आला असता. परंतु पोलिस वापरूनसुद्धा तोडफोड, हिंसात्मक आंदोलन पूर्णपणे टाळता आले नसते. श्रीनगरमध्ये अनेक महिने संचारबंदी असूनसुद्धा व सैनिक/पोलिस अश्रुधूर, पेलेट गन्स इ. चा वापर करत असूनसुद्धा जनता दगडफेकीसाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर येत होती. इथे तर फक्त लाठ्या हातात असलेले थोडे पोलिस चित्रपटगृहांवर तैनात असते व आंदोलकांनी त्यांना भीक घातली नसती. राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते, चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते, मनसेच्या काही कार्यकर्त्यांना आधीच अटक झाली होती व चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी मनसेचे बरेच कार्यकर्ते पकडले गेले असते. एवढे होऊनसुद्धा अशांतता टाळता आली नसती. त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.
सरकारचे काम काय्दा आणि सुव्यवस्था राखणे आहे. कायद्याच्या विरोधात जाउन अहिंसक मार्गांचा अवलंब करणार्‍यांना लोकभावनेच्या गोंडस नावाखाली पाठिशी घालणे हे नाही. ही गोष्ट (पाकिस्तानी कलाकारांना काम देणे) जर बेकायदेशीर असले असते तर मी चित्रपट प्रदर्शनालाचा विरोध केला असता. आणी जर करण जोहर ने कुठलेही बेकायदेशीर कृत्य केले नसेल तर त्याला नाहक या मनस्तापाला तोड द्यावे लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे. कुठलाही सोम्यागोम्या पक्ष, संघटना अथवा व्यक्ती अश्याप्रकारे व्यावसायिकांना आणि सरकारला धारेवर धरु शकत नाही.
सरकार कायद्याचे पालन करीत होतेच. राज्य सरकारने चित्रपटाला संरक्षण द्यायचे आधीच कबूल केले होते आणि चित्रपटावर बंदी घालणार नसल्याचेही सांगितले होते कारण या दोन्ही गोष्टी कायद्याच्या विरूद्ध झाल्या असत्या. जर मनसेने हिंसक आंदोलन केले असते तर त्याला तोंड द्यायची सरकारची तयारी होतीच. परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्वात आधी चर्चेच्या माध्यमातून कायदेशीर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे व चर्चा अपयशी झाल्यास कायद्याच्या बडग्याची सक्ती करणे हेच मार्ग सरकारपुढे असतात व फडणविसांनी नेमके तेच केले आहे.
लोक्भावना महत्वाची आहेच पण ती कधीही कायद्यापेक्षा वरचढ होउ शकत नाही. होत असेल तर कायदे बदलणे सरकारच्या हातात आहे आणि मग लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करणे हे देखील. बलात्कार्‍याला भर चौकात गुप्तांग तोडुन मग फाशी द्यावी ही लोकभावना झाली पण जर ते कायद्याच्या विरोधात असेल तर तसे न करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. बलात्कार्‍याला कायद्यानुसार शिक्षा जरुर द्यावी पण उद्या लोकभावनेचा आदर म्हणुन मांडवली करुन "गुप्तांग न कापता " केवळ भर चौकात बांधुन १०० फटक्यांची शिक्षा आणि मग भर चौकात फाशी ही मांडवली सरकारने करणे अपेक्षित नाही मग ती भलेही सो कॉल्ड विन विन सिच्युएशन का असेना.
लोकभावना कायद्यापेक्षा वरचढ होऊ शकत नाही, परंतु लोकभावनेकडे पूर्णपणे दुर्लक्षही करता येत नाही. कायदे बदलणे ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे व या विशिष्ट प्रकरणात इतक्या कमी वेळात कायदे बदलणे अशक्य आहे. लोकभावनेचा आदर कायदेशीर मार्गाने करता येतो आणि चर्चेच्या माध्यमातून नेमके तेच झाले आहे. निदान भविष्यात तरी पाकड्यांना चित्रपटात घेणार नाही ही जाहीर कबुली हे त्याचेच उदाहरण आहे.
एकीकडे सरकार पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार. फील गुड फॅक्टर तयार करण्याचा प्रयत्न करणार मग एखाद्या चित्रपट निर्मात्याने पाकड्यांना घेउन चित्रपट काढला की त्याला वेठीस धरणार. हे कसे जमावे. चित्रपट बनवायला ३-४ महिन्यांचा कालावधी जातो, कधी कधी वर्षभराचा सुद्धा. मग अश्यावेळेस एकाएकी (युद्ध पुकारलेले नसताना आणी असे करणे बेकायदेशीर नसताना) केवळा कुणीतरी माणुस किंवा व्य्क्तीसमूह अशी मागणी करतो म्हणून एकाएकी चित्रपट बॅन करण्याला माझा विरोध आहे.
संबंध हे एकतर्फी सुधारत नसतात. संबंध सुधारणे हा एकेरी मार्ग नसतो. भारताने आपल्या बाजूने संबंध सुधारण्याचे असंख्य प्रयत्न केले आहेत. परंतु ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. एखाद्या पाकड्याला चित्रपटात घेतल्यामुळे संबंध सुधारतील असे मानणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे. चित्रपट बॅन झालेला मला आवडला असता. परंतु तसे करणे कायदेशीर नाही व त्यामुळे तसे होणे शक्य नाही.
शिवाय जर हा निर्णय लोकभावनेचा आदर ठेउन घेतला असेल तर सर्वोत्तम मार्ग होता की चित्रपट प्रदर्शित होउ देणे. जर जनभावना इतकीच विरोधात होती तर चित्रपट साफ कोसळलाच असता की. लोकभावना दिसलीच असती. प्रत्यक्षात मात्र ही भावनाप्रधान जनता मोठ्या प्रमाणावर चित्रपट पहायला उत्सुक असेल. मनसे ज्या लोकभावनेच्य आधारावर हे राजकारण करते आहे ती जनता पाकिस्तानी कलाकार चित्रपटात आहे म्हणुन पेटुन उठुन कदाचित चित्रपटाचा द्वेष करेल पण तरीही चित्रपट पाहिलच. मग कसली आलीय डोंबलाची भावना. कित्येकांना या सगळ्या प्रकरणाशी काडीचे घेणेदेणे नसेल. खास पब्लिसिटी केलेले ऐश्वर्या रणबीर ची गरमा गरम चुंबनालिंगनादी दृष्ञे पाहण्यासाठी चित्रपटात गर्दी देखील होइल आणि मग चित्रपट संपल्यावर या भावनाशील लोकांपैकीच काही लोक "फवाद कित्ती क्युट दिसतो ना?" म्हणून उसासे पण सोडतील.
भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात एखाद्या गोष्टीवर एकमत होणे जवळपास अशक्य आहे. जर लोकांना पाकड्यांची तीव्र चीड असेल तर ते नक्कीच तो चित्रपट बघणार नाहीत.
त्यामुळे लोकभावनेच्या गोंडस आवरणाखाली नाकर्तेपणा लपवण्याचा जो प्रकार चालला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे. खरे सांगायचे तर स्वतः प्रमोट करत असलेल्या नॅशनलिजमच्या बुरख्याआडुन केल्या गेलेल्या या शरसंधानाला तोंड कसे द्यावे हे भाजपाला कळत नाही आहे. करण जोहरला संरक्षण द्यावे तर नॅशनलिजम आडवा येतो आणि न देणे " सरकार " साठी शक्य नाही. त्यातुन हा बनियाचा मध्यममार्ग निघाला. पण हा राजधर्म होउ शकत नाही.
नॅशनलिझमचा कसला आला आहे बुरखा? सत्ताधारी पक्ष या नात्याने भाजप ती जबाबदारी ओळखूनच हे प्रकरण हाताळत आहे. फडणविसांनी संघर्षाचा मार्ग टाळून दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून एक कायदेशीर तोडगा काढून शांतताभंग टाळला व लोकभावनेचाही आदर केला.

In reply to by श्रीगुरुजी

सरकारने सनदशीर व कायदेशीर मार्गानेच या प्रकरणावर तोडगा काढलेला आहे. कुठल्या सनदी नुसार हा सनदशीर तोडगा काढला आहे म्हणे? कायदेशीर म्हणता आहात तर कुठल्या कायद्यान्वये हा तोडगा वर्षांवर काढायचा ठरला त्याचा मसुदा किंवा किमान कलम क्रमांक अन त्या कलमाची वाक्यरचना विदास्वरूप द्यावीत ही नम्र विनंती. जाता जाता सनदशीर ह्या शब्दाचा उगम सनद उर्फ इंग्रजीत "charter" ह्यावरून आलेला आहे त्यामुळे सनदशीर म्हणले की मूळ सनदीची संहिता देणे बंधनकारक असते किंवा त्या सनदीच्या अंतर्गत कार्य करणे अपेक्षित असते म्हणूनच टॅली प्रो वापरणारे खंडीभर "अकाउंटंट" असले तरी महत्व "चार्टर्ड अकाउंटंट" उर्फ सनदप्राप्त सनदी लेखपालालच असते, हेच सीएस, वकील, डॉक्टर इत्यादी पेशांना सुद्धा लागू होते, ह्याची नोंद घेऊन संबंधितांनी "सनदशीर" हा शब्द वापरला असावा अशी अपेक्षा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कुठल्या कोर्टाने "असे वाद झाल्यास परस्पर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दोन्ही वादी अन फिर्यादी पक्षाला बोलवून तोडगा काढावा अन शांतता प्रस्थापित करावी" असा आदेश दिलाय का? असल्यास तो लेखी असेलच, त्याची प्रत जमल्यास द्यावी ही विनंती, तसेही असे आदेश द्यायचेच असले तर ती शक्ती फक्त सुप्रीम कोर्टाकडे आहे असे वाटते, कारण "एपेलेट ज्यूरीसडीक्शन" फक्त सुप्रीम कोर्टाचे असते असे वाटते, तरीही असा कायदा असल्यास तो द्यावा म्हणजे पुढील अभ्यासाला बरे पडेल

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

फडणविसांनी राज व करणला एकत्र बोलावून तोडगा काढण्याचे केलेले प्रयत्न हे बेकायदेशीर किंवा घटनेच्या विरोधी होते का? एखाद्या वादावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याची पद्धत अनेक वर्षांपासून वापरली जाते. १९८५ मध्ये राजीव गांधींनी शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक कमिटी या धार्मिक संस्थेशी व त्या संस्थेच्या लोंगोवाल (जे कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते किंवा निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधीही नव्हते) यांच्याशी वाटाघाटी करून तोडगा काढला होता. त्याच वर्षी अखिल आसाम विद्यार्थी परीषदेच्या विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढण्यात आला होता. १९८६ मध्ये मिझोराममधील बंडखोर लाल डेंगाशी वाटाघाटी करून शांततेसाठी तोडगा काढण्यात आला होता. फुटिरतावादी हुरियत नेत्यांशी सुद्धा केंद्र सरकारने वाटाघाटी केल्या आहेत. कोणत्याही वादात सुरवातीला चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जातो. घटस्फोटाचे प्रकरण असो किंवा एकाने दुसर्‍याची बदनामी केल्याचा आरोप असो, सर्वात आधी दोन्ही बाजूंनी एकत्र बोलून वाद मिटवावा यासाठीच प्रयत्न केले जातात. ते प्रयत्न अपयशी ठरले तर कायद्याची कारवाई सुरू होते. फडणविसांनी नेमके तेच केले आहे. दोन्ही बाजूंना समोरासमोर बसवून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला. समजा तो प्रयत्न अयशस्वी ठरला असता तर त्यांना चित्रपटाला संरक्षण द्यायची आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडावीच लागली असती.

In reply to by श्रीगुरुजी

अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मनसेने पूर्वी बिहारींविरूद्ध केलेले राडे आठवत असतील. यावेळीही तसेच राडे होण्याची वाट बघायची होती का?

In reply to by श्रीगुरुजी

अच्छा म्हणजे एका सिनेमाला विरोध करणे अन खलिस्तानी किंवा पूर्वोत्तरी फुटीरतावादी लोकांच्या बरोबरीचं वाटतं का काय तुम्हाला? का फक्त किल्ला लढवायचा म्हणून कायच्या काय बोलताय का काय? तुम्ही किती खालिस्तानी किंवा उल्फा , एनएस्सीएनवाल्या लोकांचे राडे पाहिले आहेत? एकतर तुम्ही ते पाहिलेले नाहीत किंवा मनसेची बेडकी फुगवून दाखवताय कारण नाव तुमच्या सीएमचं अडकलंय म्हणून कदाचित. रक्तपाती राडे अन असल्या दीड दमडीच्या राजकीय स्टंट मध्ये फरक असतो हो साहेब, प्लिजच ___/\__

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

राष्ट्रवादी एक फुटकळ पक्ष असतो. पण मनसे तोडफोड करणारा, विध्वंसकारी, राज्यव्यापी, जनतेपेक्षा मोठा पक्ष असतो. त्याईची सतरंजी अटकेल हाये, एवढी दलाली(इंग्रजीत Pimp या अर्थाने)….? _/\_

In reply to by श्रीगुरुजी

काश्मिर मध्ये १०० लोक मेले तर तिथे तोडगा काढायला कोणि प्रयत्न करत नाही. पण इथे करतात, यावरुनच मनसे किती मोठी दहशतवादी संघटना असेल याची कल्पना येते. याची कल्पना महाराष्ट्राबाहेर राहणार्या बीड-नंदुरबार च्या लोकांना येणार नाही, पण ती मुख्यमंत्र्याना आहे, म्हणुनच त्यांनी जिवाची बाजी लावुन हा संघर्ष टाळला.

In reply to by श्रीगुरुजी

तोडगा काढताना फक्त एका बाजुला पैसे खर्च कराय्ला लावायला नको होते. राज ठाकरें नी प्रत्येक पाकिस्तानी कलाकाराच्या बदल्यात ५ करोड स्वतः आर्मीला द्याय्ला हवे होते. किंवा निदान २.५ करोड तरी. किति माणसे मारायची हे ठरवायला राजबरोबर वेगळी मीटींग ठेवावी. फक्त मोदिंना बोलवु नका म्हणजे झाले. == हिच गोष्ट एखद्या मुस्लीम पुढार्याने केलि असती तर अशी मांडवली झाली असती का?

In reply to by भक्त प्रल्हाद

मला नाही वाटत की ५ कोटी रूपये देणे हा तोडग्याचा प्राथमिक भाग होता म्हणून. अशांतता टाळण्यासाठी आंदोलन मागे घेतले जावे हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. ५ कोटी देणे, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक दाखविणे इ. गोष्टी नंतर आलेल्या आहेत. राज ठाकरेंनी किती द्यावे किंवा अजिबातच न द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे.
हिच गोष्ट एखद्या मुस्लीम पुढार्याने केलि असती तर अशी मांडवली झाली असती का?
मुस्लिमांबरोबरही यापूर्वी बोलणी करून तडजोड केल्याची उदाहरणे आहेत. हुरियतच्या नेत्यांबरोबर चर्चा करणे हे एक उदाहरण. दुसरे उदाहरण म्हणजे सप्टेंबर १९९३ मध्ये ५-६ पाकिस्तानी अतिरेक्यांनी हजरतबाल मशिदीत प्रवेश केल्यावर सैनिकांनी मशिदीला वेढा घालून त्यांना अडकवून ठेवले होते. मशिदीत अतिरेक्यांव्यतिरिक्त इतर कोणीही नव्हते. अतिरेक्यांना पळून जाणे अशक्य होते. तरीसुद्धा तत्कालीन केंद्र सरकारने अतिरेक्यांशी बोलणी करून मशिदीचे नुकसान न करण्याच्या अटीवर वेढा उठवून त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते.

In reply to by श्रीगुरुजी

मला नाही वाटत की ५ कोटी रूपये देणे हा तोडग्याचा प्राथमिक भाग होता म्हणून.
गुरुजी, पाच कोटी देणे हा तोडग्याचा प्राथमिक वा दुय्यम भाग होता हेचं मुळात इथे दुय्यम आहे. मुख्य प्रॉब्लेम या असल्या तोडग्याशीचं आहे. बाकी पूर्वी कुणा कुणासोबत कसे तोडगे काढले गेले याचा इथे काही संबंध आहे असे मला वाटत नाही, उगाचं समोरचा चिखलात खेळला म्हणून आम्ही शेणात लोळलो म्हणण्याला काही अर्थ नसतो.

In reply to by गणामास्तर

मुख्य प्रॉब्लेम या असल्या तोडग्याशीचं आहे. ^^^ सहमत! काय करायला पाहिजे होते? १. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे. 2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे. 3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे, मनसे दंगा करेल म्हणून हा सरकारने दोघांना बोलावून तोडगा काढणे चुकीचा पायंडा पाडणे आहे, हुर्रीयात किंवा इतर आतंकवादी, नक्षलवादी, अलगाव्वदी संघटन यांची मनसे सारख्या राजकीय पक्षाबरोबर तुलना करणेच चुकीचे. ह्या प्रकरणात चित्रपट किंवा पाच कोटी महत्वाचे नाहीत, मुख्यमंत्र्यासारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने गुंडगिरी करणाऱ्याला भिऊन असले तोडग्याचे पाउल उचलणे लोकशाहिस मारक आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही, चारपाच हजार गुंड हाताशी असले की कोणीही काहीही कबूल करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो हा संदेश जात आहे. राज ठाकरे ह्या घटनाबाह्य व्यक्तीला महत्त्व देणे खटलेलं आहे, व्हाटबौटेरीच करायची असेल तर राहुल गांधीने अध्यादेश मागे घ्यायला लावल्यावर विरोधकांनी केलेला थयथयाट आठवावा.

In reply to by संदीप डांगे

काय करायला पाहिजे होते? १. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे. 2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे. 3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे,
चित्रपटाला संरक्षण देण्यात येणारच होते. परंतु ते देऊनसुद्धा तोडफोड टाळता आली नसती. त्यामुळे सामोपचाराने मार्ग काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक होते. मनसे धरणे आंदोलन करण्याची किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये असा प्रचार करण्याची शक्यता दिसत नव्हती आणि करण तर चर्चेच्या आदल्या दिवसापर्यंत गप्प होता व त्याच्या वतीने काही जण पाकड्यांना घेण्याचे समर्थन करीत होते. या दोघांपैकी कोणीतरी एकाने अशी भूमिका आधीच घेतली असती तर तडजोडीची वेळच आली नसती.

In reply to by संदीप डांगे

१. सरकार: चित्रपटाला संरक्षण देणे. = सहमत. आपण अशी अपेक्षा सरकार कडून करणे योग्य आहे. 2. मनसे: धरणे आंदोलन करून किंवा कोणत्याही अहिंसक मार्गाने चित्रपट बघू नये म्हणून प्रचार करणे. = मनसे कसलाही विरोध अहिंसक मार्गाने करेल असे वाटत नाही. आपल्या सारख्या काही लोकांचा जरी अशा प्रकारांना विरोध असला तरी काही लोकांचा त्याला सपोर्ट आहे आणि अजून काही लोक सपोर्ट करतील अशी मनसे ला अपेक्षा असल्यामुळे ते धिंगाणा घालून स्वताचे उपद्रवमूल्य वाढवणे हा हेतू साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारचं. 3. करण जो ने यापुढे कोणत्याही पाकी कलाकाराला ना घेण्याचे वचन देणे, = जर सरकारने अशी काही बंदी घातलेली नाही आणि बहुसंख्य लोकांना त्याचा काही फरक पडत नसेल तर कायद्याच्या चौकटीत राहून पाकी कलाकारांना घेण्यात काय प्रॉब्लेम असू शकतो हे मला कळत नाहीये. जेव्हा या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते तेव्हा तरी वातावरण इतके तापलेले नव्हते, आपले पंप्र सुद्धा पाकिस्तान दौरा करत होते आणि नवाझ शरीफांना आमंत्रणे धाडीत होते.

In reply to by श्रीगुरुजी

कुठले विन विन? कुठली लोकभावना? माझा दुसरीकडचा प्रतिसाद इथे चिकटवते. ही आहे लोकभावना.
पाच कोटी ही दाऊदच्या पैशांनी सिनेमे काढायच्या परवानगीची आणि आपल्या हजारों सैनिकांच्या जिवाची किंमत का? मांडवलीसाठी मध्यस्थी करणारे नरकात जातीलच. पण तोडगा स्वीकारणार्‍या सरकारचे काय? तो नालायक करण जोहर एका सिनेमामागे ५० कोटीचा निव्वळ अधिकृत फायदा कमावतो म्हणे. आणि सैनिकांच्या तोंडावर पाच कोटी फेकायची हिंमत कशी झाली त्याची? सिनेमात दाऊद आणि त्याच्यासारख्या गुन्हेगार धंदेवाल्यांचा पैसा येतो ही लोकांची समजूत आहे. तिला पुरावे देता येणार नाहीत तसेच खोटीही म्हणता येणार नाही. उद्या कोणीही दाऊदच्या पैशाने सिनेमा काढील आणि पाच कोटी सैनिक फंडाला भीक फेकेल. ते चालेल का? म्हणजे लोक गरीबाना लुबाडतात. त्यांच्या अंगावर गाड्या घालून मारतात आणि मग सिद्धीविनायकाला देणगी देऊन सगळी पापे धुवून काढतात. अजून एक दानपेटी असेच सैनिक फंडाला समजले का काय हे खंडणीखोर?
सैनिक खंडणीच्या पैशांवर जगत नाहीत म्हणून माजी अधिकार्‍यांनी झोडपून काढले आहे ना, त्याचा अर्थ समजत असला तर जरा तरी लाज वाटून घेऊ देत हे नालायक. अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना. फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या चातुर्याने हाताळत होते त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले होते पण मांडवली करणार्‍यांच्या रांगेत बसून खरेच त्यानी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे.

In reply to by पैसा

आमच्या गावचा असा रास्त उल्लेख वाचून छाती टरारली पाव इंच! थँकयु ताय! बातमी दिल्या बद्दल

In reply to by पैसा

फडणवीस मोर्चांचा प्रसंग ज्या चातुर्याने हाताळत होते त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले होते पण मांडवली करणार्‍यांच्या रांगेत बसून खरेच त्यानी हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे.
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

In reply to by पैसा

काहीही काय? नवराबायकोचे भांडण हा एका कुटुंबातला खाजगी वाद आहे. समाजाचा त्याच्याशी संबंध नाही. बादवे, वरील प्रतिसाद वाचून कायम विषय भलतीकडेच भरकटविणार्‍या, असंख्य डुआय असणार्‍या आणि प्रचंड फॅन फॉलोइंग असणार्‍या एका ट्रोलची आठवण झाली.

In reply to by श्रीगुरुजी

बादवे, खालील वाक्यांवर प्रतिसाद अपेक्षित होता.
क्षणभर असं गृहित धरू की त्यांनी राज व करणला एकत्र बोलवून त्यांच्याशी वाटाघाटी करून गंभीर घोडचूक केली. पण मग हे न करता त्यांनी नक्की काय करायला हवं होतं?

In reply to by श्रीगुरुजी

करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. हे ब्लॅकमेलिंग कशाला? आम्ही तो सिनेमा बघणार नाहीच पण म्हणून मनसे गुंडगिरी करणार असेल तर आमचा अजिबात पाठिंबा नाही. करण जोहर आणि मनसे यांच्याकडून कसलीही चांगल्या कामाची अपेक्षा अजिबात नाही पण ही मांडवली फडणविसानी करावी याचा जास्त राग आला आहे. धमक्या देऊन मनसे दंगल करणार होते? करून बघू देत. आतापर्यंत महाराष्ट्रात किती दंगलीमधे सैन्याला बोलावावे लागले? गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत. फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का?

In reply to by पैसा

>>> करण जोहरने कोर्टात जायचे होते आणि मनसेने शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. ते दोघे तसे करीत नव्हते, त्यामुळेच फडणविसांना त्यात पडावे लागले. >>> गुंडगिरीचा समाचार घ्यायला महाराष्ट्र पोलीस समर्थ आहेत. पोलीस संरक्षण हा शेवटचा पर्याय शिल्लक होताच. परंतु त्यापूर्वी चर्चने मार्ग काढणे आवश्यक होते. >>> फडणविसानी एजंटाचे काम न करता गप्प बसून लक्ष ठेवायचे होते. नसते धंदे करायला सांगितले कोणी? महाराष्ट्रातली सगळी कोर्ट आणि पोलीस मेले का? नुसते गप्प बसून लक्ष ठेवायचे? दंगेधोपे टाळून वाद मिटविणे हे त्यांचे कर्तव्य होते व तेच त्यांनी केले.

In reply to by श्रीगुरुजी

तेच तेच लिहायचा कंटाळा आला. आता पुढे टंकाळ्याचा अधिकार वापरत आहे. तुमचे म्हणणे कुठूनही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचायची काही शक्यता असेल तर महाराष्ट्रातल्या १०० पैकी ९५ लोकांना या प्रकाराचा भयंकर राग आला आहे हेही त्यांच्यापर्यंत पोचवा ही हात जोडून विनंती. आपण सगळ्यानीच बापड्या करण जोहरला यथाशक्ती १०/११ रुपयाचे चेक्स पाठवून देऊया. गरिबाला तेवढीच मदत. त्यातले पैसे त्याने अजून कोणाला दानधर्म केले तरी आमचे काही म्हणणे नाही. पण सैनिकांची चेष्टा कृपा करून थांबवा आता.

In reply to by श्रीगुरुजी

मग करण जोहर आणि राज ठाकरे असे कोण मोठे समाजाचे धुरीण लागून गेले की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ खर्च करावा? एक फडतूस सिनेमा म्हणजे काय लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे का? करण जोहर रडला म्हणे आपली, आपल्या लोकांची रोजीरोटी बुडाली मग उद्या कोणा रस्त्यावरच्या मजुराला मुकादमाने कामावरून काढून टाकले आणि त्याची रोजीरोटी बुडाली तर त्याला मुख्यमंत्री स्वत मदत करणार का? कायदा आणि सरकारला मजूर आणि करण जोहर दोघे सारखेच ना?

In reply to by पैसा

ती बैठक राज किंवा करणसाठी किंवा त्याच्या चित्रपटासाठी नसून दंगेधोपे टाळण्यासाठी होती.

In reply to by पैसा

अकोल्याच्या एका दुकानदाराने करण जोहरला ३२० रुपयाचा चेक पाठवून भीक घातली आहे ही आहे लोकभावना. भारीच कल्पक आहे तो दुकानदार ! पण, असे बरेच चेक आले तर पैश्याच्या मागे धावणारे बॉलीवूडी लोक ते निर्लज्जपणे घेतीलही. पैसा सोडून त्यांना इतर काही दिसते असे वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

> या वादात एकूण ३ हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) होते. करण जोहर (म्हणजेच निर्माते), राज ठाकरे (म्हणजेच मनसे) आणि फडणविस (म्हणजेच राज्य सरकार). तसे चित्रपटगृहांचे मालक, वितरक, प्रेक्षक इ. सुद्धा हितसंबंधी होते, परंतु वरील ३ हे प्रमुख हितसंबंधी होते. इथे राज ठाकरेंना स्टॅकहोल्डर म्हणणेच मुळांत चुकीचे आहे. ठाकरे ह्यांनी स्टेक होल्डर बनण्याचा प्रयत्न केला तेंव्हाच त्यांना हिसका दाखवायला पाहिजे होता. उद्या मुलीची छेड काढणाऱ्याला तिच्या लग्नाच्या वेळी "स्टेक होल्डर' म्हणावे काय ? रेड रायडींग हूड मध्ये लांडग्याची जी भूमिका होती, शोले मध्ये गब्बर ची जी भूमिका होती, रामायणात रावणाची जी भूमिका होती, बाजारांत हफ्ता गोळा करायला येणार्यांची जी भूमिका असते, काश्मीर मध्ये पाकिस्तानची जी भूमिका आहे तीच भूमिका राज ठाकरे ह्यांची वरील घटनेत होती.

सब गंदा है...पर धंदा है ये... जिथे आर्थिक फायदा नुकसानीच्या गोष्टी येतात तिथे चित्रपट व्यावसायिक काय किंवा राजकारणी व मुख्यमंत्री काय सगळे कमरेच सोडून डोक्याला गुंडाळायला तयार होतात. हीच गोष्ट ह्या प्रसंगातून ह्या तिघांनी दाखवून दिली आहे....बाकी सेना आणि सैनिक वगैरे गोष्टी ह्या लोकांसाठी नगण्य आहेत.

(ह्यातील काही मुद्दे रिपीट झाले असतील तर क्षमस्व.) शेवटी लावलेच की नाही करण जोहरला गुढगे टेकायला खळ्ळ खट्याक 'संस्कृती'पुढे (चुकलो, लोकेच्छेपुढे)? आपली लोकशाहीदेखील अशीच गुढगे टेकील लवकरच केंव्हातरी. मग आपण आपली शस्त्रे खाली ठेवू व आनंदोत्सव साजरा करू. आपण खाली ठेवलेली शस्त्रे केव्हातरी आपल्यावरच उगारली जातील पण ते नंतर पाहता येईल. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची परवानगी देऊ नये व जे कोणी इथे असतील त्यांनी भारत सोडून जावे अशी हाकाटी उरीच्या हल्ल्यानंतर सुरु झाली. ज्या कोणी (उदा. सलमान खान) त्याविरुद्ध सूर लावला त्याच्यावर हल्लाबोल झाला. आपली राष्ट्रनिष्ठा कशी मोठी हे सिद्ध करण्याची अहमहिका लागली. पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते. पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही. दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का? पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.) शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही. ह्या तमाशाची परवाच्या दिवशी तात्पुरती सांगता झाली. ('तात्पुरती' अशासाठी की 'ह्यापुढे मी पाकिस्तानी कलाकारांना माझ्या चित्रपटात घेणार नाही' अशी हमी करण जोहरकडून घेतली आहे.) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती, म्हणजे मांडवली, केली. करण जोहरने पाच कोटी रुपये सैनिक कल्याण निधीला द्यायचे असा करार झाला. त्यावर शिवसेनेने 'लष्कराला खंडणीचा पैसा नको' अशी कॉमेंट देण्याचा उपचारदेखील पार पाडला. असे सर्व यथासांग झाले. ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे. परिस्थिती बदलली म्हणून पूर्वीचे करार रद्द करता येत नसतात. तशी कोणी मागणी जर करत असेल तर ते घटनाबाह्य आहे. प्रत्येक नागरिकाचे अधिकार राखण्यास सरकार बांधील आहे अशी तर्कशुद्ध आणि न्यायाची भूमिका सरकारची असायला हवी होती. त्याविरुद्ध कोणी येत असेल तर त्याचा कठोरपणे बीमोड करणे हे सरकारचे कर्तव्य होते. निदान ज्या पक्षाचे पंतप्रधान 'भारताची राज्यघटना हा माझा धर्म आहे' अशी जाहीर भूमिका घेतात त्या पक्षाची तरी. पण कसचे काय? निवडणुकींच्या आणि मतांच्या हिशोबापुढे सगळे दुय्यम असते, हेच खरे. (शिवसेनाशी आपले फाटलेलेच आहे. मनसे तरी आपल्या बाजूला असलेला बरा, निदान विरुद्ध तरी नको अशी भाजपाची भूमीका असावी.) आता ह्या त्रिपक्षीय कराराचा निषेध करणाऱ्यांविरुद्ध हल्लाबोल करता येईल. 'आता मनसे आमची देशभक्ती ठरवणार का' असा प्रश्न शबाना आझमी हिने केला आहे, तिलाही राष्ट्रद्रोही ठरविता येईल. आणि हो, देशातील वाढत्याअसहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या रतन टाटा ह्यांना देखील. आणि हे सर्व लिहिल्याबद्दल मलासुद्धा. पण मी काही शबाना आझमी, रतन टाटा ह्यांच्या पंक्तीत बसणारा नव्हे. मी एक क्षुल्लक इसम. म्हणून मला माफही करतील कदाचित. शेवटी एवढेच, की हे राजापेक्षा राजनिष्ठ लोक राजालाही तापदायक ठरू शकतात.

In reply to by रविकिरण फडके

माझ्या मते सर्व घटनेचे अनालिसिस करणारा सर्वांत चांगला कमेंट हा आहे. > ह्यात एक बरे झाले; भाजपाचे खरे रूप प्रकटले. 'party with a difference' म्हणजे काय ते लोकांसमोर आले. सत्य कटू असले तरी भ्रम दूर झालेला केव्हाही चांगलाच, नाही का? पाकिस्तानी कलाकाराला घेतले ही काही करण जोहरची चूक नव्हे. भाजपचे खरे रूप हेच आहे ह्याची शंका अनेकांना आधीपासून होतीच म्हणून विशेष आश्चर्य वाटत नाही. आश्चर्य अश्या गोष्टीचे वाटते कि सभ्य, चांगली माणसे अचानक "लोकेच्छा", "दिवाळीचं वेळी शांतता" इत्यादी इत्यादी करणे देऊन आणि शाब्दिक कोलांट्या उड्या मारून आपल्या आवडत्या पक्षाचे समर्थन करीत आहेत. काँग्रेस पक्ष भ्रष्ट असला तरी किमान आपल्या चमच्याची खूप काळजी घेतो. भाजपच्या समर्थानात नाचणाऱ्या भक्तगणांच्या गळ्यांत मात्र शेवटी धोंडाच पडेल असे वाटते.

पाकिस्तानी कलाकारांना भारतात का येऊ देऊ नये ह्यासाठी हास्यापद कारणे देण्यात आली - भारतात कलाकार नाहीत का, पाकिस्तानी कलाकारांना म्हणजे शेवटी पाकिस्तानी अतिरेक्यांना पैसे द्यायचे, आपण परकीयांना पैसे द्यायचे म्हणजे आपला तेवढा तोटा करून घायचा, पाकिस्तानी कलाकार भारताच्या सुरक्षेला धोका आहेत, हे प्रमुख आक्षेप होते.
या कारणात काय हास्यास्पद आहे? ज्या प्रमाणात भारतात पाकड्यांना कामे दिली जातात त्या प्रमाणात भारतीय कलाकारांना पाकिस्तानी चित्रपटात कामे दिली जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे (खरं पाकिस्तानी चित्रपटात काम करणार्‍या भारतीय कलाकारांची संख्या शून्याच्या जवळपासच आहे). कोणतीही देवाणघेवाण/व्यापार/व्यवहार एकतर्फी होऊ शकत नाही. आपण इथे बोलावून पाकड्यांना कोट्यवधी रूपये देऊन चित्रपटात झळकवायचे आणि आपल्या एकाही कलाकाराला तिथे काम नाही असे किती दिवस चालणार? पाकिस्तानी कलाकारांना जे पैसे मिळतात त्यातील काही भाग करांच्या रुपाने त्यांच्या सरकारकडे जातोच व सरकारकडून त्यातला काही भाग दहशतवादासाठी वापरला जातो. म्हणजे आपणच पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाकड्या कलाकारांच्या माध्यमातून अर्थपुरवठा करीत आहोत.
पण जर आपल्या सरकारचीदेखील अधिकृत भूमिका अशी असेल की आम्ही अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करून ते उद्वस्थ केले; आमचे पाक सरकारशी वा जनतेशी भांडण नाही, तर त्यासाठी काही कारण असेल ना? ते कारण एकच असू शकते ते म्हणजे पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांना जमेल तितके एकटे पाडावयाचे आणि इतरांचा पाठिंबा मिळवायचा नाहीतर किमान ते तटस्थ राहतील असे बघायचे. हे ह्या 'राज'कारणी नेत्यांना समजत नसेल असे नाही पण स्वतःच्या क्षुल्लक राजकारणासाठी त्यांना ते समजूनच घ्यायचे नाही.
पाकिस्तानमधील कट्टरतावाद्यांना एकटे पाडायचे हे त्यामागे कारण नाही. भारताने अशी कारवाई करून पहिल्यांदाच तसे अधिकृतरित्या जाहीर केले. पहिल्यांदाच कारवाईची जाहीर कबुली करताना भारत अत्यंत सावध होता. आम्ही फक्त दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करीत आहोत, ही कारवाई पाकिस्तानविरूद्ध नसून पूर्वी आमचाच भाग असलेल्या पाकव्याप्त काश्मिरमध्ये केली इ. स्पष्टीकरण भारताने दिले. आंतरराष्ट्रीय राजकारणात इतर देश आपल्याविरूद्ध जाऊ नयेत, आम्ही स्वसरंक्षणासाठी असे केले, इतर देशांचा आपल्याला पाठिंबा मिळावा हा त्यामागे उद्देश होता व तो उद्देश सफल झाला.
दुसरा मुद्दा पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे मिळवितात म्हणजे आपण अतिरेक्यांना आर्थिक मदत करतो. असे असेल तर इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीला कितीतरी पट जास्त पैसे पाकिस्तानातून मिळतात ते चालतात का?
का चालू नये? हरकत काय आहे?
पाकिस्तानी कलाकार भारतात येउन हेरगिरी करू शकतात, हा आक्षेपही पोकळ आहे. सलमान म्हणतो त्याप्रमाणे आपल्या सरकारनेच त्यांना व्हिसा दिलेले आहेत ना? मग जर सरकारला त्यांना इथे येऊ देण्यात धोका वाटत नसेल तर हे कोण लागून गेले स्वतःचा कायदेबाह्य अधिकार चालवणारे? (आता जर कोणी म्हणत असेल की सरकारच शिवसेना आणि मनसेचा वापर करून त्यांना भारताबाहेर काढीत आहे तर पुढे बोलावे असे काही राहात नाही.)
सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे.
शेवटचा मुद्दा म्हणजे करण जोहरला किंवा तत्सम कुणाला भारतीय कलाकार मिळत नाहीत का? हा तर प्रतिवाद करण्याच्याही लायकीचा मुद्दा नाही.
पाकिस्तान व पाकिस्तानी आपले शत्रू आहेत. त्यामुळे शत्रूला अर्थपुरवठा करण्याऐवजी इथलेच कलाकार घ्यावेत हा मुद्दा योग्यच आहे.

"सरकारने व्हिसा दिला असला तरी सरकारी निर्णयाला विरोध करण्याचा कायदेशीर हक्क सर्वांना आहे. मनसेने त्यांना विरोध केला यात काहीही चुकीचे नाही. तो मनसेला घटनेने दिलेला हक्क आहे." कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच. असो. ह्यावर वाद घालण्यात अर्थ नाही. आपण सहमत होणार नाही ह्यावर सहमत होऊया.

कायदेशीर? होच की! आणि पाच कोटी रुपये खंडणी उकळण्याचाही हक्कच.
ते पैसे मनसेला मिळणार नाहीत हो किंवा राजच्या खिशातही जाणार नाहीत. सैनिक कल्याण निधीला ते पैसे दिले जाणार आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?

In reply to by मोदक

याच गोष्टीचा अनेक लोकांना राग आला आहे गुरूजी.. सैनीक कल्याण निधीला पैसे देण्याचा हा मार्ग चुकीचा आहे हे तरी मान्य आहे का?
ती बैठक मुळात सैनिक कल्याण निधीला देणगी देण्यासाठी बोलविलेली बैठक नव्हती. चर्चेच्या माध्यमातून दिवाळीत निर्माण होणारी संभाव्य अशांतता टाळणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता. तो साध्य झाला व त्यातून भविष्यात पाकड्यांवर बंदी, सैनिक कल्याण निधीला देणगी, चित्रपटाच्या सुरवातीला उरी हल्ल्याच्या निषेधाचा फलक इ. अजून काही गोष्टी बाहेर आल्या. परंतु मूळ उद्देश आंदोलन रद्द करणे हाच होता.

In reply to by श्रीगुरुजी

ते काहीही असले तरी अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून सैनीक कल्याण निधीला देणगी देणवण्याची गोष्ट पटली नाही.

In reply to by मोदक

ते ठीक आहे. परंतु ही देणगी हा चर्चेतला सेकंडरी आऊटकम आहे. तो चर्चेतला प्राथमिक मुद्दा नव्हताच.

In reply to by श्रीगुरुजी

सैनिक कल्याण नाव घेतले की काहीही कायदेशीर होईल का? असे असले तर सैन्याचे नाव संबंधित खराब करत आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, उद्या तुमची कॉलर धरून कोणी काढ सगळे खिशातले पैसे आर्मी फंडला द्यायचे म्हणले तर तुम्ही राष्टरकार्य असल्यासारखा द्याल का आपल्या घामाचा पैसा? अन तो पैसा सैन्य स्वीकारेल ह्याची काय शाश्वती, त्यांनी नाकारल्यास तुमचा पैसा तुम्हाला परत पोच करायचे ओनस कोणाचे असेल? आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का ? ह्याचा जरूर विचार केला जावा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आपण गणपतीची वर्गणी नामे खंडणी प्रमाणे आर्मी वेल्फेयर फंड नामे नवी खंडणी जन्माला घालतोय का
सेमच बाप्पू, मला सेम उधारण आमच्या इथले आठवलेले. सगळ्यांच्या होलसेल जयंत्या ब्यंत्याचे पैसे आम्ही देत नै. नवीन दुकान टाकले की एरीयावाईज एक सर्टिफिकेट मिळते. त्याला ४-५ ह्जार मोजायचे एकवट्ट. मग त्यांचे ते सगळ्या मंडळांना पैसे देतात. मंडळे आमच्याकडे फिरकत नैत. एकूणच ह्या मिलिभगत प्रकरणात प्रथमदर्शनी विनविन सगळे दिसत असले तरी स्वतःचे मत (वर्गणी नाहि द्यायची असे) मांडायची सोय नाही. एकट्याने ह्या सिस्टिमशी लढायची ताकद नाही आणि धंदा करु की हेच करत बसू म्हणून आम्ही सहन करतो. जवळपास सर्वत्र शहरात ही सर्वमान्य प्र्याक्टीस झालीय. वरील आर्मीसाठी खंडणी प्रकरणात तोच पायंडा पडू नये हीच इच्छा.

In reply to by श्रीगुरुजी

तुमच्या मुलाला कुणी किडनॅप करून उद्या सैनिक निधीला पैसे द्यायला लावले तर ते नैतिक दृष्ट्या बरोबर वाटते का ? (उदाहरणादाखल)

आणि BTW , आपण सर्वानीच पाकड्या पाकडे इत्यादी शब्द टाळावेत. सुसंकृत माणसे असे बोलत नाहीत आपापसात. (अर्थात, ह्यालाही उत्तर असेलच. आम्ही असंस्कृत लोकांबद्दल बोलतोय, असे.)