बहुतेक गृहिणी गहु विकत आणुन गिरणीत त्याचे दळण करुन पोळ्या करत असतात...
वाहिन्यावर आशिर्वाद आदी "आटा" च्या जाहिराती झळकत असतात..
आपल्या समुहावर कुणी तयार आटा पोळ्या साठी वापतात का?
असेल तर आपला अनुभव काय आहे???
गहू आणून दळून घेणे उत्तम, तसेच घरघंटी असल्यास पाच पाच दिवसाचे ताजे ताजे पीठ वापरणे अति उत्तम,
तयार पिठात कोणते गहू व किती दिवस जुने पीठ याची खात्री नसते,
खफवर घरघंटीचे तोटे बद्दल उडत उडत ऐकले, संबंधितांनी मार्गदर्शन करावे ही विनंती!
मला वाटलं होतं जेवण, स्ट्राॅबेरी वगैरे सारखी एखादी रोम्यांटिक कथा असेल. तिचे आट्याने भरलेले हात, बाहेर पाऊस पडतोय, तो येतो आणि.... असं काहीतरी वाटलेलं. हे फारच गद्य आहे राव! छे! पूर्वीचे अकु राहिले नाहीत!
आशिर्वाद आट्याच्या चपात्या छान होतात..गार झाल्या तरी मउ /नरम राहतात..याउलट पिल्सबरी व पतन्जली आट्याचा अनुभव चान्गला नाही..पतन्जली ची फक्त किम्मत कमी आहे बाकी क्वालिटी ठीक नाही वाटली.
आशीर्वाद व्होल व्हीट आटा वापरते. पोळ्या मऊ होतात. आशीर्वाद मल्टीग्रेन बद्दल अनुभव चांगला नाही. पिल्सबरी एकदाच वापरलंय, अनुभव आठवत नाही. पतंजली बाबांचा आटा कैच्या काई वाईट्ट आहे. गिरणीत गहू दळलेल्या पिठाशी कसलीच तुलना नाही, परंतु ऑफिस आणि कंटाळ यामुळे आयतं पीठच बेस्ट वाटतं .
माझ्या घरी चक्की आहे, खास महाराष्ट्रातून आणली होती, २० वर्षांपूर्वी, (ब्रांडचे नाव देत नाही, उगाच जाहिरात होते). घरात गहू नसले (होते कधी कधी) पतंजली आटा वापरतो, अगदी घरच्या चक्की सारखा स्वाद येतो. शिवाय बाकी ब्रांडच्या आट्यामध्ये नमी प्रमाण जास्त असल्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते.
आयला मी घाबरलो होतो राव, स्ट्रॉबेरी हे फळच काकांनी असे मांडले होते का बस्स! आता 'आटा' वाचून मला कणिक मळण्यात काका काय डोकं चालवतील ही धास्तीच होती, पण देवकृपेने ह्यावेळी वाचलो म्हणायला हवे!
प्रतिक्रिया
गहू आणून दळून घेणे उत्तम,
अर्र असं हाय काय ?
काय हे अकुकाका!
+११
गव्हाच्या पोळ्या वरवर साधा
=)))
आशिर्वाद आट्याच्या चपात्या
आशीर्वाद व्होल व्हीट आटा वापरते
माझ्या घरी चक्की आहे, खास
धन्यवाद, =))
+१
'आपल्या समूहावर'? म्हणजे ही
आयला मी घाबरलो होतो राव,
हेचं म्हणतो बापु. मला तर कणिक
'आटा'करता केवढा तो आटा-पिटा !